Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी कोरहाच्या कुटुंबासाठी मास्कील
44 देवा, आम्ही तुझ्याबद्दल ऐकले आहे.
आमच्या वडिलांनी तू त्यांच्या आयुष्यात काय केलेस ते सांगितले,
खूप पूर्वी तू काय केलेस तेही त्यांनी सांगितले.
2 देवा, तू तुझ्या सर्व शक्तीने हा देश इतर लोकांपासून घेतलास
आणि तो आम्हाला दिलास
तू त्या परदेशी माणसांना चिरडलेस
तू त्यांना हा देश सोडायला भाग पाडलेस.
3 हा देश आमच्या वडिलांच्या तलवारीने मिळवलेला नाही.
त्यांच्या कणखर बाहूंनी त्यांना विजयी केले नाही.
हे घडले कारण तू त्यांच्या बरोबर होतास.
देवा तुझ्या पराक्रमी शक्तीमुळे आमचे वाडवडील वाचले का?
कारण तू त्यांच्यावर प्रेम केलेस.
4 देवा, तू माझा राजा आहेस आज्ञा दे
आणि याकोबाच्या माणसांना विजयाप्रत ने.
5 देवा, तुझ्या मदतीने आम्ही शत्रूला मागे रेटू.
तुझ्या नावाने आम्ही आमच्या शत्रूवर चालून जाऊ.
6 माझ्या धनुष्यबाणांवर माझा विश्वास नाही.
माझी तलवार मला वाचवू शकणार नाही.
7 देवा, तू आम्हाला मिसर पासून वाचवलेस.
तू आमच्या शत्रूंना लाजवले आहेस.
8 आम्ही रोज देवाची स्तुती करु आम्ही
तुझ्या नावाची सदैव स्तुती करत राहू.
9 परंतु देवा, तू आम्हाला सोडून गेलास.
तू आम्हाला अडचणीत टाकलेस तू आमच्याबरोबर लढाईत आला नाहीस.
10 तू आमच्या शत्रूंना आम्हाला मागे रेटू दिलेस.
शत्रूंनी आमची संपत्ती घेतली.
11 तू आम्हाला मेंढ्यासारखे खायचे अन्न म्हणून देऊन टाकले.
तू आम्हाला राष्ट्रांमध्ये इतस्तत: विखरुन टाकले.
12 देवा, तू आम्हाला कवडीमोलाने विकलेस.
तू किंमतीसाठी घासाघीस देखील केली नाहीस.
13 तू शेजाऱ्यांमध्ये आमचे हसे केलेस.
आमचे शेजारी आम्हाला हसतात.
ते आमची मस्करी करतात.
14 आम्ही म्हणजे लोकांनी सांगितलेली हसवणूक आहोत,
ज्यांना स्वत:चा देश नाही असे लोकही आम्हाला हसतात आणि मान हलवतात.
15 मी लाजेने वेढला गेलो आहे.
दिवसभर मला माझी लाज दिसते.
16 माझ्या शत्रूंनी मला अडचणीत आणले
माझे शत्रू माझी चेष्टा करुन जशास तसे वागायचा प्रयत्न करतात.
17 देवा, आम्ही तुला विसरलो नाही तरीही तू आम्हाला या सगळ्या गोष्टी करतोस
आम्ही तुझ्याबरोबर केलेल्या करारनाम्यावर सही केली तेव्हा खोटे बोललो नाही.
18 देवा, आम्ही तुझ्यापासून दूर गेलो नाही.
आम्ही तुझा मार्ग चोखाळणे बंद केले नाही.
19 परंतु देवा, तू आम्हाला कोल्हे राहातात त्या जागेत चिरडलेस,
मृत्यूसारख्या अंधाऱ्याजागेत तू आम्हाला झाकलेस.
20 आम्ही आमच्या देवाचे नाव विसरलो का?
आम्ही परक्या देवाची प्रार्थना केली का? नाही.
