Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the ESV. Switch to the ESV to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 इतिहास 4:5-5:17

अशूरचा मुलगा तकोवा. तकोवाला दोन बायका होत्या. हेला आणि नारा. नाराला अहुज्जाम, हेफेर, तेमनी आणि अहष्टारी हे मुलगे झाले. सेरथ, इसहार, एथ्रान आणि कोस हे हेलाचे मुलगे. कोसने आनूब आणि सोबेबा यांना जन्म दिला. हारुमचा मुलगा अहरहेल याच्या घराण्यांचा प्रवर्तकही कोसच होता.

याबेस एक फार चांगला माणूस होता. आपल्या भावांपेक्षा तो भला होता. त्याची आई म्हणे, “याचे नाव याबेस ठेवले कारण याच्यावेळी मला असह्य प्रसववेदना झाल्या.” 10 याबेसने इस्राएलाच्या देवाची प्रार्थना केली. याबेस म्हणाला, “तुझा माझ्यावर वरदहस्त असू दे. माझ्या प्रदेशाच्या सीमा वाढू देत. तू माझ्यासमीप राहा आणि कोणाकडूनही मला इजा पोहोंचू देऊ नकोस. म्हणजे मी सुखरुप राहीन.” देवानेही त्याला त्याने जे मागितले ते दिले.

11 शूहाचा भाऊ कलूब. कलूबचा मुलगा महीर. महीरचा मुलगा एष्टोन. 12 बेथ-राफा, पासेहा आणि तहिन्ना ही एष्टोनची मुले. तहिन्नाचा मुलगा ईर-नाहाश. हे रेखा येथील लोक होत.

13 अथनिएल आणि सराया ही कनाजची मुले. हथथ आणि म्योनोथाय ही अथनिएलची मुले. 14 म्योनोथायने अफ्राला जन्म दिला.

आणि सरायाने यवाबला जन्म दिला. यवाब हा गे-हराशीमचा संस्थापक. तेथील लोक कुशल कारागीर असल्यामुळे त्यांनी हे नाव घेतले.

15 यफुन्ने याचा मुलगा कालेब. कालेबची मुले म्हणजे इरु, एला आणि नाम. एलाचा मुलगा कनज.

16 जीफ, जीफा, तीऱ्या आणि असरेल हे यहल्ललेलचे मुलगे.

17-18 एज्राचे मुलगे येथेर व मरद, येफेर व यालोन. मिर्याम, शम्माय आणि इश्बह ही मरदाची मुले. इश्बहचा मुलगा एष्टमोवा. मरदची बायको मिसरची होती. तिने येरेद, हेबेर आणि यकूथीएल यांना जन्म दिला. येरेदचा मुलगा गदोर. सोखोचे वडील हेबेर. आणि यकूथीएल हे जानोहाचे वडील. ही बिथ्याची मुले. बिथ्या ही फारोची मुलगी. ही मिसरची असून मरदची बायको होती.

19 मरदची बायको ही नहमची बहीण होती. मरदची ही बायको यहूदाकडील होती. मरदच्या बायकोच्या मुलांनी कईला आणि एष्टमोवा यांना जन्म दिला. कईला गार्मी लोकांपैकी होता आणि एष्टमोवा माकाथी होता. 20 अम्नोन, रिन्ना, बेन-हानान, तिलोन हे शिमोनचे मुलगे.

इशीचे मुलगे जोहेथ आणि बेन-जोहेथ.

21-22 यहूदाचा मुलगा शेला. एर, लादा, कोजेबा योकीम, योवाश आणि साराफ ही शेलाची संतती. एर हा लेखाचा पिता. लादा मारेशाचा आणि बेथ-अश्बेच्या विणकर घराण्यांचा संस्थापक योवाश आणि साराफ यांनी मवाबी बायकांशी लग्ने केली. त्यानंतर ते बेथलहेमला परतले. या घराण्याच्या या नोंदी फार जुन्या आहेत. 23 शेलाचे वंशज हे कुंभार असून ते नेताईम आणि गदेरा येथे राजाच्या चाकरीत होते.

