Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NIV. Switch to the NIV to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 राजे 22:3-23:30

मंदिराच्या दुरुस्तीचा आदेश

मशुल्लामचा मुलगा असल्या याचा मुलगा शाफान चिटणीस याला योशीया राजाने आपल्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी परमेश्वराच्या मंदिरात पाठवले आणि सांगितले. मंदिराच्या दुरुस्तीचा आदेश, “तिथे तू महायाजक हिल्कीया याच्याकडे जा. द्वारपालांनी लोकांकडून गोळा केलेले पैसे या याजकाकडे जमा व्हायला हवेत. हा परमेश्वराच्या मंदिरात जमा झालेला पैसा आहे. परमेश्वराच्या मंदिराच्या कामावर देखेरख करणाऱ्यांना याजकांनी यातील पैसे द्यावेत. मंदिराची दुरुस्ती करणाऱ्या कारागिरांना देण्यासाठी या पैशाचा विनियोग व्हावा. सुतार, गवंडी, पाथरवट यांना तसेच लाकूड घेणे, चिरे घडवणे यासाठी पैसे द्यावेत. दिलेल्या पैशाचा हिशेब मागू नये कारण ही मंडळी विश्वसनीय आहे.”

मंदिरात नियमशास्त्राचे पुस्तक

महायाजक चिटणीस शाफान याला म्हणाला, “मला परमेश्वराच्या मंदिरात नियमशास्त्राचे पुस्तक सापडले आहे.” मग ते पुस्तक याजक हिल्कीयाने शाफानला दिले. शाफानने ते वाचले.

शाफानने परत येऊन राजाला सर्व वर्तमान सांगितले. तो म्हणाला, “तुझ्या सेवकांनी मंदिरातील सर्व पैसा एकत्र करुन तो परमेश्वराच्या मंदिराच्या कामावर देखरेख करणाऱ्यांना त्यांनी दिला आहे.” 10 पुढे शाफान राजाला म्हणाला, “याजक हिल्कीया याने हे पुस्तकही मला दिले.” शाफानने ते राजाला वाचून दाखवले.

11 नियमशास्त्रातील वचने ऐकून राजाने अतीव दु:ख प्रदर्शित करण्यासाठी आपली वस्त्रे फाडली. 12 मग त्याने याजक हिल्कीया, शाफानचा मुलगा अहीकाम, मिखायाचा मुलगा अखबोर, शाफान चिटणीस आणि सेवक असाया यांना आज्ञा केली की, 13 “आता जाऊन परमेश्वराचा कौल घ्या. मी, आपले लोक आणि सर्व यहूदा यांच्या वतीने त्याला या पुस्तकातील वचनांविषयी विचारा. परमेश्वराचा आपल्यावर कोप झाला आहे. कारण आपल्या पूर्वंजांनी या पुस्तकातील वचनांचा भंग केला आहे. आपल्यासाठी लिहून ठेवलेल्या सर्व गोष्टी त्यांनी आचरणात आणल्या नाहीत.”

योशीया आणि संदेष्ट्री हुल्दा

14 मग हिल्कीया याजक, अहीकाम, अखबोर, शाफान, असाया हे सर्व हुल्दा या संदेष्ट्रीकडे गेले. हरहसचा मुलगा तिकवा याचा मुलगा शल्लूम याची ती बायको. शल्लूम याजकांच्या कपड्यांचे खाते सांभाळी, हुल्दा यरुशलेममध्ये दुसऱ्या भागात राहात होती. हे सर्वजण तिच्याकडे गेले आणि तिच्याशी बोलले.

