Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाचे एक स्तोत्र.
32 ज्याच्या अपराधांची क्षमा केली गेली
आहे तो अत्यंत सुखी आहे
ज्याचे अपराध पुसले गेले आहेत तो फार सुखी आहे.
2 परमेश्वर ज्याला निरपराध म्हणतो तो सुखी आहे.
जो स्वत:चे गुप्त अपराध लपवीत नाही तो सुखी आहे.
3 देवा, मी पुन्हा पुन्हा तुझी प्रार्थना केली
परंतु माझ्या गुप्त अपराधांची वाच्यता केली नाही
प्रत्येक प्रार्थनेच्या वेळी मी क्षीण होत गेलो.
4 देवा, रात्रंदिवस तू माझे आयुष्य अधिक बिकट करीत गेलास,
मी उष्ण उन्हाळी दिवसांतील जमिनीसारखा शुष्क होत गेलो.
5 परंतु नंतर मी परमेश्वरा पुढे माझे अपराध कबूल करण्याचा निर्णय घेतला.
परमेश्वरा, मी तुला माझे अपराध सांगितले.
आणि तू मला माझ्या सर्व अपराधांबद्दल क्षमा केलीस.
6 याच कारणासाठी देवा तुझ्या सर्व भक्तांनी तुझी प्रार्थना करायला हवी.
संकटे जेव्हा महापुरासारखी येतात तेव्हा ती तुझ्या भक्तांपर्यंत नक्कीच जाणार नाहीत.
7 देवा, तू माझी लपण्याची जागा आहेस.
तू माझे माझ्या संकटांपासून रक्षण करतोस
तू माझ्या भोवती कडे करतोस आणि माझे रक्षण करतोस
म्हणून मी तू मला कसे वाचवलेस त्याचे गाणे गातो.
8 परमेश्वर म्हणतो, “मी तुला आयुष्य कसे जगायचे
या विषयी मार्गदर्शन करीन.
मी तुझे रक्षण करीन आणि तुझा मार्गदर्शक होईन.
9 म्हणून घोड्यासारखा वा गाढवासारखा मूर्ख होऊ नकोस, त्या प्राण्यांना आवरण्यासाठी लगाम वापरायलाच हवा.
या गोष्टीशिवाय ते प्राणी तुमच्या जवळ येणार नाहीत.”
10 वाईट लोकांना खूप दु:ख भोगावे लागेल,
परंतु जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात त्यांच्या भोवती देवाच्या खऱ्या प्रेमाचे कडे आहे.
11 चांगल्या लोकांनो! परमेश्वराच्या ठायी आपला आनंद व सुख व्यक्त करा.
शुध्द मनाच्या सर्व लोकांनो आनंदी व्हा!
14 सर्व इस्राएल लोकांच्या मनात त्या दिवशी परमेश्वराने यहोशवाबद्दल थोर असे महत्व बिंबवले. तेव्हापासून पुढे त्याचे आयुष्य असेपर्यंत त्यांनी मोशे प्रमाणेच यहोशवाविषयी आदर बाळगला.
15 याजक तो कोश घेऊन नदीच्या पात्रात उभे असताना परमेश्वर यहोशवाला म्हणाला, 16 “याजकांना नदीतून बाहेर यायला सांग.”
17 त्याप्रमाणे यहोशवाने याजकांना यार्देनबाहेर येण्याची आज्ञा केली.
18 यहोशवाचे ऐकून याजक करारकोश घेऊन नदीच्या पात्रातून बाहेर आले. याजकांचे पाय जमिनीला लागताच पाणी पुन्हा पूर्ववत वाहू लागले. नदी पुन्हा पहिल्यासारखी दुथडी भरून वाहू लागली.
19 पहिल्या महिन्याच्या दहाव्या दिवशी नदी ओलांडून लोकांनी यरीहोच्या पूर्वेकडील गिलगाल येथे तळ दिला. 20 नदीतून उचललेले बारा दगड त्यांनी आणले होतेच. ते यहोशवाने गिलगाल येथे रचून ठेवले. 21 यहोशवा म्हणाला, “‘या दगडांचे महत्व काय? ते येथे कशासाठी?’ असे उद्या तुमची मुले तुम्हाला विचारतील. 22 तेव्हा त्यांना सांगा, ‘यार्देन नदीच्या कोरडचा पात्रातून इस्राएल लोक कसे आले त्याची ही आठवण आहे.’ 23 तेव्हा तुमच्या परमेश्वर देवाने नदीचा प्रवाह रोखला होता. आम्ही तांबडा समुद्र ओलांडला त्यावेळी झाले तसेच येथेही लोकांनी नदी ओलांडेपर्यंत नदीचे पात्र कोरडे होते. तांबडा समुद्रही परमेश्वराने असाच आटवला होता. 24 आपला परमेश्वर अतिशय प्रतापी आहे हे जाणून येथील लोकांना त्याचा धाक वाटावा म्हणून तुमच्या परमेश्वर देवाने असे केले.”
6 म्हणून आम्हांला नेहमीच विश्वास असतो आणि माहीत असते की, जोपर्यंत आम्ही या शरीरात राहत आहोत, तोपर्यंत आम्ही प्रभुपासून दूर आहोत. 7 आम्ही विश्वासाने जगतो, जे बघतो त्याने 8 आम्हांला विश्वास आहे, मी म्हणतो, आणि शरीरापासून दूर राहण्याचे आम्ही पसंत करु. आणि प्रभुसंगती राहू. 9 म्हणून त्याला संतोषविणे हे आम्ही आमचे ध्येय करतो, आम्ही शरीराने जगत असलो किंवा प्रभुपासून दूर असलो तरी. 10 कारण आम्हांला सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर उभे राहायचे आहे. आणि प्रत्येकाला त्याचे जे प्रतिफळ मिळणार आहे. म्हणजे शरीरात असताना ज्या वाईट किंवा चांगल्या गोष्टी केल्या त्याप्रमाणे बक्षिस मिळेल.
देवाचे मित्र होण्यासाठी लोकांना मदत करणे
11 म्हणून आम्ही जाणतो की देवाचे भय कशासाठी धरायचे व त्यासाठी आम्ही मनुष्यांना वळविण्याचे प्रयत्न करतो. आम्ही जे आहोत ते देवासमोर स्पष्ट आहोत. आणि माझी आशा आहे की, तुमची सद्विवेकबुध्दि आम्हांला जाणते. 12 आम्ही तुमच्यासमोर आमची पात्रता पुन्हा एकदा सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत नाही. पण आमच्याविषयी तुम्ही अभिमान बाळगावा यासाठी संधी देत आहोत, यासाठी की तुम्ही अशांना उत्तर द्यावे की जे पाहिलेल्या गोष्टीविषयी अभिमान बाळगतात आणि अंतःकरणात जे आहे त्याविषयी बाळगत नाहीत. 13 जरी आम्ही वेडे असलो तरी ते ख्रिस्तासाठी, जर आम्ही आमच्या योग्य मनःस्थितीत असलो तर ते तुमच्यासाठी. 14 कारण ख्रिस्ताचे प्रेम आम्हाला भाग पाडते, कारण आमची खात्री झाली आहे की, जर एक सर्वांसाठी मेला आणि म्हणून सर्व मेले. 15 आणि तो सर्वांसाठी मेला, यासाठी की जे जगतात त्यांनी स्वतःसाठीच जगू नये तर जो त्यांच्यासाठी मेला व पुन्हा उठला त्याच्यासाठी जगावे.
2006 by World Bible Translation Center