Revised Common Lectionary (Semicontinuous)
10 परमेश्वरा, तू इतक्या दूर का राहतोस?
संकटात पडलेले लोक तुला पाहू शकत नाहीत.
2 गर्विष्ठ आणि दुष्ट लोक वाईट योजना आखतात.
आणि गरीब लोकांना त्रास देतात.
3 दुष्ट लोक आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींबद्दल बढाया मारतात.
आधाशी लोक देवाला शाप देतात.
अशा रीतीने दुष्ट लोक आपण परमेश्वराला तुच्छ मानतो असे दाखवून देतात.
4 वाईट लोक देवाची प्रार्थना न करण्याइतके गर्विष्ठ आहेत
ते त्यांच्या सर्व वाईट योजना आखतात आणि जगात देवच नसल्यासारखे वागतात.
5 दुष्ट लोक नेहमीच काहीतरी वेडे वाकडे करीत असतात.
देवाचे नियम आणि शहाणपणाच्या गोष्टी त्यांच्या लक्षात देखील येत नाहीत.
देवाचे शत्रू त्यांच्या शिकवण्याकडे लक्ष देत नाहीत.
6 आपले काहीही वाईट होणार नाही असे त्या लोकांना वाटते ते म्हणतात, “आपण मजा करु
आणि आपल्याला कधीही शिक्षा होणार नाही.”
7 ते लोक नेहमी शाप देत असतात.
ते लोकांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात.
ते सतत वाईट योजना आखत असतात.
8 ते गुप्त जागी लपून बसतात
आणि लोकांना पकडण्यासाठी वाट पाहातात.
ते दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी लपतात ते निष्पाप लोकांना ठार मारतात.
9 ते दुष्ट लोक खाण्यासाठी एखादा प्राणी पकडणाऱ्या सिंहासारखे असतात.
ते गरीबांवर हल्ला करतात.
दुष्टांनी तयार केलेल्या सापळड्यात गरीब अडकतात.
10 ते दुष्ट गरीब आणि आधीच पीडलेल्या लोकांना
पुन्हा पुन्हा त्रास देतात.
11 “देव आपल्याला विसरला, तो आपल्यापासून कायमचा दूर गेला.
आपल्यावर काय प्रसंग आलेला आहे हे देव बघत नाही”
असा विचार गरीब लोक करतात.
12 परमेश्वरा, ऊठ!
आणि काहीतरी कर.
देवा, दुष्टांना शिक्षा कर गरीबांना विसरु नकोस.
13 वाईट लोक देवाविरुध्द का जातात?
कारण देव आपल्याला शिक्षा करणार नाही असे त्यांना वाटते.
14 परमेश्वरा, ते लोक अतिशय दुष्ट
आणि वाईट गोष्टी करतात ते तू बघतोस तू त्याकडे लक्ष दे आणि काहीतरी कर.
संकटांनी पिडलेले लोक तुझ्याकडे मदतीसाठी येतात.
परमेश्वरा, निराधाराला मदत करणारा तूच एक आहेस.
म्हणून त्यांना मदत कर.
15 परमेश्वरा, दुष्टांचे निर्दालन कर.
16 त्या लोकांना तुझ्या भूमीतून घालवून दे.
17 परमेश्वरा, गरीबांना काय हवे ते तू ऐकलेस.
त्यांची प्रार्थना ऐक आणि त्यांना काय हवे ते दे.
18 परमेश्वरा आई बाप नसलेल्या पोरक्या मुलांचे रक्षण कर.
दुखी: लोकांना आणखी कष्ट सोसायला लावू नकोस.
दुष्टांना इथे राहायला भीती वाटेल इतके त्यांना घाबरवून सोड!
27 “यिर्मया, यहूदाच्या लोकांना तू ह्या सर्व गोष्टी सांग पण ते तुझे ऐकणार नाहीत. तू त्यांना बोलाविलेस तरी ते तुला ओ देणार नाहीत. 28 म्हणून तू त्यांना पुढील गोष्टी सांगितल्या पाहिजेस. ह्या राष्ट्रांने परमेश्वराच्या म्हणजेच त्यांच्या देवाच्या आज्ञा पाळल्या नाहीत. त्या राष्ट्रांतील लोकांनी देवाची शिकवण ऐकली नाही. त्यांना खरी शिकवण माहीत नाही.
