Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the CSB. Switch to the CSB to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 इतिहास 24:1-26:11

याजकांचे गट

24 अहरोनच्या मुलांची वर्गवारी अशी: नादाब, अबीहू एलजार व इथामार हे अहरोनचे मुलगे. पण नादाब आणि अबीहू हे दोघे आपल्या वडीलांच्या आधीच वारले. शिवाय त्यांना मुलेही झाली नव्हती. तेव्हा एलाजार आणि इथामार हेच याजक झाले. प्रत्येकाला नेमून दिलेली कर्तव्ये पार पाडता यावीत म्हणून दावीदाने एलाजार आणि इथामार यांच्या वंशजांची स्वतंत्र गटांत विभागणी करुन टाकली. त्यासाठी दावीदाने सादोक आणि अहीमलेख यांची मदत घेतली. सादोक हा एलाजारच्या वंशातला आणि अहीमलेख इथामारच्या इथामारपेक्षा एलाजारच्या घराण्यात वडीलधारी प्रमुख मंडळी अधिक निघाली. एलाजारच्या घराण्यात सोळा जण प्रमुख होते तर इथामारच्या घराण्यात आठ जण. दोन्ही घराण्यातील पुरुषांची निवड चिठ्ठ्या टाकून केली गेली. काहीजणांना पवित्रस्थानाच्या देखभालीचे मुखत्यार म्हणून नेमले तर काहींना याजक म्हणून सेवेसाठी नेमले. हे सर्वजण एलाजार आणि इथामार यांच्या घराण्यातलेच होते.

शमाया लेखनिक होता. हा नथनेलचा मुलगा. याचे घराणे लेवीचे होते सर्व वंशजांची नावे लिहिण्याचे काम शमायाने केले. राजा दावीद आणि इतर प्रमुख मंडळी-उदाहरणार्थ सादोक हा याजक, अहीमलेख, याजक आणि लेवी यांच्या घराण्यातील प्रमुख-यांच्यासमोर त्याने या नोंदी केल्या. अहीमलेख हा अब्याथारचा मुलगा. दावेळी चिठ्ठ्या टाकून त्यातून एकाची निवड करण्यात येई. आणि शमाया त्या माणसाचे नाव लिहून ठेवी. अशाप्रकारे एलाजार आणि इथामार यांच्या कुळातील लोकांमध्ये कामाची वाटणी करण्यात आली.

यहोयारीबचा गट पहिला होता.

दुसरा गट यदायाचा.

हारीमचा गट तिसरा.

सोरीमचा गट चौथा.

मलकीयाचा पाचवा गट.

सहावा गट मयामिनचा.

10 हक्कोसाचा सातवा गट.

आठवा गट अबीयाचा.

11 नववा गट येशूवाचा.

दहावा गट शकन्याचा.

12 अकरावा गट एल्याशिबाचा.

बारावा गट याकीमचा.

13 तेरावा गट हुप्पाचा.

चवदावा गट येशेबाबाचा.

14 पंधरावा गट बिल्गाचा.

सोळावा गट इम्मेराचा.

15 सतरावा गट हेजीराचा.

अठरावा गट हप्पिसेसाचा.

16 पथह्याचा गट एकोणिसावा.

विसावा गट यहेजकेलाचा.

17 एकविसावा गट याखीनचा.

बाविसावा गट गामूलचा.

18 तेविसावा गट दलायाचा.

आणि चोविसावा गट माज्याचा.

19 परमेश्वराच्या मंदिरात सेवा करण्यासाठी या सर्वांची क्रमाने नेमणूक करण्यात आली. इस्राएलचा परमेश्वर देव याने अहरोनला जे नियम घालून दिले त्याच नियमांचे पालन त्यांनी मंदिराच्या सेवेसाठी केले.

इतर लेवी

20 लेवीच्या इतर वंशजांची नावे खालीलप्रमाणे:

अम्रामच्या वंशातील मुलेबाळे: शूबाएल.

शूबाएलचे वंशज: यहदाया.

21 रहब्याचे वंशज: इशिया. (हा सर्वात थोरला.)

22 इसहार घराण्यापैकी: शलोमोथ.

शलोमोथच्या घराण्यातूनः यहथ.

23 हेब्रोनचा मोठा मुलगा यरीया.

हेब्रोनचा दुसरा मुलगा अमऱ्या.

यहजियेल तिसरा आणि चौथा यकमाम.

24 उज्जियेलचा मुलगा मीखा.