15 तेव्हा हुल्दा त्यांना म्हणाली, “इस्राएलचा देव परमेश्वर म्हणतो: तुम्हाला माझ्याकडे ज्याने पाठवले त्याला सांगा: 16 ‘परमेश्वराचे म्हणणे आहे की, हा प्रदेश आणि तेथे राहणारे लोक यांच्यावर आता मी अरिष्ट आणणार आहे. यहूदाच्या राजाने त्या पुस्तकात वाचली तीच संकटे येतील. 17 यहूदाच्या लोकांनी माझा त्याग केला. इतर दैवतांपुढे त्यांनी धूप जाळला. त्यांनी मला संताप आणला. त्यांनी अनेक मूर्तींही केल्या. म्हणून या प्रदेशावर माझा राग आहे. न विझवता येणाऱ्या अग्निसारखा माझा संताप असेल.’

18-19 “यहूदाचा राजा योशीया याने तुम्हाला परमेश्वराचा कौल घ्यायला पाठवले. योशीयाला हे सांगा: ‘इस्राएलाचा देव परमेश्वराची वचने तू ऐकलीस. हा प्रदेश आणि येथील लोक यांच्याविषयी मी सांगितले ते ऐकलेस. तू मृदू मनाचा आहेस. या गोष्टी ऐकून तुला दु:ख झाले. यरुशलेमवर अरिष्ट येईल असे मी म्हणालो तेव्हा शोकाने तू वस्त्रे फाडलीस आणि रडलास. म्हणून मीही तुझे ऐकले आहे.’ हे परमेश्वराचे शब्द आहेत. 20 ‘मी तुझी तुझ्या पूर्वजांशी भेट करुन देईन. तुला मरण येईल आणि तू सुखाने कबरीत पडशील. यरुशलेमवर येणारे अरिष्ट तुला आपल्या डोळ्यांनी पाहावे लागणार नाही.’”

मग याजक हिल्कीया, अहीकाम, अखबोर, शाफान, असाया यांनी हा संदेश राजाला सांगितला.

लोक नियमशास्त्र ऐकतात

23 राजा योशीया याने यहूदा आणि यरुशलेम येथील सर्व वडिलधाऱ्यांना निरोप पाठवून बोलावून घेतले. मग राजा परमेश्वराच्या मंदिरात गेला. त्याच्या मागोमाग यहूदा आणि यरुशलेम येथे राहणारे लोकही गेले. अगदी सामान्य माणसापासून याजक, संदेष्टे यांच्यासारख्या महत्वाच्या व्यक्तींपर्यंत झाडून सर्वजण राजाच्या बरोबर गेले. मग राजाने परमेश्वराच्या मंदिरात सापडलेले कराराचे पुस्तक काढून त्यातील सर्व वचने सगळ्यांना ऐकू जातील अशी वाचली.

स्तंभाजवळ उभे राहून राजाने परमेश्वराशी करार केला. त्याने परमेश्वराची सर्व वचने, करार, नियम पाळायचे कबूल केले. पुस्तकात लिहिलेले सर्व मनोभावे पाळायचे त्याने आश्वासन दिले. राजाने केलेल्या या कराराला पाठिंबा दशर्विण्यासाठी सर्वजण उठून उभे राहिले.

मग बालदैवत, अशेरा, नक्षत्रे यांच्या पूजेसाठी केलेली सर्व पात्रे परमेश्वराच्या मंदिरातून बाहेर काढण्यात यावीत अशी आज्ञा राजाने हिल्कीया, इतर याजक आणि द्वारपाल यांना दिली. मग त्याने ती यरुशलेम बाहेरच्या किद्रोनच्या शेतात जाळली. त्यांची राख बेथेल येथे नेली.

यहूदाच्या राजांनी याजक म्हणून जी माणसे निवडली होती ती सामान्य माणसे होती, आहरोन कुळातली नव्हती! हे भोंदू याजक यहूदाच्या सर्व नगरामध्ये तसेच यरुशलेमभोवतीच्या गावांतून उंचस्थानावरील पूजास्थळांपुढे सर्रास धूप जाळत होते. बाल, सूर्य, चंद्र, नक्षत्रे आणि आकाशातील इतर तारे यांच्यासाठी ते धूप जाळत. मग हिज्कीयाने या याजकांवर बंदी घातली.

