Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी “नष्ट करु नकोस” या चालीवरचे आसाफाचे स्तोत्र
75 देवा, आम्ही तुझी स्तुती करतो.
आम्ही तुझी स्तुती करतो.
तू जवळ आहेस आणि लोक तू करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगतात.
2 देव म्हणतो “मी न्यायदानाची वेळ निवडली,
मी बरोबर न्याय करीन.
3 पृथ्वी आणि तिच्यावरील सारे काही थरथर कापेल
आणि पडायला येईल पण मी त्याला स्थिरता देईन.”
4-5 “काही लोक गर्विष्ठ असतात.
ते शक्तीशाली आणि महत्वपूर्ण आहेत असे त्यांना वाटते,
परंतु मी त्यांना सांगतो, ‘फुशारक्या मारु नका.
एवढे गर्विष्ठ बनू नका.’”
6 या पृथ्वीवर एखाद्या व्यक्तीला मोठा बनवू शकेल
अशी कोणतीही शक्ती नाही. [a]
7 देव न्यायाधीश आहे. कोणी मोठे व्हायचे ते देवच ठरवतो.
देव एखाद्याला वर उचलतो आणि त्याला मोठे बनवतो.
देव एखाद्याला खाली उतरवतो आणि त्याला मोठा करत नाही.
8 देव दुष्टांना शासन करण्यास तयार आहे.
परमेश्वराच्या हातात पेला आहे.
तो पेला विषयुक्त द्राक्षारसाने भरलेला आहे.
तो तो द्राक्षारस ओतेल आणि दुष्ट लोक तो शेवटच्या थेंबापर्यंत पितील.
9 मी नेहमी लोकांना याबद्दल सांगेन.
मी इस्राएलाच्या देवाचे गुणगान करीन.
10 मी दुष्टांकडून सत्ता काढून घेईन
आणि मी चांगल्या लोकांकडे सत्ता देईन.
12 “ईयोबा, मी तुला लिव्याथानाच्या पायांविषयी, त्याच्या शक्तीविषयी
आणि त्याच्या ऐटदार बांध्याविषयी सांगेन.
13 कुणीही त्याची कातडी छेदू शकत नाही.
त्याची कातडी चिलखतासारखी [a] आहे.
14 लिव्याथानाला त्याचा जबडा उघडायला कुणीही भाग पाडू शकत नाही.
त्याच्या तोंडातल्या दातांची लोकांना भीती वाटते.
15 लिव्याथानाच्या पाठीवर ढालीसारख्या खवल्यांच्या
रांगा एकमेकांना चिकटून आहेत.
16 ते खवले एकमेकांना इतके चिकटले आहेत
की त्यातून हवासुध्दा जाऊ शकत नाही.
17 त्याचे खवले एकमेकांशी घटृ बांधलेले आहेत.
ते एकमेकांशी इतके घटृ बांधलेले आहेत की कुणी ते ओढून वेगळे करु शकत नाही.
18 लिव्याथान जेव्हा शिंकतो तेव्हा वीज चमकल्यासारखी वाटते.
त्याचे डोळे पहाटेच्या प्रकाशासारखे चमकतात.
19 त्याच्या तोंडातून आगीचे लोळ बाहेर पडतात.
आगीच्या ठिणग्या निघतात.
20 उकळत्या भांड्याखाली ठेवलेल्या जळत्या गवतातून
निघतो तसा धूर त्याच्या नाकातून येतो.
21 लिव्याथानाच्या श्र्वासानी कोळसे पेटतात
आणि त्याच्या तोंडातून ज्वाला बाहेर पडतात.
22 लिव्याथानाची मान मजबूत आहे.
लोक त्याला घाबरतात आणि त्याच्यापासून दूर पळत सुटतात.
23 त्याच्या कातडीवर एकही मऊ भाग नाही.
ती लोखंडासाखी कठीण आहे.
24 लिव्याथानाचे हृदय पाषाणासारखे आहे.
त्याला भीती वाटत नाही.
ते पाट्यासारखे आहे.
जात्याच्या खालच्या तळीसारखे ते आहे.
25 लिव्याथान उठून उभा राहिला की शूर वीरही घाबरतात.
लिव्याथानाने त्यांची शेपटी हलवली की ते पळून जातात.
26 तलवारी, भाले आणि तीर त्याच्यावर फेकले तरी ते त्याला न लागता परत येतात.
त्या शस्त्रांनी त्याला काहीही इजा होत नाही.
27 तो लोखांडाची कांब गवताच्या काडीसारखी मोडू शकतो.
कुजलेले लाकूड जसे पटकन मोडते तसे तो पितळ मोडतो.
