Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 48

एक गाणे कोरहाच्या मुलांचे स्तोत्र

48 परमेश्वर थोर आहे आपल्या देवाच्या शहरात,
    त्याच्या पवित्र पर्वतावर लोक त्याची स्तुति करतात.
देवाचे पवित्र शहर सुंदर आहे.
    त्याचे सौंदर्य सर्व पृथ्वीवर आनंद आणते
सियोन पर्वत सगळ्यात उंच आणि पवित्र पर्वत आहे.
    हे त्या महान राजाचे शहर आहे.
इथे त्या शहराच्या राजवाड्यांत
    देवाला किल्ला म्हणतात.
एकदा काही राजे भेटले.
    त्यांनी या शहरावर हल्ला करायची योजना आखली
ते सगळे चालून आले.
    त्यांनी पाहिले आणि ते विस्मित झाले.
    ते घाबरले आणि पळत सुटले.
भयाने त्यांना घेरले,
    भीतीने त्यांचा थरकाप झाला.
देवा, तू पूर्वेकडच्या जोरदार वाऱ्याचा उपयोग केलास
    आणि त्यांची मोठी जहाजे मोडलीस.
होय, आम्ही ती गोष्ट ऐकली पण आम्ही ते सर्वशक्तिमान परमेश्वराच्या शहरात,
    आमच्या देवाच्या शहरात घडत असलेले पाहिले.
देव ते शहर सदैव सामर्थ्यवान बनवतो.

देवा, आम्ही तुझ्या मंदिरात तुझ्या प्रेमळ दयेचा लक्षपूर्वक विचार करतो.
10 देवा तू प्रसिध्द आहेस.
    पृथ्वीवर सगळीकडे लोक तुझी स्तुती करतात
    तू किती चांगला आहेस ते प्रत्येकाला माहीत आहे.
11 देवा, सियोन पर्वत आनंदी आहे
    यहूदाची शहरे तुझ्या चांगल्या निर्णयामुळे उल्हासित झाली आहेत.
12 सियोन भोवती फिरा,
    शहर बघा, बुरुज मोजा.
13 उंच भिंती बघा, सियोनच्या राजवाड्याचे कौतुक करा.
    नंतर तुम्ही पुढच्या पिढीला त्याबद्दल सांगू शकाल.
14 देव खरोखरच नेहमी आपला देव असेल.
    तो आपल्याला सदैव मार्गदर्शन करेल.

योएल 2:18-29

परमेश्वर देश पुन्हा उभा करील

18 मग, देशासाठी, परमेश्वराच्या भावना उत्तेजित झाल्या.
    त्याला, त्याच्या लोकांबद्दल वाईट वाटले.
19 परमेश्वर त्याच्या लोकांशी बोलला.
तो म्हणाला, “मी तुमच्याकडे पुन्हा धान्य, द्राक्षरस आणि तेल पाठवीन.
    तुम्ही तृप्त व्हाल.
    ह्यापुढे, इतर राष्ट्रांत तुमची अप्रतिष्ठा मी होऊ देणार नाही.
20 मी उत्तरे [a] कडून आलेल्या लोकांना तुमचा देश सोडायला भाग पाडीन.
    मी त्यांना रूक्ष आणि ओसाड देशात जायला लावीन.
त्यातील काही पूर्व समुद्राकडे जातील.
    तर काही पश्चिम समुद्राकडे जातील.
त्या लोकांनी फारच भयंकर कृत्ये केली आहेत.
    ते मृतांप्रमाणे व सडलेल्या गोष्टींसारखे होतील.
तेथे भयंकर दुर्गधी पसरेल.”

देश पुन्हा नव्याने घडविला जाईल

21 हे भूमी, घाबरू नकोस.
    सुखी आणि हर्षाल्लासित हो!
    कारण परमेश्वर महान गोष्टी घडवून आणणार आहे.
22 रानातल्या प्राण्यानो, घाबरू नका.
    कारण वाळवंटातील कुरणांत हिरवळ उगवेल,
झाडांना फळे लागतील.
    अंजिराची झाडे व द्राक्षवेली फळांनी लगडतील.

