Revised Common Lectionary (Semicontinuous)
2 इतर राष्ट्रांचे लोक इतके का रागावले आहेत?
ती राष्ट्रे अशा मूर्खासारख्या योजना का आखीत आहेत?
2 त्यांचे राजे आणि पुढारी एकत्र येऊन परमेश्वराशी
आणि त्याने निवडलेल्या राजांशी भांडले.
3 ते पुढारी म्हणाले, “आपण देवाविरुध्द आणि त्याने निवडलेल्या राजाविरुद्ध उभे राहू
आपण त्यांच्यापासून स्वतंत्र होऊ.”
4 परंतु माझे स्वामी स्वर्गातील राजा
त्या लोकांना हसतो.
5-6 देव रागावला आहे आणि तो
त्या लोकांनाच सांगत आहे, “मी या माणसाची राजा म्हणून निवड केली
तो सियोन पर्वतावर राज्य करेल सियोन हा माझा खास पर्वत आहे.”
यामुळे ते दुसरे पुढारी भयभीत झाले आहेत.
7 आता मी तुम्हाला परमेश्वराच्या कराराविषयी सांगतो
परमेश्वर मला म्हणाला, “आज मी तुझा बाप झालो!
आणि तू माझा मुलगा झालास.
8 जर तू विचारले तर मी तुला राष्ट्रे देईन
या पृथ्वीवरची सगळी माणसे तुझी होतील.
9 लोखंडाची कांब जशी मातीच्या भांड्याचा [a] नाश करते
तसा तू त्या राष्ट्रांचा नाश करू शकशील.”
10 म्हणून राजांनो तुम्ही शहाणे व्हा
राज्यकर्त्यांनो हा धडा शिका.
11 परमेश्वराच्या आज्ञांचे भीतीयुक्त पालन करा.
12 तुम्ही देवपुत्रासी प्रामाणिक आहात हे दाखवा.
तुम्ही जर असे केले नाही तर तो रागावेल आणि तुमचा नाश करेल जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात ते सुखी असतात.
पण इतरांनी मात्र सावधगिरी बाळगली पाहिजे.
तो आता आपला राग प्रकट करण्याच्या बेतात आहे.
12 पण यहूदातील लोक म्हणतील, ‘असा प्रयत्न करुन काही भले होणार नाही. आम्हाला पाहिजे तेच आम्ही करीत राहू आमच्यातील प्रत्येकाच्या हट्टी आणि दुष्ट मनाला वाटेल तेच आम्ही करु.’”
13 परमेश्वर सांगत असलेल्या गोष्टी ऐका:
“दुसऱ्या राष्ट्रांना हा प्रश्न विचारा.
‘इस्राएलने केलेल्या पापाप्रमाणे, पापे आणखी कोणी केल्याचे तुम्ही ऐकले आहे का?’ आणि इस्राएल तर देवाच्या दृष्टीने विशेष आहे. ती देवाच्या वधूप्रमाणे आहे.
14 तुम्हाला हेही माहीत आहे की लबानोनमधील पर्वतांवरचे बर्फ कधीच वितळत नाही
व थंड व सतत वाहणारे झरे कधीच सुकत नाहीत.
15 पण माझे लोक मला विसरले आहेत.
ते कवडी मोलाच्या मूर्तींना वस्तू अर्पण करतात.
ते जे काय करतात, त्यालाच अडखळतात
त्यांच्या पूर्वजांच्या जुन्या रस्त्यांपाशी ते अडखळतात माझी माणसे,
माझ्यामागून चांगल्या मार्गाने येण्याऐवजी,
आडवळणाने व वाईट मार्गाने जाणे पसंत करतील.
16 म्हणून यहूदाचा देश म्हणजे
एक निर्जन वाळवंट होईल.
ह्या देशाच्या जवळून जाताना, प्रत्येकवेळी लोक धक्क्याने मान हलवून नि:श्वास सोडतील.
ह्या देशाचा, अशा रीतीने, नाश झालेला पाहून त्यांना धक्का बसेल.
17 मी यहूदाच्या लोकांची फाटाफूट करीन.
ते त्यांच्या शत्रूंपासून पळ काढतील.
पूर्वेकडचा वारा ज्याप्रमाणे सर्व वस्तू दूर उडवून देतो, त्याप्रमाणे मी यहूदातील लोकांना दूर पसरवून देईन.
मी त्या लोकांचा नाश करीन.
मी त्यांच्या मदतीला येत आहे, असे त्यांना दिसण्याऐवजी, मी त्यांना सोडून जाताना दिसेन.”
