Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 107:1-9

भाग पांचवा

((स्तोत्रसंहिता 107-150)

107 परमेश्वराला धन्यवाद द्या.
    कारण तो चांगला आहे.
    त्याचे प्रेम कायम राहाणार आहे.
परमेश्वराने ज्याचा उध्दार केला आहे अशा प्रत्येक माणसाने हे शब्द म्हटले पाहिजेत.
    परमेश्वराने त्यांना त्यांच्या शत्रूपासून वाचवले.
परमेश्वराने त्याच्या माणसांना वेगवेगळ्या देशातून गोळा करुन आणले.
    त्याने त्यांना पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण या दिशांतून आणले.

त्यांतले काही वाळवंटात फिरले.
    ते राहण्यासाठी जागा शोधत होते पण त्यांना शहर सापडले नाही.
ते खूप भुकेले आणि तान्हेले होते
    आणि अशक्त होत होते.
नंतर त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली
    आणि त्याने त्यांना त्यांच्या संकटातून वाचवले.
देव त्यांना सरळ जेथे त्यांना राहायचे होते त्या शहरात घेऊन गेला.
परमेश्वराला त्याच्या प्रेमाबद्दल आणि
    तो ज्या अद्भुत गोष्टी लोकांसाठी करतो त्याबद्दल धन्यवाद द्या.
देव तान्हेल्या आत्म्याचे समाधान करतो.
    देव भुकेल्या आत्म्याला चांगल्या वस्तूंनी भरतो.

स्तोत्रसंहिता 107:43

43 जर एखादा माणूस शहाणा असला तर त्याला या गोष्टी आठवतील
    नंतर त्याला देवाचे प्रेम म्हणजे खरोखर काय ते कळून येईल.

होशेय 10

इस्राएलच्या संपत्तीने त्याला मूर्तिपूजेकडे नेले

10 इस्राएल बहरलेल्या द्राक्षवेलीप्रमाणे आहे.
त्याला परमेश्वराकडून पुष्कळ गोष्टी मिळत गेल्या
    पण त्याने दैवांच्या मानासाठी खूपखूप वेद्या बांधल्या.
त्याची भूमी अधिकाधिक चांगली होत गेली,
    तेव्हा त्याने अधिक चांगले स्तंभ दैवतांच्या मानासाठी उभे केले.
इस्राएलाच्या लोकांनी परमेश्वराला फसविण्याचा प्रयत्न केला.
    पण आता त्यांनी त्यांचा अपराध कबूल केलाच पाहिजे.
परमेश्वर त्यांच्या वेद्या मोडेल.
    तो त्यांच्या स्मारक स्तंभांचा नाश करील.

इस्राएलींचे दुष्ट निर्णय

आता इस्राएल लोक म्हणतात, “आम्हाला राजा नाही आम्ही परमेश्वराला मानत नाही. त्याचा राजा आमच्यासाठी काही करू शकत नाही.”

ते वचने देतात पण ते फक्त खोटो बोलत असतात. ते आपला शब्द पाळत नाहीत. ते दुसऱ्या देशांबरोबर करार करतात. परमेश्वराला ते करार आवडत नाहीत. न्यायाधीश नांगरलेल्या शेतात वाढणाऱ्या विषारी तणाप्रमाणे आहेत

शोमरोनमधील लोक बेथ: आवेन येथील वासरांची पूजा करतात. ते लोक अक्षरश: रडतील. ते याजकही खरोखरी रडतील. का? कारण त्यांची सुंदर मूर्ती नाहीशी झाली. ती दूर नेली गेली. ती मूर्ती अशशूरच्या महान राजाला भेट म्हणून नेली गेली तो, एफ्राईमची लज्जास्पद मूर्ती ठेवील. इस्राएलला आपल्या मूर्तीची लाज वाटेल. शोमरोनच्या दैवतांचा नाश केला जाईल पाण्यावर तरंगणाऱ्या लाकडाच्या तुकड्याप्रमाणे त्यांची दशा होईल.

