Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
नीतिसूत्रे 31:10-31

सर्वगुणसंपन्न बायको

10 j सर्वगुणसंपन्न स्त्री शोधणे खूप कठीण आहे.
    पण तिचे मोल जड-जवाहिऱ्यापेक्षा अधिक आहे.
11 तिचा नवरा तिच्यावर अवलंबून असतो.
    तो कधीही गरीब होणार नाही.
12 ती तिच्या आयुष्यभर नवऱ्याचे कल्याण करते.
    ती त्याच्यावर कधीही संकटे आणीत नाही.
13 ती नेहमी लोकर आणि कापड
    तयार करण्यात मग्न असते.
14 ती दूरच्या प्रदेशातील मेंढीसारखी असते.
    ती सर्व ठिकाणाहून घरी अन्न आणते.
15 ती भल्या पहाटे उठते तिच्या कुटुंबासाठी अन्न शिजवते
    आणि नोकर मुलींना काय करायचे ते सांगते.
16 ती जमिनी बघते आणि विकत घेते.
    तिने साठवलेल्या पैशांचा उपयोग करुन ती द्राक्षाचे मळे लावते.
17 ती खूप काम करते. ती खूप शक्तिवान आहे.
    आणि सर्व काम करण्यात तरबेज आहे.
18 तिने केलेल्या गोष्टी जेव्हा ती विकते तेव्हा तिला नेहमी नफा होतो.
    आणि ती रात्री उशीरापर्यंत काम करते.
19 ती स्वतःचे सूत स्वतः कातते
    आणि स्वतःचे कपडे विणते.
20 ती नेहमी गरीबांना देते
    आणि ज्यांना गरज असते अशांना मदत करते.
21 जेव्हा बर्फ पडतो (म्हणजेच फार थंडी असते) तेव्हा ती आपल्या कुटुंबाची काळजी करत नाही.
    तिने त्या सर्वाना चांगले, गरम कपडे दिलेले असतात.
22 ती अंथरुणावर टाकायला चादरी आणि पांघरायला पांघरुणे तयार करते.
    चांगल्या कापडापासून केलेले कपडे ती वापरते.
23 लोक तिच्या नवऱ्याचा आदर करतात.
    तो देशाचा एक नेता असतो.
24 ती खूप चांगली उद्योगी-स्त्री असते.
    ती कपडे आणि पट्टे तयार करते आणि ती त्या वस्तू त्या व्यापाऱ्यांना विकते.
25 ती खूप ताकतवान आहे आणि लोक तिला मान देतात
    तीला भविष्याबद्दल विश्वास आहे.
26 ती शहाणपणाचे बोल बोलते.
    ती लोकांना प्रेमळ व दयाळू असावे असे शिकविते.
27 ती कधीही आळशी नसते.
    ती तिच्या घरातील गोष्टींची काळजी घेते.
28 तिची मुले तिच्याबद्दल चांगले बोलतात.
    तिचा नवरा तिच्याबद्दल अभिमान बाळगतो आणि म्हणतो,
29 “चांगल्या स्त्रिया खूप आहेत.
    पण तू सर्वांत चांगली आहेस.”
30 मोहकता आणि सौंदर्य तुम्हाला फसवू शकेल.
    पण जी स्त्री परमेश्वराचा आदर करते तिची प्रशंसा केली पाहिजे.
31 तिला साजेसे बक्षीस तिला द्या.
    लोकांमध्ये तिची प्रशंसा करा.
    तिने ज्या गोष्टी केल्या आहेत त्याबद्दल तिची स्तुती करा.

स्तोत्रसंहिता 1

भाग पहिला

(स्तोत्रसंहिता 1-41)

माणसाने जर वाईट लोकांचा सल्ला मानला नाही, तो पापी लोकांसारखा राहिला नाही
    आणि देवावर [a] विश्वास न ठेवणाऱ्या लोकांबरोबर राहाणे त्याला आवडले नाही
    तर तो माणूस खरोखरच सुखी होईल.
चांगल्या माणसाला परमेश्वराची शिकवण आवडते
    तो त्या बद्दल रात्रंदिवस विचार करत असतो.
त्यामुळे तो माणूस ओढ्याच्या कडेला लावलेल्या झाडासारखा शक्तिशाली होऊ शकतो
    तो योग्यवेळी फळे येणाऱ्या झाडासारखा असतो तो पाने असलेल्या व न मरणाऱ्या झाडासारखा असतो.
    तो जे काही करतो ते यशस्वी होते.

परंतु वाईट लोक असे नसतात ते वाऱ्यावर उडून
    जाणाऱ्या फोलपटासारखे असतात.
न्यायालयातील खटल्याचा निवाडा करण्यासाठी जर चांगले लोक एकत्र आले
    तर वाईट लोकांना अपराधी ठरविले जाईल ते पापीलोक निरपराध ठरविले जाणार नाहीत.
का? कारण परमेश्वर चांगल्यांचे रक्षण करतो
    आणि वाईटाचे निर्दालन करतो.