शिमोनाची संतती

24 नमुवेल, यामीन, यारिब, जेरह, शौल हे शिमोनचे मुलगे. 25 शौलचा मुलगा शल्लूम. शल्लूमचा मुलगा मिबसाम. मिबसामचा मुलगा मिश्मा.

26 मिश्माचा मुलगा हम्मूएल. हम्मूएलचा मुलगा जक्कूर. जक्कूरचा मुलगा शिमी. 27 शिमीला सोळा मुलगे आणि सहा मुली होत्या. पण शिमीच्या भावांना फार मुले बाळे झाली नाहीत. त्यांची (कुदुंबे) मर्यादितच होती. यहूदातील इतर काही घराण्यांप्रमाणे त्यांचा विस्तार नव्हता.

28 शिमीच्या वंशजातील लोक बैर-शेबा, मोलादा व हसर-शुवाल, 29 बिल्हा, असेम, तोलाद, 30 बथुवेल, हर्मा सिकलाग, 31 बेथमर्काबोथ, हसर-सुसीम, बेथ-बिरी व शाराइम येथे राहत होते. दावीदराजा होईपर्यंत त्यांची तेथे वस्ती होती. 32 एटाम, अईन, रिम्मोन, तोखेन आणि आशान ही या पाच गावांची नावे. 33 बालापर्यंत पसरलेल्या खेड्यापाड्यांमधूनही ते राहत होते. आपल्या वंशावळींची नोंदही त्यांनीच ठेवली.

34-38 त्यांच्या घराण्यातील वडिलधाऱ्या मंडळींच्या नावांची यादी अशी आहे: मेशोबाब, यम्लेक, अमस्याचा मुलगा योशा, योएल, येहू (योशिब्याचा मुलगा) सरायाचा मुलगा योशिब्या, असिएलचा मुलगा सराया, एल्योवेनाय, याकोबा, यशोहाया, असाया, अदिएल, यशीमिएल, बनाया, जीजा हा शिफीचा मुलगा. शिफी हा अल्लोनचा मुलगा, अल्लोन यदायाचा मुलगा, यदाया शिम्रीचा मुलगा, आणि शिम्री शमायाचा मुलगा.

या सर्वांच्या कुटुंबांचा विस्तार चांगला झाला. 39 ते खोऱ्याच्या पूर्वेला गदोरच्या सीमेबाहेरही जाऊन पोहोंचले. आपल्या गुरोमेंढरांना चरायला कुरण हवे म्हणून जमिनीच्या शोधात ते गेले. 40 त्यांना चांगली गवताळ कुरणे मिळाली. तेथील जमीन विस्तीर्ण होती. ही भूमी शांत व स्वस्थ होती. हामचे वंशज पूर्वी या भागात राहत असत. 41 हिज्कीया यहूदाचा राजा होता त्यावेळची ही हकीकत. ते लोक गदोरपर्यंत आले आणि हामच्या लोकांशी त्यांनी लढाई केली. हामच्या लोकांच्या राहुट्या त्यांनी उद्ध्वस्त केल्या. तेथे राहणाऱ्या मूनी लोकांनाही त्यांनी ठार केले. आजही या भागात मूनीलोक आढळत नाहीत. तेव्हा या लोकांनी तेथे वस्ती केली. मेंढरांसाठी कुरण असल्याने ते तेथे राहिले.

42 शिमोनच्या घराण्यातील पाचशे माणसे सेईर डोंगरावर गेली. इशीचे मुलगे पलटया, नाऱ्या, रफाया आणि उज्जियेल यांनी त्यांना मार्गदर्शन केले. शिमोनी लोकांनी त्या ठिकाणी वस्ती असणाऱ्या लोकांशी चकमकी केल्या. 43 काही अमालेकी लोकांचा त्यातूनही निभाव लागला ते तेवढे अजून आहेत. त्यांना शिमोन्यांनी ठार केले. तेव्हा पासून सेईरमध्ये अजूनही शिमोनी लोक राहत आहेत.

