Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NIV. Switch to the NIV to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
अनुवाद 21-22

अज्ञात व्यक्तीची हत्या

21 “तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या प्रदेशात एखाद्याचा उघड्यावर खून झालेला आढळला आणि मारेकऱ्याचा पत्ता लागला नाही तर तुमच्यापैकी वडीलधारे आणि न्यायाधीश यांनी पुढे येऊन मृतदेहापासून सभोवर पसरलेल्या गावांचे अंतर मोजावे. मग जो गाव प्रेताच्या सर्वात जवळचा असेल तेथील वडिलधाऱ्यांनी आपल्या कळपातील एक गाय निवडावी. कधीही कामाला न जुंपलेली व अजून न व्यायलेली अशी ती गाय असावी. मग तिला वाहता झरा असलेल्या खोऱ्यांत आणावी. हे खोरे कधी पेरणी, नांगरणी न झालेले असावे. अशा ठिकाणी त्या गायीची मान कापावी. लेवी वंशातील याजकांनी या वेळी तिथे असावे. (आपली सेवा करुन घ्यायला आणि आपल्या वतीने लोकांना आशीर्वाद द्यायला तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांची याजक म्हणून निवड केली आहे. प्रत्येक वादात किंवा मारामारीत ते निवाडा करतील.) त्या खोऱ्यात, मृताच्या जवळच्या नगरातील वडील माणसांनी, गाय मारल्यावर तिच्या मानेतून वाहणाऱ्या रक्ताने आपले हात धुवावे. व म्हणावे ‘या व्यक्तीला आमच्या हातून मरण आले नाही. ही घटना घडताना आम्ही पाहिली नाही. परमेश्वरा तू इस्राएलाल वाचवलं आहेस. आम्हाला तू आपलस केल आहेस. आमचा उद्धार केला आहेस. आम्हाला शुद्ध कर. एका निरपराध व्यक्तीच्या हत्त्येबद्दल आम्हाला दोषी धरु नकोस. असे केले असता त्या निरपराध व्यक्तीच्या हत्येचे पाप या लोकांना लागणार नाही.’ याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टिने जे योग्य ते करुन तुम्ही आपल्यामधून या पापाचा निचरा करा.

युद्धकैदी स्त्रिया

10 “शत्रूशी युद्ध करायला गेल्यावर तुमचा देव परमेश्वर ह्याच्या साहाय्याने तुम्ही शत्रूला पराभूत कराल व त्याच्या सैनिकांना बंदीवान कराल. 11 तेव्हा बंदिवानात एखादी सुंदर स्त्री पाहून तिच्याशी लग्न करावे असे एखाद्याला वाटेल. 12 तेव्हा त्याने तिला आपल्या घरी आणावे. तिने आपले केशवपन करावे व नखे कापावी. 13 तिचे पहिले, युद्धकैदीचे द्योतक असलेले वस्त्रही काढून टाकावे. आपल्या आईवडलांपासून दुरावल्याबद्दल तिने पूर्ण महिनाभर त्याच्या घरी शोक करावा. मग त्याने तिच्याजवळ जावे. म्हणजे तो तिचा पती व ती त्याची पत्नी होईल. 14 पुढे त्याला ती आवडली नाही तर त्याने घटस्फोट देऊन तिला मुक्त करावे. पण तिची विक्री करु नये. तिला गुलाम म्हणूनही त्याने वागवता कामा नये. कारण त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवला होता.

ज्येष्ठ मुलगा

15 “एखाद्याला दोन बायका असतील आणि त्याचे एकीवर दुसरीपेक्षा जास्त प्रेम असेल. दोघींना मुले असतील. पण नावडतीचा मुलगा सगळ्यात मोठा असेल. 16 अशा परिस्थितीत, आपल्या मालमत्तेची वाटणी करताना ज्येष्ठ मुलाच्या वाटणीचे, आवडतीच्या मुलाला देऊ नये. 17 त्याने आपल्या ज्येष्ठ पुत्राचा नावडतीचा मुलगा असला तरी स्वीकार केला पाहिजे. तसेच आपल्या एकंदर मालमत्तेतील दुप्पट वाटा त्याला दिला पाहिजे. कारण तो ज्येष्ठ पुत्र आहे. व त्यालाच जेष्ठपणाचा हक्क आहे.

