Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी “नष्ट करु नकोस” या चालीवरचे आसाफाचे स्तोत्र
75 देवा, आम्ही तुझी स्तुती करतो.
आम्ही तुझी स्तुती करतो.
तू जवळ आहेस आणि लोक तू करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगतात.
2 देव म्हणतो “मी न्यायदानाची वेळ निवडली,
मी बरोबर न्याय करीन.
3 पृथ्वी आणि तिच्यावरील सारे काही थरथर कापेल
आणि पडायला येईल पण मी त्याला स्थिरता देईन.”
4-5 “काही लोक गर्विष्ठ असतात.
ते शक्तीशाली आणि महत्वपूर्ण आहेत असे त्यांना वाटते,
परंतु मी त्यांना सांगतो, ‘फुशारक्या मारु नका.
एवढे गर्विष्ठ बनू नका.’”
6 या पृथ्वीवर एखाद्या व्यक्तीला मोठा बनवू शकेल
अशी कोणतीही शक्ती नाही. [a]
7 देव न्यायाधीश आहे. कोणी मोठे व्हायचे ते देवच ठरवतो.
देव एखाद्याला वर उचलतो आणि त्याला मोठे बनवतो.
देव एखाद्याला खाली उतरवतो आणि त्याला मोठा करत नाही.
8 देव दुष्टांना शासन करण्यास तयार आहे.
परमेश्वराच्या हातात पेला आहे.
तो पेला विषयुक्त द्राक्षारसाने भरलेला आहे.
तो तो द्राक्षारस ओतेल आणि दुष्ट लोक तो शेवटच्या थेंबापर्यंत पितील.
9 मी नेहमी लोकांना याबद्दल सांगेन.
मी इस्राएलाच्या देवाचे गुणगान करीन.
10 मी दुष्टांकडून सत्ता काढून घेईन
आणि मी चांगल्या लोकांकडे सत्ता देईन.
मवाब इस्राएलपासून वेगळा होतो
4 मेशा हा मवाबचा राजा होता. त्याच्याकडे मेंढयांचे बरेच कळप होते. एक लक्ष मेंढया आणि एक लक्ष एडके यांची लोकर तो इस्राएलच्या राजाला देत असे. 5 पण अहाबच्या मृत्यूनंतर तो इस्राएलच्या सत्तेपासून फुटून वेगळा झाला.
6 यहोराम मग शोमरोन मधून बाहेर पडला आणि त्याने सर्व इस्राएल लोकांना एकत्र केले. 7 यहूदाचा राजा यहोशाफाट याच्याकडे त्याने आपले दूत पाठवले. यहोरामने निरोप पाठवला, “मवाबच्या राजाने बंड केले आहे तेव्हा त्याच्यावर हल्ला करायला तुम्ही माझ्या बाजूने याल का?”
यहोशाफाटने सांगितले, “होय, मी जरुर येईन तुझ्या माझ्यात काही भेदभाव नाही. माझे सैन्य, ते तुझे सैन्य माझे घोडे ते तुझे घोडे.”
तीन राजांची अलीशाकडे विचारणा
8 “कोणत्या वाटेने हल्ला करायला जायचे” यहोशाफाटने यहोरामला विचारले.
यावर, “अदोमच्या वाळवंटाच्या दिशेने” असे यहोरामने सांगितले.
9 इस्राएलचा राजा, यहूदा आणि अदोम यांच्या राजांबरोबर निघाला. सात दिवस त्यांनी वाटचाल केली. त्यांचे सैन्य, तसेच त्यांच्याबरोबरची जनावरे यांच्यासाठी पुरेसे पाणी नव्हते. 10 तेव्हा इस्राएलचा राजा यहोराम म्हणाला, “मवाबांच्या हातून पराभव पत्करावा लागावा म्हणून का परमेश्वराने आम्हा तीन राजांना एकत्र आणले आहे.?”
11 यावर यहोशाफाट म्हणाला, “येथे एखादा परमेश्वराचा संदेष्टा नक्कीच असला पाहिजे. आपण काय करावे असे परमेश्वराला वाटते ते आपण त्यालाच विचारु या.”
यहोरामचा एक सेवक म्हणाला, “शाफाटचा मुलगा अलीशा इथेच आहे. एलीयाच्या हातावर तो पाणी घालत असे, त्याचा तो सेवक होता.”
12 यहोशाफाट म्हणाला, “अलीशाच्या मुखातून परमेश्वरच बोलतो.”
मग इस्राएलचा राजा यहोराम, यहोशाफाट आणि अदोमचा राजा असे तिघे जण अलीशाकडे गेले.
13 अलीशा यहोरामला म्हणाला, “माझ्याकडून तुला काय पाहिजे? तू आपल्या वडीलांच्या किंवा आईच्या संदेष्ट्यांकडे जा.”