23 म्हणून सियोनवासीयांनो, आनंदित व्हा.
    तुमच्या परमेश्वर देवामध्ये संतोष माना.
तो कृपावंत होऊन, पाऊस देईल.
    तो पूर्वाप्रमाणेच, आगोटीचा व वळवाचा पाऊस पाडील.
24 खळी गव्हाने भरून जातील,
    आणि पिंपे द्राक्षरसाने व जैतुनच्या तेलाने भरून वाहतील.
25 “मी, परमेश्वराने, माझे सैन्य तुमच्याविरुध्द पाठविले.
    तुमचे जे काही होते ते,
    नाकतोडे, टोळ, कुसरूड
    व घुले यांनी खाल्ले. [b]
पण, मी, परमेश्वर,
    तुमच्या संकटांच्या वर्षाची भरपाई करीन.
26 मग तुम्हाला भरपूर खायला मिळेल.
    तुम्ही तृप्त व्हाल.
तुम्ही, तुमच्या परमेश्वर देवाची, स्तुती कराल.
    त्याने तुमच्यासाठी आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत.
माझ्या लोकांना पुन्हा कधीही लज्जित व्हावे लागणार नाही.
27 मी इस्राएलच्या बाजूने आहे हे तुम्हाला समजेल.
मीच परमेश्वर म्हणजे तुमचा देव आहे,
    हेही तुम्हाला कळून येईल.
    माझ्याशिवाय दुसरा कोणताच परमेश्वर नाही.
माझ्या लोकांना पुन्हा कधीही लज्जित व्हावे लागणार नाही.”

परमेश्वर, स्वतःचा आत्मा सर्व लोकांत घालण्याचे वचन देतो

28 “ह्यांनंतर मी
    माझा आत्मा सर्व लोकांत ओतीन (घालीन).
तुमची मुले-मुली भविष्य सांगतील
    तुमच्यातील वृध्द स्वप्न पाहतील.
    तुमच्यातील तरूणांना दृष्टांन्त होतील.
29 त्या वेळी, मी माझा आत्मा
    पुरूष व स्त्री सेवकांमध्येसुध्दा ओतीन.

1 करिंथकरांस 2:1-11

ख्रिस्ताविषयीचा वधस्तंभावरील संदेश

म्हणून बंधूनो, जेव्हा मी तुमच्याकडे आलो, तेव्हा मी देवाचे रहस्यमय सत्य मानवी ज्ञानाने किंवा वक्तृत्वकलेने सांगण्यासाठी आलो नाही. कारण तुमच्यामध्ये असताना फक्त येशू ख्रिस्त आणि तोही वधस्तंभावर खिळलेला याशिवाय कशाचेही ज्ञान असू नये असा मी निश्र्च्य केला आहे. तेव्हा मी तुमच्याकडे अशक्तपणाने, भीतियुक्त असा व थर थर कापत आलो आहे. माझे भाषण व संदेश हे मन वळविणाऱ्या मानवी ज्ञानाद्वारे दिलेले नव्हते, ते आत्मा आणि सामर्थ्य यांचा पुरावा असलेले होते. यासाठी की, तुमचा विश्वास मानवी ज्ञानावर नव्हे तर देवाच्या सामर्थ्यवर असावा.

देवाचे ज्ञान

परंतु जे प्रौढ आहेत त्यांना आम्ही ज्ञान देतो. या युगाच्या अधिकाऱ्यांना नव्हे, ज्यांचा शेवट करण्यासाठी आणण्यात येत आहे. त्याऐवजी, जे लपविलेले आहे, आणि हे युग सुरु होण्यापूर्वी देवाने आमच्या गौरवासाठी नेमले होते ते देवाचे रहस्यमय ज्ञान देतो. जे या युगाच्या कोणाही सत्ताधीशाला माहीत नव्हते, कारण जर त्यांना कळले असते, तर त्यांनी गौरवी प्रभूला वधस्तंभावर खिळले नसते. परंतु ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र म्हणते,

“डोळ्यांनी पाहिले नाही,
    कानांनी ऐकले नाही,
आणि मनुष्याच्या अंतःकरणाने जे उपजविले नाही,
    ते देवाने त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी तयार केले आहे.” (A)

10 परंतु देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपणांस प्रकट केले आहे.

कारण आत्मा हा प्रत्येक गोष्टीचा शौध घेतो, एवढेच नव्हे तर तो देवाच्या सखोलतेच्या गुप्ततेचाही शोध घेतो. 11 कारण मनुष्याच्या आत्म्याशिवाय त्या मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा दुसरा कोण मनुष्य आहे? याप्रमाणेच देवाच्या आत्म्याशिवाय देवाचे विचार कोणीच ओळखू शकत नाही.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center