Revised Common Lectionary (Semicontinuous)
भाग दुसरा
(स्त्रोतसंहिता 42-72)
प्रमुख गायकासाठी कोरहाच्या कुटूंबाकडून मास्कील
42 हरणाला झऱ्याच्या पाण्याची तहान लागते.
त्याचप्रमाणे देवा माझा आत्मा तुझ्यासाठी तहानेला आहे.
2 माझा आत्मा जिवंत देवासाठी तहानेला आहे.
मी त्याला भेटायला केव्हा जाऊ शकेन?
3 रात्रंदिवस माझे अश्रूच माझे अन्न झाले आहे.
सर्व वेळ माझा शत्रू थट्टा करुन म्हणत आहे, “कुठे आहे तुझा देव?”
4 म्हणून मला या सर्व गोष्टी आठवू दे.
मला माझे मन रिकामे करु दे.
जमावाला मी देवाच्या मंदिरापर्यत नेल्याची मला आठवण आहे.
खूप लोकांबरोबर स्तुतीचे आनंदी गाणे गाऊन
सण साजरा केल्याची मला आठवण आहे.
5-6 मी दु:खी का व्हावे?
मी इतके का तळमळावे?
मी देवाकडून मदतीसाठी थांबले पाहीजे.
त्याची स्तुती करण्याची मला पुन्हा संधी मिळेल.
तो मला वाचवेल!
देवा, मी खूप दु:खी आहे म्हणूनच मी तुला बोलावले.
मी यार्देनच्या दरीपासून हर्मोनच्या डोंगरावर आणि मिसहारच्या टेकडीवर गेलो.
7 या समुद्रापासून त्या समुद्रापर्यंत मी तुझ्या लाटांचा आपटण्याचा आवाज ऐकला.
समुद्रातल्या लाटांसारखी संकटे माझ्यावर पुन्हा कोसळली,
परमेश्वरा तुझ्या लाटा माझ्यावर चहु बाजूंनी आदळत आहेत.
तुझ्या लाटांनी मला पूर्णपणे झाकले आहे.
8 दररोज व रात्रीही परमेश्वर त्याचे खरे प्रेम दाखवतो म्हणून
माझ्याजवळ त्याच्यासाठी एक गीत आहे व एक प्रार्थना आहे.
9 मी देवाशी माझ्या खडकाशी बोलतो मी म्हणतो,
“परमेश्वरा, तू मला का विसरलास?
माझ्या शत्रूच्या क्रूरतेमुळे मी इतके दु:ख का सहन करावे?”
10 माझ्या शत्रूंनी मला मारण्याचा प्रयत्न केला, “तुझा देव कुठे आहे?”
असे जेव्हा ते मला विचारतात तेव्हा ते माझा तिरस्कार करत आहेत असे दाखवतात.
11 मी इतका दु:खी का आहे?
मी इतका खिन्न का आहे?
मी देवाच्या मदतीची वाट बघितली पाहिजे.
त्याची स्तुती करण्याची संधी मला पुन्हा मिळेल.
तो मला वाचवेल.
43 देवा तुला न अनुसरणारा एक माणूस इथे आहे.
तो कपटी आहे आणि तो खोटे बोलतो देवा मी बरोबर आहे हे सिध्द कर.
माझा बचाव कर.
मला त्या माणसापासून वाचव.
2 देवा, तू माझे सुरक्षित स्थान आहेस
तू मला का सोडलेस?
माझ्या शत्रूंपासून कशी सुटका करायची ते
तू मला का दाखवले नाहीस?
3 देवा, तुझा प्रकाश आणि सत्य माझ्यावर उजळू दे तुझा प्रकाश आणि सत्य मला मार्ग दाखवेल.
ते मला तुझ्या पवित्र डोंगराकडे नेतील.
ते मला तुझ्या घराकडे नेतील.
4 मी देवाच्या वेदीजवळ जाईन
मला अत्यंत सुखी करणाऱ्या देवाकडे मी येईन.
देवा, माझ्या देवा मी तुझी वीणा वाजवून स्तुती करीन.
5 मी इतका खिन्न का आहे?
मी इतका का तळमळतो आहे?
मी देवाच्या मदतीची वाट पहायला हवी.
मला देवाची स्तुती करायची आणखी संधी मिळेल.
तो मला वाचवेल.
14 “एखाद्यावर संकट आले तर त्याच्या मित्रांनी त्याला दया दाखवावी
आणि आपला मित्र सर्वशक्तीमान देवापासून दूर गेला तरी माणसाने मित्राशी निष्ठा ठेवली पाहिजे.
15 पण मित्रांनो, तुम्ही मात्र निष्ठावान नाही.
मी तुमच्यावर विसंबून राहू शकत नाही.