योशीयाने परमेश्वराच्या मंदिरातून अशेराचा स्तंभ हलवला. तो गावाबाहेर किद्रोन खोऱ्यात नेऊन जाळून टाकला. नंतर त्याने जळलेल्या भागाच्या तुकड्यांची राख केली. ती सामान्य लोकांच्या थडग्यांवर विखरुन टाकली.

परमेश्वराच्या मंदिरातील पुरुषवेश्यांची घरे योशीयाने उद्ध्वस्त केली. बायकाही या घरांचा वापर करत आणि अशेरा या देवतेच्या सन्मानार्थ लहान तंबू आच्छादने करत असत.

8-9 याजक या काळात यरुशलेमला यज्ञबळी आणून मंदिरातील वेदीवर वाहात नव्हते. यहूदातील वेगवेगळ्या शहरामध्ये हे याजक राहात होते. त्या त्या ठिकाणच्या उंचस्थानावरील ठिकाणी ते धूप जाळत आणि यज्ञ करत. गेबापासून बैर-शेब्यापर्यंत अशी उंचस्थाने होती. आणि हे याजक आपली बेखमीर भाकर यरुशलेममधील मंदिरात विशिष्ट ठिकाणी न खाता त्या त्या गावांमध्ये सामान्य लोकांबरोबर बसून खात. पण राजाने ही उंचस्थाने मोडली आणि याजकांना यरुशलेमला आणले. नगराधिकारी यहोशवा याच्या वेशीजवळची डावीकडील उंचस्थानेही योशीयाने उद्ध्वस्त केली.

10 हिन्नोमच्या मुलाचे खोरे या ठिकाणी तोफेत हे एक ठिकाण होते. तेथे लोक मोलख या दैवताला आपल्या मुलांचा बळी देत आणि वेदीवर त्यांना जाळत. योशीयाने हे स्थान पुन्हा वापरता येऊ नये अशातऱ्हेने भ्रष्ट करुन टाकले. 11 पूर्वीच्या राजांनी परमेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराशी एक रथ आणि काही घोडे ठेवलेले होते. नाथान-मेलेक या अधिकाऱ्याच्या खोलीजवळ ही जागा होती. हे घोडे आणि रथ सूर्य दैवतांच्या सन्मानार्थ [a] होते. योशीयाने हे घोडे तेथून हलवले आणि रथ जाळून टाकला.

12 आहाजच्या इमारतीच्या गच्चीत पूर्वी यहूदाच्या राजांनी वेद्या बांधल्या होत्या. परमेश्वराच्या मंदिराच्या दोन्ही चौकातही मनश्शेने वेद्या बांधल्या होत्या. योशीयाने या सर्व वेद्यांची मोडतोड करुन किद्रोनच्या खोऱ्यात त्यांचे भग्निवशेष टाकून दिले.

13 यरुशलेमजवळच्या विध्वंसगिरी नावाच्या पहाडावर राजा शलमोनने काही उच्चस्थाने पूर्वी बांधली होती. पहाडाच्या ती दक्षिणेला होती.सिदोन्यांची अमंगळ दैवत अष्टोरेथ, मवाब्यांची अमंगळ दैवत कमोश आणि अम्मोन्यांची अमंगल देवता मिलकोम यांच्यासाठीही उच्चस्थाने त्याने बांधली होती. पण ही सर्व स्थाने राजा योशीयाने भ्रष्ट केली. 14 त्याने सर्वच्या सर्व स्मृतिस्तंभ आणि अशेराचे खांब यांची पार मोडतोड केली आणि त्या ठिकाणावर मृत माणसांच्या अस्थी पसरुन टाकल्या.

15 नबाटचा मुलगा यराबाम याने बांधलेली बेथेलमधली वेदी आणि उच्चस्थानेही योशीयाने उध्वस्त केली. या यराबामने इस्राएलला पाप करायला लावले होते. योशीयाने त्या बांधकामांची मोडतोड करुन त्याची अगदी माती केली. अशेरा स्तंभही त्याने जाळून टाकला. 16 योशीयाने डोंगरावर इकडे तिकडे पाहिले तेव्हा त्याला काही कबरी दिसल्या. तेव्हा त्याने माणसे पाठवून त्यांतील हाडे आणली. ती हाडे त्याने वेदीवर जाळली आणि ते स्थान अपवित्र केले. संदेष्ट्याने जो परमेश्वराचा संदेश घोषित केला होता त्या प्रमाणेच हे झाले. यराबाम वेदीजवळ उभा असताना संदेष्ट्याने हे सांगितले होते.

