Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the CSB. Switch to the CSB to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 इतिहास 11:1-12:18

दावीद इस्राएलचा राजा होतो

11 सर्व इस्राएल लोक हेब्रोन येथे दावीदाकडे जमले. ते त्याला म्हणाले, “आम्ही तुझे भाऊबंद आहोत, तुझ्याच रक्तामांसाचे आहोत. पूर्वी लढाईत तू आमचे नेतृत्व केले आहेस. शौल राजा असतानाही तू ते केले आहेस. परमेश्वर तुला म्हणाला, ‘दावीदा, तू माझ्या इस्राएल लोकांचा मेंढपाळ होशील. माझ्या लोकांचे नेतृत्व करशील.’”

इस्राएल लोकांमधील सर्व वडीलधारी मंडळी दावीद राजाकडे हेब्रोन येथे आली. परमेश्वरासमोर दावीदाने त्यांच्याशी करार केला. तेव्हा त्या पुढाऱ्यांनी दावीदास अभिषेक केला. आता दावीद इस्राएलाचा राजा झाला. शमुवेल मार्फत परमेश्वराने असे होणार असे वचन दिले होते.

दावीद यरुशलेम घेतो

सर्व इस्राएल लोकांबरोबर दावीद यरुशलेम नगराकडे गेला. यरुशलेमला त्याकाळी यबूस असे म्हणत असत; आणि तेथे राहणाऱ्यांना यबूसी. ते नगरवासी दावीदाला म्हणाले, “तू आमच्या नगरात पाऊल टाकू शकणार नाहीस.” तरीही दावीदाने त्यांचा पाडाव केलाच. दावीदाने सियोनचा किल्ला घेतला. यालाच दावीदनगर हे नाव पडले.

दावीद म्हणाला, “यबूसी लोकांवरील हल्ल्याचे जो नेतृत्व करील तो माझा सेनापती होईल.” यवाबने हे नेतृत्व केले. हा सरुवेचा मुलगा. यवाब सेनापती झाला.

दावीदाने किल्ल्यातच आपला मुक्काम केला म्हणून त्याला दावीद नगर नाव पडले. या किल्ल्याभोवती दावीदाने नगराची उभारणी केली. मिल्लो पासून नगराच्या तटबंदीपर्यंत त्याने ते बांधले. जेथे पडझड झाली होती तिथे दुरुस्ती केली. दावीदाच्या मोठेपणात भर पडत गेली. सर्वशक्तिमान परमेश्वर त्याच्या बाजूचा होता.

दावीदाची फौज

10 दावीदाच्या, खास सैनिकांच्या पुढाऱ्यांची नावे या यादीत आहेत. दावीदाच्या राज्यात त्यांचेही बळ वाढले. त्यांनी आणि समस्त इस्राएल लोकांनी दावीदाला पाठिंबा दिला आणि त्याला राजा केले. देवाने कबूल केल्याप्रमाणेच हे घडले.

11 दावीदाकडील खास सैनिकांची नावे अशी:

याशबाम हखमोनी. हा रथचालकांचा प्रमुख होता. याशबाम एकावेळी तीनशे जणांना आपल्या भाल्याने ठार करु शकत असे.

12 त्यानंतर दोदय अहोही याचा मुलगा एलाजार. एलाजार तिघा पराक्रमींपैकी एक होता. 13 पसदम्मीम येथे हा दावीदाबरोबर होता. पलिष्टे त्या ठिकाणी लढायला आले होते. तेथे शेतात जवाचे पीक उभे होते. इस्राएल लोक तेव्हा पळून गेले. 14 पण तीन शूर वीर तिथेच पाय रोवून उभे राहिले आणि त्यांनी बचाव करायचा प्रयत्न केला. पलिष्ट्यांचा त्यांनी पराभव केला. परमेश्वराने इस्राएल लोकांना मोठा विजय मिळवून दिला.

15 एकदा, दावीद अदुल्लामच्या गुहेत होता. पलिष्ट्यांचे सैन्य तिथून खाली रेफाईमच्या खोऱ्यात होते. त्यावेळी तीस वीरांपैकी तिघेजण गुहेत असलेल्या दावीदाकडे जायला जमिनीवरुन सरपटत रांगत निघाले.

