Revised Common Lectionary (Semicontinuous)
19 परमेश्वरा, लक्षात ठेव.
मी फार दु:खी आहे, व मला घर नाही.
तू दिलेल्या कडू विषाचे (शिक्षेचे) स्मरण कर.
20 मला माझ्या सर्व त्रासांची आठवण आहे.
म्हणूनच मी दु:खी आहे.
21 पण मी पुढील काही गोष्टींचा विचार
केला की मला आशा वाटते.
22 परमेश्वराच्या प्रेम व दयेला अंत नाही.
परमेश्वराची करुणा चिरंतन आहे.
23 ती प्रत्येक दिवशी नवीन, ताजी असते.
परमेश्वरा, तुझी विश्वासार्हता महान आहे.
24 मी मनाशी म्हणतो, “परमेश्वर माझा देव आहे.
म्हणूनच मला आशा वाटेल.”
25 परमेश्वराची वाट पाहणाऱ्यांवर
व त्याला शोधणाऱ्यांवर तो कृपा करतो.
26 परमेश्वराने आपले रक्षण करावे
म्हणून मुकाट्याने वाट पाहणे केव्हाही चांगले.
12 बाबेलच्या राजाच्या खास रक्षकांचा प्रमुख नबूजरदान हा, नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या 19 व्या वर्षीच्या पाचव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, यरुशलेमला आला. नबूजरदान बाबेलमधील एक महत्वाचा अधिकारी होता. 13 नबूजरदानने परमेश्वराचे मंदिर जाळले. त्याने राजवाडा व यरुशलेममधील इतर घरेही जाळली. त्याने तेथील सर्व महत्वाच्या इमारती बेचिराख केल्या. 14 बाबेलच्या सैन्याने यरुशलेमची तटबंदी पाडली. त्या सैन्याचा सेनापती राजाच्या खास रक्षकांचा प्रमुख होता. 15 सेनापती नबूजरदानने यरुशलेममध्ये अजूनही राहत असलेल्या [a] सर्व लोकांना कैदी म्हणून नेले. बाबेलच्या राजाला आधीच शरण आलेल्यांनाही तो घेऊन गेला. यरुशलेममध्ये मागे राहिलेले कुशल कारागीरही त्याने बरोबर नेले. 16 पण नबूजरदानने काही अगदी गरीब लोकांना द्राक्षमळ्यांत व शेतांत काम करण्यासाठी मागेच ठेवले.
17-18 बाबेलच्या सैन्याने मंदिरातील पितळी खांब, घंगाळ व बैठकी [b] मोडल्या. त्यांनी ते सर्व पितळ बाबेलला नेले. त्याचबरोबर पात्रे, फावडी, वात सारखी करण्याच्या कात्र्या, वाडगे, तसराळी आणि मंदिरातील पूजेची उपकरणेही नेली. 19 राजाच्या खास रक्षकांच्या प्रमुखाने कुंडे, विस्तव ठेवण्याची पात्रे, वाडगे, पात्रे, दीपदाने. तसराळी आणि अर्पण केलेली पेयार्पणे ठेवण्याचे प्याले अशा सर्व वस्तू नेल्या. थोडक्यात त्याने चांदी सोन्याच्या सर्व वस्तू नेल्या. 20 दोन खांब, घंगाळ, त्याखालील बारा बैल व सरकत्या बैठकी अतिशय जड होत्या. शलमोन राजाने त्या परमेश्वराच्या मंदिरासाठी बनविल्या होत्या. ह्या वस्तूंसाठी वापरलेल्या पितळाचे वजन करणे अशक्य होते.
21 प्रत्येक खांब 31 फूट उंच होता. त्याचा घेर 21 फूट होता-हे खांब पोकळ होते. खांबाचा पत्रा 4 इंच जाडीचा होता. 22 पहिल्या खांबाचा पितळेचा कळस 8 फूट उंच होता. जाळीकाम व चारी बांजूनी डाळिंबे कोरुन तो सुशोभित केलेला होता. दुसऱ्या खांबावरही डाळिंबे कोरलेली होती. तो पहिल्या खांबासारखाच होता. 23 खांबांच्या बाजूंवर 96 डाळिंबे कोरलेली होती. खांबाच्या भोवती असलेल्या जाळीकामावर सर्व मिळून 100 डाळिंबे होती.
24 राजाच्या खास रक्षकांच्या प्रमुखाने सराया व सफन्या यांना कैद करुन नेले. सराया महायाजक होता, तर सफन्या दुय्यम महायाजक होता. तीन द्वारपालांनाही कैदी म्हणून नेले 25 राजाच्या खास रक्षकांच्या प्रमुखाने सैनिकांवर नेमलेला अधिकारी, तोपर्यंत नगरात असलेले राजाचे सात सल्लागार, सैन्यात भरती होणाऱ्यांची नोंद ठेवणारा लेखनिक, आणि नगरात असलेले साठ सामान्य लोक यांना कैद केले. 26-27 सेनापती नबूजरदानने ह्या सर्व अधिकाऱ्यांना बाबेलच्या राजाकडे आणले बाबेलचा राजा तेव्हा रिब्ला शहरात होता. रिब्ला हमाथ देशात आहे. रिब्लामध्ये राजाने त्या सर्वांना ठार करण्याचा हुकूम दिला.
