Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 1

भाग पहिला

(स्तोत्रसंहिता 1-41)

माणसाने जर वाईट लोकांचा सल्ला मानला नाही, तो पापी लोकांसारखा राहिला नाही
    आणि देवावर [a] विश्वास न ठेवणाऱ्या लोकांबरोबर राहाणे त्याला आवडले नाही
    तर तो माणूस खरोखरच सुखी होईल.
चांगल्या माणसाला परमेश्वराची शिकवण आवडते
    तो त्या बद्दल रात्रंदिवस विचार करत असतो.
त्यामुळे तो माणूस ओढ्याच्या कडेला लावलेल्या झाडासारखा शक्तिशाली होऊ शकतो
    तो योग्यवेळी फळे येणाऱ्या झाडासारखा असतो तो पाने असलेल्या व न मरणाऱ्या झाडासारखा असतो.
    तो जे काही करतो ते यशस्वी होते.

परंतु वाईट लोक असे नसतात ते वाऱ्यावर उडून
    जाणाऱ्या फोलपटासारखे असतात.
न्यायालयातील खटल्याचा निवाडा करण्यासाठी जर चांगले लोक एकत्र आले
    तर वाईट लोकांना अपराधी ठरविले जाईल ते पापीलोक निरपराध ठरविले जाणार नाहीत.
का? कारण परमेश्वर चांगल्यांचे रक्षण करतो
    आणि वाईटाचे निर्दालन करतो.

उपदेशक 1

हे गुरूकडून आलेले शब्द आहेत. हा गुरू दाविदाचा मुलगा आणि यरुशलेमचा राजा होता.

सारे काही व्यर्थ आहे. गुरू म्हणतात, “सगळे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. [a] आयुष्यात केलेल्या अपार कष्टांमुळे माणसाला खरोखरच काही प्राप्त होते का? [b] नाही.”

काहीही बदलत नाही

लोक जगतात आणि लोक मरतात. पण पृथ्वी मात्र सदैव असते. सूर्य उगवतो आणि मावळतो. आणि नंतर तो पुन्हा त्याच ठिकाणाहून उगण्यासाठी धावपळ करतो.

वारा दक्षिणेकडे आणि उत्तरेकडे वाहतो. वारा गोल गोल घुमतो आणि नंतर त्याने ज्या ठिकाणाहून वाहायला सुरवात केली होती तिथून तो परत वाहायला लागतो.

सगळ्या नद्या पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी वाहातात. त्या सागराला जाऊन मिळतात पण समुद्र भरून जात नाही.

शब्द सगळ्या गोष्टी [c] पूर्णपणे सांगू शकत नाहीत. पण लोक बोलणे [d] चालूच ठेवतात. शब्द पुन्हा पुन्हा आपल्या कानावर येतात. पण आपले कान तृप्त होत नाहीत. आणि आपण जे बघतो ते बघून आपल्या डोळ्यांचेही पारणे फिटत नाही.

काहीच नवीन नाही

सुरुवातीपासून गोष्टी जशा होत्या तशाच त्या राहतात. जे आता पर्यंत करण्यात आले तेच करण्यात येणार. या आयुष्यात नवीन असे काहीच नसते.

10 एखादा माणूस म्हणेल, “बघा हे नवीन आहे.” पण ती गोष्ट तर नेहमीच होती. आपल्याही आधी ती इथे होती.

11 खूप पूर्वी घडलेल्या गोष्टी लोकांच्या लक्षात रहात नाहीत. आज घडलेल्या गोष्टी भविष्यात लोकांच्या लक्षात राहाणार नाहीत आणि नंतर आपल्या आधीच्या लोकांनी काय केले ते नंतरच्या लोकाच्या लक्षात राहाणार नाही.

शहाणपण सुख आणते का?

12 मी, गुरू उपदेशक यरुशलेममध्ये इस्राएलचा राजा होतो. 13 मी अभ्यास करायचा निश्चय केला आणि माझ्या शहाणपणाचा उपयोग या जीवनात ज्या गोष्टी केल्या जातात त्या शिकून घेण्यासाठी करायचे ठरवले. मला कळले की देवाने आपल्याला करायला दिलेली ही फार कठीण गोष्ट आहे. 14 मी पृथ्वीवर केल्या गेलेल्या सर्व गोष्टींकडे पाहिले आणि त्या सर्व गोष्टी वेळ वाया घालवण्यासारख्या आहे असे मला वाटले. त्या वारा पकडण्यासारख्या [e] आहे असे वाटले. 15 या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही. जर एखादी वस्तू वाकडी असली तर ती सरळ आहे असे तुम्ही म्हणू शकत नाही. आणि एखादी वस्तु हरवली असली, तर ती आहे असे तुम्ही म्हणू शकत नाही.

