Revised Common Lectionary (Semicontinuous)
71 परमेश्वरा, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
त्यामुळे माझी कधीही निराशा होणार नाही.
2 तुझ्या चांगुलपणात तू मला वाचवशील.
तू माझी सुटका करशील, माझ्याकडे लक्ष दे आणि मला वाचव.
3 माझा किल्ला हो, सुरक्षित ठिकाणी धावत जाण्याचे माझे घर तू हो,
तू माझे सुरक्षित ठिकाण माझा खडक आहेस.
तेव्हा मला वाचवण्याची आज्ञा दे.
4 देवा, तू मला दुष्ट लोकांपासून वाचव.
मला वाईट, पापी लोकांपासून वाचव.
5 प्रभु, तू माझी आशा आहेस मी तरुण मुलगा असल्यापासूनच
तुझ्यावर विश्वास टाकला आहे.
6 जन्माला यायच्या आधीपासूनच मी तुझ्यावर अवलंबून आहे
मी माझ्या आईच्या शरीरात होतो
तेव्हा पासूनच तुझ्यावर विसंबून होतो मी नेहमीच तुझी प्रार्थना केली.
यरुशलेमला शत्रूचा घेराव
6 बन्यामीनच्या लोकांनो, जीव वाचविण्यासाठी पळा.
यरुशलेमपासून दूर पळा.
तकोवामध्ये तुतारी फुंका.
बेथ-हक्करेम वर धोक्याचा इशारा देणारे निशाण उभारा.
हे सर्व करा कारण उत्तरेकडून अरिष्ट येत आहे.
भयानक नाश तुमच्याकडे येत आहे.
2 सियोनच्या कन्ये, तू सुंदर कुरणासारखी आहेस.
3 मेंढपाळ आपापले कळप
घेऊन यरुशलेमला येतात.
ते तिच्या सर्व बाजूंना तंबू ठोकतात.
प्रत्येक मेंढपाळ स्वतःच्या कळपाची काळजी घेतो.
4 “यरुशलेमविरुद्ध् लढण्यास तयार व्हा.
उठा! आपण दुपारी नगरावर हल्ला करु
पण आधीच उशीर होत आहे.
संध्याछाया लांबत आहेत.
5 म्हणून उठा! आपण रात्रीच तिच्यावर हल्ला करु
या व यरुशलेमच्या भक्कम तटबंदीचा नाश करु या.”
6 सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो,
“यरुशलेमच्या भोवतालची झाडे कापा
आणि तिच्याविरुद्ध् मोर्चा बांधा.
ह्या नगरीला शिक्षा व्हावीच
ह्या नगरीच्या आत जुलुमाशिवाय काहीही नाही.
7 जशी विहीर आपले पाणी ताजे ठेवते,
तशीच यरुशलेम आपला दुष्टपणा ताजा ठेवते.
मी नेहमीच येथील लूटमार व हिंसाचार याबद्दल ऐकतो.
मी येथे सदोदित पीडा आणी घृणा पाहतो.
8 यरुशलेम, धोक्याचा इशारा ऐक.
जर तू ऐकले नाहीस तर मी तुझ्याकडे पाठ फिरवीन,
तुझ्या भूमीचे ओसाड वाळवंट करीन.
येथे कोणीही राहू शकणार नाही.”
9 सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो
“इस्राएलमध्ये मागे उरलेल्या
इस्राएली लोकांना गोळा करा.
द्राक्षवेलींवरची उरलेली द्राक्षे तुम्ही जशी गोळा करता,
तसे त्यांना गोळा करा.
द्राक्ष गोळा करणारा जसा प्रत्येक वेल तपासतो,
तशी तुम्ही प्रत्येकाची तपासणी करा.”
10 मी कोणाशी बोलू शकतो?
मी कोणाला इशारा देऊ शकतो?
माझे कोण ऐकेल?