तेव्हा इस्राएलच्या राजा अलीशाला म्हणाला, “नाही, आम्ही तुझ्याकडे आलो आहोत कारण मवाबांचा पराभव करायला आम्हा तीन राजांना परमेश्वराने एकत्र आणले आहे. आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे.”
14 अलीशा म्हणाला, “मी यहुदाचा राजा यहोशाफाट याचा आदर करतो व सर्वशक्तीमान परमेश्वराचा मी सेवक आहे. त्याला स्मरुन मी सांगतो की यहूदाचा राजा यहोशाफाट याच्यामुळे मी येथे आलो आहे. मी तुम्हाला खरे सांगतो जर यहूदाचा राजा यहोशाफाट इथे नसता तर मी तुझी दखलही घेतली नसती. 15 तेव्हा आता एखाद्या वीणावादकाला इथे बोलावून आणा.”
एक वादक येऊन वीणा वाजवू लागला तेव्हा परमेश्वराचे सामर्थ्य अलीशात आले. 16 मग अलीशा म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे असे आहे: या खोऱ्यात जागोजाग खणून ठेवा 17 परमेश्वर म्हणतो तुम्हाला वारा, पाऊस काही दिसणार नाही पण तरीही हे खोरे पाण्याने भरुन जाईल. तुम्हाला आणि तुमच्या जनावरांना पाणी मिळेल. 18 परमेश्वराला एवढे करणे सोपे आहे. मवाबांचाही तुम्हाला तो पराभव करु देईल. 19 प्रत्येक तटबंदीच्या व चांगल्या बंदोबस्त आणि निवडक नगरांवर तुम्ही हल्ला कराल. प्रत्येक चांगला वृक्ष तुम्ही तोडून टाकाल, पाण्याचे झरे, विहिरी बुजवून टाकाल. दगडफेक करुन चांगल्या शेतांची नासाडी कराल.”
20 नंतर सकाळी, सकाळच्या यज्ञाच्या वेळी, अदोमच्या बाजूने पाण्याचा लोंढा आला आणि सगळे खोरे पाण्याने भरले.
6 पोकळ भाषणाने कोणी तुम्हांला फसवू नये. कारण या कारणांमुळे जे आज्ञा मोडतात, त्यांच्यावर देवाचा क्रोध येणार आहे. 7 म्हणून त्यांचे भागीदार होऊ नका. 8 मी हे सांगतो कारण एके काळी तुम्ही पूर्णपणे अंधारात होता, पण आता तुम्ही प्रभूचे अनुयायी म्हणून पूर्ण प्रकाशात आहात. प्रकाशात चालणाऱ्या लेकरांसारखे व्हा. 9 कारण प्रकाशाची फळे प्रत्येक चांगुलपणात, नीतीमत्वात, आणि सत्यात दिसून येतात. 10 नेहमी प्रभूला कशाने संतोष होईल हे शोधण्याचा प्रयत्न करा. 11 आणि अंधाराची जी निष्फळ कार्ये आहेत त्यांचे भागीदार होऊ नका. तर उलट, ती उघडकीस आणा. 12 कारण ज्या गुप्त गोष्टी त्यांनी केल्या आहेत, त्याविषयी बोलणेही लज्जास्पद आहे. 13 पण जेव्हा सर्व काही प्रकाशाद्वारे उघड होते, तेव्हा प्रत्येक गोष्ट दिसते. 14 आणि जी प्रत्येक गोष्ट दिसते, ती प्रकाश आहे. म्हणूनच आम्ही असे म्हणतो:
“हे झोपलेल्या जागा हो
व मेलेल्यांतून ऊठ,
आणि ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशेल.”
15 म्हणून, तुम्ही कसे जगता, याविषयी सावध असा. मूर्ख लोकांसारखे होऊ नका, तर शहाण्या लोकांसारखे व्हा. 16 जे चांगल्या संधीचा उपयोग करतात. कारण हे दिवस वाईट आहेत. 17 म्हणून मूर्खासारखे वागु नका, तर उलट देवाची इच्छा काय आहे ते जाणून घ्या. 18 द्राक्षारस पिऊन झिंगल्यासारखे राहू नका. त्यामुळे मनुष्य सर्वच बाबतीत बेताल होतो. उलट आत्म्याने पूर्ण भरले जा, 19 स्तोत्रे, गीते, आणि आध्यात्मिक गीतांनी एकमेकाबरोबर सुसंवाद साधा, गाणी गा, आणि आपल्या अंतःकरणात प्रभूसाठी गायने गा. 20 आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावात देव जो आपला पिता आहे त्याचे प्रत्येक गोष्टीबद्दल नेहमी उपकार माना.
2006 by World Bible Translation Center