पुन्हा पाहिले तेव्हा योशीयाला संदेष्ट्याची कबर दिसली.

17 योशीयाने विचारले, “हे थडगे कोणाचे?”

तेव्हा गावातील लोकांनी त्याला सांगितले, “हे यहूदातून आलेल्या संदेष्ट्याचे थडगे. तू बेथेलच्या वेदीची जी दशा करुन टाकलीस त्याबद्दल त्याने फार पूर्वीच भाकित केले होते.”

18 तेव्हा योशीया म्हणाला, “या थडग्याला धक्का लावू नका तेथील अस्थी हलवू नका.”

19 शोमरोनच्या नगरामधील उच्चस्थानांवरील सर्व दैवतेही योशीयाने उद्ध्वस्त केली. ही दैवते इस्राएलच्या राजांनी बांधली होती आणि त्या मुळे परमेश्वराचा कोप झाला होता. बेथेलमधील वेदीप्रमाणेच योशीयाने ह्या दैवतांची गत करुन टाकली.

20 शोमरोन मधील उच्चस्थानांच्या सर्व याजकांना योशीयाने ठार केले. त्या वेदीवरच त्याने त्यांना मारले. वेदीवर माणसांची हाडे जाळली. अशाप्रकारे सर्व पूजास्थळांची मोडतोड करुन मग तो यरुशलेमला परतला.

यहूदाचे लोक वल्हांडण साजरे करतात

21 राजा योशीयाने सर्व लोकांना आज्ञा केली, “ करारात लिहिले आहे त्या पध्दतीने तुमच्या परमेश्वर देवासाठी वल्हांडण सण साजरा करा.”

22 इस्राएलवर न्यायाधीश राज्य करत होते तेव्हापासून लोकांनी वल्हांडण सण अशा पध्दतीने साजरा केला नव्हता. यहूदाच्या किंवा इस्राएलच्या कोणत्याही राजाने त्यानिमित्त उत्सव केला नव्हता. 23 योशीयाचे राजा म्हणून अठरावे वर्ष चालू असताना लोकांनी परमेश्वरासाठी हा सण साजरा केला.

24 यहूदा आणि यरुशलेममध्ये लोक पुजत असलेल्या मांत्रिक (भूतसंचारी) चेटकी, गृहदेवता आणि अनेक अमंगळ गोष्टींचा नाश योशीयाने केला. परमेश्वराच्या मंदिरात याजक हिल्कीयाला जे नियमशास्त्राचे पुस्तक सापडले त्या बरहुकूम योशीयाने हे केले.

25 योशीयासारखा राजा यापूर्वी झाला नव्हता. योशीया पूर्णपणे परमेश्वराचा उपासक बनला मोशेच्या कराराचे पालन योशीयाइतक्या काटेकोरपणे कुठल्याच राजाने केले नव्हते. आणि त्यानंतरही तसा राजा झाला नाही.

26 पण तरीही यहूदावरील परमेश्वराचा राग ओसरला नाही. मनश्शेच्या वर्तनाबद्दल अजूनही त्याला राग होता. 27 परमेश्वर म्हणाला, “मी इस्राएलांना हुसकावून लावले तसेच यहूदांना करीन त्यांना मी नजरेपुढून घालवीन. यरुशलेमचाही मी त्याग करीन. मीच ते नगर निवडले हे खरे पण तेथील मंदिराची मी मोडतोड करीन ‘माझे नाव राखणारी जागा’ असे याच स्थळाबद्दल मी म्हणत होतो.”

