Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी यदूथून सुरावर आधारलेले आसाफाचे स्तोत्र.
77 मी देवाला मदतीसाठी जोरात हाक मारली,
देवा मी तुझी प्रार्थना करतो. माझ्याकडे लक्ष दे.
2 माझ्या प्रभु, मी संकटात असतो तेव्हा तुझ्याकडे येतो.
मी रात्रभर तुझ्यापर्यंत पोहोंचण्याचा प्रयत्न केला.
माझ्या आत्म्याने शांत व्हायला नकार दिला.
11 परमेश्वराने काय केले ते मला आठवते आहे.
देवा, खूप पूर्वी तू ज्या अद्भूत गोष्टी केल्यास त्या मला आठवतात.
12 तू केलेल्या गोष्टींचा मी विचार केला.
मी त्या गोष्टींबद्दल विचार केला.
13 देवा, तुझे मार्ग पवित्र आहेत,
देवा, तुझ्यासारखा महान कोणीही नाही.
14 अद्भुत गोष्टी करणारा देव तूच आहेस.
तू लोकांना तुझी महान शक्ती दाखवलीस.
15 तू तुझ्या शक्तीने लोकांना वाचवलेस.
तू याकोबाच्या आणि योसेफाच्या वंशजांना वाचवलेस.
16 देवा, पाण्याने तुला पाहिले आणि ते घाबरले,
खोल पाणी भयाने थरथरले.
17 दाट ढगांनी पाणी खाली सोडले,
लोकांनी वरच्या उंच ढगातला गडगडाट ऐकला.
नंतर तुझे विजांचे बाण ढगातून चमकू लागले.
18 तिथे ढगांचा भयानक गडगडाट होत होता.
विजांनी जगाला प्रकाशमय केले होते.
पृथ्वी हलली आणि थरथरली.
19 देवा, तू खोल पाण्यातून चाललास.
तू खोल समुद्र ओलांडलास, पण तुझे पाऊल कुठेही उमटले नाही.
20 तू मोशेच्या आणि अहरोनच्या मदतीने
तुझ्या माणसांना मेंढ्यांप्रमाणे मार्गदर्शन केलेस.
13 अहज्याने तिसऱ्या सरदाराला पन्नास जणांसह पाठवले. तो ही सरदार आपल्या बरोबरच्या लोकांसह एलीयाकडे आला. हा सरदार गुडघे टेकून बसला आणि एलीयाची त्याने विनवणी केली. तो म्हणाला, “हे देवाच्या माणसा, मी आणि माझ्याबरोबरचे हे पन्नासजण यांच्या प्राणांचे मोल तू जाणावेस. 14 आधीचे दोन सरदार आणि त्यांच्या बरोबरची पन्नास पन्नास माणसे आकाशातून आलेल्या अग्नीत नष्ट झाली. पण आता आमच्यावर दया कर आणि आम्हाला जीवदान दे.”
15 तेव्हा परमेश्वराचा दूत एलीयाला म्हणाला, “या सरदाराबरोबर जा व त्याला भिऊ नकोस.”
तेव्हा एलीया त्या सरदाराबरोबर राजा अहज्याला भेटायला गेला.
16 एलीया अहज्याला म्हणाला, “इस्राएलचा देव परमेश्वर आहे. तरी तू एक्रोनच्या बाल-जबूबकडे माणसे का पाठवलीस? तू असे केलेस म्हणून तू आता अंथरुणावरुन उठणार नाहीस. तुला मरण येईल.”
अहज्याच्या जागी यहोराम
17 अहज्या मरण पावला. परमेश्वराने एलीयाला सांगितले होते तसेच झाले. अहज्याला मुलगा नव्हता. तेव्हा अहज्यानंतर यहोराम राजा झाला. यहोशाफाटचा मुलगा यहोराम यहूदावर राज्य करत असताना दुसऱ्या वर्षी हा यहोराम राज्य करु लागला.
18 इस्राएलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात अहज्या ने केलेली बाकीची कृत्ये लिहिलेली आहेत.
3 तेव्हा संदेष्ट्यांचा बेथेलमधला एक गट अलीशाला येऊन भेटला. आणि म्हणाला, “आज तुझ्या स्वामीला परमेश्वर घेऊन जाणार आहे हे तुला माहीत आहे ना?”
अलीशा म्हणाला, “होय, मला माहीत आहे, पण ह्या विषयासबंधी बोलू नका”
4 एलीया अलीशाला म्हणाला, “तू येथेच थांब, कारण परमेश्वराने मला यरीहो येथे जायला सांगितले आहे.”
पण अलीशा म्हणाला, “परमेश्वराची शपथ, मी तुम्हाला सोडून राहणार नाही.” तेव्हा ते दोघे यरीहोला गेले.
5 तेव्हा यरीहोचे संदेष्टे अलीशाकडे आले आणि म्हणाले, “परमेश्वर तुझ्या स्वामीला आज घेऊन जाणार आहे हे तुला माहीत आहे का?”
अलीशा म्हणाला, “हो, मला कल्पना आहे, पण त्याबद्दल आता बोलू नका.”
21 तेव्हा ताकीद देऊन त्याने त्यांना सूचना दिली की, हे कोणालाही सांगू नका.
येशू म्हणतो की त्याने मेलेच पाहिजे(A)
22 येशू म्हणाला, “मनुष्याच्या पुत्राला पुष्कळ दु:ख सोसणे आवश्यक आहे, आणि वडिलांनी, मुख्य याजकांनी, नियमशास्त्राचे शिक्षक यांनी नाकारावे व त्यांच्याकडून मारले जावे व पुन्हा तिसऱ्या दिवशी उठावे हे आवश्यक आहे.”
23 नंतर तो त्या सर्वांना म्हणाला, “जर कोणा व्यक्तीला माझ्या मागे यायचे असेल तर त्याने स्वतःला नाकारले पाहिजे. व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून माझ्या मागे आले पाहिजे. 24 जो कोणी स्वतःचा जीव वाचवू पाहतो, तो त्याला मुकेल, पण जो कोणी माझ्यासाठी जिवाला मुकेल तो त्याला बाचवील. 25 कोणी सर्व जग मिळविले परंतु स्वतःचा नाश करुन घेतला किंवा स्वतःला गमाविले तर त्याला काय लाभ? 26 जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरतो तर मनुष्याचा पुत्र जेव्हा त्याच्या वैभवाने, पित्याच्या आणि पवित्र दूतांच्या गौरवाने येईल तेव्हा तोही त्याची लाज धरील. 27 परंतु मी तुम्हांला खरे सांगतो येथे उभे राहिलेल्यांमध्ये असे काही आहेत की, स्वार्गाचे राज्य पाहिल्याशिवाय त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.”
2006 by World Bible Translation Center