इस्राएलच्या लोकांनी आपले कान बंद करुन घेतले आहेत.
म्हणून ते माझा इशारा ऐकू शकत नाहीत.
लोकांना परमेश्वराची शिकवण आवडत नाही.
त्यांना परमेश्वराचा संदेश ऐकावासा वाटत नाही.
11 पण माझ्यात (यिर्मयात) परमेश्वराचा
राग पूर्ण भरला आहे.
“तो आतल्या आत दाबून धरण्याचा मला आता कंटाळा आला आहे.
रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांवर, एकत्र जमलेल्या तरुणांवर परमेश्वराचा राग ओत.
पुरुष व त्याची बायको असे दोघही, तसेच सर्व म्हातारे पकडले जातील.
12 त्यांची घरे दुसऱ्यांना दिली जातील.
त्यांची शेते व त्यांच्या बायका दुसऱ्यांना दिल्या जातील.
मी माझा हात उगारीन आणि यहूदातील लोकांना शिक्षा करीन.”
हा परमेश्वराचा संदेश आहे.
13 “इस्राएलमधल्या सर्व लोकांना जास्तीच जास्त पैसा पाहिजे.
अति महत्वाचे व अति सामान्य, सर्व सारखेच आहेत.
संदेष्ट्यांपासून याजकापर्यंत सर्व खोटे बोलतात.
14 माझे लोक अतिशय वाईटरीतीने दुखावले जात आले आहेत.
संदेष्ट्यांनी आणि याजकांनी त्यांच्या जखमा बांधाव्यात.
पण ते तर त्या जखमांवर, किरकोळ खरचटल्यावर करतात त्याप्रमाणे इलाज करतात.
ते म्हणतात, ‘ठीक आहे, ठीक आहे.’
पण हे ठीक नाही. [a]
15 संदेष्ट्यांना आणि याजकांना त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल लाज वाटली पाहिजे.
पण त्यांना अजिबात लाज वाटत नाही.
आपल्या दुष्कृत्यांची शरम वाटण्याएवढीही त्यांना जाणीव नाही.
म्हणून बाकीच्यांबरोबर त्यांना शिक्षा होईल.
मी जेव्हा लोकांना शिक्षा करीन तेव्हा
हे सर्वजण जमिनीवर फेकले जातील.”
परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
16 परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो:
“चौकात उभे राहा आणि पाहा.
जुना रस्ता कोणता ते विचारा.
चांगल्या रस्त्याची चौकशी करा व चांगल्या रस्त्यावरुन चाला.
तुम्ही असे केल्यास तुमचा तुम्हाला विश्वास सापडेल.
पण तुम्ही लोक म्हणाला आहात की, ‘आम्ही चांगल्या रस्त्यावरुन चालणार नाही.’
17 तुमच्यावर लक्ष ठेवण्यासाठी मी रखवालदार निवडले.
मी त्यांना सांगितले, ‘रणशिंगाचा आवाज ऐका.’
पण ते म्हणाले, ‘आम्ही ऐकणार नाही.’
18 तेव्हा सर्व राष्ट्रांनो, ऐका!
त्या देशातील लोकांनो, लक्ष द्या.
19 पृथ्वीवरच्या लोकांनो, ऐका!
यहुदातील लोकांवर मी अरिष्ट आणणार आहे.
का? कारण त्यांनी हेतूपूर्वक दुष्कृत्ये केली.
माझ्या संदेशाकडे दुर्लक्ष केले,
माझ्या आज्ञांचे पालन करण्याचे नाकारले.”
3 तुम्ही खचून जाऊ नये आणि धीर सोडू नये म्हणून पापी लोकांचा मोठ्या प्रमाणातील विरोध सहन कला. त्याचा विचार करा.