रऊबेनाचे वंशज

रऊबेन इस्राएलाचा थोरला मुलगा होता. तेव्हा थोरल्या मुलाला मिळणारे सगळे विशेषाधिकार त्याला मिळायला हवे होते. पण रऊबेनने आपल्या वडीलांच्या पत्नीशीच शरीरसंबंध ठेवले त्यामुळे हे अधिकार योसेफच्या मुलांना दिले गेले. या घराण्याच्या वंशावळीच्या नोंदीत रऊबेनची थोरला मुलगा म्हणून नोंद नाही. यहूदा आपल्या भावंडांपेक्षा पराक्रमी निघाला म्हणून पुढारीपण त्याच्या घराण्यात गेले. मोठ्या मुलाला मिळायचे ते इतर सर्व अधिकार मात्र योसेफाच्या घराण्याला मिळाले.

हनोख, पल्लू, हस्रोन आणि कर्मी हे रऊबेनचे मुलगे.

योएलचे वंशज असे: योएलचा मुलगा शमाया. शमायाचा मुलगा गोग. गोगचा शिमी. शिमीचा मुलगा मीखा. मीखाचा मुलगा राया. रायाचा मुलगा बाल. बालचा मुलगा बैरा. अश्शूरचा राजा तिल्गथ-पिल्नेसर याने बैराला आपल्या घरातून पिटाळून लावले. आणि कैद केले. बैरा हा रऊबेनी घराण्याचा अधिकारी पुरुष होता.

योएलचे भाऊ आणि त्यांची त्यांची घराणी यांची नोंद वंशावळींच्या नोंदीवरुनच येथे केली आहे: ईयेल सर्वांत मोठा, मग जखऱ्या आणि बेला. बेला हा आजाजचा मुलगा. आजाज हा शमाचा मुलगा. शमा योएलचा मुलगा. नबो आणि बाल मौन येथपर्यंत ते अरोएर प्रांतात राहत होते. फरात नदीच्या जवळ अगदी पूर्वेला वाळवंटाच्या कडेपर्यंत बेलाच्या लोकांची वस्ती होती. गिलाद प्रांतात आपली गाई-गुरे फार झाल्यामुळे त्यांना या बाजूला सरकावे लागले. 10 शौलच्या कारकीर्दीत बेलाच्या लोकांनी हग्री लोकांशी लढाई करुन त्यांचा पाडाव केला. त्यांच्याच तंबूत बेलाच्या लोकांनी मुक्काम केला. तेथे राहून त्यांनी गिलादच्या पर्वेकडील सर्व प्रदेश पालथा घातला.

गादचे वंशज

11 रऊबेनी लोकांच्या शेजारीच गाद घराण्यातील लोकांची वस्ती होती. बाशान प्रांतात सलका नगरापर्यंत गाद घराण्यातील लोक राहत होते. 12 योएल हा बाशान मधला पहिला नायक. शाफाम दुसरा. मग यानयने त्याची जागा घेतली. 13 मीखाएल, मशुल्लाम, शबा, योरय, याकान, जीया आणि एबर हे त्यांच्या घराण्यातील सात भाऊ. 14 हे अबीहईलचे वंशज. अबीहईल हूरीचा मुलगा. हूरी यारोहाचा मुलगा आणि यारोहा गिलादचा. गिलाद मीखाएलचा. मीखाएल यशीशायाचा मुलगा. यशीशाया यहदोचा मुलगा. यहदो बूजाचा मुलगा. 15 अही हा अब्दीएलचा मुलगा. अब्दीएल गूनीचा मुलगा. अही हा त्या घराण्याचा प्रमुख.

