Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NLT. Switch to the NLT to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
यहोशवा 7:16-9:2

16 दुसऱ्या दिवशी पहाटे यहोशवाने सर्व इस्राएल लोकांना परमेश्वरासमोर आणले. सर्व वंशांचे लोक परमेश्वरापुढे उभे राहिले. परमेश्वराने यहूदाच्या वंशाची निवड केली. 17 तेव्हा यहूदाचे एकेक कूळ परमेश्वरापुढे हजर झाले. त्यातून परमेश्वराने जेरहाचे कूळ निवडले. जेरहाच्या कुळातील सर्व कुटुंबे परमेश्वरापुढे आली तेव्हा झिम्रीचे कुटुंब पकडले गेले. 18 मग यहोशवाने या कुटुंबातील सर्व पुरूषांना परमेश्वरापुढे हजर व्हायला सांगितले. परमेश्वराने कर्मीचा मुलगा आखान याला पकडले (कर्मी झिम्रीचा मुलगा झिम्री जेरहाचा)

19 मग यहोशवा आखानला म्हणाला, “मुला, आता प्रार्थना कर. इस्राएलांच्या परमेश्वर देवाचा मान राखून आपली पापे त्याच्यापुढे कबूल कर. आता काहीही लपवून न ठेवता तू काय केलेस ते मला सांग.”

20 आखान म्हणाला, “हे खरे आहे. इस्राएलच्या परमेश्वर देवाविरूध्द वागून मी पाप केले आहे. मी केले ते असे. 21 यरीहो नगर आणि त्यातील सर्व मालमत्ता काबीज केल्यावर मी एक सुंदर शिनारी (बबिलोनियन) अंगरखा, अंदाजे पाच पौंड चांदी आणि जवळपास एक पौड सोन्याची वीट पाहिली. त्याचा मला मोह पडला त्या वस्तू मी घेतल्या. माझ्या तंबूत या गोष्टी जमिनीत पुरून ठेवलेल्या तुम्हाला सापडतील. चांदी अंगरख्याखाली दडवलेली आहे.”

22 तेव्हा यहोशवाने काही माणसे तंबूकडे पाठवली. ती धावतच तेथे गेली आणि त्यांना तंबूत लपवून ठेवलेल्या या वस्तू मिळाल्या. चांदी अंगरख्याच्या खाली होती. 23 त्या माणसांनी या वस्तू तेथून बाहेर काढल्या यहोशवा व सर्व इस्राएल लोक ह्यांच्यापर्यंत आणून परमेश्वरापुढे ठेवल्या.

24 नंतर यहोशवा व समस्त इस्राएल लोकांनी जेरहचा मुलगा आखान याला आखोर खोऱ्यात नेले. चांदी, सोने, अंगरखा, आखानची मुलेबाळे, जनावरे, गाढवे, शेळ्यामेंढ्या, त्याचा तंबू आणि होती नव्हती ती चीजवस्तू हे ही नेले. 25 तेव्हा यहोशवा म्हणाला, “तुझ्यामुळे आम्हाला फार त्रास झाला आहे. पण आता परमेश्वरच तुला संकटात टाकील” मग सर्व लोकांनी आखान आणि त्याचे कुटुंबीय यांच्यावर ते मरेपर्यंत दगडांचा मारा केला. मग त्यांना सर्व चीजवस्तूसह जाळून टाकले. 26 त्यानंतर आखानाच्या जळून गेलेल्या शरीरावर त्यांनी दगडांची रास रचली. हे दगड आज ही तेथे आहेत. अशा तऱ्हेने परमेश्वराने आखानावर आपत्ती आणली म्हणूनच त्या ठिकाणाचे नाव आखोर ची दरी असे पडले. यानंतर परमेश्वराचा कोप झाला नाही.

आय नगराचा संहार

मग परमेश्वर यहोशवाला म्हणला, “भिऊ नको, हात पाय गाळू नको. सर्व योध्द्यांना घेऊन आय वर चाल करून जा. आयच्या राजाचा पराभव करायला मी मदत करीन.तेथील प्रजा, ते नगर आणि ती भूमी मी तुमच्या हाती देईन. यरीहो नगर आणि त्यांचा राजा यांचा तुम्ही पाडाव केलात तसाच आय नगराचा आणि राजाचाही कराल. फक्त यावेळी सर्व संपत्तीची लूट तुम्ही स्वतःसाठी ठेवू शकता. येथील गुरेढोरे व संपत्ती तुम्ही आपापसात वाटून घ्या. आता आपल्या सैन्याला नगराच्या पिछाडीला दबा धरून बसण्यास सांग.”