मीखाचा मुलगा शामीर.

25 इश्शिया हा मीखाचा भाऊ.

इश्शियाचा मुलगा जखऱ्या.

26 मरारीचे वंशज: महली मूशी आणि याजीया.

27 मरारीचा मुलगा याजीया याची मुले: शोहम व जक्कूर.

28 एलाजार हा महलीचा मुलगा. पण एलाजारला पुत्रसंतती नव्हती.

29 कीशाचा मुलगा यरहमेल.

30 महली, एदर आणि यरीमोथ हे मूशीचे मुलगे.

लेवी घराण्यातील हे प्रमुख होत. आपापल्या घराण्याप्रमाणे त्यांची नोंद करण्यात आली. 31 खास कामगिरीकरता त्यांची निवड करण्यात आली. अहरोनचे वंशज असलेले त्यांचे याजक नातलग यांच्याप्रमाणेच चिठ्ठ्या टाकून ही निवड झाली. राजा दावीद,सादोक, अहीमलेख आणि याजक व लेवी घराण्यातील प्रमुख यांच्यासमोर त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. कामाच्या नेमणुकीमध्ये घराण्यातील श्रेष्ठ आणि कनिष्ठ बांधव असा भेदभाव नव्हता.

गायक वर्ग

25 दावीद आणि सैन्यातील अधिकारी यांनी मिळून आसाफच्या मुलांना एका खास कामासाठी निवडले. हेमान व यदूथून ही ती मुले. वीणा, सतारी आणि झांजा ही वाद्ये, वाजवून देवाचा संदेश देणे असे त्यांच्या कामाचे स्वरुप होते. हे काम करणाऱ्या लोकांची यादी पुढीलप्रमाणे:

आसाफाच्या कुटुंबातून जक्कूर, योसेफ, नथन्या आणि अशेराला. दावीदाने आसाफला संदेश कथनासाठी निवडले आणि आसाफने आपल्या या मुलांना.

यदूथूनच्या घराण्यातून गदल्या, सारी, यशया, हशब्या व मत्तिथ्या हे सहाजण. यदूथूनने यांना आपल्या हाताखाली घेतले. यदूथून वीणा वाजवून संदेश देऊन, परमेश्वराचे उपकारस्मरण आणि स्तवन करत असे.

सेवा करायला हेमानचे वंशज होते ते असे बुक्कीया: मत्तन्या, उज्जियेल, शबएल, यरीमोथ, हनन्या, हनानी, अलियाथा, गिद्दल्ती, रोममती एजेर, याश्बकाशा, मल्लोथी, होथीर आणि महजियोथ. हे सर्व हेमानचे मुलगे. हेमान हा राजा दावीदाचा द्रष्टा होता. देवाने हेमानला वंशवृध्दीचे वचन दिले होते. त्यानुसार हेमानला भरपूर मुलेबाळे झाली. देवाने हेमानला चौदा मुलगे आणि तीन मुली दिल्या.

परमेश्वराच्या मंदिरात गीते गाण्यासाठी हेमानने आपल्या सर्व मुलांना हाताशी धरले. ही मुले झांजा, सतारी आणि वीणा वाजवत, आणि देवाची सेवा करत. राजा दावीदाने यांना निवडले होते. लेवी घराण्यातील हे लोक आणि त्यांचे नातेवाईक गायनकलेत निपुण होते. परमेश्वराची स्तुती गीते गाणारी अशी 288 माणसे होती. प्रत्येकाने कोणते काम करायचे हे ठरवायला चिठ्ठया टाकल्या जात. त्यांना एकसारखीच वागणूक मिळे. लहान थोर, गुरु-शिष्य असा त्यांच्यात भेदभाव नव्हता.

पहिली चिठ्ठी आसाफ (योसेफ) याची निघाली. त्यांची मुले आणि नातलग यांच्यातून बारा जणांची निवड झाली.

दुसरी गदल्याची त्याची मुले आणि भाऊबंद यांच्यातून बाराजणांना घेतले.

10 जक्कूरचे मुलगे आणि भाऊबंद यांच्यामधून, तिसऱ्या चिठ्ठीनुसार बाराजण घेतले.

11 चवथी चिठ्ठी इस्त्रीची. त्याचे मुलगे आणि आप्त यांच्यामधून बारा.

12 पाचवी नथन्याची. त्याच्या मुलां-नातलगामधून बारा.

