Revised Common Lectionary (Semicontinuous)
कोरहाच्या मुलाचे स्तुतिगीत
87 देवाने आपले मंदिर यरुशलेमच्या पवित्र डोंगरावर बांधले.
2 परमेश्वराला सियोनचे द्वार इस्राएलमधल्या इतर ठिकाणापेक्षा अधिक आवडते.
3 हे देवाच्या नगरी लोक तुझ्याबद्दल आश्चर्यजनक गोष्टी सांगतात.
4 देव त्याच्या सर्व माणसांची यादी ठेवतो त्यापैकी काही मिसर आणि बाबेल मध्ये राहातात.
त्यापैकी काहींचा जन्म पलेशेथ, सोर आणि कूश येथे झाला.
5 सियोनात जन्मलेल्या प्रत्येकाला देव ओळखतो.
सर्वशक्तिमान देवाने ते नगर बांधले.
6 देव त्याच्या सर्व लोकांविषयीची यादी ठेवतो.
प्रत्येकाचा जन्म कुठे झाला ते त्याला माहीत आहे.
7 देवाचे लोक यरुशलेमला खास सण साजरा करण्यासाठी जातात.
ते खूप आनंदी आहेत.
ते गाणी गातात, नाच करतात.
ते म्हणतात, “सगळ्या चांगल्या गोष्टी यरुशलेम मधून येतात.”
युध्दाला सज्ज व्हा
9 राष्ट्रा-राष्ट्रामध्ये घोषणा करा:
युध्दाला सज्ज व्हा.
बलवान माणसांना उठवा.
सर्व योध्दे जवळ येऊ देत
त्यांना उठू द्या.
10 फाळ मोडून त्यांच्या तलवारी करा.
कोयत्यापासून भाले करा.
“दुबळ्याला मी बलवान योध्दा आहे”
असे म्हणू द्या.
11 सर्व राष्ट्रांनो, त्वरा करा!
त्या जागी एकत्र या.
हे परमेश्वरा, तुझे बलवान योध्दे आण
12 राष्ट्रांनो, उठा!
यहोशाफाटच्या दरीत गोळा व्हा.
तेथे मी सभोवतालच्या राष्ट्रांचा
न्याय करायला बसेन.
13 विळा आणा,
कारण पीक तयार झाले आहे.
या आणि द्राक्षे तुडवा.
कारण द्राक्षकुंड भरून गेले आहे.
पिंप भरून वाहत आहेत.
कारण त्यांचे पाप मोठे आहे.
14 निर्णयाच्या [a] दरीत पुष्कळशी माणसे आहेत.
परमेश्वराचा विशेष दिवस जवळ आला आहे.
15 चंद्र-सूर्य काळवंडतील.
तारे निस्तेज होतील.
16 परमेश्वर देव सियोनेहून गर्जना करील
तो यरुशलेमहून ओरडेल.
आणि आकाश व पृथ्वी कापेल
पण परमेश्वराच्या लोकांना
तो सुरक्षित स्थान असेल.
इस्राएलच्या लोकांना
तो सुरक्षित जागा असेल.
देवाचा कळप
5 आता मी तुमच्यातील वडीलजनांना आवाहन करतो (मी स्वतः एक वडील आहे आणि ख्रिस्ताच्या दु:खसहनाचा साक्षीदार आहे, तसेच भविष्यकाळात प्रकट होणाऱ्या गौरवाचा भागीदारसुद्धा आहे.) 2 तुमच्या देखभालीसाठी असलेल्या देवाच्या कळपाचे संगोपन करा. व त्याचा सर्वांगीण काळजीवाहक असल्यासारखे त्या कळपाचे पालनपोषण करा. तुम्हांला बळजबरीने करायला सांगितले म्हणून नाही, तर देवाला पाहिजे म्हणून स्वसंतोषाने कळपाचे पालनपोषण करा. तुम्ही पैशाचे लोभी आहात म्हणून काम करु नका तर तुम्ही सेवा करण्यास अधीर आहात म्हणून सेवा करा. 3 आणि ज्यांची काळजी घेण्याची कामगिरी तुमच्यावर सोपविली आहे, त्यांच्याशी एखाद्या हुकूमशहाप्रमाणे वागू नका, तर तुमच्या सर्व कळपापुढे एक उदाहरण होईल असे वागा. 4 आणि जेव्हा तुमचा मुख्य मेंढपाळ येईल, तेव्हा तुम्हाला कधीही नाश न पावणारा गौरवी मुगुट देईल. 5 त्याचप्रकारे तरुण बंधुनो, वडीलजनांच्या अधिन असा. आणि तुम्ही सर्वजण लिनतेचा पोशाख घालून एकमेकाशी विनयाने वागा कारण,
“देव गर्विष्ठ लोकांचा विरोध करतो,
पण दीनांवर कृपा करतो.” (A)
6 देवाने योग्य वेळी तुम्हांस उंच करावे यासाठी देवाच्या बलशाली हाताखाली लीनतेने राहा. 7 तुमच्या सर्व चिंता देवावर टाका, कारण तो तुमची काळजी घेतो,
8 सावध आणि जागरुक असा. तुमचा वैरी जो सैतान तो गर्जना करीत फिरणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे म्हणून सगळीकडे फिरत असतो. 9 त्याचा विरोध करा आणि तुमच्या विश्वासात खंबीर राहा. कारण तुम्हाला माहीत आहे की, जगभर असलेल्या बंधूभगिनींना अशाच प्रकारचे दु:ख सहन करावे लागले, जसे तुम्ही सध्या अनुभवीत आहात.
10 परंतु काही काळ दु:ख सहन केल्यानंतर सर्व कृपेचा उगम जो देव, ज्याने येशू ख्रिस्ताच्या अनंतकाळच्या गौरवात भागीदार होण्यासाठी तुम्हाला पाचारण केले तो स्वतः तुम्हाला पुन्हा खंबीरपणे उभे करील. तुम्हाला सामर्थ्य देईल. तुम्हाला स्थिरता देईल. 11 त्याचे सामर्थ्य अनंतकाळचे आहे! आमेन.
2006 by World Bible Translation Center