बंडखोर मुलगा

18 “एखाद्याचा मुलगा हट्टी अजिबात न ऐकणारा, आईबापांना न जुमानणारा निघतो. शिक्षा केली तरी काही फरक पडत नाही. 19 अशावेळी आईवडलांनी त्याला गावच्या चावडीवर वडीलधाऱ्यांपुढे न्यावा. 20 त्यांनी सांगावे की, हा उद्दाम आहे. आमचे ऐकत नाही. तसेच तो खादाड व मद्यपी आहे. 21 यावर त्या गावातील माणसांनी या मुलाला दगडांनी मरेपर्यंत मारावे. असे केल्याने तुम्ही हे पाप आपल्यामधून काढून टाकाल. इस्राएलमधील इतर लोकांच्या कानावर ही गोष्ट गेली की ते घाबरुन राहतील.

गुन्हेगारांची झाडावर टांगलेली प्रेते

22 “एखाद्याचा अपराध मुत्युदंड मिळण्याइतका मोठा असेल. अशावेळी त्याच्या देहान्ता नंतर लोक त्याचे प्रेत झाडाला टांगतील. 23 तेव्हा ते रात्रभर झाडावर टांगलेले राहू देऊ नका. त्याचदिवशी कटाक्षाने त्याचे दफन करा. कारण झाडाला टांगलेल्या त्या मृतदेहाला देवाचा शाप असतो. तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेली भूमी अशी विटाळू नका.

इतर नियम

22 “आपल्यापैकी कोणाचा बैल किंवा मेंढरु मोकाट सुटलेले आढळले तर तिकडे दुर्लक्ष न करता ते त्याच्या मालकाकडे पोंचते करा. तो मालक जवळपास राहात नसला किंवा कोण ते माहीत नसला तर त्या जनावराला आपल्या घरी आणा. त्याचा मालक शोध करत आला की त्याचे त्याला परत करा. कोणाचे गाढव, कपडे किंवा इतर कोणतीही वस्तू अशी इकडे तिकडे दिसली तरी असेच करा. व त्या शेजाऱ्याला मदत करा.

“कोणाचे गाढव किंवा बैल रस्त्यात पडलेले आढळले तर तिकडे दुर्लक्ष करु नका. त्याला उठवून उभे राहायला मदत करा.

“बायकांनी पुरुषांचा किंवा पुरुषांनी बायकोचा पेहेराव करु नये. तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने ते निंद्य आहे.

“वाटेत तुम्हाला झाडावर किंवा जमिनीवर पक्ष्याचे घरटे आढळले आणि मादी अंडी उबवत किंवा पिल्लांवर बसलेली दिसली तर पिल्लांसकट तिला नेऊ नका. हवी तर फक्त पिल्ले घ्या पण आईला सोडा. हे नियम पाळलेत तर तुमचे कल्याण होईल व तुम्ही चिरायु व्हाल.

“नवीन घर बांधलेत तर त्याच्या छताला कठडा [a] अवश्य करा. म्हणजे वरुन तोल जाऊन कोणी पडल्यास त्याच्या हत्येचे पातक तुम्हाला लागणार नाही.

यांची सांगड घालू नये

“द्राक्षमळ्यात इतर धान्याचे बियाणे पेरु नये. पेरलेत तर सारेच वाया जाईल. धान्य आणि द्राक्षं यापैकी काहीच तुम्हाला वापरता येणार नाही.

10 “बैल आणि गाढव एका नांगराला जुंपू नका.

11 “लोकर आणि ताग यांच्या मिश्र विणीचे वस्त्र वापरु नका.

12 “वेगवेगळे धागे एकत्र करुन त्यांचे गोंडे [b] आपल्या पांघरायच्या वस्त्राला चारीही टोकांना लावा.