16 मी स्वतःशीच म्हणालो: “मी खूप शहाणा आहे. माझ्या आधी ज्या राजांनी यरुशलेमवर राज्य केले त्या सर्वांपेक्षा मी शहाणा आहे. शहाणपण आणि ज्ञान म्हणजे खरोखर काय ते मला माहीत आहे.”

17 शहाणपण आणि ज्ञान हे मूर्खपणाच्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा किती चांगले आहे हे समजून घेण्याचे मी ठरवले. पण शहाणा होणे हे वाऱ्याला पकडण्यासारखे आहे हे मला कळते. 18 अतिशहाणपणाने निराशा येते. ज्या माणसाला खूप शहाणपण मिळते त्यालाच खूप दु:खही मिळते.

मत्तय 23:29-39

29 “अहो, परूश्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दु:खी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही संदेष्ट्यांसाठी कबरा बांधता. आणि जे लोक धार्मिक जीवन जगले त्यांची थडगी सजवता. 30 आणि तुम्ही म्हणता जर आम्ही आमच्या वाडवडिलांच्या काळात जिवंत असतो तर त्यांना या संदेष्ट्यांना जिवे मारण्यास मदत केली नसती. 31 पण ज्यांनी ज्यानी त्यांना जिवे मारले, त्यांचेच तुम्ही वंशज आहात याचा पुरावा तुम्ही देता. 32 पुढे व्हा आणि तुमच्या वाडवडिलांनी सुरू केलेली पापी कामे पूर्ण करा.

33 “तुम्ही साप आहात. विषारी सापाची पिल्ले आहात! तुम्ही देवाच्या हातून सुटू शकणार नाही. तुम्हा सर्वांना दोषी ठरविण्यात येईल. तुम्ही नरकात जाल. 34 मी तुम्हांला सांगतो की मी तुमच्याकडे संदेष्टे, ज्ञानी लोक आणि शिक्षक पाठवीत आहे. त्यांच्यातील काहींना तुम्ही जिवे माराल. त्यांपैकी काहींना वधस्तंभावर खिळाल. त्यांच्यातील काहींना तुमच्या सभास्थानात मारहाण कराल. त्यांचा नगरानगरातून पाठलाग कराल.

35 “म्हणून ज्या चांगल्या लोकांचा वध या पृथ्वीवर झाला त्या सर्वांसाठी तुम्ही दोषी ठराल. हाबेल या चांगल्या मनुष्याच्या वधासाठी तुम्ही दोषी ठराल. आणि तुम्ही बरख्याचा पुत्र जखऱ्याला जिवे मारण्याविषयी दोषी ठराल. त्याला मंदिर आणि वेदी यांच्यामध्ये मारले होते. हाबेलाच्या काळापासून ते जखऱ्याच्या [a] काळापर्यंत जे जे चांगले लोक मारण्यात आले, त्यांच्या वधाविषयी तुम्ही दोषी ठराल. 36 मी तुम्हांला खरे सांगतो; तुम्ही लोक जिवंत असेपर्यंत या गोष्टी घडतील.

यरूशलेमच्या लोकांना येशू सावध करतो(A)

37 “अगे, यरूशलेमे, यरूशलेमे, तू संदेष्ट्यांना जिवे मारतेस. देवाने तुझ्याकडे पाठविलेल्या लोकांना दगडमार करतेस. कोंबडी जशी आपल्या पिल्लांना पंखाखाली एकवटते तसे तुझ्यातील लोकांना एकवटण्याचा पुष्कळ वेळा मी प्रयत्न केला पण तू मला तसे करू दिले नाहीस. 38 आता तुझे घर उजाड होईल. 39 मी तुला सांगतो, ‘प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो. [b] असे म्हणेपर्यंत तू मला पाहणार नाहीस.’”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center