Revised Common Lectionary (Semicontinuous)
117 सर्व देशांनो, परमेश्वराची स्तुती करा.
सर्व लोकांनो परमेश्वराची स्तुती करा.
2 देव आपल्यावर खूप प्रेम करतो आणि
देव आपल्याशी सदैव खरा वागतो.
परमेश्वराचा जयजयकार करा!
नवीन इस्राएल
31 परमेश्वराने पुढील गोष्टी सांगितल्या: “त्या वेळी मी इस्राएलमधील सर्व कुळांचा देव असेन आणि ती सर्व माझी माणसे असतील.”
2 परमेश्वर म्हणतो:
“काही लोक शत्रूकडून मारले गेले नव्हते. ते लोक वाळवंटात आश्रय घेतील.
इस्राएल विश्रांतीच्या अपेक्षेने तेथे जाईल.”
3 खूप लांबून परमेश्वर
लोकांना दर्शन देईल.
परमेश्वर म्हणतो, “लोकांनो, मी तुमच्यावर प्रेम करतो आणि ते चिरंतन राहील.
तुमची निष्ठा मी कायमची सांभाळीन.
4 इस्राएल, माझ्या वधू, मी तुझी पुन्हा निर्मिती करीन.
तुझ्यातून देश निर्माण करीन.
तू तुझी खंजिरी उचलशील आणि मौजमजा करणाऱ्या
इतर लोकांबरोबर नृत्यात सामील होशील.
5 इस्राएलमधील शेतकऱ्यांनो, तुम्ही पुन्हा द्राक्षाच्या बागा लावाल.
शोमरोन शहराच्या भोवतालच्या टेकडीवर
तुम्ही द्राक्षवेलींची लागवड कराल.
त्या द्राक्षमळ्यातील
पिकांचा तुम्ही आस्वाद घ्याल.
6 अशी एक वेळ येईल की पहारेकरी ओरडून
पुढील आदेश देतील.
‘या, आपण परमेश्वर देवाची उपासना करण्यासाठी वर
सियोनला जाऊ या.’
एफ्राईम या डोंगराळ प्रदेशातील पहारेकरीसुद्धा ओरडून हा संदेश देतील.”
लूक येशूच्या जीवनाविषयी लिहितो
1 पुष्कळ लोकांनी आमच्यामध्ये घडलेल्या ऐतिहासिक घटनांची नोंद करण्याचा प्रयत्न केला. 2 त्यांनी त्याच गोष्टी लिहिल्या ज्या आम्हांला काही इतर लोकांकडून समजल्या होत्या-या लोकांनी त्या गोष्टी सुरुवातीपासून पाहिल्या होत्या आणि देवाचा संदेश लोकांना सांगून त्याची सेवा केली होती. 3 थियफिला महाराज, सुरुवातीपासून या सगळ्या गोष्टींचा काळजीपूर्वक अभ्यास मी केला आहे, म्हणून मला असे वाटले की, या सर्व घटनांविषयी आपणांला व्यवस्थित माहिती लिहावी. 4 हे मी यासाठी लिहित आहे की, जे काही तुम्हांला शिकविण्यात आले ते खरे आहे, हे तुम्हांला समजावे.
2006 by World Bible Translation Center