तेव्हा यहोशवाने सर्व सैन्यासह आय नगराकडे मोहरा वळवला. आपल्या सैन्यातील तीस हजार उत्कृष्ट योध्द्यांची निवड केली व त्यांना रातोरात पाठवले. त्यांना आज्ञा केली, “मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. नगराच्या मागील बाजूस दबा धरून बसा. हल्ल्याच्या योग्य वेळेची वाट पाहा. फार लांब जाऊ नका. टेहेळणी करत तयारीत राहा. नगरावर हल्ला करायला लोकांना घेऊन मी पुढे जाईन. नगरातील लोक आमचा सामना करायला समोर येतील. तेव्हा आम्ही माघार घेऊन मागील वेळेप्रमाणे पळत सुटू. हे लोक आमचा पाठलाग करत नगरापासून दूर येतील. पूर्वींप्रमाणेच आपल्याला भिऊन हे पळ काढत आहेत असे त्यांना वाटेल (त्यांचा हा समज कायम ठेवायला) आम्ही पळत सुटू. तेव्हा तुम्हीआपल्या लपण्याच्या जागा सोडून बाहेर या आणि नगराचा ताबा घ्या. तुमचा देव परमेश्वर तुम्हाला जिंकण्याचे सामर्थ्य देईल.

“परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे वागा. माझ्याकडे लक्ष असू द्या नगरावर हल्ला करण्याची मी आज्ञा देईन. तेव्हा नगर काबीज करून त्याला आग लावा.”

मग यहोशवाने त्यांना रवाना केले. ते आयच्या पश्चिमेस बेथेल व आय यांच्या दरम्यान एका जागी दबा धरून बसले. आणि यहोशवा आपल्या इतर माणसांबरोबर त्या रात्री राहिला.

10 दुसऱ्या दिवशी पहाटे यहोशवाने सर्व लोकांना एकत्र आणले यहोशवा व इस्राएलाच्या पुढाऱ्यांनी या लोकांसह आय कडे मोर्चा वळवला. 11 सर्व सैन्य आयवर चाल करून गेले. नगराजवळ पोचल्यावर त्यांनी उत्तरेस तळ दिला. हे सैन्य आणि आय यांच्यामध्ये एक दरी होती.

12 यहोशवाने मग जवळजवक पाच हजार माणसांना आयच्या पश्चिमेस बेथेल व आय यांच्या मध्ये दबा धरून बसण्यास पाठवले. 13 अशाप्रकारे त्याने आपल्या सैन्याला सज्ज ठेवले होते. मुख्य छावणी शहराच्या उत्तरेला होती. इतर माणसे पश्चिमेला दबा धरून बसली होती. रात्री यहोशवा त्या दरीत राहिला.

14 आयच्या राजाने इस्राएलाचे सैन्य पाहिले तेव्हा तो व नगरातील माणसे इस्राएलांशी युध्द करण्यास लगबगीने निघाली. राजा नगराच्या पूर्वेला गेला. त्यामुळे नगराच्या पिछाडीला लपलेले सैन्य त्याला दिसले नाही.

15 आयच्या सैन्यापुढे आपली पीछेहाट होते आहे असे यहोशवा व इस्राएलच्या लोकांनी भासवले आणि ते वाळवंटाच्या दिशेला पूर्वेकडे पळत सुटले. 16 आयच्या सैन्याने आरडाओरडा करत त्यांचा पाठलाग करायला सुरूवात केली. नगरातील सर्व लोक यात सामील झाले नगरतील सगळे नगर सोडून बाहेर पडले. 17 आय आणि बेथेल मधील एकूणएक माणसे इस्राएल सैन्याच्या पाठलागावर गेली. नगर मोकळे झाले. त्याचे रक्षण करायला कोणी उरला नाही.