16 गाद घराण्यातील लोक गिलाद प्रांतात राहत होते. बाशान, बाशानच्या आसपासची खेडी, शारोनच्या आसपासची शिवारे एवढ्या भागात थेट सीमेपर्यंत राहत होते.

17 योथाम आणि यराबाम यांच्या काळात या लोकांच्या नावांच्या नोंदी गाद वंशावळीमध्ये केल्या गेलेल्या आहेत. योथाम यहूदाचा आणि यराबाम इस्राएलचा राजा होता.

प्रेषितांचीं कृत्यें 25

पौल कैसराची भेट घेऊ इच्छितो

25 मग त्या प्रांतात फेस्त आला. आणि तीन दिवसांनी तो कैसरीयाहून वर यरुशलेमला गेला. मुख्य याजकांनी आणि यहूदी पुढाऱ्यांनी फेस्तच्या पुढे पौलावरील आरोप सादर केले. आणि पौलाला यरुशलेमला पाठवून द्यावे, अशी त्याला विनंति केली. पौलाला वाटेत ठार मारण्याचा ते कट करीत होते. फेस्तने उत्तर दिले, “पौल कैसरीया येथे बंदिवासात आहे आणि मी स्वतः लवकरच कैसरीयाला जाणार आहे. तुमच्यातील काही पुढाऱ्यांनी माझ्याबरोबर तिकडे खाली यावे, आणि जर त्या मनुष्याने काही चूक केली असेल तर त्याच्यावर दोषारोप ठेवावा.”

त्यांच्याबरोबर आठ ते दहा दिवस घालविल्यानंतर फेस्त खाली कैसरीयाला परत गेला. दुसऱ्या दिवशी फेस्त न्यायालयात बसला आणि त्याने आपल्यासमोर पौलाला हजर करण्याचा आदेश दिला. जेव्हा पौल तेथे हजर झाला, तेव्हा यरुशलेमहून तेथे आलेले यहूदी लोकही पौलाच्या सभोवती उभे राहिले, त्यांनी त्याच्यावर पुष्कळ गंभीर आरोप ठेवले, परंतु ते आरोप यहूदी लोक सिद्ध करु शकले नाहीत. पौल आपला बचाव करण्यासाठी असे म्हणाला, “मी यहूदी लोकांच्या नियमशास्त्राच्या, मंदिराच्या किंवा कैसराच्या विरुद्ध काही गुन्हा केलेला नाही.”

फेस्तला यहूदी लोकांना खूष करायचे होते म्हणून तो पौलाला म्हणाला, “यरुशलेम येथे जाऊन माइयासमोर तुझी चौकशी व्हावी अशी तुझी इच्छा आहे काय?”

10 पौल म्हणाला, “मी आता कैसराच्या न्यायासनासमोर उभा असून त्याच्यासमोर माझा न्यायनिवाडा व्हावा, अशी माझी इच्छा आहे. मी यहूदी लोकांचा काहीही अपराध केलेला नाही, हे आपणांस चांगले माहीत आहे. 11 मी जर काही गुन्हा केला असेल तर मला मरणदंड झाला पाहिजे. आणि त्यापासून सुटका व्हावी असा प्रयत्न मी करणार नाही. परंतु जे आरोप हे लोक माझ्यावर करीत आहेत, ते खरे नसतील तर मला कोणी यांच्या हाती देऊ शकणार नाही, मी आपले गाऱ्हाणे कैसरासमोर मांडू इच्छितो.”

12 यावर फेस्तने आपल्या सभेशी सल्लामसलत केली. मग त्याने पौलाला सांगितले, “तू कैसरापुढे आपला न्यायनिवाडा व्हावा अशी इच्छा दाखविली आहे, म्हणून तुला कैसरासमोर पाठविण्यात येईल.”

