Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाने परमेश्वरापाशी गायलेले स्तोत्र हे स्तोत्र बन्यामीनी कुटुंबातील कुशाचा मुलगा शौल याच्या संबंधी आहे.
7 परमेश्वरा, माझ्या देवा, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
माझा पाठलाग करणाऱ्या लोकांपासून मला वाचव मला सोडव.
2 तू जर मला मदत केली नाहीस तर सिंहाच्या तावडीत सापडलेल्या एखाद्या प्राण्यासारखी माझी अवस्था होईल
मला दूर नेले जाईल आणि कुणीही मला वाचवू शकणार नाही.
3 परमेश्वर देवा मी काहीही चूक केलेली नाही.
मी चूक केली नसल्याबद्दल खात्रीपूर्वक सांगतो.
4 मी माझ्या मित्रांशी दुष्टावा केला नाही
आणि मी मित्रांच्या शत्रूंना मदतही केली नाही.
5 जर हे खरे नसेल तर मला शिक्षा कर.
शत्रू माझा पाठलाग करो, मला पकडो व मला मारो.
त्याला माझे जीवन जमिनीत तुडवूदे आणिमाझा जीव मातीत ढकलू दे.
6 परमेश्वरा ऊठ, आणि तुझा क्रोध दाखव माझा शत्रू रागावलेला आहे
म्हणून तू त्याच्या पुढे उभा राहा आणि त्याच्या विरुध्द् लढ.
परमेश्वरा ऊठ आणि न्यायाची मागणी कर.
7 परमेश्वरा लोकांचा निवाडा कर.
सगळे देश तुझ्याभोवती गोळा कर आणि लोकांचा निवाडा कर.
8 परमेश्वरा, माझा निवाडा कर.
मी बरोबर आहे हे
सिध्द् कर मी निरपराध आहे हे सिध्द् कर.
9 वाईटांना शिक्षा कर आणि चांगल्यांना मदत कर.
देवा तू चांगला आहेस आणि तू लोकांच्या ह्रदयात डोकावून बघू शकतोस.
10 ज्याचे ह्रदय सच्चे आहे अशांना देव मदत करतो
म्हणून तो माझे रक्षण करेल.
11 देव चांगला न्यायाधीश आहे
आणि तो त्याचा क्रोध केव्हाही व्यक्त करु शकतो.
12-13 देवाने एकदा निर्णय घेतल्यानंतर
तो त्याचे मन बदलत नाही.
देवाकडे लोकांना शिक्षा करायची शक्ती आहे. [a]
14 काही लोक सतत वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखत असतात.
ते गुप्त योजना आखतात आणि खोटे बोलतात.
15 ते दुसऱ्यांना जाळ्यात पकडतात आणि त्यांना इजा करतात.
परंतु ते स्वत:च्याच जाळ्यात अडकतील आणि त्याना कुठली तरी इजा होईल.
16 त्यांना योग्य अशी शिक्षा मिळेल.
ते इतरांशी फार निर्दयपणे वागले.
त्यांनाही योग्य अशीच शिक्षा मिळेल.
17 मी परमेश्वराची स्तुती करतो, कारण तो चांगला आहे
मी त्या सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नावाची स्तुती करतो.
9-10 अश्दोद व मिसर यांच्या उंच मनोऱ्यांवरून पुढील संदेशाची घोषणा करा: “शोमरोनच्या पर्वतांवर या तेथे तुम्हाला भयंकर गोंधळ पाहायला मिळेल का? कारण लोकांना योग्य आचरण माहीत नाही. ते दुसऱ्यांशी क्रूरपणे वागले. दुसऱ्यांच्या वस्तू घेऊन त्यांनी त्यां उंच मनोऱ्यात लपवून ठेवल्या युध्दात लुटलेल्या वस्तूंनी त्यांचे खजिने भरून गेले आहेत.”
11 म्हणून परमेशवर म्हणतो, “त्या देशावर शत्रू चालून येईल तो तुमचे सामर्थ्य हिरावून घेईल. तुम्ही तुमच्या उंच मनोऱ्यांमध्ये लपविलेल्या वस्तू तो घेईल.”
12 परमेश्वर म्हणतो,
“जर सिंहाने मेंढीवर हल्ला केला,
तर कदाचित मेंढपाळ तिला वाचवायचा प्रयत्न करील.
पण तो मेंढीचा
काही भागच वाचवू शकेल.
तो कदाचित् मेंढीचे दोन पाय
वा कानाचा तुकडाच सिंहाच्या तोंडातून ओढून काढेल.
