Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 26

दावीदाचे स्तोत्र.

26 परमेश्वरा, माझा न्याय कर.
    मी सच्चे आयुष्य जगलो हे सिध्द कर.
    मी परमेश्वरावर विश्वास ठेवणे कधीही सोडले नाही.
परमेश्वरा, माझी चौकशी कर माझी परीक्षा घे.
    माझ्या ह्रदयात आणि मनात अगदी जवळून पाहा.
मी नेहमीच तुझे कोवळे प्रेम बघतो.
    मी तुझ्या सत्याच्या आधाराने जगतो.
मी कपटी लोकांबरोबर जात नाही,
    मी ढोंगी लोकांची कधीही संगत धरीत नाही.
मी त्या दुष्टांच्या टोळीचा तिरस्कार करतो.
    मी त्या दुष्टांच्या टोळीत कधीही सामील होणार नाही.

परमेश्वरा, मी हात स्वच्छ धुवून
    तुझ्या वेदीजवळ आलो आहे.
परमेश्वरा, मी तुझे स्तुतीपर गाणे गातो
    तू ज्या ज्या आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत त्या सत्यांची गाणी मी गातो.
परमेश्वरा, मला तुझे मंदिर आवडते.
    मला तुझा तेजस्वी तंबू आवडतो.

परमेश्वरा, मला पाप्यांच्या यादीत बसवू नकोस.
    त्या खुन्यांबरोबर मला मारु नकोस.
10 ते लोक इतरांना फसवतील.
    वाईट गोष्टी करण्यासाठी ते पैसाही घेतील.
11 परंतु मी निरपराध आहे.
    म्हणून देवा माझ्यावर दया कर आणि मला वाचव.
12 मी सर्व धोक्यांपासून सुरक्षित आहे.
    परमेश्वरा, तुझे भक्त भेटतात तेव्हा मी तुझी स्तुती करतो.

ईयोब 4

अलीफज म्हणतो:

तेमानच्या अलिफाजाने उत्तर दिले:

“मी काहीतरी बोललेच पाहिजे.
    मी जर काही म्हटले तर तू अस्वस्थ होशील का?
ईयोब, तू खूप लोकांना शिकवलं आहेस.
    अशक्त हातांना तू शक्ती दिली आहेस.
खाली पडणाऱ्या लोकांना तू तुझ्या शब्दांनी सावरले आहेस.
    ज्यांच्यात स्वतःहून उभे राहण्याचे बळ नव्हते त्यांना तू सबळ केले आहेस.
पण आता तुझ्यावर संकटे आली
    असताना तू खचला आहेस.
संकटे कोसळल्यावर
    तू कष्टी झाला आहेस.
तू देवाची भक्ती करतोस.
    तुझा त्याच्यावर विश्वास आहे.
तू चांगला माणूस आहेस
    आणि तीच तुझी आशा असू दे.
ईयोब, तू याचा विचार कर, निष्पाप माणसाचा कधी नाश केला गेला नाही.
    चांगल्या लोकांचा कधीच नि:पात होत नाही.
मला काही अन्यायी आणि आयुष्य कष्टी करणारे लोक माहित आहेत,
    पण अशा लोकांना नेहमी शासन होते.
असे लोक देवाच्या शिक्षेमुळे मारले जातात.
    देवाचा क्रोध त्यांना नष्ट करतो.
10 वाईट लोक सिंहासारखी गर्जना करतात आणि गुरगुर करतात.
    परंतु देव त्यांना मुके करतो आणि त्यांचे दात पाडतो.
11 हे वाईट लोक ठार मारण्यासाठी ज्यांना कोणी प्राणी मिळत नाही अशा सिंहाप्रमाणे असतात.
    ते मरतात आणि त्यांची मुले इतस्ततः भटकत राहातात.