यिर्मयाचे चौथे गाऱ्हाणे
18 नंतर यिर्मयाचे शत्रू म्हणाले, “या आपण यिर्मयाविरुध्द कट करु या. नियमांची शिकवण याजकांकडून नक्कीच विसरली जाणार नाही. सुज्ञांचा सल्ला अजूनही आमच्याजवळ असेल. आमच्यापाशी संदेष्ट्याचे शब्द असतील. म्हणून त्याच्याबद्दल खोटे सांगू या. त्यामुळे त्याचा नाश होईल. तो सांगत असलेल्या कोणत्याही गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचे नाही.”
19 परमेश्वरा, माझे ऐक!
माझे म्हणणे ऐकून घे आणि कोण बरोबर आहे ते ठरव.
20 चांगल्याची परतफेड लोकांनी दुष्टाव्याने करावी का?
नाही! देवा, मी केलेल्या गोष्टी तुला आठवतात का?
मी तुझ्यासमोर उभा राहिलो आणि ह्या लोकांना तू शिक्षा करु नये म्हणून
त्यांच्याविषयी चांगल्या गोष्टी मी तुला सांगितल्या.
पण ते मला सापळ्यात पकडून ठार मारायला बघत आहेत.
21 म्हणून दुष्काळात त्यांच्या मुलांची उपासमार होऊ देत.
त्यांचे शत्रू तलवारीने त्यांचा पराभव करु देत.
त्यांच्या बायका वांझ होऊ देत. यहूदातील पुरुषांना मृत्यू येऊ देत.
त्यांच्या बायकांना विधवा कर युद्धात तेथील तरुण मारले जाऊ देत.
22 त्यांच्या घरांत शोककळा पसरु देत.
शत्रूला, अचानक, त्यांच्यावर आक्रमण करायला लावून त्यांना रडव.
माझ्या शत्रूंनी मला सापळ्यात पकडण्याचा प्रयत्न केला, म्हणून हे सर्व घडू देत.
मी सापळ्यात अडकावे म्हणून त्यांनी आपला सापळा लपवून ठेवला आहे.
23 परमेश्वरा, मला मारण्यासाठी त्यांनी रचलेले बेत तुला माहीत आहेतच.
त्यांना त्यांच्या अपराधांबद्दल क्षमा करु नकोस.
त्यांची पापे पुसून टाकू नकोस.
माझ्या शत्रूंचा नाश कर.
तू रागावला असतानाच त्या लोकांना शिक्षा कर.
आपल्या जीवनाचे रहस्य
14 मी तुझ्याकडे लवकरच येण्याची इच्छा धरून असलो तरी मी तुला या गोष्टी लिहीत आहे. 15 यासाठी की, जरी मला उशीर झाला तरी देवाच्या घरात म्हणजे जिवंत देवाच्या मंडळीत एखाद्या व्यक्तीने कसे वागावे हे तुला माहीत असावे. ती मंडळी सत्याचा खांब व पाया अशी आहे. 16 आणि आपल्या सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे:
तो मानवी शरीरात दिसला;
आत्म्याने तो नीतिमान ठरविला गेला,
देवतूतांनी त्याला पाहीले होते;
राष्ट्रांमध्ये तो गाजविला गेला.
जगाने त्याच्यावर विश्वास ठेवला
आणि स्वर्गामध्ये तो गौरवाने घेतला गेला.
खोठ्या सिक्षकांविरुद्ध इशारा
4 आत्मा स्पष्ट म्हणतो की, नंतरच्या काळात काही जण विश्वास सोडतील, ते भविष्य सांगणारे आत्मे, जे फसविणारे आहेत त्यांच्याकडे लक्ष देतील, 2 आणि भूतापासून येणाऱ्या शिक्षणाकडे आणि ढोंगी फसविणाऱ्यां कडे लक्ष देतील. 3 ते लोकांना लग्न करण्यास मना करतात व काही अन्नपदार्थ टाळण्यासाठी सांगतात. जे विश्वासणारे आहेत, व ज्यांना सत्य माहीत आहे अशांनी उपकार मानून घेण्यासाठी देवाने ते निर्माण केले आहेत. 4 कारण देवाने केलेली प्रत्येक गोष्ट चांगली आहे व जर उपकार मानून आम्ही घेतो तर कोणतीही गोष्ट नाकारु नये. 5 कारण प्रत्येक वेळी ती देवाच्या शब्दाने आणि प्रार्थनेने पवित्र केली जाते.
2006 by World Bible Translation Center