16 आणखी एकदा दावीद किल्ल्यांत असताना पलिष्ट्यांचे सैन्य बेथलहेममध्ये होते. 17 तेव्हा आपल्या गावचे पाणी प्यावे असे दावीदाला फार वाटले. तो म्हणाला, “बेथलहेमच्या वेशीजवळ विहीर आहे तिच्यातले पाणी मला कोणी आणून दिले तर किती बरे होईल.” त्याला पाणी हवे होते असे नाही पण तरी तो हे म्हणाला. 18 यावर त्या तिघांनी पलिष्ट्यांच्या छावणीतून मोठ्या हिकमतीने वाट काढली, बेथलहेमच्या वेशीजवळच्या विहिरीतील पाणी काढले आणि ते त्या तिघांनी दावीदाला आणून दिले. दावीदाने ते पाणी प्यायला नकार दिला. त्याने ते जमिनीवर ओतून परमेश्वराला अर्पण केले. 19 दावीद म्हणाला, “देवा, हे पाणी मी कसे पिऊ? हे मी प्यायलो तर ते इथपर्यंत आणायला ज्यांनी आपला जीव धोक्यात घातला त्यांचे रक्तच प्यायल्यासारखे होईल.” त्याने ते पाणी न प्यायचे कारण हे होय. त्या तीन शूरांनी असे बरेच पराक्रम केले.

दावीदाकडील आणखी शूर वीर.

20 यवाबचा भाऊ अबीशय हा या तिघांचा प्रमुख होता. त्याने आपल्या भाल्याने तीनशे जणांचा प्रतिकार केला आणि त्यांना ठार केले. अबीशय त्या तिघांएवढाच प्रसिध्द होता. 21 त्या तीन शूरांपेक्षा जास्त याने नाव कमावले. तो त्या तिघामधला नसला तरी त्यांचा नायक झाला.

22 यहोयादा हा एका बलाढ्य माणसाचा मुलगा होता. यहोयादाचा मुलगा बनाया. हा कबसेल येथला होता. बनायाने खूप पराक्रम केले. मवाबातील दोन अग्रगण्य माणसांना त्याने ठार केले. एकदा बर्फ पडत असताना गुहेत शिरुन त्याने सिंहाचा वध केला. 23 मिसरच्या एका मजबूत सैनिकालाही त्याने मारले. हा सैनिक साडेसात फूट उंचीचा होता. त्याच्याजवळ चांगला लांब आणि भक्कम भाला होता. विणकराच्या मागावरील तुळईएवढा हा भाला होता. बनायाजवळ फक्त गदा होती. बनायाने त्या सैनिकाच्या हातून भाला हिसकावून घेतला आणि त्यानेच त्या मिसर सैनिकाला ठार केले. 24 यहोयादाचा मुलगा बनाया याने असे बरेच पराक्रम केले. तीन शूरांप्रमाणेच त्याने नाव मिळवले. 25 तीस शूरांपेक्षा बनायाचा बोलबाला जास्त झाला. पण तो त्या तिघांपैकी नव्हता. दावीदाने बनायाला आपल्या अंगरक्षकांचे प्रमुख म्हणून नेमले.

तीस पराक्रमी वीर

26 सैन्यातील शूर सैनिक (तीस वीर) पुढीलप्रमाणे:

यवाबचा भाऊ असाएल,

बेथलेहेमच्या दोदोचा मुलगा एलहानान,

27 हरोरी शम्मोथ,

हेलस पलोनी,

28 तकोइच्या इक्केशचा मुलगा ईरा,

अनाथोथचा अबियेजेर

29 शिब्बखाय हूशाथी,

ईलाय अहोही,

30 महरय नटोफाथी,

बाना नटोफाथी याचा मुलगा हेलेद,

31 बन्यामीनांच्या संतानांमधला गिबोथकर रीबय याचा मुलगा इत्तय,

बनाया पिराथोनी,

32 गाशच्या झऱ्यांजवळचा हूरय,

अबीएल अर्बाथी,

33 अजमावेथ बहरुमी,

अलीहबा शालबोनी,

34 हामेश गिजोनी याचे मुलगे,

शागे हरारी याचा मुलगा योनाथान,

35 साखार हरारी याचा मुलगा अहीयाम,

ऊरचा मुलगा अलीफल,

36 हेफेर मखेराथी,

अहीया पलोनी,

37 हेस्त्री कर्मेली,

एजबयचा मुलगा नारय,

38 नाथानचा भाऊ योएल,

हग्रीचा मुलगा मिभार,

39 सेलक अम्मोनी,

सरुवेचा मुलगा यवाब याचा शस्त्रवाहक नहरय बैरोथी,

40 ईरा, इथ्री,

गारेब, इथ्री,

41 उरीया हित्ती,

अहलयाचा मुलगा जाबाद,

42 शीजा रउबेनी याचा मुलगा अदीना हा रउबेन्यांचा अधिकारी व तीस शूरांपैकी एक,

43 माकाचा मुलगा हानान

आणि योशाफाट मिथनी,

44 उज्जीया अष्टराथी,

होथाम अरोएरी याचे मुलगे शामा ईयेल

45 शिम्रीचा यदीएल योहा तीसी

आणि त्याचा भाऊ योहा

46 अलीएल महवी व

एलानामचे मुलगे यरीबय

आणि योशव्या व इथ्मा मवाबी,

47 अलीएल, ओबेद न यासीएल मसोबायी.

दावीदाला येऊन मिळालेले शूर वीर

12 दावीद सिकलागला असताना त्याच्याकडे आलेल्यांची ही यादी. दावीद तेव्हा कीशचा मुलगा शौल याच्या भयाने लपून राहत होता. या लोकांनी दावीदाला लढाईत मदत केली. धनुष्यबाण चालवणे किंवा गोफणगुंडा मारणे या गोष्टी ते डाव्या उजव्या दोन्ही हातांनी सराईतपणे करीत. बन्यामीनच्या वंशात जे शौलचे नातेवाईक होते त्यांच्यापैकी हे होत. त्यांची नावे अशी:

अहीएजर हा त्यांच्यातला प्रमुख. मग योवाश (गिबा येथील शमा याचे हे मुलगे) त्यानंतर यजिएल आणि पलेट. हे अजमावेथ याचे मुलगे. अनाथोच येथील बराका व येहू. गिबोन येथील इश्माया (हा तीन वीरांपैकी एक आणि त्या तीन वीरांचा प्रमुख.) गदेराथ लोकामधून यिर्मया, यहजिएल, योहानान आणि योजाबाद. एलूजय, यरीमोथ, बाल्या, शमऱ्या, हरुफी शफट्या एलकाना, इश्शीया, अजरेल, योबेजर आणि याशबाम हे कोरही, तसेच यहोहाम गदोरी याचे मुलगे योएला आणि जबद्या.

गाद वंशातील लोक

गादी यांच्यातील काही लोक दावीदाकडे तो वाळवंटातील गढीत असताना आले. ते चांगले शूर लढवय्ये होते. ढाल वापरणे, भालाफेक यात ते वाकबगार होते. ते सिंहासारखे उग्र आणि डोंगरातल्या हरणासारखे चपळ होते.

गाद वंशातील एजेर हा सैन्याचा प्रमुख होता. ओबद्या दुसरा, अलीयाब तिसरा. 10 मिश्मन्ना चवथ्या क्रमाकांवर तर यिर्मया पाचव्या वर होता. 11 अत्तय सहावा, एलीएल सातवा, 12 योहानन आठवा, एलजाबाद नववा, 13 यिर्मया दहावा, मखबन्नय अकरावा.

14 हे गादी सैन्यातील सरदार होते. त्यांच्यातला कनिष्ठसुध्दा शत्रूच्या शंभर जणांना भारी होता आणि त्यांच्यातला खंदा वीर हजाराच्या सैन्याशी एकटा लढू शकत असे. 15 गादच्या घराण्यातील हेच सैनिक, वर्षाच्या पहिल्या महिन्यात यार्देन नदी पार करुन गेले. नदीला तेव्हा पूर आलेला होता. खोऱ्यात राहणाऱ्या लोकांना त्यांनी पार पूर्वेला आणि पश्र्चिमेला पळवून लावले.

इतर सैनिक दावीदाला येऊन मिळतात

16 बन्यामिन आणि यहूदा वंशातील लोकही दावीदाला गढीत येऊन मिळाले. 17 दावीदाने त्यांचे स्वागत केले व त्यांना तो म्हणाला, “मला मदत करायला तुम्ही सदभावनेने आला असाल तर तुमचे स्वागत असो. तुम्ही माझ्याकडे या पण माझ्या हातून काही अपराध झालेला नसताना कपट करायला आला असलात तर आमच्या पूर्वजांचा देव ते पाहून तुम्हाला शासन करो.”