21 देवाला खरोखरच या गोष्टी माहीत असतात.
त्याला आपल्या ह्रदयातल्या अगदी आतल्या गुप्त गोष्टीही माहीत असतात.
22 देवा आम्ही रोज तुझ्यासाठी मारले जात आहोत.
मारण्यासाठी नेल्या जाणाऱ्या मेंढ्यांप्रमाणे आम्ही आहोत.
23 प्रभु, ऊठ तू का झोपला आहेस?
ऊठ आम्हाला कायमचा सोडून जाऊ नकोस.
24 देवा, तू आमच्यापासून लपून का राहात आहेस?
तू आमची दु:ख आणि संकट विसरलास का?
25 तू आम्हाला घाणीत ढकलून दिले आहेस
आम्ही धुळीत [a] पोटावर पडलो आहोत.
26 देवा, ऊठ! आम्हाला मदत कर.
मेहेरबानी करुन आम्हाला वाचव.
14 “म्हणून मी (परमेशवर) तिला शिकवीन. मी तिला वाळवंटात नेईन. मी तिच्याशी प्रेमाने बोलेन. 15 तेथे मी तिला द्राक्षमळे देईन अखोरची दरी आशेचे द्वार म्हणून देईन. मग तिच्या तरुणपणी मिसर देशातून बाहेर आल्यावर ज्याप्रमाणे तिने प्रत्युत्तर दिले होते, ती देईल.” 16 परमेश्वरच असे म्हणतो.
“त्या वेळेला ‘तू मला माझ पती’ म्हणून संबोधशील. मला ‘माझा बआल [a] असे म्हणणार नाहीस.’ 17 मी तिच्या तोंडातून बालाचे नाव काढून टाकीन. मग लोक कधीही बालाचे नाव घेणार नाहीत.
18 “त्या वेळेला, मी इस्राएली लोकांसाठी रानातल्या प्राण्यांबरोबर, आकाशातील पक्ष्यांबरोबर आणि जमिनीवर सरपटणाव्या प्राण्यांबरोबर एक करार करीन. मी धनुष्य तलवार व युध्दात वापरण्यात येणारी शस्त्रे मोडून टाकीन. त्या देशात एकही शस्त्र राहणार नाही. मी देश सुरक्षित करीन, त्यामुळे इस्राएलचे लोक शांतीने झोप घेतील. 19 आणि मी (परमेश्वर) तुला माझी चिरंतन वधू करीन. मी चांगुलपणा, न्याय, प्रेम व दया यांच्यासह तुला वधू करून घेईन. 20 मी तुला माझी विश्वासू वधू बनवीन. मग तू परमेश्वराला खरोखर जाणशील. 21 मी त्या वेळेला प्रत्युत्तर देईन.” परमेश्वर असे म्हणतो.
“मी आकाशाशी बोलेन व
तो पृथ्वीवर पाऊस पाडील.
22 भूमी धान्य, मद्य व तेल देईल.
त्यामुळे इज्रेलच्या गरजा भागतील.
23 तिच्या भूमीत मी तिचे पुष्कळ बीज [b] पेरीन.
लो-रूमाहावर मी दया करीन.
लो-अम्मीला मी ‘माझे लोक’ म्हणीन.
मग ते मला, ‘तू माझा परमेश्वर’ मानतील.”
होशेय गोमरला विकत घेऊन गुलामगिरीतून परत आणतो
3 मग परमेश्वर पुन्हा मला म्हणाला, “गोमरला खूप प्रियकर आहेत पण तू तिच्यावर प्रेम करीत राहिलेच पाहिजे. का? कारण परमेश्वर तसेच करतो. परमेश्वर इस्राएल लोकांवर सतत प्रेम करतो, पण ते लोक मात्र इतर दैवतांची पूजा करीत राहतात. त्यांना मनुकांच्या ढेपा खाणे आवडते.”