विवाहविषयक नियम

13 “एखाद्या माणसाला लग्न केल्यावर बायकोशी शरीरसंबंध ठेवल्यावर काही काळानंतर बायको आवडेनाशी झाली आणि 14 ‘मी या बाईशी लग्न केले पण ती कुमारी नसल्याचे आमच्या शरीरसंबंधाच्या वेळी मला आढळून आले’ असा खोटा आरोप त्याने तिच्यावर ठेवला तर लोकांमध्ये तिची बदनामी होईल. 15 अशा वेळी त्या मुलीच्या आईवडिलांनी तिच्या कौमार्याचा पुरावा घेऊन गावच्या चावडीवर वडीलधाऱ्या पंचाकडे जावे. 16 ‘मी या पुरुषाशी माझ्या मुलीचे लग्न लावून दिले आहे. पण आतां ती त्याला नकोशी झाली आहे. 17 त्याने तिच्यावर भलते सलते आरोप केले आहेत. आणि हा म्हणतो की कौमार्याची लक्षणे तिच्या ठायी आढळली नाहीत. पण हा घ्या माझ्या मुलीच्या कौमार्याचा पुरावा,’ असे मुलीच्या वडलांनी तेथे सांगून, त्या मंडळींना ती चादर दाखवावी. 18 यावर गावाच्या पंचांनी त्या नवऱ्याला धरुन शिक्षा करावी. 19 त्याला चाळीस औंस चांदी [c] दंड करावा. एका इस्राएल कन्येवर ठपका ठेवून तिची बदनामी केल्याबद्दल ही रक्कम त्याने मुलीच्या वडीलांना द्यावी. त्याने बायको म्हणून तिचा स्वीकार केला पाहिजे. तसेच जन्मभर त्याने तिचा त्याग करता कामा नये.

20 “पण बायकोबद्दल नवऱ्याने केलेला आरोप खराही असू शकतो. तिच्या कौमार्याचा पुरावा तिचे आईवडील दाखवू शकले नाहीत तर 21 गावातील ज्येष्ठ मंडळींनी तिला आपल्या वडिलांच्या घराच्या दारापाशी आणावी आणि गावकऱ्यांनी तिला मरेपर्यंत दगडांनी मारावे. कारण तिने इस्राएलमध्ये ही लाजिरवाणी गोष्ट केली आहे. आपल्या वडलांच्या घरी असतानाचे तिचे वर्तन वेश्येसमान आहे. हा कलंक आपल्यामधून तुम्ही धुवून काढलाच पाहिजे.

स्वैर वर्तन

22 “एखाद्या पुरुषाचे दुसऱ्या विवाहित स्त्री बरोबर लैंगिक संबंध असतील तर दोघांनाही मृत्युदंड द्यावा. आणि इस्राएलमधून या दुराचाराचे निमूर्लन करावे.

23 “एखाद्या कुमारिकेचा वाङनिश्चय झालेला असताना गावातील दुसऱ्या एखाद्या पुरुषाने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवलेले आढळले तर 24 त्या दोघांना गावाच्या वेशीपाशी भर चौकात आणून दगडांनी मरेपर्यंत मारावे ती दुसऱ्याची बायको होणार होती. तिच्याशी शरीरसंबधं ठेवल्याबद्दल पुरुषाला आणि गावांत असून मदतीसाठी आरडाओरडा केला नाही म्हणून त्या मुलीला मरेपर्यंत दगडांनी मारावे. अशाप्रकारे आपल्या लोकांमधून हा दुराचार निपटून टाकवा.

25 “पण अशा वाग्दत्त मुलीला एखाद्याने रानात गाठले आणि तिच्यावर बलात्कार केला तर मात्र फक्त त्या पुरुषाला मारावे. 26 त्या मुलीला काही करु नये. देहान्तशासन व्हावे असे तिने काही एक केले नाही. कोणी आपल्या शेजाऱ्यावर चालून जाऊन त्याचा जीव घ्यावा तसेच हे झाले. 27 त्याला ही मुलगी रानात आढळली. त्याने तिच्यावर हात टाकला. कदाचित् तिने मदतीसाठी हाका मारल्याही असतील पण तिच्या बचावासाठी तिथे कोणी नव्हते. तेव्हा तिला शिक्षा करु नये.

28 “जिचा वाङनिश्चय झालेला नाही अशी कुमारिका कोणाला आढळली आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला हे लोकांनी पाहिल्यास 29 त्याने मुलीच्या वडीलांना वीस औंस चांदी [d] द्यावी. आता ती त्याची बायको झाली. कारण त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवल्याचे पाप केले आहे. तो आता तिचा जन्मभर त्याग करु शकत नाही.

30 “आपल्या वडलांच्या बायकोशी गमन करुन कोणी त्यांच्या तोंडाला काळे फासू नये.”

लूक 9:51-10:12

शोमरोननगर

51 आता असे घडले की, जेव्हा त्याला स्वर्गात घेण्याची वेळ आली, त्याने यरुशलेमाला जाण्याचे ठरविले. 52 त्याने आपणांपुढे निरोपे पाठविले. ते गेले आणि येशूच्या येण्याविषयीच्या तयारीसाठी एका शोमरोनी खेड्यात गेले. 53 पण शोमरोन्यांनी येशूचा स्वीकार केला नाही, कारण तो यरुशलेमाकडे निघाला होता. 54 जेव्हा याकोब व योहान या शिष्यांनी पाहिले, तेव्हा ते म्हणाले, “प्रभु, स्वर्गातील अग्नीने येऊन त्यांचा नाश करावा यासाठी आम्ही आज्ञा करावी असे तुला वाटते काय?”

