Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the ESV. Switch to the ESV to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 इतिहास 1:1-2:17

आदामापासून अब्राहामापर्यंतची वंशावळ

आदाम, शेथ, अनोश, केनान, महललेल, यारेद, हनोख, मथुशलह, लामेख (नोहा.) [a]

शेम, हाम आणि याफेथ ही नोहाची मुले.

याफेथची मुले

गोमर, मागोग, मादय, यावान, तुबाल, मेशेख, तीरास

गोमरचे मुलगे: आश्कनाज, रीफाथ, तोगार्मा

यावानचे मुलगे: अलीशा, तार्शीश, कित्तीम, रोदानीम

हामचे मुलगे

कूश, मिस्राईम (मिसर) पूट व कनान.

कूशचे मुलगे असे: सबा, हवीला, सब्ता, रामा, साब्तका,

रामाचे मुलगे शबा आणि ददान.

10 कुशचा वंशज निम्रोद हा जगातील सर्वात सामर्थ्यवान आणि शूर सैनिक झाला.

11 मिस्राईमने लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम, 12 पात्रुसीम, कास्लूहीम (याच्यापासून पलिष्टी झाले) व कफतोरीम यांना जन्म दिला.

13 आणि कनानाचा ज्येष्ठ मुलगा सीदोन व त्यांनतर हेथ; 14 यबूसी, अमोरी, गिर्गाशी, 15 हिव्वी, अर्की, शीनी 16 आर्वाही, समारी, हमाथी हे होत.

शेमचे मुलगे

17 एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद आणि अराम हे शेमचे मुलगे, ऊस, हूल, गेतेर आणि मेशेख हे अरामचे मुलगे.

18 शेलहचे वडील अर्पक्षद आणि एबरचे वडील शेलह.

19 एबरला दोन मुलगे झाले. एकाचे नाव पेलेग (म्हणजे विभागणी) त्याला हे नाव पडायचे कारण याच्या हयातीत पृथ्वीवरील लोकांची भाषावार विभागणी झाली. पेलेगच्या भावाचे नाव यक्तान. 20 यक्तानने अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह, 21 हदोराम, ऊजाल, दिक्ला, 22 एबाल, अबीमाएल, शबा, 23 ओफीर, हवीला, योबाब यांना जन्म दिला.

24 अर्पक्षद, शेलह, 25 एबर, पेलेग, रऊ 26 सरुग, नाहोर, तेरह, 27 अब्राम (म्हणजेच अब्राहाम) ही सर्व शेमची मुले.

अब्राहामची वंशावळ

28 इसहाक आणि इश्माएल ही अब्राहामची मुले. 29 त्यांचे वंशज पुढीलप्रमाणे:

नबायोथ हा इश्माएलचा पहिला मुलगा. इश्माएलची इतर मुले म्हणजे केदार, अदबेल, मिबसाम, 30 मिश्मा, दुमा, मस्सा, हदद, तेमा 31 यतूर, नापीश, केदमा. हे सर्व इश्माएलचे मुलगे.

32 कटूरा ही अब्राहामची दासी होती. तिने जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक, शूह यांना जन्म दिला.

यक्षानला सबा व ददान हे मुलगे झाले.

33 एफा, एफर, हनोख, अबीदा, एल्दा हे मिद्यानचे मुलगे.

या सर्वाना कटूराने जन्म दिला.

साराचे मुलगे

34 इसहाक हा अब्राहामचा मुलगा. एसाव आणि इस्राएल (याकोब) हे इसहाकचे मुलगे.

35 एसावाचे मुलगे पुढीलप्रमाणे: अलीपाज, रगुवेल, यऊश, यालाम, कोरह.

36 अलीपाजचे मुलगे असे: तेमान, ओमार, सपी, गाताम, कनाज. याखेरीज अलीपाज आणि तिम्रा यांना अमालेक नावाचा मुलगा होता.

37 नहाथ, जेरह, शम्मा, मिज्जा हे रगुवेलचे मुलगे होत.

सेईरचे अदोमी

38 लोटान, शोबाल, सिबोन, अना, दीशोन, एसर व दीशान हे सेईराचे मुलगे.

39 होरी आणि होमाम हे लोटानचे मुलगे. लोटानला तिम्ना नावाची बहीणही होती.