18 अमासय हा तीस वीरांचा सरदार होता. त्याच्यात परमेश्वरी आत्म्याचा साक्षात्कार झाला आणि तो म्हणाला,

“दावीदा, आम्ही तुझ्या बाजूचे
    आहोत इशायाच्या मुला,
आम्ही तुझ्या पाठीशी आहोत शांती असो!
    तुला साहाय्य करणाऱ्यांनाही शांती असो.
    कारण देव तुझा पाठीराखा आहे.”

तेव्हा दावीदाने त्यांना आपल्यात सामावून घेतले आणि त्यांना सैन्याचे अधिकारी केले.

प्रेषितांचीं कृत्यें 28

माल्ता बेटावर पौल

28 जेव्हा आमचे पाय सुखरुपपणे तेथील जमीनीला लागले. तेव्हा आम्हांना कळले की, त्या बेटाचे नाव माल्ता असे आहे. तेथील रहिवाश्यांनी आम्हांला अतिशय ममतेने वागविले. त्यांनी एक शेकोटी पेटविली आणि आमचे स्वागत केले. कारण पाऊस पडू लागाला होता. व थंडीही होती. पौलाने काटक्या गोळा केल्या आणि ते त्या शेकोटीत टाकू लागला. उष्णतेमुळे तेथून एक साप निघाला. आणि त्याने पौलाच्या हाताला विळखा घातला. ते पाहून तेथील रहिवासी एकमेकांना म्हणू लागले, “हा मनुष्य खुनी असला पाहिजे. समुद्रातून जरी हा वाचला असला तरी देवाच्या न्यायामुळे याचे आयुष्य संपुष्टातच आले आहे!”

परंतु पौलाने तो प्राणी शेकोटीत झटकून टाकला. आणि पौलाला काही अपाय झाला नाही. त्या बेटावरील लोकांना पौलाचे अंग सुजून येईल किंवा पौल एकाएकी मरुन पडेल असे वाटत होते. बराच वेळ वाट पाहूनही पौलाला काहीही विकार झाल्याचे दिसेना, तेव्हा त्या लोकांचे विचार पालटले, आणि पौल देवच आहे असे ते म्हणू लागले.

तेथून जवळच पुब्ल्य नावाच्या मनुष्याची शेती होती. पुब्ल्य हा त्या बेटाचा मुख्य अधिकारी होता. त्याने आम्हा सर्वांचे त्याच्या घरी स्वागत केले आणि तीन दिवस आमचा चांगला पाहुणचार केला. पुब्ल्याचे वडील तापाने व हगवणीने आजारी होते. त्यामुळे अंथरुणाला खिळून होते. पौल त्या आजारी व्याक्तिला भेटायला गेला प्रार्थना करुन पौलाने आपला हात त्याच्यावर ठेवला आणि त्या मनुष्याला बरे केले. हे घडलेले पाहिल्यावर त्या बेटावरील इतर आजारी लोक पौलाकडे आले आणि बरे झाले.

10 त्यांनी आम्हांला सन्मानपूर्वक पुष्कळ वस्तू भेटीदाखल दिल्या. आणि जेव्हा आम्ही परत प्रवासाला निघालो तेव्हा आम्हांला लागणाऱ्या अनेक गोष्टी पुरविल्या.

पौल रोमला खाना होतो

11 आम्ही तेथे हिवाळ्यात राहिल्यावर आलेक्सांद्रा शहरातील एका जहाजातून पुढील प्रवासाला निघालो. ते जहाज त्या बेटावर हिवाळाभर मुक्कामाला होते. त्या जहाजाच्या समोरील बाजूस “जुळ्या देवाचे” [a] चिन्ह होते. 12 मग आम्ही सुराकूस येथे जाऊन पोहोंचलो आणि तेथे तीन दिवास राहिलो. 13 तेथून शिडे उभारुन आम्ही निघालो, आणि रेगियोन नगराला गेला. तेथे एक दिवस मुक्काम केला. नंतर दक्षिणेकडील वारा सुटल्यावर दुसऱ्या दिवशी पुत्युलास गेलो. 14 त्या शहरात आम्हांला काही बंधु (विश्वासणारे) आढळले. त्या बंधूंच्या सांगण्यावरुन आम्ही तेथे सात दिवस राहिलो. मग आम्ही रोम येथे जाऊन पोहोंचलो. 15 तेथील बंधुनी आमच्याबद्दलची वार्ता ऐकली होती. ते आमच्या भेटीसाठी अप्पीयाच्या बाजारपेठेपर्यंत आणि तीन धर्मशाळेपर्यंत आले. पौलाची त्यांची भेट झाल्यावर त्याने देवाचे उपकार मानले, व त्याला धीर आला.

