Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 44

प्रमुख गायकासाठी कोरहाच्या कुटुंबासाठी मास्कील

44 देवा, आम्ही तुझ्याबद्दल ऐकले आहे.
    आमच्या वडिलांनी तू त्यांच्या आयुष्यात काय केलेस ते सांगितले,
    खूप पूर्वी तू काय केलेस तेही त्यांनी सांगितले.
देवा, तू तुझ्या सर्व शक्तीने हा देश इतर लोकांपासून घेतलास
    आणि तो आम्हाला दिलास
तू त्या परदेशी माणसांना चिरडलेस
    तू त्यांना हा देश सोडायला भाग पाडलेस.
हा देश आमच्या वडिलांच्या तलवारीने मिळवलेला नाही.
    त्यांच्या कणखर बाहूंनी त्यांना विजयी केले नाही.
हे घडले कारण तू त्यांच्या बरोबर होतास.
    देवा तुझ्या पराक्रमी शक्तीमुळे आमचे वाडवडील वाचले का?
    कारण तू त्यांच्यावर प्रेम केलेस.
देवा, तू माझा राजा आहेस आज्ञा दे
    आणि याकोबाच्या माणसांना विजयाप्रत ने.
देवा, तुझ्या मदतीने आम्ही शत्रूला मागे रेटू.
    तुझ्या नावाने आम्ही आमच्या शत्रूवर चालून जाऊ.
माझ्या धनुष्यबाणांवर माझा विश्वास नाही.
    माझी तलवार मला वाचवू शकणार नाही.
देवा, तू आम्हाला मिसर पासून वाचवलेस.
    तू आमच्या शत्रूंना लाजवले आहेस.
आम्ही रोज देवाची स्तुती करु आम्ही
    तुझ्या नावाची सदैव स्तुती करत राहू.

परंतु देवा, तू आम्हाला सोडून गेलास.
    तू आम्हाला अडचणीत टाकलेस तू आमच्याबरोबर लढाईत आला नाहीस.
10 तू आमच्या शत्रूंना आम्हाला मागे रेटू दिलेस.
    शत्रूंनी आमची संपत्ती घेतली.
11 तू आम्हाला मेंढ्यासारखे खायचे अन्न म्हणून देऊन टाकले.
    तू आम्हाला राष्ट्रांमध्ये इतस्तत: विखरुन टाकले.
12 देवा, तू आम्हाला कवडीमोलाने विकलेस.
    तू किंमतीसाठी घासाघीस देखील केली नाहीस.
13 तू शेजाऱ्यांमध्ये आमचे हसे केलेस.
    आमचे शेजारी आम्हाला हसतात.
    ते आमची मस्करी करतात.
14 आम्ही म्हणजे लोकांनी सांगितलेली हसवणूक आहोत,
    ज्यांना स्वत:चा देश नाही असे लोकही आम्हाला हसतात आणि मान हलवतात.
15 मी लाजेने वेढला गेलो आहे.
    दिवसभर मला माझी लाज दिसते.
16 माझ्या शत्रूंनी मला अडचणीत आणले
    माझे शत्रू माझी चेष्टा करुन जशास तसे वागायचा प्रयत्न करतात.
17 देवा, आम्ही तुला विसरलो नाही तरीही तू आम्हाला या सगळ्या गोष्टी करतोस
    आम्ही तुझ्याबरोबर केलेल्या करारनाम्यावर सही केली तेव्हा खोटे बोललो नाही.
18 देवा, आम्ही तुझ्यापासून दूर गेलो नाही.
    आम्ही तुझा मार्ग चोखाळणे बंद केले नाही.
19 परंतु देवा, तू आम्हाला कोल्हे राहातात त्या जागेत चिरडलेस,
    मृत्यूसारख्या अंधाऱ्याजागेत तू आम्हाला झाकलेस.
20 आम्ही आमच्या देवाचे नाव विसरलो का?
    आम्ही परक्या देवाची प्रार्थना केली का? नाही.
21 देवाला खरोखरच या गोष्टी माहीत असतात.
    त्याला आपल्या ह्रदयातल्या अगदी आतल्या गुप्त गोष्टीही माहीत असतात.
22 देवा आम्ही रोज तुझ्यासाठी मारले जात आहोत.
    मारण्यासाठी नेल्या जाणाऱ्या मेंढ्यांप्रमाणे आम्ही आहोत.
23 प्रभु, ऊठ तू का झोपला आहेस?
    ऊठ आम्हाला कायमचा सोडून जाऊ नकोस.
24 देवा, तू आमच्यापासून लपून का राहात आहेस?
    तू आमची दु:ख आणि संकट विसरलास का?
25 तू आम्हाला घाणीत ढकलून दिले आहेस
    आम्ही धुळीत [a] पोटावर पडलो आहोत.
26 देवा, ऊठ! आम्हाला मदत कर.
    मेहेरबानी करुन आम्हाला वाचव.

होशेय 6:11-7:16

11 यहूदा, तुझ्यासाठी सुगीची वेळ ठेवलेली आहे.
    माझ्या लोकांना मी कैदेतून परत आणीन, तेव्हा ती वेळ येईल.”

