Revised Common Lectionary (Semicontinuous)
हामानला फाशी
7 तेव्हा राजा आणि हामान राणी एस्तेरकडे भोजनाला गेले. 2 मेजवानीच्या या दुसऱ्या दिवशी ते द्राक्षारस घेत असताना राजाने पुन्हा एस्तेरला विचारले, “राणी एस्तेर, तुला काय हवे आहे? काहीही माग. ते तुला मिळेल. काय हवे तुला? तुला मी काहीही देईन. अगदी अर्धे राज्य देखील.”
3 तेव्हा राणी म्हणाली, “राजा, तुला मी आवडत असेन आणि तुझी मर्जी असेल तर कृपा करून मला जगू दे. माझ्या लोकांनाही जगू दे. एवढेच माझे मागणे आहे. 4 कारण, पुरते नेस्तनाबूत होण्यासाठी, मारले जाण्यासाठी मी आणि माझे लोक विकले गेलो आहोत. आमची नुसती गुलाम म्हणून विक्री झाली असती तरी मी गप्प राहिले असते. कारण राजाला तसदी देण्याइतकी ती समस्या गंभीर ठरली नसती.”
5 तेव्हा राजा अहश्वेरोशने राणी एस्तेरला विचारले, “असे तुमच्या बाबतीत कोणी केले? तुझ्या लोकांच्या बाबतीत असे करण्याचे धाडस करणारा कोण तो माणूस?”
6 एस्तेर म्हणाली, “तो आपल्या समोरच आहे. हाच तो दुष्ट हामान आमचा शत्रू.”
तेव्हा राजा आणि राणीसमोर हामान भयभीत झाला.
9 हर्बोना नावाचा राजाचा खोजा म्हणाला, “हामानच्या घराजवळ पंचाहत्तर फूट उंचीचा वधस्तंभ उभारला आहे. मर्दखयला फाशी द्यायला त्याने तो उभारला होता. तुम्हाला ठार करायचा कट उघडकीला आणून ज्याने तुम्हाला मदत केली तोच हा मर्दखय.”
राजा म्हणाला, “हामानला त्या स्तंभावरच फाशी द्या.”
10 तेव्हा मर्दखयसाठी उभारलेल्या स्तंभावर हामानला फाशी देण्यात आली. राजाचा क्रोध शमला.
20 मर्दखयने जे जे झाले ते सगळे लिहून काढले. मग त्याने राजा अहश्वेरोशच्या प्रांतातील जवळदूरच्या सर्व प्रांतातील यहुद्यांना पत्रे पाठवली. 21 दरवर्षी अदार महिन्याच्या चौदाव्या आणि पंधराव्या दिवशी यहुद्यांना पुरीम साजरा करायला सांगायला त्याने ती पत्रे लिहिली. 22 या दिवशी यहुद्यांनी आपल्या शत्रूचा काटा काढला म्हणून या दिवशी आनंदोत्सव साजरा करावा. या महिन्यात त्यांच्या शोकाचे रुपांतर आनंदात झाले. म्हणून हा महिनाही उत्सवासारखा साजरा करावा. या महिन्यात त्यांच्या आक्रोशाचे रुपांतर आनंदोत्सवाच्या दिवसात झाले. मर्दखयाने सर्व यहुद्यांना पत्रे लिहिली. सणासुदीचे दिवस म्हणून त्याने हे दिवस त्यांना साजरे करायला सांगितले. या दिवशी त्यांनी मेजवान्या द्याव्यात, भेटवस्तूंची देवाणघेवाण करावी आणि गरिबांना भेटवस्तू द्याव्यात.
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे दावीदाचे स्तोत्र.
124 परमेश्वर जर आपल्या बाजूला नसता तर आपले काय झाले असते?
इस्राएल, मला उत्तर दे.
2 लोकांनी आपल्यावर हल्ला केला
तेव्हा जर परमेश्वर आपल्या बाजूला नसता तर आपले काय झाले असते?
3 आपले शत्रू आपल्यावर जेव्हा रागावले असते
तेव्हा त्यांनी आपल्याला जिवंत गिळले असते.
4 आपल्या शत्रूंचे सैन्य महापुरासारखे आपल्या अंगावरुन गेले असते.
नदी प्रमाणे त्यांनी आपल्याला बुडवले असते.
5 गर्विष्ठ लोकांनी वर वर चढणाऱ्या पाण्याप्रमाणे
आपल्या तोंडापर्यंत येऊन आपल्याला बुडवले असते.
6 परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराने आपल्या शत्रूंना
आपल्याला पकडू दिले नाही आणि ठार मारु दिले नाही.