12 “माझ्याकडे गुप्तपणे एक निरोप आला
    आणि माझ्या कानी त्याची कुजबुज पडली.
13 त्यामुळे एखाद्या भयंकर स्वप्नाने झोप चाळवावी
    तशी माझी झोप चाळवली गेली.
14 मी घाबरलो. माझा थरकाप झाला.
    माझी सगळी हाडे थरथर कापू लागली.
15 एक आत्मा अगदी माझ्या चेहऱ्याजवळून गेला
    आणि माझ्या शरीरावरचे सगळे केस उभे राहिले.
16 तो आत्मा निश्र्चल उभा राहिला
    पण ते काय होते ते मला दिसू शकले नाही.
माझ्या डोळ्यांसमोर एक आकार होता
    आणि सर्वत्र शांतता होती.
    आणि नंतर मला एक हलका आवाज ऐकू आला:
17 ‘देवापेक्षा माणूस जास्त बरोबर असू शकत नाही.
    माणूस त्याच्या निर्मात्यापेक्षा अधिक पवित्र असू शकत नाही.
18 हे बघा, देव त्याच्या स्वर्गातील दूतांवर देखील विश्वास टाकू शकत नाही.
    त्याला स्वतःच्या दूतांमध्ये सुध्दा काही दोष आढळतात.
19 तेव्हा माणसे नक्कीच वाईट आहेत.
    ते मातीच्या घरात राहातात (म्हणजे त्यांचे शरीर नाशवंत आहे) आणि या मातीच्या घरांचा पाया मातीतच असतो.
    ते पतंगापेक्षाही (किड्यापेक्षाही) अधिक सहजतेने चिरडले जातात.
20 माणसे सकाळपासून संध्याकाळपर्यंत मरत असतात आणि ते कोणाच्या लक्षातही येत नाही.
    ते मरतात आणि कधीच परत न येण्यासाठी निघून जातात.
21 त्यांच्या तंबूच्या दोऱ्या वर खेचल्या जातात [a]
    आणि ते शहाणपणा न मिळवताच मरतात.’”

रोमकरांस 8:1-11

पवित्र आत्म्यात जीवन

म्हणून आता जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना शिक्षा नाही. कारण आत्म्याचा जो नियम ख्रिस्त येशूमध्ये जीवन देतो त्याने पापाचा नियम जो तुम्हांला मरणाकडे नेतो त्यापासून मुक्त केले आहे. नियमशास्त्र समर्थ आहे पण आपण दूर्बळ आहोत त्यामुळे वाचु शकत नाही, देवाने आपल्या पुत्राला पापी देहाच्या प्रतिरुपाने व पापाकरिता पाठवून ख्रिस्ताच्या देहामध्ये पापाला न्यायदंड ठरविला. यासाठी की, नीतिच्या व आवश्यक गोष्टी आपण जे देहाच्या पापमय स्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालतो, त्या आमच्याद्वारे पूर्ण व्हाव्यात.

कारण जे त्यांच्या मानवी पापी देहाप्रमाणे जगतात ते देहाच्या गोष्टींचा विचार करतात, परंतु जे आत्म्याने चालतात व ज्यांचे मन आत्म्याच्या गोष्टींकडे लागलेले असते ते त्याप्रमाणे जीवन जगतात. देहाचे चिंतन हे मरण आहे. पण आत्म्याचे मनन हे जीवन आणि शांति आहे. मानवी स्वभावाचे अधिकार असलेले पापी मन म्हणजे देवाबरोबर वैर आहे. कारण ते देवाच्या नियमाच्या आधीन होत नाही, व त्याला आधीन होताही येत नाही. कारण जे देहस्वभावाच्या आधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्र करता येत नाही.

देवाचा आत्मा तुम्हांमध्ये राहतो, तर तुम्ही देहाचे नसून आत्म्याचे आहात. परंतु जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही. 10 उलट जर ख्रिस्त तुम्हांमध्ये आहे व तुमचा देह पापामुळे मेला आहे तरी नीतिमत्वामुळे तुमच्या आत्म्याच जीवन आहे. 11 आणि ज्या आत्म्याने येशूला मरणातून उठविले तो त्याचा आत्मा तुम्हांमध्ये राहतो त्या तुमच्या मर्त्य शरीराला जीवन देईल.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center