Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 119:17-32

गीमेल

17 माझ्याशी, तुझ्या सेवकाशी चांगला वाग, म्हणजे मी जिवंत राहू शकेन.
    आणि तुझ्या आज्ञा पाळू शकेन.
18 परमेश्वरा, माझे डोळे उघड मला तुझ्या शिकवणीकडे बघू दे.
    आणि तू केलेल्या अद्भुत गोष्टीबद्दल वाचू दे.
19 मी या देशात परका आहे.
    परमेश्वरा, तुझी शिकवण माझ्या पासून लपवू नकोस.
20 तू घेतलेल्या निर्णयांचा
    मला सतत अभ्यास करावासा वाटतो.
21 परमेश्वरा, तू गर्विष्ठ लोकांवर सदैव टीका करतोस.
    त्यांचे वाईट होईल ते तुझ्या आज्ञा पाळायचे नाकारतात.
22 मला शरम वाटू देऊ नकोस.
    मला लाज आणू नकोस.
    मी तुझा करार पाळला आहे.
23 नेते सुध्दा माझ्या विषयी वाईट बोलतात.
    पण परमेश्वरा, मी तुझा सेवक आहे
    आणि मी तुझ्या नियमांचा अभ्यास करतो.
24 तुझा करार माझा सर्वांत चांगला मित्र आहे.
    तो मला चांगला उपदेश करतो.

दालेथ

25 मी लवकरच मरणार आहे.
    परमेश्वरा, आज्ञा कर आणि मला जगू दे.
26 मी तुला माझ्या आयुष्या बद्दल सांगितले
    आणि तू मला उत्तर दिलेस.
    आता मला तुझे नियम शिकव.
27 परमेश्वरा, तुझे नियम समजून घेण्यासाठी मला मदत कर.
    तू ज्या आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत त्या मला अभ्यासू दे.
28 मी खिन्न आणि दमलेलो आहे.
    आज्ञा कर आणि मला परत बलवान बनव.
29 परमेश्वरा, मला खोटं जगू देऊ नकोस.
    मला तुझ्या शिकवणीने मार्गदर्शन कर.
30 परमेश्वरा, मी तुझ्याशी इमानदार राहायचे ठरवले.
    मी अगदी काळजीपूर्वक तू शहाणपणाने घेतलेल्या निर्णयांचा अभ्यास करतो.
31 मी तुझ्या कराराशी चिकटून राहातो.
    परमेश्वरा, माझी निराशा करु नकोस.
32 मी तुझ्या आज्ञांचे आनंदाने पालन करीन.
    परमेश्वरा, तुझ्या आज्ञा मला आनंदित करतात.

आमोस 7:1-6

टोळांचा दृष्टांन्त

परमेश्वराने मला पुढील गोष्टी दाखविल्या: दुसरे पीक वाढण्यास सुरुवात व्हायच्या वेळेलाच. तो टोळ तयार करीत होता. पहिल्या पिकाची राजाची कापणी झाल्यानंतरचे हे दुसरे पीक होते. टोळांनी देशातील सर्व गवत खाल्ले. त्यानंतर मी म्हणालो, “परमेश्वरा, माझ्या प्रभू, मी विनवणी करतो, आम्हाला क्षमा कर. याकोब जगू शकणार नाही तो फारच दुबळा आहे.”

मग ह्याबाबतीत परमेश्वराचे मनःपरिवर्तन झाले परमेश्वर म्हणाला, “ते घडणार नाही.”

अग्नीचा दृष्टांन्त

परमेश्वराने, माझ्या प्रभूने, मला पुढील गोष्टी दाखविल्या मी पाहिले की परमेश्वर देवाने अग्नीला न्याय देण्यास बोलाविले. अग्नीने मोठा डोह नष्ट केला व त्याने भूमी गिळण्यास सुरवात केली. पण मी म्हणालो, “हे परमेश्वर देवा, थांब, मी तुझी करूणा भाकतो याकोब जगू शकणार नाही तो खूपच लहान आहे.” मग परमेश्वराचे ह्या गोष्टीबाबत ह्रदयपरिवर्तन झाले. परमेश्वर प्रभू म्हणाला, “हीही घटना घडणार नाही.”

कलस्सैकरांस 1:27-2:7

27 देवाला त्याच्या लोकांना माहीत करुन द्यायचे होते की, विदेशी लोकांमध्ये या वैभवी रहस्याची संपत्ती ख्रिस्त येशू जो तुम्हांमध्ये आहे आणि जो देवाच्या गौरवामध्ये सहभागी होण्याची आमची आशा आहे. 28 आम्ही त्याची घोषणा करतो. प्रत्येक व्यक्तीला सूचना देतो, व प्रत्येक व्यक्तीला शक्य ते ज्ञानाने शिकविण्याचा प्रयत्न करतो यासाठी की, आम्हांला प्रत्येक व्यक्ति ख्रिस्तामध्ये पूर्ण अशी देवाला सादर करता यावी. 29 या उद्देशाने मी झगडत आहे. ख्रिस्ताच्या शक्तीच्या उपयोगाने, जी माझ्यामध्ये सामर्थ्यशाली रीतीने कार्य करीत आहे.

कारण माझी अशी इच्छा आहे की, तुमच्यावतीने जो महान झगडा मी करीत आहे आणि जे लावातिकीयात आहेत त्यांच्या वतीने आणि ज्यांची माझी व्यक्तिश: भेट झाली नाही अशा सर्वांसाठी जो महान झगडा मी केला तो तुम्हांला माहीत व्हावा. यासाठी की, त्यांच्या मनाला समाधान वाटावे. आणि ते प्रेमाने एकत्र जोडले जावेत, आणि खात्रीची सर्व संपत्ती जी समजबुद्धीने येते ती मिळावी. तसेच देवाचे रहस्य जो ख्रिस्त त्याच्याविषयी पूर्ण ज्ञान मिळावे. ज्यामध्ये ज्ञानाची आणि शहाणपणाची सर्व संपत्ती लपलेली आहे.

मी हे म्हणत आहे ते यासाठी की, तुम्हांला दिसायला चांगल्या पण खोट्या कल्पनांनी फसवू नये. कारण मी जरी शरीराने तुम्हांपासून दूर असलो तरीही आत्म्यात मी तुम्हाबरोबर आहे आणि तुमच्या जीवनातील नीटनेटकेपणा आणि ख्रिस्तावरील विश्वासासाठी खंबीरता पाहून मी आनंदीत आहे.

ख्रिस्तात जगत राहा

म्हणून ज्याप्रमाणे तुम्हांला दिलेल्या शिक्षणाद्वारे तुम्हाला येशू ख्रिस्त व प्रभु म्हणून मिळाला, तसे त्याच्यामध्ये एक होत चला. त्याच्यामध्ये मुळावलेले, त्याच्यावर उभारलेले, तुमच्या विश्वासात दृढ झालेले असे व्हा आणि देवाची उपकारस्तुति करीत ओसंडून जा.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center