Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तुतिगीत.
139 परमेश्वरा, तू माझी परीक्षा घेतलीस
तुला माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे.
2 मी केव्हा बसतो आणि केव्हा उठतो ते
तुला माहीत आहे तुला माझे विचार खूप दुरुनही कळतात.
3 परमेश्वरा, मी कुठे जातो आणि केव्हा झोपतो ते तुला कळते.
मी जे जे करतो ते सर्व तुला माहीत आहे.
4 परमेश्वरा, मला काय म्हणायचे आहे
ते तुला माझे शब्द तोंडातून बाहेर पडायच्या आधीच कळते.
5 परमेश्वरा, तू माझ्या सभोवताली आहेस.
माझ्या पुढे आणि माझ्या मागे आहेस तू तुझा हात हळूवारपणे माझ्यावर ठेवतोस.
6 तुला जे सर्वकाही माहीत आहे
त्याचे मला आश्र्चर्य वाटते ते समजून घेणे मला खूप कठीण वाटते.
13 परमेश्वरा, तू माझे संपूर्ण शरीर निर्माण केलेस
मी माझ्या आईच्या गर्भात होतो तेव्हाच तुला माझ्याबद्दल सर्वकाही माहीत होते.
14 परमेश्वरा, मी तुझी स्तुती करतो.
तू मला अद्भुत आणि अतिशय सुंदररीतीने निर्मिलेस
तू जे केलेस ते खूपच अद्भुत आहे हे मला चांगलेच माहीत आहे.
15 तुला माझ्याबद्दल सारे माहीत आहे
माझे शरीर आईच्या गर्भात लपून आकार घेत होते तेव्हा तू माझी हाडे वाढत असताना पाहिलीस.
16 माझे अवयव वाढत असताना तू पाहिलेस तू तुझ्या पुस्तकात त्यांची यादी केलीस.
तू माझी रोज पाहणी केलीस.
त्यातला एकही अवयव हरवलेला नाही.
17 तुझे विचार मला महत्वाचे आहेत,
देवा तुला खूप माहिती आहे.
18 मी जर ती मोजू लागलो तर ती वाळूच्या कणांपेक्षाही जास्त असेल.
आणि जेव्हा माझी झोप संपेल तेव्हा मी तुझ्याजवळच असेन.
यिर्मयाचे पुन्हा देवाकडे गाऱ्हाणे
10 माते, तू मला (यिर्मयाला) जन्म दिलास
याचा मला खेद वाटतो.
वाईट गोष्टीबद्दल सर्व देशावर दोषारोप
व टीका करणे माझ्यासारख्याला भाग पडते.
काहीही देणे घेणे नसताना,
मला प्रत्येकजण शिव्याशाप देतो.
11 खरे म्हणजे परमेश्वरा, मी तुझी चांगली सेवा केली.
संकटाच्या वेळी मी शत्रूंबद्दल तुझ्याकडे विनवणी केली.
देवाचे यिर्मयाला उत्तर
12 “यिर्मया, लोखंडाच्या तुकड्याचे कोणीही शतशा तुकडे करु शकत नाही,
हे तुला माहीत आहे.
येथे लोखंड वा पोलाद हा शब्द मी उत्तरेकडून येणाऱ्या पोलादासाठी वापरत आहे.
तसेच कोणीही काशाचे पण तुकडे तुकडे करु शकत नाही.
13 यहूदाच्या लोकांकडे बरीच संपत्ती आहे ती संपत्ती मी दूसऱ्या लोकांना देईन.
ती त्या लोकांना विकत घ्यावी लागणार नाही.
मीच ती त्यांना देईन.
का? कारण यहूदाच्या लोकांनी खूप पापे केली.
यहूदाच्या प्रत्येक भागात त्यांनी पापे केली.
14 यहूदातील लोकांनो, मी तुम्हाला तुमच्या शत्रूचे गुलाम करीन.
तुम्हाला अनोळखी असलेल्या प्रदेशात तुम्ही गुलाम व्हाल.
मी खूप रागावलो आहे.
माझा राग प्रखर अग्नीसारखा आहे.
त्यात तुम्ही जाळले जाल.”
15 परमेश्वरा, तू मला जाणतोस माझी आठवण ठेव
व माझी काळजी घे.
