Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NLT. Switch to the NLT to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
अनुवाद 33

मोशेचे आशीर्वाद

33 देवाचा भक्त मोशे याने इस्राएल लोकांना आपल्या मृत्युपूर्वी असा आशीर्वाद दिला, मोशे म्हणाला.

“परमेश्वर सीनाय येथून आला.
    उषःकालच्या प्रकाशाप्रमाणे
    तो सेईर वरुन आला,
पारान डोंगरावरुन तो प्रकाशला. दहाहजार देवदूतांसमवेत तो आला
    देवाचे समर्थ सैनिक [a] त्याच्याबरोबर होते.
परमेश्वराचे आपल्या लोकांवर खरंच फार प्रेम आहे.
    त्याची पवित्र प्रजा त्याच्या हातात आहे.
ते लोक त्याच्या पायाशी बसून
    त्याच्याकडून शिकवण घेतात.
मोशेने आम्हाला नियमशास्त्र दिले.
    ती शिकवण याकोबच्या लोकांची ठेव आहे.
इस्राएलचे सर्व लोक
    आणि त्यांचे प्रमुख आले
    तेव्हा परमेश्वर यशुरुनचा राजा झाला.

रऊबेनला आशीर्वाद

“रऊबेनचे लोक मोजकेच असले तरी ते जगोत,
    त्यांना मरण न येवो.”

यहूदासाठी आशीर्वाद

मोशेने यहूदाला हा आशीर्वाद दिला:

“परमेश्वरा, यहूदा तुझ्याकडे मदत मागेल तेव्हा त्याचे ऐक.
    त्याच्या लोकांची व त्यांची गाठभेट करुन दे.
त्याला शक्तिशाली कर आणि
    शत्रूला पराभूत करण्यात त्याला साहाय्यकारी हो.”

लेवींना आशीर्वाद

लेवींविषयी मोशे असे म्हणाला,

“लेवी तुझा खरा अनुयायी आहे.
    तो थुम्मीम व उरीम बाळगतो.
मस्सा येथे तू लेवींची कसोटी पाहिलीस.
    मरीबाच्या झऱ्याजवळ, ते तुझेच आहेत याची तू कसोटी करुन घेतलीस.
हे परमेश्वरा, आपल्या कुटुंबियांपेक्षाही त्यांनी तुला आपले मानले.
    आपल्या आईवडीलांची कदर केली नाही.
भाऊबंदांना ओळख दाखवली नाही.
    पोटच्या पोरांची पर्वा केली नाही.
पण तुझ्या आज्ञांचे पालन केले.
    तुझा पवित्र करार पाळला.
10 ते तुझे विधी याकोबाला,
    नियमशास्त्र इस्राएलला शिकवतील.
तुझ्यापुढे धूप जाळतील.
    तुझ्या वेदीवर होमबली अर्पण करतील.

11 “परमेश्वरा, जे जे लेवींचे आहे त्याला आशीर्वाद दे.
    ते जे करतील त्याचा स्वीकार कर.
त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचा संहार कर.
    त्यांच्या शत्रूंना पार नेस्तनाबूत करुन टाक.”

बन्यामीनला आशीर्वाद

12 बन्यामीन विषयी मोशे म्हणाला,

“बन्यामीन परमेश्वराला प्रिय आहे.
    तो परमेश्वरापाशी सुरक्षित राहील.
देव त्याचे सदोदित रक्षण करील.
    आणि परमेश्वराचे वास्तव्य त्याच्या प्रदेशात राहील.” [b]

योसेफला आशीर्वाद

13 योसेफा विषयी तो म्हणाला,

“योसेफच्या भूमीवर परमेश्वराची कृपादृष्टी असो.
    परमेश्वरा, त्यांच्या देशात आकाशातून पावसाचा वर्षाव कर
    आणि त्यांच्या भूमीतून मुबलक पाणी दे.
14 सूर्यामुळे उत्कृष्ट फलित त्यांच्या पदरात पडो.
    आणि प्रत्येक महिना आपली उत्कृष्ट फळे त्याला देवो.
15 टेकड्या आणि पुरातन पर्वत यांच्यातील
    अमूल्य जिन्नसे त्यांना मिळोत.
16 धरतीचा उत्तमातील उत्तम ठेवा योसेफाला मिळो.
    योसेफाची आपल्या भाऊबंदापासून ताटातूट झाली होती.
    तेव्हा जळत्या झुडुपांतून, परमेश्वराचा दुवा त्याला मिळो.
17 योसेफ माजलेल्या बैलासारखा आहे.
    त्याचे दोन पुत्र बैलाच्या शिंगांप्रमाणे आहेत.
ते लोकांवर चढाई करुन
    त्यांना पृथ्वीच्या सीमेपर्यंत ढकलतील.
असे मनश्शेचे हजारो
    आणि एफ्राइमचे लाखो आहेत.”