28 तो बाणांना घाबरुन पळून जात नाही.
वाळलेल्या गवताप्रमाणे दगड त्याच्यावर आपटून परत येतात.
29 जेव्हा लाकडी गदा त्याच्यावर आपटली जाते तेव्हा त्याला ते गवत आपटल्याप्रमाणे वाटते.
लोक त्याच्यावर भाले फेकतात तेव्हा तो हसतो.
30 लिव्याथानाच्या शरीरावरची कातडी तीक्ष्ण, टणक खापरासाखी आहे.
तो चिखलात कुळक फिरवल्याप्रमाणे तास पाडतो.
31 लिव्याथान पाण्याला उकळी आल्याप्रमाणे हलवतो.
तो त्याला उकळत्या तेलाच्या भांड्याप्रमाणे तो त्यावर बुडबुडे आणतो.
32 लिव्याथान पोहतो तेव्हा तो आपल्यामागे मार्ग तयार करतो.
तो पाणी ढवळून टाकतो आणि आपल्यामागे पांढरा फेस ठेवतो.
33 पृथ्वीवरचा एकही पशू लिव्याथानासारखा नाही.
तो एक भीतिविरहित प्राणी आहे.
34 लिव्याथान गर्विष्ठ प्राण्याला कमी (तुच्छ) लेखतो.
तो सगळ्या रानटी श्वापदांचा राजा आहे.
आणि मी, परमेश्वराने त्याला निर्माण केले आहे.”
येशू त्याच्या शिष्यांचे पाय धुतो
13 मग वल्हांडण सणापूर्वी येशूने आपण या जगातून निघून पित्याकडे जावे असा समय आला आहे, हे जाणून आपले स्वतःचे लोक जे जगात होते त्यांच्यावर शेवटपर्यंत प्रीति केली.
2 मग संध्याकाळचे भोजन होण्याच्या वेळेस सैतानाने शिमोनाचा मुलगा यहूदा इस्कर्योत याच्या मनात त्याला शत्रूंच्या हाती घावे असे आधीच घालून दिले असताना, 3 आपल्या हाती पित्याने सर्व काही दिले आहे आणि आपण देवापासून आलो आणि आता देवाकडे जातो हे ओळखून, 4 येशू जेवणावरून उठला, त्याने आपली बाह्यवस्त्रे काढून ठेवली व रुमाल घेऊन आपल्या कमरेस बांधला. 5 मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुऊ लागला. आणि कमरेस बांधलेल्या रुमालाने पुसू लागला.
6 मग तो शिमोन पेत्राकडे आला; पण पेत्र त्याला म्हणाला, “प्रभु, तू माझे पाय धुणार काय?”
7 येशूने उत्तर दिले, “मी आता जे करीत आहे, ते तुला आता कळणार नाही, तर पुढे तुला कळेल.”
8 पेत्र त्याला म्हणाला, “तू माझे पाय कधीही धुवायचे नाहीत.”
येशूने उत्तर दिले, “जर मी तुझे पाय धुतले नाहीत तर तुला माझ्या बरोबर वाटा नाही.”
9 शिमोन पेत्राने उत्तर दिले,“मग प्रभु माझे पायच नव्हे तर हात व डोकेही धुवा.”
10 येशूने उत्तर दिले, “ज्याची आंघोळ झाली आहे, त्याचे फक्त पाय धुतले तरी चालेल, कारण तो स्वच्छच आहे. तुम्ही स्वच्छ आहात पण सर्वच नाहीत.” 11 आपल्याला कोण धरून देणार हे येशूला माहीत होते, म्हणून “तुम्ही सर्वच शुद्ध नाहीत” असे तो म्हणाला.
12 जेव्हा त्याने त्याचे पाय धुण्याचे संपविले तेव्हा त्याने आपली बाह्यवस्त्रे घातली व आपल्या जागेवर आला. त्याने त्यांना विचारले, “मी काय केले हे तुम्हांला समजले काय? 13 तुम्ही मला ‘गुरुजी’ आणि ‘प्रभु’ म्हणता आणि योग्य म्हणता, कारण मी तोच आहे. 14 म्हणून मी जो प्रभु आणि गुरु असूनही मी तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुवावे. 15 कारण जसे मी केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हांला उदाहरण घालून दिले. 16 मी खरे सांगतो, दास आपल्या मालकापेक्षा श्रेष्ठ नाही आणि पाठविलेला ज्याने पाठविले त्याच्यापेक्षा श्रेष्ठ नाही. 17 या गोष्टी जर तुम्ही समजता आणि त्या तुम्ही जर केल्या तर तुम्ही आशीर्वादित आहात.
2006 by World Bible Translation Center