रोम येथे पौल

16 आम्ही रोम येथे पोहोंचल्यावर पौलाला एकटे राहायला परवानगी मिळाली. परंतु त्याच्यावर देखरेख करण्यासाठी एक शिपाई ठेवण्यात आला.

17 तीन दिवसांनंतर पौलाने सर्व यहूदी पुढाऱ्यांना एकत्र बोलावले. जेव्हा सर्व जण जमा झाले तेव्हा पौल त्यांना म्हणाला, “बंधूंनो, आपल्या बांधवांविरुद्ध मी काहीही केलेले नाही. तरी मला यरुशलेम येथे पकडून रोमी लोकांच्या हाती कैदी म्हणून देण्यात आले. आणि 18 त्यांनी माझी चौकशी केली. तेव्हा त्यांची मला सोडून देण्याची इच्छा होती. कारण मरणदंडाला योग्य असा कोणताही गुन्हा मी केला नव्हता. 19 परंतु यहूदी लोकांनी जेव्हा माझ्या सुटकेला हरकत घेतली, तेव्हा कैसराकडे न्याय मागणे मला भाग पडले. याचा अर्थ असा नाही की, यहूदी लोकांविरुद्ध मला दोषारोप करण्याची इच्छा आहे. 20 या कारणासाठी तुम्हाला भेटण्याची आणि तुमच्याशी बोलण्याची मी इच्छा दाखविली. कारण इस्राएलाच्या आशेच्या निष्ठेमुळेच मी या साखळदंडानी जखडलो गेलो आहे.”

21 यहूदी पुढारी पौलाला म्हणाले, “आम्हांला तुमच्या बाबत यहूदीयाहून कसलेही पत्र आलेले नाही, अगर तिकडून येणाऱ्या बंधुजनांपैकी एकाही भावाने तुमच्याविषयी वाईट कळविले अथवा बोललेले नाही. 22 परंतु तुमची मते काय आहेत हे समजून घेण्याची आमची इच्छा आहे. कारण या गटाविरुद्ध (ख्रिस्ती गटाविरुद्ध) सगळीकडे लोक बोलतात हे आम्हांना माहीत आहे.”

23 तेव्हा (रोम शहरातील) यहूदी लोकांनी एक बैठकीचा दिवस ठरविला, जेथे पौल राहत होता, तेथे ते मोठ्या संख्येने जमा झाले. तेव्हा पौलाने त्यांना समजावून सांगितले आणि देवाच्या राज्यविषयी आपली साक्ष दिली. मोशेच्या नियमशास्त्रापासून आणि संदेष्ट्यांच्यापासून फोड करुन येशूविषयी त्यांची खात्री पटविण्याचा प्रयत्न केला. हे तो (पौल) सकाळपासून संध्याकाळपर्यंत करीत होता. 24 त्याने फोड करुन सांगितलेल्या गोष्टीविषयी काही जणांची खात्री पटली, तर काहींनी तो बोलत असलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही.

25 पौल पुढील एक गोष्ट बोलला, त्यावरुन मतभेद होऊन त्यांच्यापैकी काही जण उठले आणि तेथून जाऊ लागले, पौल म्हणाला, “यशया संदेष्टयांच्या द्वारे पवित्र आत्मा आपल्या वाडवडिलांशी जे बोलला, ते खरोखरच किती खरे आहे! यशया म्हणाला होता:

26 ‘या लोकांकडे (यहूदी) तुम्ही जा, आणि त्यांना सांगा:
तुम्ही ऐकाल तर खरे
    पण तुम्हांला समजणार नाही.
तुम्ही पहाल तुम्हाला दिसेल
    पण तुम्ही काय पाहात ते तुम्हाला कळणार नाही.
27 कारण या लोकांचे विचार मंद झाले आहेत
    त्याच्या कानांनी त्यांना ऐकू येत नाही.
    आणि त्यांनी आपले डोळे बंद केले आहेत नाही
तर त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले असते
    आणि आपल्या कानांनी ऐकले असते आणि माझ्याकडे वळाले
असते आणि मी त्यांना बरे केले असते.’ (A)