40 आल्यान, मानहाथ, एबाल, शपी आणि ओनाम हे शोबालचे मुलगे.

अय्या आणि अना हे सिबोनचे मुलगे.

41 दीशोन हा अनाचा मुलगा

आणि हमदान, एशबान, यित्राण, करान हे दीशोनचे मुलगे.

42 बिल्हान, जावान, याकान हे एसेराचे मुलगे.

ऊस व अरान हे दीशानाचे मुलगे.

अदोमचे राजे

43 इस्राएलमध्ये राजांनी राज्य केले त्याच्या कितीतरी आधी अदोममध्ये राजे होते. त्यांची नावे अशी:

बौराचा मुलगा बेला, बेलाच्या नगराचे नाव दीन्हाबा.

44 बेलाच्या निधनानंतर जेरहचा मुलगा योबाब राजा झाला. योबाब बस्रा येथील होता.

45 योबाब मरण पावल्यानंतर त्याच्या जागी हूशाम गादीवर आला. हा तेमानी देशातील होता.

46 हूशामच्या मृत्यूनंतर बदादचा मुलगा हदाद याने राज्य केले. त्याने मवाबच्या देशात मिद्यानचा पराभव केला. हदादच्या नगराचे नाव अवीत होते.

47 हदाद मरण पावल्यावर साम्ला राजा झाला. हा मास्रेका येथील होता.

48 साम्ला मरण पावल्यावर त्याच्या जागी शौल राज्यावर आला. हा युफ्राटीस नदीवरल्या रहोबोथचा होता.

49 शौल वारल्यावर अकबोरचा मुलगा बाल-हानान राजा झाला.

50 बाल-हानान वारल्यावर हदाद राजा झाला. त्याच्या नगराचे नाव पाई असे होते. हदादच्या बायकोचे नाव महेटाबेल. ही मात्रेद हिची मुलगी. मात्रेद मे-जाहाबची मुलगी. 51 पुढे हदाद वारला.

नंतर तिम्रा, आल्या, यतेथ, 52 अहलीबामा, एला, पीनोन, 53 कनाज, तेमान मिब्सार, 54 माग्दीएल, ईराम, हे अदोमचे नेते झाले.

इस्राएलची मुले

रऊबेन, शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, जबुलून, दान, योसेफ, बन्यामीन, नफताली, गाद व आशेर हे इस्राएलचे मुलगे होत.

यहूदाचे मुलगे

एर, ओनान व शेला, ही यहूदाची मुले. बथ-शूवा या कनानी स्रीपासून ही त्याला झाली. यहूदाचा पहिला मुलगा एर वाईट प्रवृत्तीचा आहे हे परमेश्वराने जाणले होते त्यामुळे एरला त्याने मारुन टाकले. यहूदाची सून तामार हिला पेरेस आणि जेरह हे मुलगे झाले. असे यहूदाचे हे पाच मुलगे.

हेस्त्रोन आणि हामूल हे पेरेस चे मुलगे

जेरहला पाच मुलगे होते. ते म्हणजे जिम्री, एथान, हेमान, कल्कोल व दारा (दारदा).

जिम्रीचा मुलगा कर्मी. कर्मीचा मुलगा आखार, आखार ने युध्दात बळकावलेल्या वस्तू देवाला अर्पण करण्याऐवजी ती लूट स्वतः जवळच ठेवली. आणि इस्राएल लोकांवर पुष्कळ संकटे आणली.

एथानाचा मुलगा अजऱ्या.

यरहमेल, राम आणि कालेब हे हेस्रोनचे मुलगे.

रामचे वंशज

10 अम्मीनादाब हा रामचा मुलगा. अम्मीनादाब हा नहशोनचा पिता. नहशोन हा यहूदाच्या लोकांचा नेता होता. 11 नहशोनचा मुलगा सल्मा. बवाज हा सल्माचा मुलगा. 12 बवाजचा मुलगा ओबेद. आणि ओबेदचा मुलगा इशाय. 13 इशायचा मुलगा अलीयाब. अलीयाब हा इशायचा पहिला पुत्र, दुसरा अबीनादाब आणि तिसरा शिमा. 14 चवथा नथनेल, पाचवा रद्दाय. 15 सहावा ओसेम, सातवा दावीदा. 16 सरुवा आणि अबीगईल या त्यांच्या बहिणी अबीशय, यवाब आणि असाएल हे तिघे सरुवाचे मुलगे. 17 अमासाची आई अबीगईल अमासाचे वडील येथेर हे इश्माएली होते.