55 तेव्हा त्याने वळून त्यांना धमकावले. 56 आणि ते दुसऱ्या खेड्यात निघून गेले.

येशूला अनुसरणे(A)

57 ते रस्त्याने चातल जात असता कोणी तरी त्याला म्हणाले, “तू जेथे कोठे जाशील तेथे मी तुझ्यामागे येईन.”

58 तेव्हा येशू त्याला म्हणाला, “कोल्ह्यांना बिळे आहेत, आणि आकाशातील पक्ष्यांना घरटी आहेत, पण मनुष्याच्या पुत्राला डोकेसुध्दा टेकावयास जागा नाही.”

59 तो दुसऱ्या एकाला म्हणाला, “माझ्यामागे ये.”

पण तो मनुष्य म्हणाला, “पहिल्यांदा मला जाऊ दे आणि माझ्या वडिलांना पुरु दे.”

60 पण येशू त्याला म्हणाला, “मेलेल्यांना त्यांच्या मेलेल्यांना पुरु दे. तू जा आणि देवाच्या राज्याची घोषणा कर.”

61 दुसरा म्हणाला, “मी तुला अनुसरेन, प्रभु पण अगोदर मला माझ्या घरातील लोकांचा निरोप घेऊ दे.”

62 पण येशू त्यांस म्हणाला, “जो कोणी नांगराला हात घालतो व मागे पाहतो तो देवाच्या राज्यासाठी योग्य नाही.”

येशू बहात्तर पुरुषांना कामगिरीवर पाठवितो

10 या घटनांनंतर प्रभुने इतर बहात्तर जणांची [a] नेमणूक केली. आणि येशूने त्यांना जोडीजोडीने पाठविले. त्याला ज्या ठिकाणी जायचे होते त्या प्रत्येक गावात व ठिकाणी त्याने त्यांना पाठविले. तो त्यांना म्हणाला, “पीक फार आहे पण कामकरी थोडे आहेत. यास्तव पिकाच्या धन्याने त्याच्या पिकासाठी कामकरी पाठवावेत यासाठी प्रार्थना करा.

“जा! आणि लक्षात ठेवा, लांडग्यात जशी कोंकरे तसे मी तुम्हास या जगात पाठवीत आहे. थैली, पिशवी किंवा वहाणा बरोबर घेऊ नका, व रस्त्याने जाताना कोणाला सलाम करु नका. कोणत्याही घरात तुम्ही प्रवेश कराल तेव्हा पहिल्यांदा असे म्हणा, ‘या घरास शांति असो!’ जर तेथे शांतिप्रिय मनुष्य असेल तर तुमची शांति त्याच्यावर राहील, परंतु तो मनुष्य शांतिप्रिय नसेल तर तुमची शांति तुमच्याकडे परत येईल. त्या घरात तुम्हांला जे देतील ते खातपीत राहा. कारण कामकरी हा त्याच्या मजुरीस पात्र आहे. या घरातून त्या घरात असे घर बदलू नका.

“कोणत्याही नगरात तुम्ही प्रवेश कराल तेव्हा आणि जेव्हा ते तुमचे स्वागत करतील तेव्हा, तुमच्यासमोर जे वाढलेले असेल ते खा. तेथील रोग्यांना बरे करा आणि नंतर त्यांना सांगा की, ‘देवाचे राज्य लवकरच तुमच्याकडे येत आहे!’

10 “परंतु तुम्ही एखाद्या गावात प्रवेश कराल आणि त्यांनी जर तुमचे स्वागत केले नाही तर रस्त्यात जा आणि म्हणा. 11 ‘आमच्या पायाला लागलेली तुमच्या गावाची धूळदेखील आम्ही तुम्हांविरुद्ध झटकून टाकीत आहोत! तरीही हे लक्षात असू द्या की, देवाचे राज्य लवकरच तुमच्याकडे येत आहे.!’ 12 मी तुम्हांला सांगतो, त्या दिवशी त्या गावापेक्षा सदोमातील लोकांना सोपे जाईल.