13 सहावी चिठ्ठी बुक्कीयाची. त्याचे मुलगे आणि भाऊबंद यांमधून बारा.

14 सातवी यशरेलाची. त्याचे मुलगे आणि भाऊबंद यांमधून बारा.

15 यशयाची आठवी. या चिठ्ठीनुसार मुलगे आणि भाऊबंद यांमधून बारा.

16 नववी मत्तन्याची. त्याचे मुलगे आणि आप्त यांमधून बारा.

17 दहावी शिमोची. त्याचे मुलगे आणि नातलग यांमधून बारा.

18 अकरावी अजरेलाची. त्याचे मुलगे आणि नातलग यांमधून बारा.

19 बारावी हशब्याची. त्याचे मुलगे आणि त्याचे नातलग यांमधून बारा.

20 तेरावी शूबाएलाची. त्याचे मुलगे आणि नातलग यांमधून बारा.

21 चोदावी मतिथ्याची. त्याचे मुलगे आणि आप्त यांमधून बारा.

22 पंधरावी यरेमोथची. त्याचे मुलगे आणि नातेवाईक यांमधून बारा.

23 सोळावी हनन्याची. त्याचे मुलगे आणि भाऊबंद यांमधून बारा.

24 सतरावी याश्बाकाशाची. त्याचे मुलगे आणि नातलग यांमधून बारा.

25 अठरावी हनानीची. त्याचे मुलगे आणि नातलग यांमधून बारा.

26 एकुणिसावी मल्लोथीची. त्याचे मुलगे आणि आप्त यांमधून बारा.

27 विसावी अलीयाथची. त्याचे मुलगे आणि नातलग यांमधून बारा.

28 एकविसावी होथीरची. त्याचे मुलगे आणि नातलग यांमधून बारा.

29 बाविसावी गिद्दल्तीची. त्याचे मुलगे आणि आप्त यांमधून बारा.

30 तेविसावी महजियाथची. त्याचे मुलगे आणि भाऊबंद यांमधून बारा.

31 चोविसावी रोममती एजेरची. त्याचे मुलगे आणि नातलग यांमधून बारा.

द्वारपालांची व्यवस्था

26 द्वारपालांचे गट: हे पहारेकरी कोरहाच्या घराण्यातील होते. त्यांची नावे अशी:

मेशेलेम्या आणि त्याची मुलेबाळे. (आसाफच्या कुळातील कोरहचा हा मुलगा.) मेशेलेम्या याला मुलगे होते. जखऱ्या हा त्यांतला मोठा. यदिएल दुसरा, जबद्या तिसरा, यथनिएल चौथा अलाम पाचवा, यहोहानान सहावा, एल्योवेनय सातवा.

आता ओबेद-अदोम, याची मुले. शामाया थोरला, अहोजाबाद दुसरा, यवाह तिसरा, साखार चौथा, नथनेल पाचवा, अम्मीएल सहावा, इस्साखार सातवा, पउलथय आठवा. देवाची ओबेद-अदोमवर खरोखरच कृपादृष्टी होती. शमाया हा ओबेद-अदोमचा मोठा मुलगा. त्यालाही पुत्रसंतती होती. हे मुलगे चांगले कणखर योध्दे असल्यामुळे त्यांची आपल्या पितृकुळावर सत्ता होती. अथनी, रफाएल, ओबेद एलजाबाद, अलीहू आणि समख्या हे शमायाचे पुत्र. एलजाबादचे भाउबंद सर्व प्रकारच्या कामात कुशाल होते. हे सर्व ओबेद-अदोमचे वंशज त्याची मुले, नातेवाईक असे सर्वच पुरुष पराक्रमी होते. ते सावध पहारेकरी होते. ओबेद-अदोमचे एकंदर 62 वंशज होते.

मेशेलेम्याचे पुत्र आणि भाऊबंद मिळून अठराजण होते. ते सर्व पराक्रमी होते.

10 मरारीच्या वंशातले द्वारपाल पुढीलप्रमाणे: त्यापैकी एक होसा. शिम्री या त्याच्या मुलाला ज्येष्ठपद दिले होते. खरे म्हणजे हा जन्माने थोरला नव्हे, पण त्याच्या वडीलांनी त्याला तो मान दिला होता. 11 हिल्कीया दुसरा. टबल्या तिसरा. जखऱ्या चौथा. होसाला मुलगे आणि भाऊबंद मिळून तेराजण होते.

