Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 शमुवेल 1:4-20

एलकाना दर यज्ञाच्या वेळी पनिन्ना आणि तिची मुले यांना त्यांच्या वाटचे अन्न देई. हन्नालाही तो समान वाटा देई. परमेश्वराने तिची कूस उजवलेली नसतानाही तो देई, कारण हन्नावर त्याचे खरेखुरे प्रेम होते.

हन्नाचा पाण उतारा

पनिन्ना दर वेळी काहीतरी बोलून हन्नाला दु:खवी. मूलबाळ नसल्यावरुन दूषणे देई. असे दरवर्षी चालायचे. शिलो येथील परमेश्वराच्या मंदिरात सर्व कुटुंबीय जमले की पनिन्नाच्या बोलण्यामुळे हन्ना कष्टी होई. एकदा असेच एलकाना यज्ञ करीत असताना हन्ना दु:खीकष्टी होऊन रडू लागली. ती काही खाईना. एलकाना ते पाहून म्हणाला, “तू का रडतेस? तू का खात नाहीस? तू का दु:खी आहेस? तुला मी आहे-मी तुझा नवरा आहे. तू असा विचार कर की मी दहा मुलांपेक्षा अधिक आहे.”

हन्नाची प्रार्थना

सर्वांचे खाणे पिणे झाल्यावर हन्ना गूपचूप उठली आणि परमेश्वराची प्रार्थना करायला गेली. एली हा याजक तेव्हा परमेश्वराच्या पवित्रस्थानाच्या दरवाजाजवळ आपल्या आसनावर बसला होता. 10 हन्ना अतिशय खिन्न होती. परमेश्वराची प्रार्थना करताना तिला रडू कोसळले. 11 परमेश्वराला ती एक नवस बोलली. ती म्हणाली, “हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझे दु:ख तू बघतोच आहेस. माझा विसर पडू देऊ नकोस. तू मला मुलगा दिलास तर मी तो तुलाच अर्पण करीन. तो परमेश्वराचा नाजीर होईल. तो मद्यपान करणार नाही. त्याचे आम्ही जावळ काढणार नाही.”

12 हन्नाची प्रार्थना बराच वेळ चालली होती. त्यावेळी एलीचे तिच्या तोंडाकडे लक्ष होते. 13 ती मनोमन प्रार्थना करत होती त्यामुळे तिचे ओठ हलत होते पण शब्द बाहेर फुटत नव्हते. त्यामुळे ती दारुच्या नशेत आहे असे एलीला वाटले. 14 एली तिला म्हणाला, “तू फार प्यायलेली दिसतेस. आता मद्यापासून दूर राहा.”

15 हन्ना म्हणाली, “महाशय, मी कोणतेही मद्य घेतलेले नाही. मी अतिशय त्रासलेली आहे. परमेश्वराला मी माझी सर्व गाऱ्हाणी सांगत होते. 16 मी वाईट बाई आहे असे समजू नका. मी फार व्यथित आहे, मला फार दु:खं आहेत म्हणून मी खूप वेळ प्रार्थना करीत होते इतकंच.”

17 तेव्हा एली म्हणाला, “शांतीने जा. इस्राएलाच्या देवाकडे जे मागणे तू केले आहे ते तो तुला देवो.”

18 “तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात अशी आशा आहे.” असे त्याला म्हणून हन्ना निघाली. तिने नंतर थोडे खाल्लेही. आता तिला उदास वाटत नव्हते.

19 दुसऱ्या दिवशी पहाटे उठून परमेश्वराची भक्ती करुन एलकानाचे कुटुंबीय रामा येथे आपल्या घरी परतले.

शमुवेलचा जन्म

पुढे एलकाना आणि हन्नाचा संबंध आला तेव्हा परमेश्वराला तिचे स्मरण झाले. 20 यथावकाश तिला दिवस राहिले व मुलगा झाला. हन्नाने त्याचे नाव शमुवेल ठेवले. ती म्हणाली, “मी परमेश्वराकडे त्याला मागितले म्हणून त्याचे नाव शमुवेल.”