लोक मला दुखवत आहेत
त्यांना योग्य ती शिक्षा कर.
त्या लोकांशी तू संयमाने वागतोस.
पण त्यांना संयम दाखविताना,तू माझा नाश करू नकोस.त्यांच्याशी त्यांच्याशी संयमाने वागताना,
माझा, मी तुझ्यासाठी भोगत असलेल्या दु:खाचा परमेश्वरा विचार कर.
16 मला तुझा संदेश मिळाला व मी तो खाल्ला (आत्मसात केला.)
तुझ्या संदेशाने मला खूप आनंद झाला.
तुझ्या नावाने ओळखले जाण्यात मला आनंद वाटतो कारण तुझे नावच सर्वशक्तिमान परमेश्वर असे आहे.
17 लोकांच्या हसण्याखिदळण्यात
आणि जल्लोशांत मी कधीच सामील झालो नाही.
माझ्यावर तुझा प्रभाव असल्याने मी एकटाच बसून राहिलो.
आजूबाजूला असलेल्या दुष्टाईबद्दल तू माझ्यात क्रोध भरलास.
18 पण तरीसुद्धा मी दुखावला का जातो?
माझ्या जखमा भरुन येऊन बऱ्या का होत नाहीत,
ते मला समजत नाही.
देवा, मला वाटते तू बदललास पाणी आटून गेलेल्या झऱ्याप्रमाणे तू झालास.
ज्यातून पाणी वाहायचे थांबले आहे अशा प्रवाहाप्रमाणे तू झालास.
19 मग परमेश्वर म्हणाला, “यिर्मया, तू बदललास आणि माझ्याकडे परत आलास,
तर मी शिक्षा करणार नाही.
मगच तू माझी सेवा करु शकतोस वायफळ बडबड न करता, महत्वाचे तेवढेच बोललास,
तर तू माझे शब्द बोलू शकतोस.
यहूदातील लोकांनी बदलावे
व तुझ्याकडे परत यावे.
यिर्मया! पण तू मात्र त्यांच्यासारखा होऊ नकोस.
20 त्या लोकांना तू काश्याची भिंत वाटशील,
एवढा मी तुला बलवान करीन.
ते तुझ्याविरुद्ध लढतील,
पण ते तुझा पराभव करु शकणार नाहीत.
का? कारण मी तुझ्या पाठीशी आहे
मी तुला मदत करीन आणि तुझे रक्षण करीन.”
हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
21 “त्या दुष्ट लोकांपासून मी तुझे रक्षण करीन.
ते लोक तुला घाबरवितात.
पण त्यांच्यापासून मी तुला वाचवीन.”
25 एपफ्रदीत, जो माझा बंधु आहे. सहकारी व सहशिपाई आहे, त्याला तुमच्याकडे पाठविण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटले, तसेच तो तुमचा प्रतिनिधी आहे जो माझ्या गरजेच्या वेळी मला साहाय्य करतो. मी असे करण्याचे ठरविले आहे कारण तो तुम्हा सर्वांना भेटण्यास आतुर झाला आहे. 26 मी त्याला पाठवितो कारण त्याला तुम्हांला फार भेटावेसे वाटते. तुम्ही तो आजरी असल्याचे जे ऐकले त्यामुळे त्याला काळजी वाटत आहे. 27 तो खरोखरच आजारी होता, अगदी मरणाला टेकला होता, पण देवाने त्याच्यावर करुणा केली; त्याच्यावरच केली असे नाही, तर माझ्यावरही केली; यासाठी की, मला आणखी दु:ख होऊ नये. 28 म्हणून, अधिक अधीरतेने, मी त्याला पाठवित आहे. यासाठी की जेव्हा तुम्ही त्याला पाहाल तेव्हा पुन्हा एकदा तुम्ही आनंदी व्हाल आणि मी निश्रिंत असेन. 29 म्हणून, प्रभूमध्ये त्याचे स्वागत करा आणि अशा लोकांचा सन्मान करा, कारण ख्रिस्ताच्या कामासाठी तो जवळजवळ मेला होता. 30 त्याने त्याचे जीवन धोक्यात घातले, यासाठी की, माझी सेवा करण्यात तुमच्या जी उणीव होती ती भरुन काढावी.
2006 by World Bible Translation Center