स्तोत्रसंहिता 74

आसाफाचे मास्कील

74 देवा, तू आम्हाला कायमचाच सोडून गेलास का?
    देवा, तू तुझ्या माणसांवर अजूनही रागावलेला आहेस का?
तू खूप दिवसांपूर्वी ज्या लोकांना विकत घेतलेस त्यांची आठवण ठेव.
    तू आम्हाला वाचवलेस आता आम्ही तुझे आहोत.
ज्या सियोनाच्या डोंगरावर तू राहिलास त्याची आठवण तुला होते का?
देवा, ये आणि या प्राचीन अवशेषांमधून चाल.
    शत्रूंनी ज्या पवित्र जागेचा नाश केला तिथे परत ये.

शत्रूंनी मंदिरात युध्द गर्जना केल्या.
    ते युध्द जिंकले आहे हे दाखविण्यासाठी त्यांनी मंदिरात झेंडे फडकवले.
फावड्याने गवत कापणाऱ्यासारखे
    शत्रुचे सैनिक दिसत होते.
देवा, त्यांनी कुऱ्हाडीचा आणि हातोडीचा उपयोग करुन
    तुझ्या मंदिरातील कोरीव काम तोडून टाकले.
त्या सैनिकांनी तुझे पवित्र स्थान जाळून टाकले.
    तुझ्या नावाला गौरव प्राप्त करुन देण्यासाठी
    ते मंदिर बांधले होते पण त्यांनी ते मातीत मिळवले.
शत्रूंनी आमचा संपूर्ण नाश करायचे ठरवले.
    त्यांनी देशातील प्रत्येक पवित्र स्थान जाळून टाकले.
आम्हाला आमचे एकही चिन्ह दिसू शकले नाही.
    आता कोणी संदेष्टे राहिले नाही.
    कुणालाही काय करावे ते कळत नाही.
10 देवा, आणखी किती काळ शत्रू आमची चेष्टा करणार आहेत?
    तू त्यांना कायमचीच तुझ्या नावाचा अनादर करायची परवानगी देणार आहेस का?
11 देवा, तू आम्हाला इतकी मोठी शिक्षा का दिलीस?
    तू तुझी महान सत्ता वापरलीस आणि आमचा संपूर्ण नाश केलास.
12 देवा, तू खूप काळापासून आमचा राजा आहेस
    या देशात लढाया जिंकायला तू आम्हाला मदत केलीस.
13 देवा, लाल समुद्र दुभागण्यासाठी
    तू तुझ्या शक्तीचा उपयोग केलास.
14 समुद्रातल्या मोठ्या राक्षसांचा तू पराभव केलास लिव्याथानाचे डोके तू ठेचलेस
    आणि त्याचे शरीर प्राण्यांना खाण्याकरता ठेवून दिलेस.
15 तू नद्या नाल्यांना पाणी आणतोस
    आणि तूच नद्या कोरड्या करतोस.
16 देवा, तू दिवसावर आणि रात्रीवर नियंत्रण ठेवतोस.
    सूर्य आणि चंद्र तूच निर्माण केलेस.
17 पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट तूच सीमित केलीस.
    तूच उन्हाळा आणि हिवाळा निर्माण केलास.
18 देवा, या गोष्टींची आठवण ठेव.
    शत्रूंनी तुझा प्राण उतारा केला ते लक्षात असू दे.
    ती मूर्ख माणसे तुझ्या नावाचा तिरस्कार करतात.
19 त्या जंगली प्राण्यांना तुझे कबुतर घेऊ देऊ नकोस.
    तुझ्या गरीब माणसांना कायमचे विसरु नकोस.
20 आपला करार आठव या देशातील
    प्रत्येक अंधाऱ्या कोपऱ्यात हिंसा आहे.
21 देवा, तुझ्या माणसांना वाईट वागणुक मिळाली.
    त्यांना आणखी दु:ख होणार नाही असे पाहा.
    गरीब आणि असहाय्य लोक तुझी स्तुती करतात.
22 देवा, ऊठ! आणि युध्द कर!
    त्या मूर्खांनी तुला आव्हान दिले याची आठवण ठेव.
23 तुझ्या शत्रूंच्या आरोळ्या विसरु नकोस
    त्यांनी तुझा पुन्हा पुन्हा अपमान केला आहे.

नीतिसूत्रे 12:11

11 जो शेतकरी आपल्या शेतात कष्ट करतो त्याच्याकडे पुरेसे अन्न असते. पण जो माणूस फालतू गोष्टीत वेळ घालवतो तो मूर्ख असतो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center