1 शमुवेल 2:1-10

हन्नाचे धन्यवाद

हन्नाने परमेश्वराला धन्यवाद देणारे गीत म्हटले;

“परमेश्वराबद्दल माझ्या मनात आनंद मावत नाही.
    त्याच्यामुळे मला सामर्थ्य आले [a]
माझ्या शत्रुंना मी हसते. [b]
    माझ्या विजयाचा मला आनंद आहे!

परमेश्वरासारखा पवित्र कोणी देव नाही.
    देवा, तुझ्यावाचून कोणी नाही.
    आमच्या देवासारखा अभेद्य दुर्ग दुसरा नाही.

लोकहो, बढाया मारु नका.
    गर्वाने बोलू नका.
कारण परमेश्वर सर्वज्ञ आहे.
    तोच लोकांचे नेतृत्व करतो आणि त्यांना न्याय देतो.
शूरांची धनुष्यं भंगतात
    आणि दुर्बळ लोक शक्तीशाली होतात.
पूर्वी ज्यांच्याकडे अन्नाधान्याचे मुबलक साठे होते
    त्यांना आज अन्नासाठी मोल मजुरी करावी लागत आहे.
आणि जे पूर्वी भुकेकंगाल होते
    ते आता आराम करत आहेत.
आजपर्यंत नि:संतान होती
    तिला आता सात मुलं आहेत.
पण मुलबाळ असलेली दु:खी आहे.
    कारण तिची मुलं तिच्यापासून लांब गेली आहेत.

परमेश्वर लोकांना मरण देतो
    आणि परमेश्वरच त्यांना जीवन देतो.
तोच अधोलोकाला नेतो
    आणि वरही आणतो.
परमेश्वरच काहीना दरिद्री तर
    काहींना श्रीमंत करतो.
काही लोकांना लाचार करतो
    तर काहींचा सन्मान परमेश्वरच करतो.
गरीबांना धुळीतून उचलून
    त्यांचे दु:ख हरण [c] त्यांचा गौरव करुन
त्यांना राजपुत्रांच्या बरोबरीने बसवतो,
    मानाचे स्थान देतो.
जगाची निर्मिती परमेश्वरानेच केली.
    सर्वजगावर त्याचीच सत्ता आहे. [d]

सज्जनांना तो आधार देतो.
    त्यांना लटपटू देत नाही.
पण दुर्जनांचा संहार करतो.
    त्यांना गर्तेत ढकलतो दुर्जनांचे बळ
    अशा वेळी कुचकामी ठरते.
10 शत्रूंचा तो नाश करुन
    त्याच्यावर गर्जेल.
दूरदूरच्या प्रदेशांचाही तो न्याय करील.
    राजाला सामर्थ्य देईल.
    आपल्या खास राजाला बलवान करील.”

इब्री लोकांस 10:11-14

11 प्रत्येक यहूदी याजक उभा राहतो आणि दररोज त्याची धार्मिक कामे करत असतो आणि ज्यामुळे पाप नाहीसे होत नाही असे यज्ञ तो वारंवार अर्पण करतो. 12 परंतु आपल्या पापांसाठी येशूने त्याच्या देहाचे एकमेव अर्पण केले. कारण ते सर्वकाळासाठी चांगले होते. तो आता देवाच्या उजवीकडे बसला आहे. 13 आणि आता त्याच्या शत्रूला त्याच्या पायाखाली घालीपर्यंत तो वाट पाहत आहे. 14 कारण अनंतकाळच्या त्याने केलेल्या एका यज्ञाच्या द्वारे त्याने ज्यांना शुद्ध केले, त्यांना परिपूर्ण केले.

