Revised Common Lectionary (Semicontinuous)
आसाफाचे स्तोत्र
82 देव देवांच्या सभेत उभा राहातो.
तो देवांच्या सभेत न्यायाधीश आहे.
2 देव म्हणतो, “तू किती काळपर्यंत लोकांना विपरीत न्याय देणार आहेस?
दुष्टांना तू आणखी किती काळ शिक्षा न करताच सोडून देणार आहेस?”
3 “गरीबांना आणि अनाथांना संरक्षण दे.
त्या गरीब लोकांच्या हक्कांचे रक्षण कर.
4 त्या गरीब, असहाय्य लोकांना मदत कर.
त्यांचे दुष्टांपासून रक्षण कर.”
5 “काय घडते आहे ते त्यांना [a] कळत नाही.
त्यांना काही समजत नाही.
ते काय करीत आहेत ते त्यांना कळत नाही.
त्यांचे जग त्यांच्या भोवती कोसळत आहे.”
6 मी (देव) म्हणतो, “तुम्ही देव आहात
तुम्ही सर्वशक्तिमान देवाची मुले आहात.”
7 परंतु तुम्ही मरणार आहात इतर लोक मरतात त्याप्रमाणे तुम्ही मराल,
इतर पुढारी मरतात त्याप्रमाणे तुम्ही मराल.
8 देवा, ऊठ! तू न्यायाधीश हो.
देवा, तू सर्व देशांचा पुढारी हो.
12 “पण तुम्ही नाजीरांना मद्य प्यायला लावले व संदेष्ट्यांना संदेश देण्यास मनाई केली. 13 तुम्ही मला बोजाप्रमाणे आहात खूप वाळलेले गवत भरलेल्या गाडीप्रमाणे मी खाली वाकलो आहे. पण मी ह्याच तव्हेने तुम्हाला खाली दाबून टाकीन [a]. 14 कोणीही पळून जाऊ शकणार नाही. अगदी जोरात धावणारा सुध्दा! बलवान पुरेसे बलवान राहणार नाहीत. सैनिक पळून जाऊन स्वतःला वाचवू शकणार नाहीत. 15 धनुर्धारी वाचणार नाहीत. जोरात धावणारे पळून जाणार नाहीत. घोडेस्वार जिवंत राहणार नाहीत. 16 त्या वेळी खूप शूर सैनिकसुध्दा पळून जातील. त्यांना कपडे घालण्याससुध्दा वेळ मिळणार नाही.” परमेश्वर असे म्हणतो.
इस्राएलला ताकीद
3 इस्राएलच्या लोकांनो, संदेश ऐका! परमेश्वराने तुमच्याबद्दल पुढील गोष्टी सांगितल्या मी मिसरमधून ज्या घराण्यांना (इस्राएलला) आणले, त्यांच्याबद्दल हा संदेश आहे. 2 “पृथ्वीच्या पाठीवर पुष्कळ घराणी आहेत पण मी फक्त तुमच्याच घराण्याला खास संबंध ठेवण्यासाठी निवडले पण तुम्ही माझ्याविरुध्द गेलात. म्हणून तुमच्या सर्व पापांसाठी मी तुम्हाला शिक्षा करीन.”
इस्राएलच्या शिक्षेचे कारण
3 दोन माणसांचे एकमत झाल्याशिवाय
ते एकमेकांबरोबर चालू शकणार नाहीत.
4 शिकार मिळाल्यावरच
जंगलातील सिंह गर्जना करील.
जर सिंहाचा बछडा, त्याच्या गुहेत गुरगुरत असेल,
तर त्याचा अर्थ त्याने काहीतरी पकडले आहे.
5 जाळ्यात दाणे नसतील तर,
पक्षी जाळ्यात जाणार नाही
आणि सापळ्याचे दार बंद झाले,
तर तो सापळा पक्ष्याला पकडणारच.
6 जर इषाऱ्याची रणशिंगे फुंकली गेली,
तर लोक भीतीने थरथर कापणारच.
जेव्हा नगरीवर संकट येते,
तेव्हा परमेश्वर त्याला कारणीभूत असतो.
7 प्रभू माझा परमेश्वर कदाचित् काही करायचे निश्चित करील, पण तसे करण्यापूर्वी, तो, आपला बेत त्याच्या सेवकांना म्हणजेच संदेष्ट्यांना सागेल. 8 सिंहाने डरकाळी फोडल्यास लोक भयभीत होतील व परमेश्वर बोलताच, संदेष्टे संदेश देतील.
16 होय, देवाने जगावर एवढी प्रीति केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने आपला पुत्र यासाठी दिला की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनतंकाळचे जीवन मिळावे. 17 देवाने आपल्या पुत्राला जगात पाठविले. जगाचा न्याय करण्यासाठी देवाने आपला पुत्र पाठविला नाही, तर आपल्या पुत्राद्वारे जगाचे तारण व्हावे यासाठी देवाने त्याला जगात पाठविले. 18 जो कोणी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याचा न्याय (दोषी ठरविले जाणे) होणार नाही. परंतु जो विश्वास ठेवीत नाही त्याचा न्याय झाल्यासारखाच आहे. कारण त्याने देवाच्या एकुलत्या एका पुत्रावर विश्वास ठेवला नाही. 19 ज्या वस्तुस्थितीच्या आधारे लोकांचा न्याय केला जातो ती ही जगामध्ये प्रकाश आला, परंतु लोकांना प्रकाश नको होता. त्यांना अंधार पाहिजे होता. कारण लोक वाईट कृत्ये करीत होते. 20 वाईट कृत्ये करणारा प्रत्येक जण प्रकाशाचा द्वेष करतो. तो प्रकाशाकडे येत नाही. कारण त्याने केलेली सर्व वाईट कृत्ये तो प्रकाश उघड करील. 21 परंतु जो सत्य मार्गाने चालतो तो प्रकाशाकडे वळतो. आणि त्याने केलेली कामे देवाकडून झाली होती हे तो प्रकाश दाखवून देईल. [a]
2006 by World Bible Translation Center