जबुलून आणि इस्साखार यांना आशीर्वाद

18 मोशे जबुलूनबद्दल म्हणाला,

“जबुलूना, बाहेर जाल तेव्हा आनंद करा.
    इस्साखारा आपल्या डेऱ्यात आनंदाने राहा.
19 ते लोकांना आपल्या डोंगरावर बोलावतील.
    तेथे ते योग्य यज्ञ करतील.
समुद्रातील धन आणि वाळूतील
    खजिना हस्तगत करतील.”

गादला आशीर्वाद

20 गादविषयी मोशे म्हणाला,

“गादाचा विस्तार करणारा देव धन्य होय.
    गाद सिंहासारखा आहे. तो आधी दबा धरुन बसतो.
    आणि सावजावर हल्ला करुन त्याच्या चिंधड्या करतो.
21 स्वतःसाठी तो उत्तम भाग ठेवतो.
    राजाचा वाटा स्वतःला घेतो.
लोकांचे प्रमुख त्याच्याकडे येतात.
    जे परमेश्वराच्या दृष्टीने न्यायाने, ते तो करतो.
    इस्राएलच्या लोकांसाठी जे उचित तेच करतो.”

दानला आशीर्वाद

22 दान विषयी मोशे म्हणाला,

“दान म्हणजे सिंहाचा छावा.
    तो बाशान मधून झेप घेतो.”

नफतालीला आशीर्वाद

23 नफताली विषयी मोशेने सांगितले,

“नफताली, तुला सर्व चांगल्या गोष्टी,भरभरुन मिळतील.
    तुझ्यावर परमेश्वराचा आशीर्वाद राहील.
    गालील तलावाजवळचा प्रदेश तुला मिळेल.”

आशेरला आशीर्वाद

24 आशेर विषयी मोशने असे सांगीतले,

“आशेरला सर्वात अधिक आशीर्वाद मिळोत.
    तो आपल्या बांधावांना प्रिय होवो.
    त्याचे पाय तेलाने माखलेले राहोत.
25 तुमच्या दरवाजांचे अडसर लोखंडाचे व पितळेचे असोत.
    तुमचे सामर्थ्य आयुष्यभर राहो.”

मोशे देवाची स्तुती करतो

26 “हे यशुरुन! देवासारखा कोणी नाही.
    तुझ्या साहाय्यासाठी, मेघांवर आरुढ होऊन
    तो आपल्या प्रतापाने आकाशातून तुझ्या मदतीला येतो.
27 देव सनातन आहे.
    तो तुझे आश्रयस्थान आहे.
देवाचे सामर्थ्य सर्वकाळ चालते!
    तो तुझे रक्षण करतो.
तुझ्या शत्रूंना तो तुझ्या प्रदेशातून हुसकावून लावेल.
    ‘शत्रूंना नष्ट कर’ असे तो म्हणतो.
28 म्हणून इस्राएल सुरक्षित राहील.
    याकोबची विहीर त्यांच्या मालकीची आहे.
धान्याने व द्राक्षारसाने संपन्न अशी भूमी त्यांना मिळेल.
    त्या प्रदेशावर भरपूर पाऊस पडेल.
29 इस्राएला, तू आशीर्वादीत आहेस.
    इतर कोणतेही राष्ट्र तुझ्यासारखे नाही.
परमेश्वराने तुला वाचवले आहे.
    भक्कम ढालीप्रमाणे तो तुझे रक्षण करतो.
    परमेश्वर म्हणजे तळपती तलवार.
शत्रूंना तुझी दहशत वाटेल.
    त्यांची पवित्र स्थाने तू तुडवशील!”

लूक 13:1-21

तुमची अंतःकरणे बदला

13 त्यावेळी तेथे काही लोक उपस्थित होते. त्यांनी येशूला गालीलातील त्या लोकांविषयी सांगितले, ज्यांचे रक्त पिलाताने [a] आधीच असलेल्या यज्ञपशूंच्या रक्तात मिसळले होते. त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्हांला वाटते का की, ह्या गालीलकरांनी जे भोगले त्यावरुन ते इतर गालीलकरांपेक्षा जास्त पापी होते? नाही, मी तुम्हांस सांगतो, जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर ते जसे मेले तसे तुम्हीही मराल. किंवा त्या अठरा जणांचे काय? ज्यांच्यावर शिलोहाचा बुरुज पडला व ते मारले गेले? तुम्हांला वाटते का की, यरुशलेम येथे राहणाऱ्या सर्व लोकांपेक्षा ते अधिक दोषी होते? नाही, मी तुम्हांला सांगतो जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर तुम्ही सर्व जण त्यांच्यासारखे मराल.”

निरुपयोगी झाड

नंतर त्याने ही बोधकथा सांगितली, “एका माणसाने त्याच्या बागेत अंजिराचे झाड लावले होते, त्यावर फळ असेल म्हणून तो पाहावयास आला परंतु त्याला काहीही आढळले नाही. म्हणून तो माळयाला म्हणाला, ‘पाहा, या अंजिराच्या झाडावर फळ पाहण्यासाठी मी गेल्या तीन वर्षांपासून येत आहे, परंतु मला त्यावर काहीही आढळले नाही. तेव्हा ते तोडून टाक. त्याचा उगीच भुईला भार कशाला?’ माळयाने उत्तर दिले, ‘मालक, या एका वर्षासाठी ते राहू द्या. मग मी त्याच्याभोवती खणून त्याला खत घालीन. मग येत्या वर्षात फळ आले तर छानच! जर आले नाही तर मग आपण ते तोडून टाकावे.’”