इब्री लोकांस 10:15-18

15 पवित्र आत्माही याबाबत आपल्याला साक्ष देतो. पहिल्यांदा तो असे म्हणतो,

16 “त्या दिवसानंतर मी त्यांच्याशी हा करार करीन, अ
    से प्रभु म्हणतो,
मी माझे नियम त्यांच्या अंतःकरणात ठेवीन
    आणि ते त्यांच्या मनावर लिहीन.” (A)

17 मग तो म्हणतो,

“आणि मी त्यांची पापे
    व नियमविरहित कृत्ये कधीही आठवणार नाही.” (B)

18 जेथे या पापांची क्षमा झाली आहे, तेथे पापाच्या आणखी अर्पणाची आवश्यकता भासणार नाही.

इब्री लोकांस 10:19-25

देवाच्या जवळ या

19 म्हणून बंधु आणि भगिनींनो, येशूच्या रक्ताद्वारे आपण बिनधास्तपणे परमपवित्र स्थानामध्ये प्रवेश करतो. 20 त्याच्या शरीराद्वारे, त्याने उघडलेल्या नवीन आणि जिवंत अशा मार्गामुळे आपण न भीता परमपवित्र स्थानात पाऊल ठेवू शकतो. 21 आणि देवाच्या घराण्यावर आपल्याला महान असा मुख्य याजक मिळाला आहे. 22 म्हणून आपण आपली मळीन विवेकबद्धि शुद्ध करण्यासाठी आपल्या मनावर केलेल्या येशूच्या रक्तसिंचनाने आणि आपली शरीरे पवित्र पाण्याने धुतल्याने आपण विश्वास, आश्वासन तसेच तळमळ यांनी भरलेल्या अंतःकरणाने देवाच्या जवळ जाऊ. 23 आपल्याला जी आशा आहे तिला आपण चिकटून राहू कारण ज्याने आपल्याला अभिवचन दिले, तो विश्वासू आहे.

Help Each Other Be Strong

24 आपण एकमेकांस समजून घेऊ व प्रेम आणि चांगली कामे करण्याकरिता एकमेकांना उत्तेजन देऊ. 25 आणि काही जणांना जी वाईट सवय असते तसे आपण एकत्र येण्याचे बंद करू नये, परंतु एकमेकांना उत्तजेन देऊ या, आणि तो दिवस [a] जवळ येत असताना तसे उत्तेजन देण्याची अधिकच गरज आहे.

मार्क 13:1-8

मंदिराचा भावी विध्वंस(A)

13 येशू मंदिरातून निघून जात असता त्याच्या शिष्यांपैकी एक जण त्याला म्हणाला, “गुरूजी, पाहा, खूप मोठ्या दगडांनी बांधलेली या मंदिराची इमारत किती सुंदर आहे.”

येशू त्याला म्हणाला “तू या मोठ्या इमारती पाहतोस ना? येथील एकही दगड दुसऱ्या दगडावर राहणार नाही. त्यातील प्रत्येक खाली पडला जाईल.”

येशू मंदिरासमोरच्या जैतुनाच्या डोंगरावर बसला होता. पेत्र, याकोब, योहान आणि अंद्रिया यांनी त्याला एकांतात विचारले, “या गोष्टी केव्हा घडतील हे आम्हांस सांगा. आणि या गोष्टी पूर्ण होण्याची वेळ येईल तेव्हा कोणते चिन्ह घडेल?”

नंतर येशू त्यांना सांगू लागला, “तुम्हांला कोणी फसवू नये म्हणून सावध राहा. पुष्कळ लोक माझ्या नावाने येतील व म्हणतील की, ‘मी तोच आहे’ आणि ते पुष्काळांना फसवतील. जेव्हा तुम्ही लढायाविषयी आणि लढायांच्या आफवांविषयी ऐकाल तेव्हा घाबरू नका. हे निश्चितपणे घडाणारच आहे. पण एवढ्याने शेवट होणार नाही. एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल, एक राज्य दुसऱ्या राज्यावर उठेल, निरनिराळ्या ठिकाणी धरणीकंप होतील आणि दुष्काळ होतील. पण या गोष्टी म्हणजे नाशाची सुरूवात आहे.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center