हेरोद अग्रिप्पासमोर पौल

13 काही दिवसांनंतर फेस्ताचे स्वागत करण्याच्या हेतूने राजा अग्रिप्पा [a] आणि बर्णीका [b] कैसरीयाला येऊन त्याला भेटले. 14 ती दोघे तेथे बरेच दिवस राहिल्यावर फेस्तने पौलाचे प्रकरण राजाला समजावून सांगितले. तो म्हणाला, “फेलिक्सने तुरुंगात ठेवलेला एक कैदी येथे आहे. 15 जेव्हा मी यरुशलेम येथे होतो, तेव्हा यहूदी लोकांचा मुख्य याजक आणि वडीलजन यांनी त्याच्याविरुद्ध फिर्याद केली. आणि त्याला दोषी ठरवावे अशी मागणी केली. 16 वादी व प्रतिवादी यांना एकमेकांसमोर आणल्याशिवाय आणि आरोपीला आपला बचाव करण्याची संधि मिळेपर्यंत, त्याला इतरांकडे सोपविण्याची रोमी लोकांची रीत नाही. असे मी यहूदी लोकांना सांगितले.

17 “म्हणून ते जेव्हा माझ्याबरोबर येथे आले, तेव्हा मी उशीर न करता दुसऱ्याच दिवशी न्यायासनावर बसलो, आणि त्या मनुष्याला समोर आणण्याची आज्ञा केली. 18 त्याच्यावर आरोप करणारे जेव्हा त्याच्याविरुद्ध बोलण्यास उभे राहिले, तेव्हा माझ्या अपेक्षेप्रमाणे कसल्याही गुन्ह्याबाबत त्यांनी त्याच्यावर आरोप केले नाहीत. 19 उलट आपल्या धर्माविषयी आणि कोणा एका मनुष्याविषयी ज्याचे नाव येशू आहे, त्याच्यावरुन यहूदी लोकांनी त्या माणसाशी वाद केला. येशू हा जरी मेलेला असला, तरी पौलाचा असा दावा आहे की, येशू जिवंत आहे. 20 या प्रश्नाची चौकशी कशी करावी हे मला समजेना. तेव्हा त्या यहूदी मनुष्याविरुद्ध यहूदी लोकांचे जे आरोप आहेत, त्याबाबत त्याला यरुशलेम येथे नेऊन त्याचा न्याय केला जावा अशी त्याची इच्छा आहे काय, असे मी त्याला विचारले. 21 सम्राटाकडून आपल्या न्यायनिवाडा होईपर्यंत आपण कैदेत राहू असे जेव्हा पौल म्हणाला, तेव्हा मी आज्ञा केली की, कैसराकडे पाठविणे शक्य होईपर्यंत त्याला तुरुंगातच ठेवावे.”

22 यावर अग्रिप्पा फेस्तला म्हणाला, “मला स्वतःला या मनुष्याचे म्हणणे ऐकावेसे वाटते.”

फेस्तने त्याला उत्तर दिले, “उद्या त्याचे म्हणणे तुम्ही ऐकू शकाल.”

23 म्हणून दुसल्या दिवशी अग्रिप्पा आणि बर्णीका मोठ्या थाटामाटात आले, व लष्करी सरदार व शहरातील मुख्य नागरिकांसह दरबारात प्रवेश केला. तेव्हा फेस्तच्या आज्ञेनुसार पौलाला तेथे आणण्यात आले.

24 मग फेस्त म्हणाला, “राजे अग्रिप्पा महाराज आणि आमच्याबरोबर येथे उपस्थित असलेले सर्वजण, या मनुष्याला पाहा! याच्याच विषयी यरुशलेम व कैसरिया येथील सर्व यहूदी लोकांनी माइयाकडे अर्ज दिलेला आहे. याला जिवंत राहू देऊ नये, असा आकांत ते करतात. 25 परंतु याला मरणदंड द्यावा असे याने काहीही केले नाही, असे मला आढळून आले. आणि त्याने स्वतःच आपणांला सम्राटाकडून (कैसराकडून) न्याय मिळावा अशी मागणी केली, म्हणून मी त्याला कैसरासमोर न्यायासाठी पाठविण्याचे ठरविले आहे. 26 परंतु सम्राटाला याच्याविषयी निशिचत असे कळवावे, असे माइयाकडे काही नाही, म्हणून मी याला तुमच्यापुढे आणि विशेषतः राजा अग्रिप्पापुढे आणून उभे केले आहे. ते अशाकरिता की, या चौकशीनंतर मला या मनुष्याविषयी काहीतरी लिहिता यावे. 27 शेवटी एखाद्या कैद्याला कसलाही आरोप न ठेवता कैसराकडे पाठविणे मला योग्य वाटत नाही!”

