Revised Common Lectionary (Semicontinuous)
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र
125 जे लोक परमेश्वरावर विश्वास ठेवतात ते सियोन पर्वतासारखे आहेत.
ते कधीही थरथरणार नाहीत.
ते सदैव असतील.
2 यरुशलेमच्या सभोवती पर्वत आहेत आणि परमेश्वर त्याच्या माणसांभोवती आहे.
तो त्याच्या माणसांचे सदैव रक्षण करील.
3 दुष्ट लोक चांगल्या माणसांच्या जमिनीवर कधीही ताबा मिळवू शकणार नाहीत.
जर तसे घडले तर चांगले लोकही वाईट वागायला लागतील.
4 परमेश्वरा, तू चांगल्या लोकांशी चांगला राहा.
ज्या लोकांची मने शुध्द आहेत त्यांच्याशी तू चांगला राहा.
5 दुष्ट लोक वाईट गोष्टी करतात.
परमेश्वर त्या दुष्ट लोकांना शिक्षा करील.
इस्राएलमध्ये शांती नांदू दे.
10 मुला, माझे ऐक. मी जे सांगतो ते कर म्हणजे तू खूप जगशील. 11 मी तुला ज्ञानाविषयी शिकवत आहे. मी तुला सरळ मार्गाने नेत आहे. 12 तू जर याच मार्गाने गेलास तर तू सापळ्यात अडकणार नाहीस. तू पळू शकशील पण अडखळणार नाहीस. तू ज्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करशील त्यात सुरक्षित राहाशील. 13 या धड्यांची नेहमी आठवण ठेवा. हे धडे विसरु नका. ते तुमचे जीवन आहे.
14 दुष्ट लोक जो मार्ग आचरतात त्यावरुन जाऊ नका. तसे जगू नका. त्यांच्यासारखे व्हायचा प्रयत्न करु नका. 15 वाईटापासून दूर राहा. त्याच्या जवळ जाऊ नका. त्याच्या जवळून सरळ निघून जा. 16 वाईट लोक कोणते तरी वाईट कृत्य केल्याशिवाय झोपू शकत नाहीत. त्यांना दुसऱ्यांना त्रास दिल्याशिवाय झोप येत नाही. 17 ते दुष्टपणापासून बनवलेली भाकर खातात आणि हिंसेचे मद्य पितात. (दुष्टपणा केल्याशिवाय ते राहू शकत नाहीत.)
18 चांगले लोक पहाटेच्या प्रकाशासारखे असतात. सूर्य उगवतो आणि दिवस प्रकाशित आणि आनंदमय होतो. 19 पण वाईट लोक रात्रीसारखे असतात. ते काळोखात हरवून जातात आणि दिसू न शकणाऱ्या वस्तूंना अडखळून पडतात.
20 मुला, मी जे सांगितले त्याक़डे लक्ष दे. माझे शब्द लक्षपूर्वक ऐक. 21 तू माझ्या शब्दांना तुला सोडून जायला लावू नकोस. मी सांगतो ते लक्षात ठेव. 22 जे माझी शिकवण ऐकतील त्यांना जीवन मिळेल. माझे शब्द शरीराला आरोग्यासारखे आहेत. 23 तुझ्या हृदयाला काळजीपूर्वक जप. कारण तेथूनच जीवनप्रवाह वाहतात.
24 सत्याला वाकवू नकोस आणि खऱ्या नसलेल्या गोष्टी सांगू नकोस. खोटे बोलू नकोस. 25 तुझ्या समोर असलेल्या चांगल्या आणि शहाण्या ध्येयांपासून दूर जाऊ नकोस. 26 तू जे करशील त्या बाबतीत सावध राहा. चांगले आयुष्य जग. 27 सरळ मार्ग सोडू नकोस. चांगला आणि योग्य मार्ग धर पण वाईटा पासून नेहमी दूर राहा.
12 जे सर्व नियमशास्त्राबाहेर असून पाप करतात, ते नियमशास्त्राबाहेर नाश पावतील. व जितक्यांनी नियम शास्त्राधीन असून पाप केले तितक्यांना नियमशास्त्रानुसार शिक्षा होईल. 13 कारण जे नियमशास्त्र ऐकतात ते देवाच्या दृष्टीने नितिमान आहेत असे नाही. परंतु जे नियमशास्त्र पाळतात आणि नियमशास्त्रांत सांगितल्याप्रमाणे करतात ते नीतिमान ठरतील.
14 कारण जेव्हा यहूदी नसलेले (विदेशी) ज्यांना नियमशास्त्र नाही, मूलतः जरी त्यांना नियमशास्त्र नाही, तरीही नियमशास्त्राप्रमाणे करतात ते स्वतःच नियमशास्त्र आहेत. 15 म्हणजे ते त्यांच्या ह्रदयात नियमशास्त्र लिहिले आहे, असे दाखवतात त्यांची सद्सद्विवेक बुद्धीसुध्दा साक्ष देते आणि त्यांचे एकमेकां विषयीचे विचार त्यांना आरोपी किंवा दोषमुक्त करतात.
16 जेव्हा देव येशू ख्रिस्ताद्वारे मनुष्यांच्या रहस्यांचा, माझ्या सुवार्तेप्रमाणे न्याय करील त्या दिवशी या गोष्टी घडतील.
2006 by World Bible Translation Center