Revised Common Lectionary (Semicontinuous)
9 परमेश्वरा, मी तू करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दलचे नवे गाणे गाईन.
मी तुझी स्तुती करेन आणि दहा तारांची वीणा वाजवेन.
10 परमेश्वर राजांना त्यांच्या लढाया जिंकायला मदत करतो.
परमेश्वराने त्याचा सेवक दावीद याला त्याच्या शत्रूंच्या तलवारीपासून वाचवले.
11 मला या परक्यांपासून वाचव.
हे शत्रू खोटारडे आहेत.
ते खऱ्या नसलेल्या गोष्टी सांगतात.
12 आमची तरुण मुले बळकट झाडांसाखी आहेत.
आमच्या मुली राजवाड्यातल्या सुंदर सजावटीप्राणे आहेत.
13 आमची धान्यांची कोठारे वेगवेगळ्या धान्यांनी भरलेली आहेत.
आमच्या शेतात हजारो मेंढ्या आहेत.
14 आमचे सैनिक सुरक्षित आहेत.
कुठलाही शत्रू आत येण्याचा प्रयत्न करीत नाही.
आम्ही लढाईवर जात नाही.
आमच्या रस्त्यात लोक ओरडत नाहीत.
15 अशा वेळी लोक खूप आनंदी असतात.
जर परमेश्वर त्यांचा देव असेल तर लोक खूप आनंदी असतात.
यरुशलेमच्या स्त्रिया म्हणतात
5 वाळवंटातून, प्रियकराच्या
अंगावर रेलत येणारी ही स्त्री कोण आहे?
ती त्याच्याशी बोलते
मी तुला सफरचंदाच्या झाडाखाली उठवले,
जिथे तुझ्या आईने तुला प्रसवले,
जिथे तुझा जन्म झाला तेथे.
6 तू तुझ्या हृदयावर जी मोहोर धारण करतोस,
किंवा तुझ्या बोटात तुझा शिक्का असलेली अंगठी घालतोस त्याप्रमाणे
तू मला तुझ्या अगदी जवळ ठेव.
प्रेम मृत्यूसारखेच शक्तिशाली आहे.
वासना थडग्यासारखी शक्तिमान आहे.
त्याच्या ठिणग्या ज्वाला बनतात
आणि त्याची खूप मोठी आग होते.
7 प्रेमाला पूर नष्ट करु शकत नाही,
नद्या प्रेमाला बुडवू शकत नाहीत.
जर एखाद्याने आपल्या जवळचे सर्वकाही प्रेमासाठी उधळून दिले
तर त्याला बोल लावला जाईल.
त्याचा तिरस्कार होईल.
9 आणखीतो त्यांना म्हणाला, “आपल्या स्वतःच्या रूढी प्रस्थापित करण्यासाठी देवाच्या आज्ञा दूर करण्यात तुम्ही पटाईत आहात. 10 मोशे म्हणाला, ‘तू आपल्या आईवडिलांचा सन्मान कर.’ [a] जो मनुष्य आपल्या वडिलांबद्दल किंवा आईबद्दल वाईट बोलतो, त्याला ठार मारलेच पाहिजे. [b] 11 परंतु तुम्ही शिकविता, एखादा मनुष्य आपल्या आईला व वडिलांना असे म्हणू शकतो की, ‘तुम्हांला मदत करण्यासाठी माझ्याकडे थोडेफार आहे. परंतु तुम्हाला मदत करण्यासाठी मी ते वापरणार नाही. मी ते देवाला देईन.’ 12 तुम्ही त्याला त्याच्या वडिलांसाठी किंवा आईसाठी काही करू देत नाही. 13 तुम्ही अशा रूढी पाळण्याचे शिकवून रुढींनी देवाचे वचन रद्द करता आणि तुम्ही अशा प्रकारच्या अनेक गोष्टी करता.”
14 येशूने लोकांना आपल्याकडे पुन्हा बोलावून म्हटले, “प्रत्येकाने माझे ऐका व हे समजून घ्या. 15 बाहेरून मनुष्याच्या आत जाऊन त्याला अपवित्र करील असे काही नाही. ज्या कुणाला ऐकायला कान आहेत तो ऐको.” 16 [c]
17 लोकसमुदायाला सोडून येशू घरात गेला तेव्हा शिष्यांनी त्याला या दाखल्याविषयी विचारले, 18 तो त्यांना म्हणाला, “तुम्हांलादेखील हे समजत नाही काय?” जे बाहेरून मनुष्याच्या आत जाते ते त्याला अपवित्र करीत नाही हे तुम्हांला समजत नाही का? 19 कारण ते त्याच्या अंतःकरणात जात नाही तर त्याच्या पोटात जाते. नंतर ते शरीराबाहेर जाते. असे सांगून सर्व अन्न त्याने शुद्ध घोषित केले.
20 आणखी तो म्हणाला, “जे माणसाच्या आतून बाहेर पडते ते माणसाला अपवित्र करते. कारण आतून म्हणजे अंतःकरणातून वाईट विचार बाहेर पडतात. 21 जारकर्म, चोरी, खून, 22 व्यभिचार, लोभ, वाईटपणा, कपट, असभ्यता, मत्सर, शिव्यागाळी, अहंकार आणि मूर्खपणा, 23 या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर पडतात आणि माणसाला अपवित्र करतात.”
2006 by World Bible Translation Center