Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुक गायकासाठी दावीदाचे मास्कील (बोधपर स्तोत्र) “दावीद अहीमलेखाच्या घरी आला आहे” असे देवगअदोमीने शौलाकडे येऊन सांगितले त्यावेळचे स्तोत्र
52 बलवान पुरुषा, तू तुझ्या दुष्कर्मांची बढाई का करीत आहेस?
तू देवाला एक कलंक आहेस.
तू दिवसभर वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखतोस.
2 तू मूर्खासारख्या योजना आखतोस आणि तुझी जीभ धारदार वस्तऱ्यासारखी भयंकर आहे.
तू नेहमी खोटे बोलतोस आणि कुणाची तरी फसवणूक करण्याच्या बेतात असतोस.
3 तू चांगल्यापेक्षा वाईटावर अधिक प्रेम करतोस.
तुला खरे बोलण्यापेक्षा खोटे बोलणे अधिक आवडते.
4 तुला आणि तुझ्या खोटे बोलणाऱ्या जिभेला लोकांना त्रास द्यायला आवडते.
5 म्हणून देव तुझा कायमचा नाश करेल.
तो तुला पकडून तुझ्या घरातून बाहेर खेचेल.
तो तुला मारुन टाकेल आणि तुझा निर्वंश करेल.
6 चांगले लोक ते बघतील आणि त्यावरुन.
ते देवाला घाबरायला आणि त्याचा आदर करायला शिकतील.
ते तुला हसतील.
7 व म्हणतील, “जो देवावर अवलंबून नव्हता त्याचे काय झाले पाहा त्याची संपत्ती आणि
त्याचे खोटे बोलणे त्याला वाचवू शकेल असे त्याला वाटत होते.”
8 पण देवाच्या मंदिरात मी हिरव्यागार व दीर्घकाळ जगणाऱ्या जैतून झाडासारखा आहे.
मी देवाच्या प्रेमावर सदैव विश्र्वास ठेवतो.
9 देवा, तू केलेल्या गोष्टींबद्दल मी सर्वकाळ तुझी स्तुती करतो.
तुझ्या इतर भक्तांप्रमाणे मी ही तुझ्या नावावर विश्वास ठेवतो.
18 परमेश्वरचा खास न्यायाचा दिवस
पाहण्याची तुमच्यापैकी कीहींची इच्छा आहे.
तुम्हाला तो दिवस का बरे पहावयाचा आहे?
परमेश्वराचा तो खास दिवस अंधार आणणार आहे, उजेड नाही.
19 सिंहापासून दूर पळणाऱ्या माणसावर अस्वलाने हल्ला करावा,
अशी तुमची स्थिती होईल.
घरात जाऊन भिंतीवर हात ठेवणाव्याला साप चावावा,
तशी तुमची अवस्था होईल.
20 परमेश्वराचा खास दिवस अंधारच आणील,
उजेड नाहीतो निराशेचा दिवस असेल, प्रकाशाचा एक किरणही नसेल तो आनंदचा दिवस नसेल.
परमेश्वर इस्राएलची उपासना नाकारतो
21 “मला तुमच्या सणांचा तिरस्कार वाटतो
मी ते मान्य करणार नाही.
तुमच्या धार्मिक-सभा मला आवडत नाहीत.
22 तुम्ही मला होमार्पणे व अन्नार्पणे जरी दिलीत,
तरी मी ती स्वीकारणार नाही.
शांत्यार्पणात, तुम्ही दिलेल्या पुष्ट
प्राण्यांकडे मी पाहणारसुध्दा नाही.
23 तुमची कर्कश गाणी येथून दूर न्या.
तुमचे वाद्यसंगीत मी ऐकणार नाही.
24 तुम्ही, तुमच्या देशातून, पाण्याप्रमाणे, न्यायीपणा वाहू द्यावा.
कधीही कोरडा न पडणाऱ्या झऱ्याप्रमाणे चांगुलपणा वाहावा.
25 इस्राएल, वाळवंटात, 40 वर्षे तू मला यज्ञ
व दाने अर्पण केलीस.
26 पण तुम्ही सक्कूथ ह्या तुमच्या राजाची व कैवानची मूर्तीसुध्दा वाहून नेली.
तुम्ही स्वतःच तुमच्या दैवतांसाठी तारा तयार केला. [a]
27 म्हणून मी तुम्हाला कैदी म्हणून दिमिष्काच्या पलीकडे घालवीन.”
परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
त्याचे नाव सर्वशक्तिमान देव!
ख्रिस्ताची प्रीति
14-15 या कारण्यासाठी ज्याच्यापासून स्वर्गातील आणि पृथ्वीवरील प्रत्येक घराण्याला नाव मिळाले आहे, त्या पित्यासमोर गुडघे टेकून प्रार्थना करतो. 16 मी प्रार्थना करतो की, त्याने आपल्या वैभवी संपत्तीप्रमाणे तुम्हांला त्याच्या आत्म्याच्या द्वारे पराक्रमाने तुमच्या अंतर्यामी बलवान होण्यास मान्यता द्यावी. 17 आणि विश्वासाद्वारे ख्रिस्त तुमच्या अंतःकरणात राहावा. व तुमची मुळे चांगली रुजलेली व प्रीतित मुळावलेली असावी. 18 यासाठी की, सर्व संतांच्यासह ख्रिस्ताच्या प्रीतीची रुंदी, लांबी, उंची आणि खोली किती आहे हे समजून घेण्यास तुम्हांला सामर्थ्य प्राप्त व्हावे. 19 आणि ख्रिस्ताची प्रीति जी ज्ञान्यांना मागे टाकते हे कळावे यासाठी की तुम्ही देवाच्या पूर्णत्वाने भरावे.
20 आणि आता देव जो आपल्या सामर्थ्यानुसार आम्हांमध्ये कार्य करतो इतकेच नव्हे तर आम्ही मागितल्यापेक्षा किंवा आमच्या अपेक्षेपेक्षा अधिक कार्य करण्यास तो समर्य आहे, 21 त्याला मंडळी आणि ख्रिस्त येशूमध्ये सर्व पिढ्यानपिढ्यासाठी सदासर्वकाळ गौरव असो.
2006 by World Bible Translation Center