“मी इस्राएलला बरे करीन.
    मगच लोकांना एफ्राईमच्या पापाविषयी कळून येईल.
लोकांना शोमरोनाचा खोटेपणाही समजेल.
    त्या नगरीत ये जा करणाऱ्या चोरांबद्दलही लोकांना समजेल.
मी त्याचे अपराध लक्षात ठेवीन, असे त्या लोकांना वाटत नाही.
    त्याची दुष्कृत्ये सगळीकडे पसरली आहेत.
    मला त्यांची पापे स्पष्ट दिसू शकतात.
त्यांची दुष्कृत्ये त्यांत्या राजाला आनंद देतात.
    त्यांची दैवते त्यांच्या नेत्यांना खूश करतात.
रोटीवाला रोट्या बनविण्यासाठी
    कणीक मळतो तो रोटी भट्टीत ठेवतो
रोटी फुगत असताना तो आच मोठी ठेवत नाही.
पण इस्राएलचे लोक तसे नाहीत.
    ते त्यांची आच नेहमीच मोठी ठेवतात.
आमच्या राजाच्या दिवशी, ते आच जास्त मोठी करतात.
ते पेयांच्या मेजवान्या देतात.
    मद्याच्या गरमीने नेत्यांना मळमळते.
    मग राजाही परमेश्वराच्या निंदकांत सामील होतो.
लोक कट रचतात.
    त्यांची मने तापलेल्या भट्टीप्रमाणे उत्तेजित होऊन जळतात.
त्यांच्या मनातील खळबळ रात्रभर जळत राहाते.
    आणि सकाळी ती अतितप्त विस्तवाप्रमाणे होते.
ते तापलेल्या भट्टीप्रमाणे आहेत.
    त्यांनी त्यांच्या राज्यकर्त्यांचा नाश केला.
त्यांचे सर्व राजे पडले
    पण एकानेही मदतीसाठी मला हाक मारली नाही.”

इस्राएलचा नाश केला जाणार आहे, हे इस्राएलला ठाऊक नाही

“एफ्राईम राष्ट्राबरोबर मिसळतो
    तो दोन्हीकडून न भाजलेल्या भाकरीप्रमाणे आहे.
परके एफ्राईमची शक्ती नष्ट करतात.
    पण एफ्राईमला ते कळत नाही.
त्याच्यावर पिकलेले केस पसरले आहेत.
    पण ते त्याला माहीत नाही.
10 एफ्राईमचा गर्व त्यांच्याविरुध्द
बोलतो लोकांना खूपच अडचणी आहेत,
    तेरी ते परमेश्वराकडे, त्यांच्या परमेश्वराकडे परत जात नाहीत.
    ते मदतीसाठी त्याच्याकडे पाहात नाहीत.
11 म्हणजेच एफ्राईम मूर्ख पारव्याप्रमाणे बेअक्कल झाला आहे.
    लोकांनी मदतीसाठी मिसरला हाक मारली.
    ते मदत मागायला अश्शूरकडे गेले.
12 ते मदतीसाठी त्या देशांकडे जातात खरे,
    पण मी त्यांना सापळ्यात पकडीन.
मी माझे जाळे त्यांच्यावर फेकीन,
    आणि जाळ्यात अडकलेल्या आकाशातील पक्ष्याप्रमाणे मी त्यांना खाली आणीन.
त्यांच्या करारांबद्दल मी त्यांना शिक्षा करीन.
13 ते त्यांच्या दृष्टीने वाईट आहे.
    त्यांनी माझा त्याग केला.
त्यांनी माझी आज्ञा पाळण्यांस नकार दिला म्हणून त्यांचा नाश होईल.
    मी त्या लोकांचे रक्षण केले पण ते माझ्याविरुध्द खोटे बोलतात.
14 मनापासून ते मला कधीही बोलावीत नाहीत.
    हो! ते त्यांच्या बिछान्यात रडतात
आणि धान्य व नवीन मद्य मागताना ते स्वतःला माझ्यापासून अलगच करतात
    मनाने ते माझ्यापासून दूर गेले आहेत.
15 मी त्यांना शिकवण दिली आणि त्यांचे हात बळकट केले.
    पण त्यांनी माझ्याविरुध्द दुष्ट बेत रचले आहेत.
16 ते मोडक्या धनूष्याप्रमाणे आहेत.
त्यांनी दिशा बदलल्या पण ते परत माझ्याकडे आले नाहीत.
    त्यांचे नेते त्यांच्या सामर्थ्याबद्दल बढाई मारतात.
पण ते तलवारीच्या वाराने मारले जातील.
    मग मिसरचे लोक त्यांना हसतील.

मत्तय 5:43-48

सर्वांवर प्रेम करा(A)

43 “असे सांगिलते होते की, ‘आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करा [a] अणि आपल्या शत्रूचा द्वेष करा,’ असे तुम्ही ऐकले आहे. 44 पण मी तुम्हांला सांगतो, तुमच्या शत्रूवर प्रेम करा. तुमचे जे वाईट करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. 45 जर तुम्ही असे कराल, तर तुम्ही तुमच्या स्वर्गातील पित्याचे खरे पुत्र व्हाल. तुमचा पिता चांगल्यावर आणि वाईटावर अशा दोघांवरही सूर्य उगवितो. चांगल्यावरही आणि वाईटावरही पाऊस पाडतो. 46 कारण जे तुमच्यावर प्रीति करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीति करीत असाल तर तुम्हांला प्रतिफळ मिळणार नाही. जकातदारही असेच करतात. 47 आणि जर तुम्ही तुमच्या मित्रांशी चांगले वागत असाल तर तुम्ही इतरांपेक्षा फार चांगले आहात असे समजू नका. देवाला न मानणारे लोकही असेच करतात. 48 म्हणून जसा तुमचा स्वर्गातील पिता परिपूर्ण आहे तसे तुम्हीही परिपूर्ण व्हा.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center