याकोब 3:13-4:3

खरे शहाणपण

13 तुमच्यामध्ये कोण शहाणा व ज्ञानाने भरलेला आहे? त्याने त्याचे शहाणपण त्याच्या चांगल्या वागणुकीने दाखवावे. नम्रतेने केल्या जाणाऱ्या कृतीद्वारे त्याने आपले शहाणपण दाखवावे. 14 पण जर तुमच्या ह्रदयात कटूरता, मत्सर व स्वार्थी उद्देश असतील तर तुम्ही तुमच्या शहाणपणाची फुशारकी मारू शकणार नाही. कारण तसे करणे म्हणजे खोटेपणाच्या आड सत्य लपविण्यासारखे आहे. 15 कारण अशा प्रकारचे शहाणपण वरून, स्वर्गातून आलेले नाही, तर ते पृथ्वीवरचे आहे. अधार्मिक आणि सैतानी आहे. 16 कारण जेथे मत्सर व स्वार्थी ध्येये आढळतात तेथे अव्यवस्थितपणा व सर्व प्रकारचे वाईट व्यवहारही आढळतात. 17 पण वरून लाभलेले शहाणपण मुळात शुद्ध, शांतिदायक, समजूतदारपणाचे आणि मनमोकळे असून ते दयेचे व चांगली कामे यांना उत्तेजन देणारे असते. तसेच ते पक्षपात न करणारे व कळकळीचे असते. 18 जे लोक शांततेच्या मार्गाने शांति स्थापन करण्याचा प्रयत्न करतात त्यांना सरळ, नीतिपूर्ण वागण्यामुळे मिळणाऱ्या चांगल्या गोष्टींचा लाभ होतो.

स्वतःला देवाला द्या

तुमच्यामध्ये भांडणे व झगडे कोठून येतात? तुमच्यामध्ये ज्या स्वार्थी भावना संघर्ष करतात त्यामधून ते येत नाही काय? तुम्हांला काही गोष्टी पाहिजे असतात पण त्या तुम्हांला मिळत नाही, म्हणून तुम्ही खून करता व दुसऱ्या लोकांचा मत्सर करता पण तरीही तुम्हांला पाहिजे ते मिळत नाही. म्हणून तुम्ही भांडण व झगडे करता. तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी मिळत नाहीत कारण तुम्ही देवाला मागत नाही. आणि जेव्हा तुम्ही मागता, तेव्हा तुम्हाला काहीही मिळत नाही, कारण तुम्ही चुकीच्या उद्देशाने मागता, यासाठी की तुम्हाला जे काही मिळेल ते तुमच्या स्वतःच्या सुखासाठी वापरता.

याकोब 4:7-8

म्हणून स्वतःला देवाच्या स्वाधीन करा. सैतानाला विरोध करा. आणि तो तुमच्यापासून पळून जाईल. देवाजवळ या, आणि तो तुमच्याजवळ येईल. पाप्यांनो, तुमचे हात स्वच्छ करा. आणि तुमची अंतःकरणे शुद्ध करा, जे तुम्ही द्विबुद्धीचे आहात.

मार्क 9:30-37

येशू स्वतःच्या मरणाविषयी सांगतो(A)

30 ते तेथून निघाले आणि गालीलातून प्रवास करीत गेले. ते कोठे आहेत हे कोणालाही कळू नये अशी येशूची इच्छा होती. 31 कारण तो आपल्या शिष्यांना शिकवीत होता. तो त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र विश्वासघाताने धरून माणसांच्या हाती दिला जाणार आहे. ते त्याला ठार मारतील. परंतु मारला गेल्यानंतर तो तिसऱ्या दिवशी उठेल.”

32 पण या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला नाही. आणि त्याविषयी त्याला विचारण्यास ते भीत होते.

सर्वात मोठा कोण हे येशू सांगतो(B)

33 येशू व त्याचे शिष्य कफर्णाहूमास आले. येशू घरात असता त्याने त्यांना विचारले, “वाटेत तुम्ही कशाविषयी चर्चा करीत होता?” 34 परंतु ते गप्प राहिले कारण वाटेत त्यांनी सर्वांत मोठा कोण य़ाविषयी चर्चा केली होती.

35 मग येशू खाली बसला, त्याने बारा जणांना बोलावून त्यांना म्हटले, “जर कोणाला पहिले व्हावयाचे असेल तर त्याने शेवटले झाले पाहिजे आणि सर्वांचा सेवक झाले पाहिजे.”

36 येशू एका बालकाला घेऊन त्यांच्यापुढे उभा राहिला, येशूने त्या बालकाच्या हातास धरले व बालकास उचलून घेऊन त्यांना म्हणाला, 37 “जो कोणी ह्यासारख्या लहान बालकाला माझ्या नावाने स्वीकारतो तो मला स्वीकारतो आणि जो कोणी मला स्वीकारतो तो केवळ माझाच स्वीकार करतो असे नाही तर ज्याने मला पाठविले त्याचाही स्वीकार करतो.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center