28 यहूदाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात योशीयाच्या इतर गोष्टींची हकीकत आहे.

योशीयाचा मृत्यू

29 योशीयाच्या कारकिर्दीत, मिसरचा राजा फारो-नखो याने फरात नदीजवळ अश्शूरच्या राजावर स्वारी केली. तेव्हा योशीया फारो-नखोवर चाल करुन गेला. पण मगिद्दो येथे फारो-नखोने त्याला पाहिले आणि ठार केले. 30 योशीयाच्या सेवकांनी त्याचा मृतदेह रथात घालून मगिद्दोहून यरुशलेमला आणला. त्याला त्याच्या कबरीत पुरले.

मग देशातील लोकांनी त्याचा मुलगा यहोआहाज याला अभिषेक केला आणि त्याला पुढचा राजा केले.

प्रेषितांचीं कृत्यें 21:37-22:16

37 शिपाई पौलाला इमारतीत घेऊन जाणार इतक्यात पौल सरदाराला म्हणाला, “मी काही बोलू शकतो काय?”

तो सरदार म्हणाला, “तुला ग्रीक बोलता येते काय? 38 मग मला वाटते, तो मनुष्य तू नाहीस, मला वाटले इजिप्तच्या ज्या मजुराने काही दिवसांपूर्वी बंड करुन सरकारला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तोच तू आहेस. त्या इजिप्तच्या मनुष्यांने चार हजार दहशतवाद्यांना अरण्यात नेले.”

39 पौल म्हणाला, “किलकिया प्रांतातील तार्सज्ञ नगरात राहणारा मी एक यहूदी आहे. मी एका महत्वाच्या शहराचा नागरिक आहे. मी तुम्हांला विनवितो, मला लोकांशी बोलू द्या.”

40 जेव्हा सरदाराने त्याला बोलण्याची परवानगी दिली तेव्हा तो पायऱ्यांवर उभा राहिला आणि आपल्या हाताने त्याने लोकांना शांत राहण्यास सांगितले. जेव्हा सगळीकडे शांतता पसरली तेव्हा पौल हिब्रू भाषेत बोलू लागला:

पौल लोकांसमोर भाषण करतो

22 “बंधूनो व वडीलजनांनो, मी माझ्या बचावासाठी जे काही सांगतो ते ऐका.”

जेव्हा लोकांनी पौलाला हिब्रू भोषत बोलताना ऐकले तेव्हा ते अधिकच शांत झाले. पौल म्हणाला,

“मी एक यहूदी आहे. आणि किलिकीया प्रांतातील तार्स येथे माझा जन्म झाला. परंतु याच शहरात मी लहानाचा मोठा झालो, आपल्या पूर्वजांच्या नियमांचे सविस्तर शिक्षण मी गमालीएल यांच्या पायाजवळ बसून घेतले. जसे तुम्ही आज देवाविषयीच्या आवेशाने भरलेल आहात तसाच मी देखील देवाविषयीच्या आवेशाने भरलेला होतो. या मार्गाचा (ख्रिस्ती चळवळीचा) पुरस्कार करणाऱ्यांचा मी त्यांच्या मरणापर्यंत छळ केला. मी स्त्री व पुरुषांना अटक करुन तुंरुंगात टाकले.

“याची मुख्य याजक व धर्मसभेचे सर्व वडीलजन साक्ष देतील. त्यांच्याकडून दिमिष्कातील त्यांच्या बंधुजनांच्या नावाने मी पत्रे घेतली. आणि तेथे ह्या मार्गांचे (ख्रिस्ती) जे लोक होते, त्यांना कैदी म्हणून यरुशलेमास घेऊन येणार होतो, यसाठी की त्यांना शिक्षा व्हावी.

पौल त्याचा पालट झाला हे सांगतो

“तेव्ह? असे झाले की, मी प्रवास करीत दिमिष्क शहराजवळ आलो असताना दुपारच्या वेळी माइयाभोवती आकाशातून लख्ख प्रकाश पडला. मी जमिनीवर पडलो. आणि मी एक वाणी माइयाशी बोलताना ऐकली, ‘शौला, शौला, माझा छळ तू का करतोस?’