येशू एका स्त्रीला शब्बाथ दिवशी बरे करतो

10 शब्बाथ दिवशी येशू एका सभास्थानात शिकवीत होता. 11 तेथे एक स्त्री होती, तिला अशुद्ध आत्म्याने अठरा वर्षे पांगळे केले होते. ती कुबडी होती व तिला सरळ उभे राहता येत नव्हते. 12 येशूने तिला पाहिले, त्याने तिला बोलावले आणि तो तिला म्हणाला, “बाई, तुझ्या आजारापासून तू मुक्त झाली आहेस!” 13 नंतर त्याने आपले हात तिच्यावर ठेवले आणि ती तत्काळ सरळ झाली. आणि ती देवाची स्तुति करु लागली.

14 नंतर सभास्थानाचा अधिकारी रागावला, कारण येशूने शब्बाथ दिवशी तिला बरे केले होते. तो लोकांना म्हणाला, “काम करण्यासाठी सहा दिवस आहेत म्हणून या सहा दिवसांमध्ये या व बरे व्हा. पण शब्बाथ दिवशी येऊन बरे होऊ नका.”

15 येशूने त्याला उत्तर दिले, आणि म्हणाला. “ढोंग्यांनो, तुम्हांपैकी प्रत्येक जण त्याच्या बैलाला वा गाढवाला शब्बाथ दिवशी त्याच्या ठिकाणाहून सोडून पाणी पाजायला घेऊन जात नाही का? 16 ही तर अब्राहामाची कन्या आहे. सैतानाने हिला अठरा वर्षे बांधून ठेवले होते. ज्या बंधनात ती होती त्यापासून तिला शब्बाथ दिवशी सोडविणे चूक होते काय?” 17 तो असे म्हणाल्यावर जे त्याचा विरोध करीत होते त्यांना लाज वाटली व त्याने ज्या अद्भुत गोष्टी केल्या होत्या त्यामुळे सगळा समुदाय आनंद करु लागला.

देवाचे राज्य कशासारखे आहे?(A)

18 मग तो म्हणाला, “देवाचे राज्य कशासारखे आहे? आणि मी त्याची कशाबरोबर तुलना करु 19 देवाचे राज्य एका मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो मोहरीचा दाणा एका मनुष्याने घेतला व आपल्या बागेत लावला, तो वाढला आणि त्याचे झाडे झाले. आकाशातील पाखरांनी त्याच्या फांद्यांवर घरटी बांधली.”

20 तो पुन्हा म्हणाला, “मी देवाच्या राज्याची तुलना कोणाबरोबर करु 21 ते खमिरासारखे आहे. एका स्त्रीने तीन मापे पिठात खमिर मिसळले आणि ते सर्व खमिरामुळे फुगले.”

स्तोत्रसंहिता 78:65-72

65 शेवटी आमचा प्रभु झोपेतून उठलेल्या माणसासारखा,
    खूप द्राक्षारस प्यायलेल्या सैनिकासारखा उठला.
66 देवाने त्याच्या शत्रूंना माघार घ्यायला भाग पाडले आणि त्यांचा पराभव केला.
    देवाने त्याच्या शत्रूचा पराभव केला आणि त्यांना कायमची नामुष्की आणली.
67 परंतु देवाने योसेफाच्या कुटुंबाला झिडकारले,
    देवाने एफ्राईमच्या कुटुंबाचा स्वीकार केला नाही.
68 नाही, देवाने यहुदाच्या कुटुंबाला निवडले,
    देवाने त्याच्या आवडत्या सियोन पर्वताची निवड केली.
69 देवाने त्याचे पवित्र मंदिर उंच पर्वतावर बांधले.
    देवाने त्याचे मंदिर पृथ्वीसारखे कायमचे राहील असे बांधले.
70 देवाने दावीदाला स्वत:चा खास सेवक म्हणून निवडले.
    दावीद मेंढ्यांच्या वाड्यांचे रक्षण करीत होता.
    परंतु देवाने त्याला त्याच्या कामापासून दूर नेले.
71 दावीद मेंढ्यांची काळजी घेत होता.
    परंतु देवाने त्याला त्या कामापासून दूर नेले.
देवाने दावीदाला त्याच्या माणसांकडे, याकोबाच्या माणसांकडे,
    इस्राएलाच्या माणसांकडे आणि देवाच्या मालमत्तेकडे लक्ष देण्याचे काम करायला सांगितले.
72 आणि दावीदाने त्यांना शुध्द मनाने मार्ग दाखवला,
    त्याने त्यांना शहाणपणाने मार्ग दाखवला.

नीतिसूत्रे 12:25

25 काळजी माणसाचे सुख हिरावून घेते. पण प्रेमळ शब्द त्याला आनंदी करु शकतात.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center