Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 26

दावीदाचे स्तोत्र.

26 परमेश्वरा, माझा न्याय कर.
    मी सच्चे आयुष्य जगलो हे सिध्द कर.
    मी परमेश्वरावर विश्वास ठेवणे कधीही सोडले नाही.
परमेश्वरा, माझी चौकशी कर माझी परीक्षा घे.
    माझ्या ह्रदयात आणि मनात अगदी जवळून पाहा.
मी नेहमीच तुझे कोवळे प्रेम बघतो.
    मी तुझ्या सत्याच्या आधाराने जगतो.
मी कपटी लोकांबरोबर जात नाही,
    मी ढोंगी लोकांची कधीही संगत धरीत नाही.
मी त्या दुष्टांच्या टोळीचा तिरस्कार करतो.
    मी त्या दुष्टांच्या टोळीत कधीही सामील होणार नाही.

परमेश्वरा, मी हात स्वच्छ धुवून
    तुझ्या वेदीजवळ आलो आहे.
परमेश्वरा, मी तुझे स्तुतीपर गाणे गातो
    तू ज्या ज्या आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत त्या सत्यांची गाणी मी गातो.
परमेश्वरा, मला तुझे मंदिर आवडते.
    मला तुझा तेजस्वी तंबू आवडतो.

परमेश्वरा, मला पाप्यांच्या यादीत बसवू नकोस.
    त्या खुन्यांबरोबर मला मारु नकोस.
10 ते लोक इतरांना फसवतील.
    वाईट गोष्टी करण्यासाठी ते पैसाही घेतील.
11 परंतु मी निरपराध आहे.
    म्हणून देवा माझ्यावर दया कर आणि मला वाचव.
12 मी सर्व धोक्यांपासून सुरक्षित आहे.
    परमेश्वरा, तुझे भक्त भेटतात तेव्हा मी तुझी स्तुती करतो.

ईयोब 7

ईयोब म्हणाला, “मनुष्याला पृथ्वीवर खूप धडपड करावी लागते.
    त्याचे आयुष्य मजुराच्या आयुष्यासारखे असते.
गुलामाप्रमाणे माणसालाही उन्हातान्हात काम केल्यानंतर थंडगार सावलीची गरज भासते.
    माणूस काम केल्यानंतर पगाराच्या दिवसाची वाट बघणाऱ्या मजुराप्रमाणे आहे.
महिन्या मागून महिने निराशेत निघून गेले.
    माझ्या वाट्याला रात्रीमागून रात्र कष्टाचीच आली.
मी झोपी जाण्याच्या वेळी विचार करतो
    उठण्यासाठी किती वेळ आहे याचा
आणि रात्र संपतच नाही.
    सूर्य उगवेपर्यंत मी या कुशीवरुन त्या कुशीवर तळमळत असतो.
माझे शरीर किड्यांनी आणि घाणींनी भरलेले आहे.
    माझी कातडी सोलवटलेली आणि वाहत्या जखमांनी भरलेली आहे.

“माझे दिवस विणकऱ्याच्या मागापेक्षा भरभर जातात
    आणि माझे आयुष्य आशेशिवाय संपते.
देवा, माझे आयुष्य म्हणजे केवळ श्र्वास आहे हे आठव.
    मी पुन्हा कधीही काही चांगले पाहणार नाही.
आणि तुम्ही मला पुन्हा कधीही पाहणार नाही.
    तुम्ही मला शोधाल तेव्हा मी गेलेला असेन.
ढग दिसेनासा होतो आणि निघून जातो.
    त्याचप्रमाणे माणूस मरतो आणि थडग्यात पुरला जातो.
    तो पुन्हा कधीही परत येत नाही.
10 तो त्याच्या जुन्या घरात कधीही परत येणार नाही.
    त्याचे घर त्याला ओळखणार नाही.

11 “तेव्हा मी गप्प बसणार नाही. मी बोलेन.
    माझ्या आत्म्याला क्लेश होत आहेत.
    माझा आत्मा अगदी कडू जहर झाला आहे म्हणून मी तक्रार करीन.
12 देवा, तू माझ्यावर पाहारा का करीत आहेस?
    मी समुद्र आहे की त्यातला अक्राळ विक्राळ प्राणी?
13 माझे अंथरुणच मला स्वस्थता देऊ शकेल.
    माझा बिछानाच मला विश्रांती आणि स्वास्थ्य देईल.
14 पण देवा, मी जेव्हा स्वस्थ पडतो तेव्हा तू मला भयानक स्वप्नांनी घाबरवतोस.
    आणि तुझ्या दृष्टांतांनी मला भय वाटते.
15 म्हणून जगण्यापेक्षा गुदमरुन
    मरणे मी पसंत करतो.
16 मी माझ्या जीवनाचा तिरस्कार करतो.
    मी आशा सोडून दिली आहे.
मला जगण्याची आसक्ती नाही.
    मला एकटा सोडून दे, माझ्या जीवनाला काही अर्थ नाही.
17 देवा, माणूस तुला इतका महत्वाचा वाटतो?
    तू त्याला इतका आदर का दाखवावास?
    तू त्याची दखल तरी का घेतोस?
18 तू त्याला रोज सकाळी का भेटतोस?
    आणि क्षणाक्षणाला त्याची परीक्षा का घेतोस?
19 देवा, तू एक क्षणभरही माझ्यावरची तुझी नजर वळवीत नाहीस.
    तू मला एक क्षणही एकटा सोडीत नाहीस.
20 देवा, तू लोकांवर नजर ठेवतोस.
    मी पाप केले असले तरी मी आता काय करु शकतो?
तू मला तुझे लक्ष्य का बनवत आहेस?
    मी तुझ्यासाठी एक समस्या बनलो आहे का?
21 तू मला माझ्या पापाबद्दल क्षमा का करुन टाकीत नाहीस?
    मी लवकरच मरेन आणि माझ्या थडग्यात जाईन.
तू नंतर माझा शोध घेशील
    पण मी गेलेला असेन.”

लूक 16:14-18

देवाचे नियमशास्त्र बदलणे शक्य नाही(A)

14 मग जे परुशी धनलोभी होते, त्यांनी हे सर्व ऐकले व त्यांनी त्याचा उपहास केला. 15 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही स्वतःला लोकांसमोर नीतिमान म्हणून मिरवता दाखविता, पण देव तुमची अंतःकरणे ओळखतो. जे लोकांना महत्त्वाचे वाटते ते देवाच्या दृष्टीने टाकावू आहे.

16 “नियमशास्त्र व संदेष्टे योहानापर्यंत होते, तेव्हापासून देवाच्या राज्याची सुवार्ता गाजविली जात आहे. व प्रत्येक जण त्यात घुसण्याचा जोरदार प्रयत्न करीत आहे. 17 एकवेळ आकाश व पृथ्वी नाहीशी होणे शक्य होईल पण नियमशास्त्राचा एक काना मात्राही नाहीसा होणार नाही.

घटस्फोट आणि पुनर्विवाह

18 “जो कोणी आपल्या पत्नीस सूटपत्र देतो व दुसरीबरोबर लग्न करतो तो व्याभिचार करतो आणि जो कोणी एखाद्या स्त्रीशी- जिला तिच्या पतीने टाकलेले आहे तिच्याशी लग्न करतो तो व्यभिचार करतो.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center