संहाराची दरी
29 “यिर्मया, तुझे केस कापून दूर फेकून दे. [a] उजाड डोंगरमाथ्यावर जा आणि रड. का? परमेश्वराने माणसांच्या ह्या पिढीला नाकारले आहे. परमेश्वराने ह्या लोकांकडे पाठ फिरविली आहे. रागाच्या भरात तो त्यांना शिक्षा करील. 30 हे असे कर कारण यहूदाच्या लोकांना पापे करताना मी पाहिले आहे.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “त्यांनी त्यांच्या मूर्ती स्थापन केल्या आहेत. मी त्या मूर्तीचा तिरस्कार करतो. माझ्या नावाच्या मंदिरात त्यांनी त्या मूर्ती स्थापिल्या आहेत. त्यांनी माझे घर ‘अपवित्र’ केले आहे. 31 यहूदाच्या लोकांनी बेन हिन्नोमच्या दरीत तोफेतची उच्चस्थाने बांधली आहेत. त्या ठिकाणी लोक स्वतःच्या मुलामुलींना ठार मारतात आणि दैवताला अर्पण करण्यासाठी म्हणून जाळतात. अशी आज्ञा मी कधीही दिलेली नाही. असे काही माझ्या मनातही कधी आलेले नाही. 32 म्हणून मी तुम्हाला ताकीद देतो. असे दिवस येत आहेत.” हा परमेश्वराचा संदेश आहे, “लोक ह्या जागेला पुन्हा कधीही तोफेत वा बेन हिन्नोमची दरी असे म्हणणार नाहीत, तर तिला ते संहाराची दरी म्हणतील. असे नाव देण्याचे कारण हेच की आणखी एका मृतालाही पुरण्यास जागा राहणार नाही इतकी वेळ येईपर्यंत ते तोफेतमध्ये मृतांना पुरतील. 33 मग बाकी मृत शरीरे उघडीच जमिनीवर पडतील आणि गिधाडांचे भक्ष्य होतील. वन्य पशू ती शरीरे खातील. त्या गिधाडांना अथवा वन्य पशूंना हाकलायला तेथे कोणीही जिवंत राहणार नाही. 34 यहूदाच्या गावांतील व यरुशलेमच्या रस्त्यांवरील उल्हासाच्या व आनंदाच्या कल्लोळांचा मी शेवट करीन. यहूदात किंवा यरुशलेममध्ये पुन्हा कधीही वधू वरांचा शब्द उमटणार नाही. ती भूमी ओसाड वाळवंट होईल.”
येशू एका मनुष्याला शब्बाथ दिवशी बरे करतो(A)
6 असे झाले की दुसऱ्या एका शब्बाथाच्या दिवशी येशू सभास्थानात गेला, आणि शिकवू लागला. तेव्हा तेथे एक मनुष्य होता. त्याचा उजवा हात वाळलेला होता. 7 येशू शब्बाथ दिवशी कोणाला बरे करतो की काय हे पाहण्यासाठी नियमशास्त्राचे शिक्षक व परुशी त्याच्यावर पाळत ठेवून होते. यासाठी की, त्याच्यावर आरोप ठेवण्यासाठी त्यांना काहीतरी कारण मिळावे. 8 त्याला त्यांचे विचार माहीत होते, पण वाळलेल्या हाताच्या मनुष्याला तो म्हणाला, “ऊठ आणि सर्वांसमोर उभा राहा!” आणि तो मनुष्य उठला आणि तेथे उभा राहिला. 9 येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला विचारतो, शब्बाथ दिवशी कोणत्या गोष्टी करायला परवानगी आहे? चांगले करणे की वाईट करणे? कोणते कायदेशीर आहे, एखाद्याचा जीव वाचविणे का जीव घेणे?”
10 येशूने सर्वांकडे पाहिले, मग तो त्या मनुष्याला म्हणाला, “हात सरळ कर.” त्याने हात सरळ केला आणि त्याचा हात बरा झाला. 11 पण परुशी व नियमशास्त्राचे शिक्षक खूप रागावले व येशूविषयी काय करता येईल याविषयी आपापसात चर्चा करु लागले.
2006 by World Bible Translation Center