7 जाळ्यात सापडलेल्या आणि
नंतर त्यातून सुटलेल्या पक्ष्याप्रमाणे आपण आहोत.
जाळे तुटले आणि आपण त्यातून सुटलो.
8 परमेश्वराकडून आपली मदत आली.
परमेश्वराने पृथ्वी आणि स्वर्ग निर्माण केला.
प्रार्थनेचे सामर्थ्य
13 तुमच्यातील कोणी संकटात आहे काय? त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदी आहे काय? त्याने स्तुतिगान करावे. 14 तुमच्यापैकी कोणी आजारी आहे काय? त्याने मंडळीतील वडिलांना बोलवावे व त्यांना त्याच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगावे, आणि प्रभूच्या नावाने त्याच्यावर तेल लावावे 15 विश्वासाने केलेली प्रार्थना आजारी मनुष्याला बरे करील व प्रभु त्याला उठविल. जर त्याने पापे केली असतील तर प्रभु त्याची क्षमा करील.
16 म्हणून एकमेकांकडे आपल्या पापांची कबुली द्या आणि एकमेकांसाठी प्रार्थना करा. यासाठी की, तुम्ही बरे व्हावे. नीतिमान मनुष्याची प्रार्थना सामर्थ्ययुक्त व परिणामकारक असते. 17 एलीया हा आपल्यासारख्या स्वभावाचा मनुष्य होता. पाऊस पडू नये म्हणून त्याने कळकळीने प्रार्थना केली आणि नंतरची साडेतीन वर्षे देशात पाऊस पडला नाही. 18 मग त्याने पुन्हा प्रार्थना केली व आकाशाने पाऊस दिला आणि पृथ्वीने आपले धान्य उपजविले.
Helping People When They Sin
19 माझ्या बंधूंनो, जर तुमच्यापैकी कोणी चुकला किंवा सत्यापासून दूर भटकला असेल आणि जर कोणी त्याला परत आणले तर पापी मनुष्याला चुकीच्या मार्गावरून तो परत आणतो. 20 तो त्याचा जीव मरणाच्या दाढेतून सोडवितो. आणि त्याच्या पुष्कळ पापांची क्षमा होते.
कोणीही मनुष्य जो आपणविरूद्ध नाही तो आपल्या बाजूचा आहे(A)
38 योहान येशूला म्हणाला, “गुरुजी, आम्ही एकाला आपल्या नावाने भुते काढताना पाहिले आणि आम्ही त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला कारण तो आपल्यापैकी नव्हता.”
39 परंतु येशू म्हणाला, “त्याला मना करू नका, कारण जो कोणी माझ्या नावाने चमत्कार करतो तो नंतर माझ्याविषयी वाईट बोलू शकणार नाही. 40 जो आपल्याविरुद्ध नाही तो आपल्याला अनुकूल आहे. 41 मी तुम्हांला खरे सांगतो, रिव्रस्ताचे म्हणून तुम्हांला जो कोणी एक प्याला पाणी देईल तो नक्कीच आपल्या प्रतिफळाला मुकणार नाही.
पापाचा परिणाम या बद्दल येशू इशारा देतो(B)
42 “माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला देवापासून परावृत्त करील, त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात फेकून देणे हे त्याच्यासाठी बरे आहे. 43 जर तुझा उजवा हात तुला पाप करायला प्रवृत्त करतो तर तो तोडून टाक. दोन हात असून नरकात न विझणाऱ्या अग्नीत जाण्यापेक्षा व्यंग असून जीवनात जाणे बरे. 44 [a] 45 आणि जर तुझा पाय तुला पाप करावयास लावतो तर तो काढून टाक. दोन पाय असून नरकात फेकले जावे यापेक्षा लंगडे होऊन जीवनात गेलेले बरे. 46 [b] 47-48 जर तुझा उजवा डोळा तुला पाप करावयास लावितो तर तो काढून टाक. दोन डोळे असून जेथे त्यांना खाणारे किडे मरत नाहीत आणि अग्नि विझत नाही अशा नरकात फेकले जावे यापेक्षा एक डोळा असून देवाच्या राज्यात जाणे हे बरे.
49 “कारण प्रत्येकाची अग्नीने परीक्षा घेतली जाईल.
50 “मीठ चांगले आहे. जर मिठाने त्याचा खारटपणा घालविला तर ते पुन्हा कसे खारट कराल. तुम्ही आपणामध्ये मीठ असू द्या आणि एकमेकांबरोबर शांतीने राहा.”
2006 by World Bible Translation Center