प्रेषितांचीं कृत्यें 23:11-35

11 त्या रात्री प्रभु पौलाजवळ उभा राहिला. आणि म्हणाला, “धीर धर! कारण जशी तू माइयाविषयी यरुशलेममध्ये साक्ष दिलीस तशी तुला माइयाविषयी रोम येथे साक्ष द्यावी लागेल.”

Some Jews Plan to Kill Paul

12 दुसऱ्या सकाळी काही यहूदी लोकांनी एकजूट करुन कट रचला, त्याना पौलाला जिवे मारायचे होते. यहूदी लोकांनी अशा प्रकारची शपथ वाहिली की, पौलाला ठार मारेपर्यंत अन्नपाणी सेवन करायचे नाही. 13 अशा प्रकारे कट करणान्यांची संख्या चाळीस होती. 14 या यहूदी पुढाऱ्यांनी जाऊन मुख्य याजक क वडिलजनांशी बोलणी केली. यहूदी म्हणाले, “आम्ही एक गंभीर शपथ घेतली आहे. पौलाला मारेपर्यंत आम्ही काही खाणार वा पिणार नाही! 15 म्हणून तुम्ही आता असे करा: तुम्ही (मुख्य याजक) व धर्मसभेने अशा प्रकारचा विनंति अर्ज सरदाराला लिहा की, पौलासंबंधी अधिक बारकाईने चौकशी करायची असल्याने पौलाला आमच्याकडे घेऊन यावे. तो येथे येण्याअगोदरच आम्ही त्याला ठार मारण्याच्या तयारीत असू.”

16 पण पौलाच्या बहिणीच्या मुलाने या सर्व गोष्टी ऐकल्या व तो किल्ल्यात गेला. त्याने पौलाला सर्व काही सांगितले, 17 पौलाने एका शताधिपतीला बोलाविले आणि सांगितले या तरुणाला सरदारकडे घेऊन जा. कारण सरदाराला सांगण्यासारखे याच्याकडे काहीतरी आहे. 18 मग त्याने त्या मुलाला घेतले व सरदाराकडे गेला व त्याला म्हणाला, “कैदेत असलेल्या पौलाने मला बोलावून या तरुणाला तुमच्याकडे घेऊन जायला सांगितले. कारण हा तुम्हांला काही तरी सांगणार आहे.”

19 सरदाराने त्या तरुणाचा हात धरुन बाजूला नेले आणि तो त्याला म्हणाला, “तू मला काय सांगणार आहेस?”

20 तो मुलगा म्हणाला, “यहूदी लोकांनी असे ठरविले आहे की, पौलाला घेऊन तुम्हांला उद्या धर्मसभेपुढे यायला सांगायचे, व अशा बहाण्याने त्याला आणायचे की, जणू काय त्यांना पौलाची अधिक बारकाईने चौकाशी करायची आहे. 21 पण त्यांच्यावर विश्वास ठेवू नका! कारण चाळीस लोकांडून अधिक लोक लपून बसणार आहेत व पौलाला गाठून मारणार आहेत. त्यांनी अशा प्रकारची शपथ वाहिली आहे की, जोपर्यंत ते पौलाला मारणार नाहीत तोपर्यंत कोणीही काहीही खाणार वा पिणार नाही, म्हणून ते आता तुमच्या होकाराची वाट पाहत अगदी तयारीत आहेत.”

22 तू मला ह्यांविषयी सांगितले आहेस, “हे कोणाला सांगू नको!” असे म्हणून सरदारने त्याला जाण्याची आज्ञा केली.

पौलाला कैसरीया येथे पाठवितात

23 मग सरदाराने दोघा शाताधिपतींना बोलाविले, आणि म्हणाला, “दोनशे शिपाई कैसरीयाला जाण्यासाठी तयार ठेवा. तसेच सत्तर घोडेस्वार व दोनशे भालेदार रात्री नऊ वाजता येथून जाण्यासाठी तयार ठेवा! 24 खोगीर घातलेला घोडा पौलासाठी तयार ठेवा. आणि त्याला राज्यपाल फेलीक्स यांच्याकडे सुखरुप न्या.” 25 सरदाराने एक पत्र लिहिले. त्यात असे लिहिलेले होते:

26 क्लौद्य लुसिया याजकडून,

राज्यपाल फेलिक्स महाराज यांस,

सलाम.