अशा तऱ्हेने यहूदी लोकांना त्यांच्या देशातून नेले गेले. 28 आणि अशाप्रकारे नबुखद्नेस्सरने त्यांना कैद केले
नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या 7 व्या वर्षी 3,023 यहूदी लोकांना यहूदातून पकडून नेले.
29 नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या 18 व्या वर्षी 832 लोकांना यरुशलेममधून नेले.
30 नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या 23 व्या वर्षी नबूजरदानने 745 लोकांना कैद केले. तो राजाच्या खास रक्षकांचा प्रमुख होता.
एकूण 4,600 लोकांना कैदी म्हणून नेण्यात आले.
पर्गम येथील मंडळीला
12 “पर्गम येथील मंडळीच्या दूताला लिही:
“ज्याच्याकडे दोन्ही बाजूंनी धार असणारी तीक्ष्ण तरवार आहे, त्याचे हे शब्द आहेत, 13 मला माहीत आहे जेथे सैतानाचे सिंहासन आहे तेथे तुम्ही राहता. तरीही तुम्ही माझ्या नावात दृढ आहात. अंतिपाच्या काळामध्येसुद्धा माझ्यावर तुमचा असलेला विश्वास तुम्ही नाकारला नाही. अंतिपा माझा विश्वासू साक्षीदार होता. तो तुमच्या शहरात मारला गेला. सैतान जेथे राहतो असे ते तुमचे शहर आहे.
14 “तरीही तुमच्याविरुद्ध माझे म्हणणे आहे: तुमच्यात असे लोक आहेत की जे बलामाची शिकवण आचरणात आणतात. बलामाने बालाकाला इस्राएल लोकांना पाप करायला कसे लावायचे ते शिकविले. त्या लोकांनी लैंगिक पापे करुन आणि मूर्तीला वाहिलेले अन्न खाऊन पाप केले. 15 त्याचप्रमाणे निकलाईताची शिकवण आचरणारे तुमच्यामध्येसुद्धा काहीजण आहेत. 16 म्हणून पश्चात्ताप करा! नाहीतर मी लवकरच तुमच्याकडे येईन आणि आपल्या तोंडातील तरवारीने त्यांच्याशी लढेन.
17 “आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.
“जो विजय मिळवितो त्याला मी लपवून ठेवलेल्या मान्यातून काही देईन. मी त्याला पांढरा दगड (खडा) देईन ज्यावर नवीन नाव लिहिलेले असेल. ज्याला तो प्राप्त होईल त्यालाच ते समजेल.
थुवतीरा येथील मंडळीला
18 “थुवतीरा येथील मंडळीच्या दूताला लिही:
“देवाचा पुत्र हे सांगत आहे, ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि ज्याचे पाय चमकणाऱ्या पितळासारखे आहेत.
19 “मला तुमची कामे, तुमचे प्रेम आणि विश्वास, तुमची सेवा आणि धीर माहीत आहे. आणि तुम्ही पहिल्यापेक्षा आता जास्त करीत आहात हे माहीत आहे. 20 तरीसुद्धा तुमच्याविरुद्ध माझे म्हणणे आहे: इजबेल नावाची स्त्री जी स्वतःला संदेष्टी म्हणविते आणि ती तिच्या शिकवणीने माझ्या सेवकांना अनैतिक लैंगिक पाप व मूर्तीसमोर ठेवलेले अन्न खावयास मोहविते. तरी तुम्ही तिला खुशाल तसे करु देता. 21 मी तिला तिच्या अनैतिक लेंगिक पापाविषयी पश्चात्ताप करण्यासाठी वेळ दिला आहे. परंतु ती तसे करायला तयार नाही.
22 “म्हणून मी तिला दु:खाच्या बिछान्यावर खिळवीन आणि जे तिच्याबरोबर व्यभिचाराचे पाप करतात त्यांना भयंकर दु:ख भोगावयास लावीन. जर ती तिच्या मार्गापासून पश्र्चात्ताप पावली नाही 23 तर मी तिच्या अनुयायांना ठार मारुन टाकीन. मग सर्व मंडळ्यांना हे कळेल की मी तो आहे जो अंतःकरणे आणि मने पारखतो. तुमच्या कृतींप्रमाणे मी प्रत्येकाला तुमचा मोबदला देईन.
24 “पण थुवतीरा येथील मंडळीतील जे दुसरे लोक आहेत जे तिची शिकवण आजरीत नाहीत त्यांना मी सांगतो की, ज्या तुम्ही सैतानाची म्हणविलेली खोल गुपिते जाणली नाहीत, त्या तुमच्यावर मी दुसरे ओझे लादणार नाही. 25 मी येईपर्यंत जे तुमच्याकडे आहे त्याला धरुन राहा.
26 “जो विजय मिळवितो व शेवटपर्यंत माझ्या इच्छेप्रमाणे करतो त्याला मी राष्ट्रांवर अधिकार देईन. 27 तो त्यांच्यावर लोहदंडाने अधिकार गाजवील मातीच्या भांड्यासारखा तो त्यांचा चुराडा करील. जसा पित्याकडून मला अधिकार प्राप्त झाला आहे, check add footnote 28 तसा मीसुद्धा त्याला पहाटेचा तारा देईन. 29 आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.
2006 by World Bible Translation Center