इस्राएलाने पाप केले आणि उच्चस्थाने बांधली. आवेन मधील उच्चस्थानांचा नाश केला जाईल त्यांच्या वेदीवर काटेकुटे व तण वाढतील मग ते पर्वतांना म्हणतील, “आम्हाला झाका” आणि टेकड्यांना म्हणतील, “आमच्यावर पडा.”

इस्राएलला पापाची किंमत मोजावी लागेल

इस्राएल, गिबाच्या काळापासून तू पाप केले आहेस ते लोक तेथे पाप करीतच राहिले. गिबातील ते दुष्ट युध्दात खरोखरी पकडले जातील. 10 मी त्यांना शिक्षा करण्यासाठी येईन सैन्ये त्यांच्या विरोधात गोळा होतील. ती इस्राएलींच्या दोन्ही पापाबंद्दल त्यांना शिक्षा करतील.

11 एफ्राईम शिकविलेल्या तरुन कालवडीप्रमाणे आहे. तिला खळ्यातील धान्यावरुन चालायला आवडते. मी तिच्या गळ्यात चांगले जोखड अडकवीन. एफ्राईमला दोराने बांधीन मग यहूदा नांगरणी करील याकोब स्वतः ढेकळे फोडील.

12 जर तुम्ही चांगुलपणा पेरलात, तर तुम्हाला खऱ्या प्रेमाचे पीक मिळेल तुमचे शेंत नांगरा तुम्हाला परमेश्वरासह पीक मिळेल. तो येईल आणि पावसाप्रमाणे तुमच्यावर चांगुलपणाचा वर्षाव करायला लावील.

13 पण तुम्ही पाप पेरले, म्हणून तुम्हाला अडचणींचे पीक मिळाले तुम्हाला तुमच्या खोटेपणाचे फळ मिळाले. का? कारण तुम्ही तुमच्या शक्तीवर आणि तुमच्या सैनिकांवर विश्वास ठेवला. 14 म्हणून तुमच्या सैन्याला रणशिंग ऐकू येईल तुमच्या सर्व गढ्यांचा नाश होईल. तो नाश, शल्मनाने जसा बेथ-आर्बेलचा नाश केला, तसा असेल त्या यूध्दाच्या वेळी, आया मलांबरोबर ठार मारल्या गेल्या. 15 आणि हे सर्व तुझ्याबाबतीत बेथेल येथे घडेल. का? कारण तुम्ही खूप पापे केली. तो दिवस उजाडताच इस्राएलच्या राजाचा संपूर्ण नाश होईल.

मार्क 10:17-22

श्रीमंत मनुष्य अनुसरण्याचे नाकारतो(A)

17 येशू प्रवासाला निघाला असता एक मनुष्य त्याच्याकडे धावत आला आणि त्याच्यापुडे गुडघे टेकून म्हणाला, “उत्तम गुरूजी, अनंतकाळचे जीवन मिळण्यासाठी मी काय करावे?”

18 येशू त्याला म्हणाला, “तू मला उत्तम का म्हणतोस? एका देवाशिवाय कोणी उत्तम नाही. 19 तुला आज्ञा माहीत आहेतच: खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, फसवू नको, आपल्या वडिलांचा व आपल्या आईचा सन्मान कर.”

20 तो मनुष्य म्हणाला, “गुरूजी, मी तरूणपणापासून या आज्ञा पाळत आलो आहे.”

21 येशूने त्याच्याकडे पाहिले त्याला त्याच्याविषयी प्रेम वाटले. तो त्याला म्हणाला, “तुझ्यामध्ये एका गोष्टीची उणीव आहे. जा, तुझ्याजवळ जे सर्व आहे ते वीक. नंतर ते गोरगरिबांस वाटून टाक, स्वर्गात तूला संपत्ती प्राप्त होईल. तर मग चल आणि माझ्या मागे ये.”

22 हे शब्द ऐकून तो मनुष्य खूप निराश झाला व खिन्न होऊन निघून गेला कारण त्याच्याजवळ खूप संपत्ति होती.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center