Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 18:20-30

20 मी निरपराध असल्यामुळे परमेश्वर मला माझे बक्षीस देईल
    मी काही चूक केली नाही म्हणून तो माझ्यासाठी चांगल्या गोष्टी करेल.
21 का? कारण मी परमेश्वराची आज्ञा पाळली
    मी माझ्या देवाविरुध्द पाप केले नाही.
22 परमेश्वराच्या सर्व निर्णयांची मी नेहमी आठवण ठेवतो.
    मी त्याचे नियम पाळतो.
23 मी त्याच्या समोर स्वत:ला शुध्द आणि निरपराध राखले.
    मी वाईट गोष्टींपासून स्वतला राखले.
24 म्हणून परमेश्वर मला माझे फळ देईल.
    का? कारण मी निरपराध आहे.
देव पाहातो की मी काहीच चूक करीत नाही म्हणून
    तो माझ्यासाठी चांगल्या गोष्टी करील.

25 परमेश्वरा, जर एखादा माणूस तुझ्यावर खरोखरच प्रेम करत असेल तर तू त्याला तुझे खरे प्रेम दाखवशील.
    जर एखादा माणूस तुझ्याशी खरा वागला तर तू देखील त्याच्याशी खरा वागशील.
26 परमेश्वरा, जे लोक चांगले आणि शुध्द असतात त्यांच्याशी तू चांगला
    आणि शुध्द असतोस परंतु अगदी नीच आणि कुटिल असणाऱ्यांना तू नामोहरण करतोस.
27 परमेश्वरा, तू दीनांना मदत करतोस,
    पण तू गर्विष्ठांना खाली पाहायला लावतोस.
28 परमेश्वरा, तू माझा दिवा लावतोस
    देव माझ्या भोवतालचा अंधार उजळतो.
29 परमेश्वरा, तुझ्या मदतीने मी सैनिकांबरोबर पळू शकतो.
    देवाच्या मदतीने मी शत्रूच्या भिंतीवर चढू शकतो.

30 देवाची शक्ती परिपूर्ण आहे.
    परमेश्वराच्या शब्दांची परीक्षा घेतली गेली आहे.
    जे त्याच्यावर विश्वास टाकतात त्यांचे तो रक्षण करतो.

रूथ 3:8-18

मध्यरात्रीच्या सुमाराला बवाज झोपेतच कुशीवर वळला आणि जागा झाला. आपल्या पायाजवळ एका बाईला पाहून तो डचकला. ती कोण, काय हे त्याने विचारले.

ती म्हणाली, “मी रूथ तुमची दासी. तुम्ही आपले पंख माझ्यावर पसरा [a] तुम्हीच माझे त्राते [b] आहात.”

10 तेव्हा बवाज म्हणाला, “परमेश्वर तुझे भले करो. माझ्यावर तुझ्या प्रेमाची पाखर तू घातली आहेस. तू नामीशी आधी वागलीस त्यापेक्षाही भलेपणाने तू माझ्याशी वागते आहेस. तू तूझ्या जोगा गरीब, श्रीमंत अशा कोणत्याही तरूण मनुष्याबरोबर गेली असतीस. पण तू तसे केले नाहीस. 11 तेव्हा आता घाबरू नकोस. तू म्हणशील तसे मी करतो. तू एक चांगली बाई आहेस हे गावातील लोकांना ठाऊक आहे. 12 शिवाय, मी तुमचा जवळचा नातलग आहे हेही खरे. पण माझ्याहीपेक्षा जवळचा असा तुमचा एक आप्त आहे. 13 आजची रात्र तू इथेच राहा. तो तुला मदत करतो का ते मी सकाळी त्याला विचारून बघतो. तो तयार झाला तर उत्तमच. पण त्याने नकार दिला तर परमेश्वरची शपथ मी तुझ्याशी लग्न करीन. अलीमलेखची गेलेली जमीन तुम्हाला परत मिळवून देईन [c] तेव्हा सकाळपर्यंत इथेच थांब.”

14 त्याप्रमाणे रूथ सकाळपर्यंत बवाजच्या पायाजवळ पडून राहिली. फटफटायच्या आधीच अजून अंधार असतानाच लोक एकमेकांना ओळखायला लागण्यापूर्वीच ती उठली.

बवाज तिला म्हणाला, “कालची रात्र तू इथे होतीस हे कोणाला कळू द्यायचे नाही.” 15 पुढे तो म्हणाला, “तू पांघरलेला रूमाल काढ आणि समोर पसर.”

तिने तो पसरल्यावर त्याने एक बुशेल माप सातू त्यात टाकले. तिच्या सासूसाठी ती भेट होती. नीट गाठोडे बांधून त्याने ते तिच्या हवाली केले.मग तो शहरात निघून गेला.

16 रूथ सासूकडे गेली. सासूने दाराशी येऊन कोण आहे ते पाहिले.

रूथने घराते येऊन बवाज बरोबर जे जे घडले ते सांगितले. 17 ती म्हणाली, “त्याने तुमच्यासाठी भेट म्हणून हे सातू दिले आहे. रिकाम्या हाताने तुमच्याकडे यायचे नाही असे त्याने मला बजावले.”

18 नामी म्हणाली, “मुली, पुढे काय होणार आहे हे आपल्याला कळेपर्यंत धीर धर. अंगावर घेतलेले काम पार पडेपर्यंत तो स्वस्थ बसणार नाही. दिवस मावळायच्या आतच काय ते आपल्याला कळेल.”

योहान 13:31-35

येशू त्याच्या मरणाविषयी बोलतो

31 तो गेल्यावर येशू म्हणाला, “आता मनुष्याच्या पुत्राचे गौरव झाले आहे आणि त्याच्याठायी देवाचे गौरव झाले आहे. 32 देव आपल्याठायी त्याचे गौरव करील. तो त्याचे गौरव लवकर करील.”

33 “माझ्या मुलांनो, अजून थोडा वेळ मी तुमच्याबरोबर आहे. तुम्ही माझा शोध कराल आणि जसे मी यहूद्यांस सांगितले की, जेथे मी जातो तेथे तुमच्याने येता येणार नाही, तसेच मी तुम्हांलाही आता सांगतो.

34 “मी तुम्हांला नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीति करा. जशी मी तुम्हांवर प्रीति केली आहे तशीच तुम्हीही एकमेकांवर प्रीति करा. 35 तुमची एकमेकांवर प्रिति असली तर सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center