स्तोत्रसंहिता 5

प्रमुख गायकासाठी बासरीवरील दावीदाचे स्तोत्र.

परमेश्वरा, माझे शब्द ऐक.
    मी जे सांगायचा प्रयत्न करत आहे ते समजून घे.
माझ्या देवा! माझ्या राजा!
    माझी प्रार्थना ऐक.
परमेश्वरा, मी रोज सकाळी तुला माझी भेट अर्पण करतो.
    मी तुइयाकडे मदतीच्या अपेक्षेने पाहातो
आणि तू माझी प्रार्थना ऐकतोस.

देवा, तुला वाईट गोष्टी आवडत नाहीत.
    वाईट लोकांनी तुझ्या जवळ असणे तुला आवडत नाही.
    वाईट लोक तुझी उपासना करु शकत नाहीत.
मूर्ख तुझ्याकडे येऊ शकत नाहीत.
    जे लोक नेहमी दुष्टपणा करतात त्यांना तू दूर पाठवतोस.
जे लोक खोटं बोलतात त्यांचा तू सर्वनाश करतोस.
    जे लोक दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी गुप्त योजना आखतात ते परमेश्वराला आवडत नाहीत, परमेश्वर त्यांचा द्वेष करतो.

परमेश्वरा, मी तुझ्या विपुल कृपेमुळे तुझ्या मंदिरात येईन.
    मी पवित्र मंदिरात भीतीपोटी आणि तुझ्याबद्दलच्या आदरापोटी नतमस्तक होईन.
परमेश्वरा, तू मला जगण्याचा खरा मार्ग दाखव लोक
    माझ्यातल्या दुबळेपणाच्या शोधात असतात.
म्हणून कसे जगावे ते तू मला दाखव.
ते लोक खरे बोलत नाहीत.
    ते खऱ्याचे खोटे करणारे खोटारडे आहेत
त्यांची तोंडे रिकाम्या थडग्यासारखी आहेत
    ते लोकांशी चांगलं बोलतील पण तेही त्यांना सापळ्यात अडकवण्यासाठीच.
10 देवा, तू त्यांना शिक्षा कर.
    त्यांना त्यांच्याच सापळ्यात अडकू दे.
ते लोक तुझ्याविरुध्द गेले आहेत.
    म्हणून तू त्यांना त्यांच्या असंख्य गुन्ह्यांबद्दल शिक्षा कर.
11 परंतु जे लोक देवावर विश्वास ठेवतात त्यांना सुखी राहू दे.
    त्यांना कायमचे सुखी कर.
देवा, ज्या लोकांना तुझे नांव आवडते
    त्यांचे रक्षण कर त्यांना शक्ती दे.
12 परमेश्वरा, जेव्हा तू चांगल्या माणसांसाठी चांगल्या गोष्टी करतोस
    तेव्हा तू त्यांचे रक्षण करणाऱ्या मोठ्या ढालीसारखा आहेस.

नीतिसूत्रे 18:19

19 जर तुम्ही मित्राचा अपमान केलात तर त्याला परत जिंकणे हे बळकट तटबंदी असलेले शहर जिंकण्यापेक्षा कठीण असते. आणि वादविवाद लोकांना एकमेकांपासून राजवाड्याच्या प्रवेशद्वारांवरील आडव्या बळकट खांबांइतके दूर नेतात.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center