27 या मनुष्याला यहूदी लोकांनी धरले होते. ते त्याला ठार मारण्याच्या बेतात होते. पण तेवढ्यात माझ्या शिपायांसह मी तेथे गेलो व त्याला सोडविले. तो रोमी नागारिक आहे हे समजल्यावरुन मी त्याची सुटका केली. 28 यहूदी लोक त्याच्यावर का दोषारोप करीत आहेत हे कळावे म्हणून मी त्याला धर्मसभेपुढे घेऊन गेलो. 29 यहूदी लोकांच्या नियमशास्त्राच्या प्रश्नावरुन त्यांनी त्याला दोषी ठरविले हे मला दिसून आले. पण त्याच्यावर असा कोणताही आरोप नव्हता, ज्याची शिक्षा मरणदंड किंवा तुरुंगवास होईल. 30 जेव्हा या मनुष्याला जिवे मारण्याचा कट रचला गेल्याचे मला कळले तेव्हा मी त्याला ताबडतोब आपल्याकडे पाठविले.

31 शिपायांनी त्यांना मिळालेल्या हुकुमाचे पालन केले. ते पौलाला घेऊन रात्रीच अंतिपत्रिसास गेले. 32 दुसऱ्या दिवशी घोडेस्वर पौलासोबत कैसरियास गेले. व शिपाई किल्ल्यात परतले. 33 जेव्हा पौल व घोडेस्वार कैसरियास पोहोंचले, तेव्हा त्यांनी राज्यपालाला पत्र दिले. व पौलाला त्याच्या स्वाधीन केले.

34 राज्यपालाने ने पत्र वाचले, व पौल कोणत्या प्रांताचा आहे हे विचारले. जेव्हा त्याला समजले की, तो किलिकीयाचा आहे, तेव्हा तो म्हणाला, 35 “तुझ्यावर दोष ठेवणारे आले म्हणजे तुझे ऐकेन.” पौलाला हेरोदाच्या [a] राजवड्यात पहाऱ्यात ठेवावे असा हुकूमराज्यपालाने दिला.

स्तोत्रसंहिता 3

दावीद आपला मुलगा अबशालोम याच्याकडून पळाला तेव्हाचे दावीदाचे स्तोत्र.

परमेश्वरा मला खूप शत्रू आहेत.
    खूप लोक माझ्या विरुद्ध गेले आहेत.
बरेच लोक माझ्याबद्दल बोलत आहेत ते लोक म्हणतात, “देव त्याला वाचवणार नाही.”

परंतु परमेश्वरा, तूच माझी ढाल आहेस
    तूच माझे वैभव आहेस
    परमेश्वरा मला महत्व [a] देणारा तूच आहेस.

मी परमेश्वराची प्रार्थना करेन
    आणि तो मला त्याच्या पवित्र डोंगरावरून उत्तर देईल!

मी पडून विश्रांती घेतो तरी मी जागा होईन हे मला माहीत आहे.
    मला हे कसे कळते?
    कारण परमेश्वर मला सांभाळतो माझे रक्षण करतो.
माझ्याभोवती हजारो सैनिक असतील.
    परंतु मी या शत्रूंना घाबरणार नाही.

परमेश्वरा जागा हो!
    देवा मला वाचव तू फार शक्तिशाली आहेस
तू जर माझ्या शत्रूंच्या थोबाडीत मारलीस
    तर त्यांचे सगळे दात पडतील.

परमेश्वरा, जय तुझाच आहे.
    परमेश्वरा तू कृपा करून तुझ्या लोकांवर दया कर.

नीतिसूत्रे 18:14-15

14 आजारपणात माणसाचे मन त्याला जिवंत ठेवू शकते. पण जर आता सारे काही व्यर्थ आहे असे त्याला वाटत असेल तर सारीच आशा संपते.

15 शहाण्या माणसाला नेहमी अधिक शिकायची इच्छा असते. तो माणूस नेहमी अधिक ज्ञान मिळवण्यासाठी लक्षपूर्वक ऐकत असतो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center