God Is Like a Father
4 पापाविरुद्धच्या तुमच्या युद्धात तुम्ही रक्त सांडेपर्यंत अजून झगडा दिला नाही. 5 ज्याच्याकडून तुम्हांला उत्तेजन मिळेल असा जो शब्द (मुले) तुम्हाला उद्देशून वापरण्यात आला आहे त्याचा कदाचित तुम्हाला विसर पडलेला दिसतो:
“माइया मुला, प्रभूच्या शिस्तीचा अनादर करू नको,
आणि जेव्हा तो तुला ताळ्यावर आणतो, तेव्हा तू धीर सोडू नको.
6 कारण ज्याच्यावर प्रभु प्रेम करतो, त्यांना तो शिस्त लावतो आणि
ज्यांना तो आपले पुत्र म्हणून स्वीकारतो, त्यांना तो शिक्षा करतो.” (A)
7 हा कठीण समय आहे म्हणून शिस्त सहन कर. ते असे दर्शविते की, देव तुम्हांला मुलांसारखी वागणूक देत आहे; कारण असा कोणता मुलगा आहे ज्याला वडील शिस्त लावीत नाहीत? 8 जर तुम्हांला शिस्त लावलेली नाही तर जसा इतर सर्व मुलांचा अनुभव असतो तसे तुम्ही अनौरस मुले आहात आणि तुम्ही खरे पुत्र नाही. 9 याशिवाय आम्हा सर्वांना जगिक पिता असताना त्यांनी आम्हाला शिस्त लावली आणि त्याबद्दल आम्ही त्यांचा आदर राखला. तर मग आम्ही आमच्या आध्यात्मिक पित्याच्या किती तरी अधिक प्रमाणात अधीन होऊन जगले पाहिजे बरे? 10 आमच्या मानवी वडिलांनी त्यांच्या दृष्टीने अती उत्तम अशी शिस्त थोड्या काळासाठी लावली. पण देव आम्हाला आमच्या चांगल्यासाठी शिस्त लावतो, यासाठी की, त्याच्या पवित्रपणात आपणही वाटेकरी व्हावे. 11 शिक्षेने शिस्त लावण्याच्या वेळेस कोणतीही शिक्षा चांगली वाटत नाही, तर दु:खाची वाटते पण नंतर ज्या लोकांना शिस्तीचे धडे शिकायला मिळाले आहेत, त्यांना धार्मिकपणाच्या आणि शांतीच्या जीवनाची फळे चाखण्याची संधि मिळते.
आपण कसे जगतो याविषयी जागरुक राहा
12 म्हणून तुमचे गळून गेलेले हात उंच करा आणि तुमचे अशक्त गुडघे बळकट करा! 13 तुमच्या पावलांकरीता सरळ रस्ता तयार करा यासाठी की, लंगडे पाय निकामी होऊ नयेत, तर उलट ते बरे व्हावेत.
14 सर्व लोकांबरोबर शांतीने राहण्याचा प्रयत्न करा व पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करा. कारण त्याशिवाय (पवित्रतेशिवाय) कोणालाही प्रभूला पाहता येणार नाही. 15 कोणीही देवाची कृपा चुकवू नये, यासाठी तिकडे लक्ष द्या आणि इकडे लक्ष द्या की, कोणतेही कडूपणाचे मूळ वाहून त्यापासून समस्या निर्माण होऊ नये व इतर लोकांची मने कलुषित करू नये, म्हणून जपा. 16 कोणीही व्यभिचारी असू नये किंवा एका जेवणापायी आपला वडीलकीचा हक्क विकून टाकणाऱ्या एसावासारखे जगिक विचाराचे असू नये याकडे लक्ष द्या. 17 नंतर तुम्हाला माहीत आहे जेव्हा त्याला वारसहक्काने आशीर्वाद अपेक्षित होता, तेव्हा तो नाकारण्यात आला. जरी त्याने रडून आशीर्वाद मिळविण्याचा प्रयत्न केला, तरी आपल्या वडिलांचे मन तो बदलू शकला नाही.
2006 by World Bible Translation Center