18 तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “आता तुझ्या हातातील शस्त्र आय नगरावर उगार. मी हे नगर तुझ्या हवाली करत आहे.” तेव्हा यहोशवाने आयवर आपली बरची उगारली. 19 दबा धरून बसलेल्या इस्राएलांनी हे पाहताच आपल्या जागा सोडल्या आणि ते तात्काळ नगरावर चालून गेले. नगरात शिरून त्यांनी त्याचा ताबा घेतला. लगेचच त्यांनी नगरात जाळपोळ सुरू केली.

20 आयचे लोक मागे वळून पाहतात तो त्यांना नगर जळताना दिसले. धूर आकाशात चढत होता. हे पाहून त्यांचे अवसान गळाले. इस्राएलांचा पाठलाग त्यांनी सोडून दिला. त्याबरोबर इस्राएल लोकांनी धावायचे थांबले. माघारे फिरून ते आयच्या लोकांबर तुटून पडले. आता आयच्या लोकांना पळता भुई थोडी झाली. 21 आपल्या माणसांनी नगराचा ताबा घेतला आहे आणि नगरातून धूर निघत आहे हे पाहताच यहोशवाने व इस्राएल लोकांनी मागे वळून आयच्या लोकांवर हल्ला केला. 22 ते पाहून लपून राहिलेली आणखी माणसे त्यांच्यावर चाल करू आली. अशाप्रकारे दोन्ही बाजूंनी चाल करून येऊन इस्राएलांनी आयच्या लोकांची चांगलीच कोंडी केली. त्यांनी आयचा पराभव केला. आय वासियांपैकी एकहीजण जिवंत राहिला नाही की निसटून जाऊ शकला नाही. 23 आयच्या राजाला मात्र जीवदान मिळाले. त्याला पकडून यहोशवापुढे हजर करण्यात आले.

युध्दाचे सारांशवर्णन

24 या लढाईत इस्राएलाच्या सैन्याने आयच्या लोकांचा मोकळ्या मैदानात तसेच वाळवंटात पाठलाग करत त्या साऱ्यांची कत्तल केली. नंतर ते नगरात परतले व तेथे उरलेल्या सर्वांची हत्या केली. 25 अशाप्रकारे आय मधील सर्वजण त्यादिवशी मरण पावले. बायकापुरूष मिळून ती बारा हजार माणसे होती. 26 हे नगर उध्वस्त करायचा इशारा म्हणून यहोशवाने आपली बरची आयवर उगारलेली होती आणि सर्वांचा संहार होईपर्यंत त्याने ती तशीच उगारलेली ठेवली. 27 शहरातील गुरेढोरे आणि इतर मालमत्ता इस्राएल लोकांनी स्वतःसाठी ठेवली. परमेश्वराने यहोशवाला आज्ञा दिल्या तेव्हा यासाठी अनुमती दिलेलीच होती.

28 यहोशवाने नंतर हे शहर बेचिराख करून टाकले. तेथे निव्वळ दगडधोंड्यांची रास उरली. आजही तेथे तशीच स्थिती आहे. 29 आयच्या राजाला यहोशवाने एका झाडावर फाशी दिले आणि संध्याकाळपर्यंत त्याचे प्रेत तसेच तेथे टांगत ठेवले. सूर्यास्ताच्या वेळी त्याने ते लोकांना उतरवायला सांगितले. त्यांनी ते झाडावरून काढून नगराच्या वेशीपाशी टाकले. व तो मृतदेह दगडाधोंड्यांनी झाकून टाकला. तीही रास आज तशीच आहे.

आशीर्वाद आणि शाप यांचे वाचन

30 मग यहोशवाने एबाल पर्वतावर इस्राएल लोकांच्या परमेश्वर देवासाठी वेदी बांधली. 31 परमेश्वराचा सेवक मोशे याने वेद्या कशा बांधाव्यात हे इस्राएल लोकांना सांगितले होते. तेव्हा, मोशेच्या नियमशास्त्रात लिहून ठेवल्या बरहुकूम यहोशवाने ती बांधली. त्यासाठी कोणत्याही हत्याराचा स्पर्श न झालेले अखंड पाषाण वापरले. अशा वेदीवर त्यांनी होमार्पणे तसेच शांत्यार्पणे वाहिली.