त्याचप्रकारे इस्राएलमधील बहुतांश लोक वाचणार नाहीत.
शोमरोनमध्ये राहणारे लोक शय्येचा एखादा कोपरा
किंवा बिछान्याच्या कापडाचा तुकडाच फक्त वाचवू शकतील.”
13 माझा प्रभू सर्वशक्तिमान परमेश्वर देव पुढील गोष्टी सांगतो: “याकोबच्या वंशजांना (इस्राएलला) ह्या गोष्टींबद्दल ताकीद द्या. 14 इस्राएलने पाप केले व त्याबद्दल त्यांना शिक्षा करीन. मी बेथेलच्या वेदी नष्ट करीन. वेदीची शिगे तोडली जातील व ती मातीत पडतील. 15 हिवाळी महाल उन्हाव्व्यातील महालाबरोबर मी नष्ट करीन. हस्तिदंती घरांचा आणि इतर पूष्कळ घरांचा नाश केला जाईल.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.
मौजमजा आवडणाऱ्या बायका
4 शोमरोनच्या पर्वतावर राहणाऱ्या, बाशानच्या गायींनो, मी काय म्हणतो ते ऐका! तुम्ही गरिबांना दुखविता! त्यांना चिरडून टाकत! तुम्ही तुमच्या नवऱ्यांना तुमच्यासाठी “मद्य आणण्यास सांगता!”
2 परमेश्वराने, माझ्या प्रभूने शपथ घेतली आहे. त्याने त्याच्या पवित्र्याची शपथ घेऊन सांगितले की तुमच्यावर संकटे येतील. माशांचा गळ टाकून ते तुमच्या मुलांना नेतील. 3 तुमच्या नगरीचा नाश होईल. तुमच्यातील प्रत्येकीला तटाच्या भगदाडातून बाहेर पडावे लागेल तुम्ही तुमच्या मृत बाळांना ढिगांत फेकाल.
परमेश्वर असे म्हणतो. 4 “बेथेलला जा आणि पाप करा गिल्गालला [a] जाऊन आणखी पापे करा. सकाळी यज्ञ करा. तीन दिवसाच्या सुट्टीसाठी आपल्या पिकाचा दहावा भाग आणा. 5 खमिराची आभार-अर्पणे द्या. अनिर्बंध इच्छा अर्पणांबद्दल प्रत्येकाला सांगा. इस्राएल, तुला ह्या गोष्टी करायला आवडते. मग जा आणि हे सर्वकर!” परमेश्वर असे म्हणतो.
सर्व लोकांवर प्रेम करा
2 माझ्या बंधूंनो, गौरवी प्रभु येसू ख्रिस्तावरील विश्वासाची व पक्षपातीपणाची सांगड घालू नका. 2 समजा एक मनुष्य सोन्याची अंगठी व सुंदर कपडे घालून तुमच्या सभेला आला व एक गरीब मनुष्य अव्यवस्थित कपडे घालून आला. 3 आणि समजा चांगला पोशाख घालून आलेल्या मनुष्याला तुम्ही विशेष मानसन्मान दाखवूत त्याला म्हणाला, “येथे ज्या चांगल्या खुर्च्या आहेत त्यापैकी एखाद्या खुर्चीवर बसा.” आणि समजा तुम्ही त्या गरीब माणासाला म्हणाला, “तिकडे उभा राहा.” किंवा “माझ्या पायाजवळ बस.” 4 तर या बाबतीत तुम्ही दोघांत पक्षपातीपणा दाखविलात की नाही? आणि तुम्ही आपल्या मनात वाईट कल्पना बाळगणारे न्यायाधीश ठरलात की नाही?
5 माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका! देवानेच जगाच्या दृष्टिकोनातून गरीब असले त्यांना विस्वासात श्रीमंत होण्यासाठी निवडले नाही काय, आणि जे त्याच्यावर प्रीति करतात त्यांना देवराज्याचे वारस म्हणून निवडण्याचे अभिवचन दिले नाही का? 6 पण तुम्ही तर गरीब मनुष्याला तुच्छ लेखिले! तुमची पिळवणूक करणारे श्रीमंत लोकच नाहीत काय आणि तुम्हाला न्यायालयात नेणारे तेच लोक नाहीत काय? 7 ख्रिस्ताच्या उत्तम नावाची, जे नाव तुम्हाला देण्यात आले त्याची निंदा हेच श्रीमंत लोक करीत नाहीत का?
2006 by World Bible Translation Center