रोमकरांस 4:1-12

अब्राहामाचे उदाहरण

तर मग अब्राहाम जो मानवी रितीने आपला पूर्वज याच्याविषयी आपण काय म्हणावे? जर अब्राहाम आपल्या कर्मांनी नीतिमान ठरला तर त्याला अभिमान बाळगण्यास जागा आहे, परंतु त्याला देवासमोर अभिमान बाळगणे शक्य नाही. कारण शास्त्र काय सांगते? “अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि त्याचा विश्वास त्याला नीतिमत्व असा गणण्यात आला.”

जो कोणी काम करतो, त्याला मजुरी ही मेहरबानी म्हणून नव्हे तर त्याचा मोबदला म्हणून दिली जाते. कोणताही मनुष्य कर्मे करुन देवाच्या दृष्टीने नीतिमान ठरु शकत नाही. म्हणून त्याने देवावरच भरवंसा ठेवावा. मग देव त्या मनुष्याचा भरवंसा स्वीकारुन त्याला आपल्या दृष्टीने नीतिमान ठरवतो. दुराचारी मनुष्यालाही नीतिमान ठरविणारा देवच आहे. ज्याला देव कर्मावाचून नीतिमान ठरवितो, त्याच्याविषयीही दाविद म्हणतो;

“ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे.
    ज्याच्या पापांवर पांघरुण घातले आहे
    तो धन्य!
धन्य तो पुरुष
    ज्याच्या पापांचा हिशेब प्रभु करणार नाही.” (A)

तर मग हे नीतिमत्व ज्यांची सुंता झाली आहे आणि ज्यांची सुंता झाली नाही अशांनाही लागू होते काय? जे बेसुंती आहेत अशांनाही ते लागू पडते कारण आम्ही म्हणतो, “अब्राहामाचा विश्वास त्याला नीतिमान असा गणण्यात आला.” 10 आणि तो कसा गणण्यात आला, तो सुंता झालेला असताना का सुंता झालेली नसताना? 11 सुंता झालेली नसताना ही त्याने जो विश्वास दाखविला त्याचा परिणाम व नीतिमत्वाचा शिक्का म्हणून त्याला सुंता ही खूण मिळाली, यासाठी की, जे सुंता झाली नसताही विश्वास ठेवतात, त्यांच्याकडे ते नीतिमत्व गणले जावे. (त्यांचा तो पिता आहे.) 12 आणि तो ज्यांची सुंता झाली आहे त्यांचाही पिता आहे. पण त्यांची सुंता झालेली आहे म्हणून तो त्यांचा पिता झाला नाही, तर आपला पूर्वज अब्राहाम याची सुंता होण्यापूर्वीसुद्धा तो जसा विश्वासात जगत होता, तसे जर ते जगले तरच अब्राहाम त्यांचा पिता होऊ शकतो.

स्तोत्रसंहिता 13

प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.

13 परमेश्वरा, तू मला आणखी किती काळ विसरुन जाणार आहेस?
    तू मला कायमचाच विसरणार आहेस का?
किती काळापर्यंत तू माझा स्वीकार करायला नकार देणार आहेस? [a]
तू मला विसरला आहेस की नाही याबद्दल मी किती काळ संभ्रमात राहू!
    माझ्या ह्रदयातले हे दुख: मी किती काळ सोसू?
माझे शत्रू माझ्यावर आणखी किती काळापर्यंत विजय मिळवणार आहेत?

परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे बघ.
    माझ्या प्रश्नांचे उत्तर दे.
मला उत्तर कळू दे.
    नाही तर मी मरुन जाईन.
जर तसे घडले तर माझा शत्रू म्हणेले, “मी त्याच्यावर विजय मिळवला”
    माझ्या शत्रूने जर माझा पराभव केला तर तो खूष होईल.

परमेश्वरा, मी तुझ्या प्रेमाखातर तुझ्या मदतीची अपेक्षा केली.
    तू मला वाचवलेस आणि मला सुखी केलेस.
मी परमेश्वरासाठी आनंदाचे गाणे गातो
    कारण त्याने माझ्यासाठी कितीतरी चांगल्या गोष्टी केल्या आहेत.

नीतिसूत्रे 19:15-16

15 आळशी माणसाला भरपूर झोप मिळेल पण तो खूप उपाशीही असेल.

16 जर माणसाने कायद्याचे पालन केले तर तो स्वतःचेच रक्षण करतो. पण जर तो या गोष्टीला महत्व देत नसेल तर तो मारला जातो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center