32 त्याठिकाणी समस्त इस्राएल लोकांसाठी म्हणून यहोशवाने मोशेच्या नियमशास्त्राची पाषाणांवर नक्कल करून ठेवली. 33 यावेळी सर्व वडीलधारी माणसे, अंमलदार, न्यायाधीश व इतर इस्राएल लोक पवित्र करारकोशाभोवती उभे होते. हा परमेश्वराचा पवित्र करारकोश वाहून नेणाऱ्या लेवी याजकांसमोर ते उभे होते. उपस्थितात मूळचे इस्राएल लोक तसेच परकेही होते. त्यांच्यापैकी निम्मे एबाल पर्वतासमोर तर निम्मे गरिज्जीम पर्वतासमोर उभे राहिले. परमेश्वरचा सेवक मोशे याने आशीर्वादाच्या वाचनासाठी त्यांना तसे उभे राहायला सांगितले होते.

34 मग यहोशवाने नियमशास्त्रातील आशीर्वचने आणि शापवाणी वाचून दाखवली त्यात एका शब्दाचाही फेरफार केला नाही. 35 स्त्रिया, मुले, परकीय यांच्यासह सर्व इस्राएल लोक तेथे हजर होते. त्यांना मोशेच्या सर्व आज्ञा यहोशवाने वाचून दाखवल्या.

गिबोनाच्या रहिवाश्यांचे यहोशवाशी कपट

यार्देन नदीच्या पश्चिमेकडील हित्ती, अमोरी, कनानी, हिव्वी तसेच यबूसी लोकांच्या राजांनी या आयवरील चढाई विषयी ऐकले. या लोकांची राज्ये डोंगराळ भागात तसेच मैदानी प्रदेशात थेट लबानोनपर्यंत भूमध्य समुद्राच्या किनाऱ्या किनाऱ्याने पसरली होती. हे सर्व राजे एक झाले आणि त्यांनी यहोशवा व इस्राएल लोक यांच्यावर चढाई करण्याचा बेत केला.

लूक 16:1-18

खरी संपत्ती

16 येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “एक श्रीमंत मनुष्य होता. त्याचा एक कारभारी होता. हा कारभारी तुमचे पैसे उधळतो. असे त्या श्रीमंत माणसाला सांगण्यात आले. म्हणून त्या श्रीमंत मनुष्याने कारभाऱ्याला आत बोलावले आणि म्हणाला, ‘हे मी तुझ्याविषयी काय ऐकत आहे तुझ्या कारभाराचा हिशेब दे, कारण यापुढे कारभारी म्हणून तुला राहता येणार नाही.’

“तेव्हा कारभारी स्वतःशी म्हणाला, ‘मी काय करु? माझे मालक माझे कारभाऱ्याचे काम काढून घेत आहेत. शेतात कष्ट करण्याइतका मी बळकट नाही व भीक मागण्याची मला लाज वाटते. मी काय करावे हे मला माहीत आहे. यासाठी की जेव्हा मला कारभाऱ्याच्या कामावरुन काढून टाकतील, लोक मला त्यांच्या घरांमध्ये घेतील.’

“मग त्याने त्याच्या मालकाच्या प्रत्येक कर्जदाराला बोलावले. पहिल्याला तो म्हणाला, ‘तू माइया मालकाचे किती देणे लागतोस?’ तो म्हणाला, ‘चार हजार लीटर जैतून तेल.’ मग तो त्याला म्हणाला, ‘तुझी पावती घे बघू, खाली बस आणि लवकर त्यावर दोन हजार लीटर लिही.’

“मग दुसऱ्याला तो म्हणाला, ‘आणि तुझे किती देणे आहे?’ तो म्हणाला, ‘तीस हजार किलो गहू.’ तो त्याला म्हणाला, ‘तुझी हिशेबाची पावती घे व त्यावर पंचवीस हजार किलो लिही.’

“आणि मालकाने त्या अप्रामाणिक कारभाऱ्याची प्रशंसा केली. कारण तो धूर्तपणे वागला होता. या जगाचे पुत्र त्यांच्यासारख्यांशी वागताना प्रकाशाच्या पुत्रांपेक्षा अधिक धूर्ततेने वागतात.