“मी उत्तर दिले, ‘प्रभु, तू कोण आहेस?’ तो मला म्हणाला, ‘तू ज्याचा छळ करीत आहेस तो नासरेथचा येशू मी आहे.’ जे माझ्याबरोबर होते त्यांनी प्रकाश पाहिला, पण जो आवाज माझ्याशी बोतल होता तो त्यांना ऐकू आला नाही.

10 “मी म्हणालो, ‘प्रभु मी काय करु?’ आणि प्रभु मला म्हणाला, ‘ऊठ आणि दिमिष्कात जा. तेथे तुला जे काम नेमून देण्यात आले आहे ते सांगण्यात येईल.’ 11 त्या प्रकाशामुळे मला काही दिसेनासे झाले. तेव्हा माइया सोबत्यांनी मला हाताला धरुन नेले आणि मी दिमिष्कला पोहोंचलो.

12 “नियमशास्त्राचे भक्तिभावाने पालन करणारा हनन्या नावाचा एक मनुष्य होता. तेथे राहणारे सर्व यहूदी त्याच्याबद्दल चांगले बोलत. 13 तो माइयाकडे आला, आणि माइयाजवळ उभा राहून तो म्हणाला, ‘बंधु शौल, तू पुन्हा पाहू लागशील!’ आणि त्याच घटकेला मला दिसू लागले.

14 “तो म्हणाला, ‘आपल्या पूर्वजांच्या (वाडवडिलांच्या) देवाने तुला निवडले आहे, यासाठी की त्याची इच्छा तुला कळावी. त्या धार्मिकाला तू पहावेस. आणि त्याच्या तोंडचे शब्द तुला ऐकायला मिळावेत. 15 कारण तू जे काही पाहिलेस आणि ऐकलेस, याविषयी तू त्याचा सर्वांसमोर साक्षीदार होशील. 16 मग आता, कशाची वाट पाहतोस? ऊठ, आणि बाप्तिस्मा घे व तुझी पाप धुवून टाक. येशूवर विश्वास ठेवून हे कर.’

स्तोत्रसंहिता 1

भाग पहिला

(स्तोत्रसंहिता 1-41)

माणसाने जर वाईट लोकांचा सल्ला मानला नाही, तो पापी लोकांसारखा राहिला नाही
    आणि देवावर [a] विश्वास न ठेवणाऱ्या लोकांबरोबर राहाणे त्याला आवडले नाही
    तर तो माणूस खरोखरच सुखी होईल.
चांगल्या माणसाला परमेश्वराची शिकवण आवडते
    तो त्या बद्दल रात्रंदिवस विचार करत असतो.
त्यामुळे तो माणूस ओढ्याच्या कडेला लावलेल्या झाडासारखा शक्तिशाली होऊ शकतो
    तो योग्यवेळी फळे येणाऱ्या झाडासारखा असतो तो पाने असलेल्या व न मरणाऱ्या झाडासारखा असतो.
    तो जे काही करतो ते यशस्वी होते.

परंतु वाईट लोक असे नसतात ते वाऱ्यावर उडून
    जाणाऱ्या फोलपटासारखे असतात.
न्यायालयातील खटल्याचा निवाडा करण्यासाठी जर चांगले लोक एकत्र आले
    तर वाईट लोकांना अपराधी ठरविले जाईल ते पापीलोक निरपराध ठरविले जाणार नाहीत.
का? कारण परमेश्वर चांगल्यांचे रक्षण करतो
    आणि वाईटाचे निर्दालन करतो.

नीतिसूत्रे 18:11-12

11 श्रीमंती आपले रक्षण करेल असे श्रीमंतांना वाटते. ती बळकट किल्ल्याप्रमाणे आहे असे त्यांना वाटते.

12 गर्विष्ठ माणसाचा लवकरच नाश होईल. पण विनम्र माणसाचे गौरव होईल.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center