Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुक गायकासाठी दावीदाचे मास्कील (बोधपर स्तोत्र) “दावीद अहीमलेखाच्या घरी आला आहे” असे देवगअदोमीने शौलाकडे येऊन सांगितले त्यावेळचे स्तोत्र
52 बलवान पुरुषा, तू तुझ्या दुष्कर्मांची बढाई का करीत आहेस?
तू देवाला एक कलंक आहेस.
तू दिवसभर वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखतोस.
2 तू मूर्खासारख्या योजना आखतोस आणि तुझी जीभ धारदार वस्तऱ्यासारखी भयंकर आहे.
तू नेहमी खोटे बोलतोस आणि कुणाची तरी फसवणूक करण्याच्या बेतात असतोस.
3 तू चांगल्यापेक्षा वाईटावर अधिक प्रेम करतोस.
तुला खरे बोलण्यापेक्षा खोटे बोलणे अधिक आवडते.
4 तुला आणि तुझ्या खोटे बोलणाऱ्या जिभेला लोकांना त्रास द्यायला आवडते.
5 म्हणून देव तुझा कायमचा नाश करेल.
तो तुला पकडून तुझ्या घरातून बाहेर खेचेल.
तो तुला मारुन टाकेल आणि तुझा निर्वंश करेल.
6 चांगले लोक ते बघतील आणि त्यावरुन.
ते देवाला घाबरायला आणि त्याचा आदर करायला शिकतील.
ते तुला हसतील.
7 व म्हणतील, “जो देवावर अवलंबून नव्हता त्याचे काय झाले पाहा त्याची संपत्ती आणि
त्याचे खोटे बोलणे त्याला वाचवू शकेल असे त्याला वाटत होते.”
8 पण देवाच्या मंदिरात मी हिरव्यागार व दीर्घकाळ जगणाऱ्या जैतून झाडासारखा आहे.
मी देवाच्या प्रेमावर सदैव विश्र्वास ठेवतो.
9 देवा, तू केलेल्या गोष्टींबद्दल मी सर्वकाळ तुझी स्तुती करतो.
तुझ्या इतर भक्तांप्रमाणे मी ही तुझ्या नावावर विश्वास ठेवतो.
10 संदेष्टे चव्हाट्यांवर जाऊन लोक करीत असलेल्या दुष्कृत्यांबद्दल बोलतात, पण अशा संदेष्ट्यांचा लोक तिरस्कार करतात.
संदेष्टे सरळ, चांगल्या सत्याची शिकवण देतात. पण लोक त्यांचा रागच करतात.
11 तुम्ही अन्यायाने गरिबांकडून कर घेता,
त्याच्याकडून गव्हाचा खंड वसूल करता.
तुम्ही कौरीव दगडांची दिमाखदार घरे बांधता खरी,
पण त्यात तुम्ही रहाणार नाही.
तुम्ही द्राक्षाच्या सुंदर बागा लावता,
पण त्यापासून निघणारा द्राक्षरस तुम्ही पीणार नाही.
12 का? कारण मला तुमच्या पुष्कळ पापांची माहिती आहे.
तुम्ही खरोखरच काही वाईट कृत्ये केली आहेत.
योग्य आचरण करणाऱ्यांना पैसा घेता.
न्यायालयात गरिबांवर अन्याय करता.
13 त्या वेळी, सुज्ञ शिक्षक गप्प बसतील.
का? कारण ती वाईट वेळ आहे.
14 परमेश्वर तुमच्याबरोबर आहे असे तुम्ही म्हणता,
मग सत्कृत्ये करा, दुष्कृत्ये नव्हे.
त्यामुळे तुम्ही जगाल
व सर्व शक्तिमान परमेश्वर देव खरोखरच तुमच्याबरोहबर येईल.
15 दुष्टाव्याचा तिरस्कार करा व चांगुलपणावर प्रेम करा.
न्यायालयात पुन्हा न्याय आणा.
मग कदाचित सर्व-शक्तिमान परमेश्वर
देव योसेफच्या वाचलेल्या वंशजांवर कृपा [a] करील.
अतिशय दु:खाची वेळ येत आहे
16 माझा प्रभू सर्वशक्तिमान देव म्हणतो,
“लोक चव्हाट्यावर रडत असतील रस्त्यांतून ते रडतील.
धंदेवाईक रडणाऱ्यांना लोक [b]
भाड्याने बोलवून घेतील.
17 द्राक्षमळ्यांत लोक रडत असतील.
का? कारण मी तुमच्यामध्ये फिरून व तुम्हाला शिक्षा करीन.”
परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.
5 प्रत्येक मुख्य याजकाची निवड लोकांमधून होते. आणि लोकांच्या वतीने त्यांच्या पापांसाठी जी दाने व अर्पणे देवाला सादर केली जातात, त्या कामाकरिता मुख्य याजक नेमलेला असतो. 2 प्रत्येक मुख्य याजक हे जे चुका करतात व जे अज्ञानी आहेत त्यांच्याशी सौम्यपणे वागण्यास असमर्थ असतो कारण तो स्वतः दुबळा असतो. 3 आणि त्या दुबळेपणामुळे त्याने त्याच्या पापांसाठी तसेच लोकांच्या पापांसाठी अर्पणे केलीच पाहिजेत.
4 आणि कोणीही मुख्य याजकपणाचा बहुमान स्वतःच्या पुढाकाराने घेत नसतो, तर अहरोनाला होते तसे त्यालाही देवाचे पाचारण असणे आवश्यक असते. 5 त्याचप्रमाणे, ख्रिस्ताने मुख्य याजक होण्याचा गौरव स्वतःहून आपणावर घेतले नाही, परंतु देव ख्रिस्ताला म्हणाला,
“तू माझा पुत्र आहेस
आज मी तुला जन्म दिला आहे.” (A)
6 दुसऱ्या शास्त्रभागात तो असे म्हणतो,
“मलकीसदेकाप्रमाणे
तू अनंतकाळासाठी याजक आहेस” (B)
2006 by World Bible Translation Center