“मी तुम्हांस सांगतो, तुमच्यासाठी तुमच्या ऐहिक संपत्तीने मित्र मिळवा. यासाठी की, जेव्हा ते संपेल तेव्हा ते तुमचे अनंतकाळच्या घरात स्वागत करतील. 10 ज्या कोणावर थोडा विश्वास ठेवणे शक्य आहे त्याच्यावर जास्त विश्वास ठेवला जाण्याची शक्यता आहे. व जो कोणी थोडक्याविषयी अविश्वासू आहे तो अधिकाविषयीसुद्धा अविश्वासू आहे. 11 “म्हणून जर तुम्ही ऐहिक संपत्तीविषयी विश्वासू नाही, तर मग खऱ्या संपत्तीविषयी तुमच्यावर कोण विश्वास ठेवील? 12 जे दुसऱ्याचे आहे त्याविषयी तुम्ही विश्वासू नसाल तर जे तुमचे आहे ते तुम्हांस कोण देईल?

13 “कोणत्याही नोकराला दोन मालकांची सेवा करता येत नाही. एकाचा तो द्वेष करील व दुसऱ्यावर तो प्रेम करील किंवा एकाशी तो प्रामाणिक राहील व दुसऱ्याला तुच्छ मानील. तुम्ही एकाच वेळी देवाची व पैशाची सेवा करु शकणार नाही.”

देवाचे नियमशास्त्र बदलणे शक्य नाही(A)

14 मग जे परुशी धनलोभी होते, त्यांनी हे सर्व ऐकले व त्यांनी त्याचा उपहास केला. 15 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही स्वतःला लोकांसमोर नीतिमान म्हणून मिरवता दाखविता, पण देव तुमची अंतःकरणे ओळखतो. जे लोकांना महत्त्वाचे वाटते ते देवाच्या दृष्टीने टाकावू आहे.

16 “नियमशास्त्र व संदेष्टे योहानापर्यंत होते, तेव्हापासून देवाच्या राज्याची सुवार्ता गाजविली जात आहे. व प्रत्येक जण त्यात घुसण्याचा जोरदार प्रयत्न करीत आहे. 17 एकवेळ आकाश व पृथ्वी नाहीशी होणे शक्य होईल पण नियमशास्त्राचा एक काना मात्राही नाहीसा होणार नाही.

घटस्फोट आणि पुनर्विवाह

18 “जो कोणी आपल्या पत्नीस सूटपत्र देतो व दुसरीबरोबर लग्न करतो तो व्याभिचार करतो आणि जो कोणी एखाद्या स्त्रीशी- जिला तिच्या पतीने टाकलेले आहे तिच्याशी लग्न करतो तो व्यभिचार करतो.”

स्तोत्रसंहिता 82

आसाफाचे स्तोत्र

82 देव देवांच्या सभेत उभा राहातो.
    तो देवांच्या सभेत न्यायाधीश आहे.
देव म्हणतो, “तू किती काळपर्यंत लोकांना विपरीत न्याय देणार आहेस?
    दुष्टांना तू आणखी किती काळ शिक्षा न करताच सोडून देणार आहेस?”

“गरीबांना आणि अनाथांना संरक्षण दे.
    त्या गरीब लोकांच्या हक्कांचे रक्षण कर.
त्या गरीब, असहाय्य लोकांना मदत कर.
    त्यांचे दुष्टांपासून रक्षण कर.”

“काय घडते आहे ते त्यांना [a] कळत नाही.
    त्यांना काही समजत नाही.
ते काय करीत आहेत ते त्यांना कळत नाही.
    त्यांचे जग त्यांच्या भोवती कोसळत आहे.”
मी (देव) म्हणतो, “तुम्ही देव आहात
    तुम्ही सर्वशक्तिमान देवाची मुले आहात.”
परंतु तुम्ही मरणार आहात इतर लोक मरतात त्याप्रमाणे तुम्ही मराल,
    इतर पुढारी मरतात त्याप्रमाणे तुम्ही मराल.

देवा, ऊठ! तू न्यायाधीश हो.
    देवा, तू सर्व देशांचा पुढारी हो.

नीतिसूत्रे 13:2-3

चांगल्या माणसांना चांगले बोलल्याबद्दल फळ मिळते. पण दुष्ट माणसांना नेहमी चुकाच करायच्या असतात.

जो माणूस आपल्या बोलण्याबद्दल काळजी घेतो तो त्याचा जीव वाचवतो. पण जो विचार न करता बोलतो त्याचा नाश होतो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center