28 “म्हणून देवाचे हे तारण यहूदीतर विदेशी लोकांकडे पाठविण्यात आले आहे. हे तुम्हा यहूदी लोकांना कळावे. ते ऐकतील.” 29 [b]

30 पूर्ण दोन वर्षे तो त्याच्या भाड्याच्या घरात राहिला. जे त्याला भेटायला येत, त्यांचे तो स्वागत करी. 31 त्याने देवाच्या राज्याविषयी प्रचार केला. त्याने प्रभु येशूविषयी शिक्षण दिले. तो हे काम फार धैर्याने करीत असे. आणि कोणीही त्याला बोलण्यात अडवू शकले नाही.

स्तोत्रसंहिता 9:1-12

प्रमुक गायकासाठी मूथ लाब्येन या सुरावर बसवलेले दावीदाचे स्तोत्र.

मी अगदी मनापासून परमेश्वराची स्तुती करतो.
    परमेश्वरा, तू ज्या अद्भुत गोष्टी केल्या आहेस त्याबद्दल मी सांगेन.
तू मला खूप सुखी करतोस. सर्वशक्तिमान देवा,
    मी तुझ्या नामाचा महिमा गातो.
माझे शत्रू तुझ्यापासून दूर जाण्यासाठी पळाले.
    परंतु ते पडले आणि त्यांचा नाश झाला.

तू सगळ्यात न्यायी आहेस तू तुझ्या सिंहासनावर न्यायाधीश म्हणून बसलास.
    परमेश्वरा, तू माझे गाऱ्हाणे ऐकलेस आणि तू माझा न्यायनिवाडा केलास.
तू दुसऱ्या लोकांवर टीका केलीस.
    परमेश्वरा, तू त्यांचा नाश केलास.
    तू त्यांची नावे जिवंत माणसांच्या यादीतून कायमची पुसून टाकलीस.
शत्रूचा निपात झाला परमेश्वरा, तू त्यांच्या शहरांचा नाश केलास.
    आता केवळ पडकी घरे उभी आहेत
    त्या दुष्ट लोकांच्या आठवणी खातर आता काहीही शिल्लक उरले नाही.

परंतु परमेश्वर अनंत काळ राज्य करतो.
    त्याने त्याचे राज्य सामर्थ्यवान बनवले आहे, हे त्याने जगात न्यायव्यवस्था यावी म्हणून केले.
परमेश्वर पृथ्वीवरील सर्वांनाच न्यायाने वागवतो
    आणि सर्व देशांनाही तो एकाच मापाने तोलतो.
खूप लोक सापळ्यात अडकले
    आणि दुखी झाले कारण त्यांच्या पुढे असंख्य संकटे होती.
संकटांच्या ओझ्याखाली ते लोक चेंगरले गेले आहेत.
    परमेश्वरा, त्यांना आश्रय देणारी एक चांगली जागा तू बन.

10 ज्या लोकांना तुझे नाव माहीत आहे
    ते तुझ्यावर विश्वास ठेवतात.
परमेश्वरा, जर लोक तुझ्याकडे आले,
    तर त्यांना मदत केल्याशिवाय परत पाठवू नकोस.

11 सीयोनमध्ये राहाणाऱ्या लोकांनो, तुम्ही परमेश्वराची स्तुती करा.
    परमेश्वराने ज्या महान गोष्टी केल्या त्याबद्दल इतर देशांना सांगा.
12 जे परमेश्वराकडे मदतीसाठी गेले [a]
    त्यांची आठवण त्याने ठेवली
त्या गरीब लोकांनी मदतीची याचना केली
    आणि परमेश्वर त्यांना विसरला नाही.

नीतिसूत्रे 19:1-3

19 गरीब आणि प्रामाणिक असणे हे खोटे बोलणारा आणि लोकांना फसवणारा मूर्ख माणूस असण्यापेक्षा चांगले असते.

काही गोष्टींविषयी खूप उत्साह दाखविणे एवढेच पुरेसे नसते. तुम्ही काय करीत आहात ते तुम्हाला कळले पाहिजे. एखादी गोष्ट करण्यासाठी एकदम् पुढे घुसू नये, नाही तर तुम्ही ती चुकीची कराल.

माणसाचा स्वतःचा मूर्खपणा त्याच्या आयुष्याचा नाश करतो पण तो दोष मात्र परमेश्वराला देतो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center