2 म्हणून मी सहा औस चांदी व 9 बुशेल जव देऊन गोमरला विकत घेतले. 3 मग मी तिला म्हणालो, “खूप दिवस तू माझ्याबरोबर घरात राहिले पाहिजेस. तू वेश्येप्रमाणे वागता कामा नयेस. तू दुसऱ्या पुरुषाबरोबर जाणार नाहीस. मीच तुझा पती असेन.”
4 ह्याचप्रमाणे, पुष्कळ दिवस इस्राएली लोकांना राजावाचून वा नेत्यावाचून काळ कंठावा लागेल. त्यांना बळी, स्मृतिशिळा, एफोद वा घराण्याचा देव यांच्यावाचून राहावे लागेल. 5 ह्यानंतर इस्राएलचे लोक परत येतील. मग ते परमेश्वराला म्हणजेच त्यांच्या देवाला आणि दीवीदाला म्हणजेच त्यांच्या राजाला शोधतील. शेवटच्या दिवसांत, ते परमेश्वराचा व त्याच्या चांगुलपणाचा आदर करतील.
मनुष्यांनी केलेल नियम पाळू नका
16 म्हणून कोणीहा तुमच्यावर खाण्याविषयी आणि पिण्याविषयी किंवा मेजवान्यांविषयी, नवचंद्रोउत्सवाविषयी किंवा शब्बाथ दिवसांविषयी टीका करु नये. 17 कारण ते फक्त येणाऱ्या गोष्टींची सावली आहेत. परंतु खरे शरीर ज्यामुळे सावली पडते ते तर ख्रिस्ताचे आहे. 18 कोणीही जो स्वतःचा अपमान, नम्रतेची कृत्ये व देवदूतांची उपासना यात समाधान मानून घेतो, त्याने तुम्हाला बक्षिसासाठी अपात्र ठरवू नये. असा मनुष्य नेहमी हे सर्व दृष्टान्त पाहिल्यासारखे बोलतो आणि कोणतेही कारण नसता त्याच्या आध्यात्मिक नसलेल्या अंतःकरणामुळे गर्वाने फुगलेला असतो. 19 आणि असा मनुष्य ख्रिस्त जो मस्तक त्याला धरीत नाही. संपर्ण शरीर त्याच्या अस्थिबंधाचे स्नायू, स्नायूंनी आधार दिलेले आणि एकत्रित धरल्याने देवापासून होणारी वाढ यात वाढते त्याबद्दल त्याला धन्यवाद असो.
20 जर तुम्ही ख्रिस्ताबरोबर मेला आहात व या जगाच्या प्राथमिक शिक्षणापासून मुक्त झाला आहात, तर मग का तुम्ही या जगाचे असल्यासारखे त्यांच्या नियमांच्या अधीन राहाता. 21 “याला स्पर्श करु नका!” “त्याची चव पाहू नका!” 22 या सर्व गोष्टी त्यांच्या वापराबरोबर नाहीशा होणार आहेत. अशा नियमांच्या अधीन होताना, तुम्ही मानवी नियम व शिकवणूक यांचे पालन करता. 23 खरोखर, मनुष्यांनी केलेला धर्म, स्वतःचा अपमान, नम्रतेची कृत्ये, शरीराचा छळ, या विषयीच्या ज्ञानाबद्दल त्यांची कीर्ति आहे, परंतु शरीराच्या समाधानाविरुद्ध लढताना ते काही किंमतीचे नाहीत.
ख्रिस्तातील तुमचे नवे जीवन
3 म्हणून जसे तुम्हांला ख्रिस्ताबरोबर मेलेल्यामधून उठविले गेले आहे तर, स्वर्गातील म्हणजे ज्या वरील गोष्टी आहेत त्यासाठी प्रयत्न करा. जेथे ख्रिस्त देवाच्या उजव्या हाताला बसलेला आहे.
2006 by World Bible Translation Center