जे कधी वाहतात, कधी वाहात नाहीत अशा ओढ्यासारखे तुम्ही आहात. ओढे जेव्हा हिमाने आणि
16 वितळणाऱ्या बर्फाने गच्च होतात व दुथडी भरुन वाहू लागतात तसे तुम्ही आहात.
17 जेव्हा हवामान उष्ण आणि कोरडे होते
तेव्हा पाणी वाहात नाही
आणि ओढे नाहीसे होतात.
18 व्यापारी त्याची नागमोडी वळणे शोधत वाळवंटात जातात
परंतु ते दिसेनासे झालेले असतात.
19 तेमाच्या व्यापाऱ्यांनी पाणी शोधले.
शबाच्या प्रवाशांनी आशेने त्याचा शोध घेतला.
20 त्यांना पाणी सापडण्याची खात्री होती
परंतु त्यांची निराशा झाली.
21 आता तुम्ही त्या ओढ्यासारखे आहात.
तुम्ही माझ्या संकटांना पाहून घाबरता.
22 मी तुम्हाला मदत मागितली का?
नाही. पण तुम्ही आपणहून मला उपदेश केला.
23 ‘माझे शत्रूपासून रक्षण करा!
क्रूर लोकांपासून मला वाचवा!’
असे मी तुम्हाला म्हटले का?
24 “आता तुम्ही मला शिकवा म्हणजे मी शांत होईन.
माझी काय चूक झाली ते मला दाखवा.
25 प्रामाणिक शब्द नेहमीच सामर्थ्यशाली असतात.
परंतु तुमचे वादविवाद काहीच सिध्द करु शकत नाहीत.
26 माझ्यावर टीका करण्याचा तुमचा उद्देश आहे का?
तुम्ही आणखी कंटाळवाणे बोलणार आहात का?
27 पोरक्या मुलांच्या वस्तू जिंकून घेण्यासाठी
तुम्ही जुगार खेळायलाही तयार आहात.
तुम्ही तुमच्या मित्रालाही विकून टाकाल.
28 पण आता माझ्याकडे लक्षपूर्वक पाहा.
मी तुमच्याशी खोटे बोलणार नाही.
29 तुम्ही आता तुमचा विचार बदला, अन्यायी होऊ नका.
पुन्हा विचार करा.
मी काहीही चूक केलेली नाही.
30 मी खोटे बोलत नाही
आणि खऱ्या-खोट्यातला फरक मला कळतो.”
नियमशास्त्र आणि अभिवचन
15 बंधूंनो, मी तुम्हांला रोजच्या जीवनातील उदाहरण देतो. ज्याप्रमाणे मनुष्यांनी केलेला करार कोणीही रद्द करत नाही किंवा त्यात भर घलीत नाही. याबाबतीतसुद्धा तसेच आहे. 16 अब्राहामाला व त्याच्या वंशजांना अभिवचने दिलेली होती. लक्षात घ्या की, ते “आणि त्याच्या वंशजांना” असे अनेकजणांसांबंधी म्हणत नाही, तर जसे काय ते एका व्यक्तीला म्हणते, “आणि तुझ्या संतानाला” (आणि तो वंशज) ख्रिस्त आहे. 17 माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की, देवाने अगोदर निश्चित केलेला करार चारशे तीस वर्षे उशिरा आलेल्या नियमशास्त्राने अभिवचन रद्द करण्यास केला नव्हता.
18 कारण वतन जर नियमशास्त्रावर अवलंबून होते, तर येथून पुढे ते अभिवचनावर अवलंबून असणार नाही. परंतु देवाने अभिवचनामुळे अब्राहामाला मुक्तपणे हे वतन दिले.
19 तर मग, नियमशास्त्राचा उद्देश काय होता? ज्या संतानाला वचन दिले होते त्याच्या येण्यापर्यंत पापामुळे ते अभिवचनाला जोडण्यात आले होते. नियमशास्त्र हे देवदूताकरवी मोशे या मध्यस्थाच्या होती देण्यात आले. 20 आता मध्यस्थ हा फक्तएकाच पक्षाचा नसतो. पण देव एकच आहे आणि त्याची अभिवचने दुसऱ्या पक्षावर अवलंबून नाहीत.
मोशेच्या नियमशास्त्राचा हेतु
21 नियमशास्त्र हे देवाच्या अभिवचनाविरुद्ध आहे, असा याचा अर्थ होतो का? अर्थातच नाही! कारण लोकांना जीवन आणण्यासाठी जर नियमशास्त्र देण्यात आले असेल, तर मग नीतिमत्त्व त्याच नियमशास्त्राद्वारे येईल. 22 पण पवित्र शास्त्राने स्पष्ट केले आहे की, संपूर्ण जग ह पापाच्या सामर्थ्याने जखडून टाकले होते, यासाठी की, जे अभिवचन देण्यात आले होते ते जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, त्यांना देण्यात यावे.
2006 by World Bible Translation Center