Revised Common Lectionary (Semicontinuous)
वर मंदिरांत जाण्याच्या वेळचे स्तोत्र.
120 मी संकटात होतो, मी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली
आणि त्याने मला वाचवले.
2 परमेश्वरा, माझ्याविषयी खोट बोलणाऱ्या लोकांपासून मला वाचव.
त्या लोकांनी खऱ्या नसलेल्या गोष्टी सांगितल्या.
3 खोटारड्यांनो तुम्हाला काय मिळणार आहे ते माहीत आहे का?
त्यापासून तुमचा काय फायदा होणार आहे ते तुम्हाला माहीत आहे का?
4 सैनिकाचे अणकुचीदार बाण आणि
जळते निखारे तुम्हाला शिक्षा म्हणून मिळतील.
5 खोटारड्यांनो, तुमच्याजवळ राहाणे म्हणजे मेशेखात राहाण्यासारखे आहे,
केदारच्या तंबून राहाण्यासारखे आहे
6 शांतीचा तिरस्कार करणाऱ्या लोकांजवळ
मी खूप काळ राहिलो आहे.
7 मी म्हणालो, मला शांती हवी,
म्हणून त्यांना युध्द हवे आहे.
11 योशीयाचा मुलगा शल्लूम (यहोआहाज) ह्याच्याबद्दल परमेश्वर असे म्हणतो: (राजा योशीया यांच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा शल्लूम यहूदाचा राजा झाला) “यहोआहाज यरुशलेम सोडून दूर गेला आहे. तो पुन्हा यरुशलेममध्ये येणार नाही. 12 मिसरच्या लोकांनी यहोआहाजला पकडून नेले आहे. तो तेथेच मरेल. त्याला परत ही भूमी दिसणार नाही.”
राजा यहोयाकीमविरुद्ध निवाडा
13 राजा यहोयाकीमचे वाईट होईल.
तो वाईट गोष्टी करीत आहे.
आपला महाल तो बांधू शकेल.
लोकांना फसवून त्यावर माड्या चढवू शकेल.
तो लोकांना काहीही न देता त्यांच्याकडून काम करवून घेतो, त्यांना कामाची मजुरी देत नाही.
14 यहोयाकीम म्हणतो,
“मी माझ्यासाठी मोठा वाडा बांधीन.
त्याला खूप मोठे मजले असतील.”
तो मोठ्या खिडक्या असलेले घर बांधतो.
तो तक्तपोशीसाठी गंधसरु वापरतो आणि तक्तपोशीला लाल रंग देतो.
15 यहोयाकीम, तुझ्या घरात खूप गंधसरु आहे
म्हणून त्यामुळे काही तू मोठा राजा होत नाहीस.
तुझे वडील योशीया अन्नपाण्यावरच समाधानी होते.
त्यांनी फक्त योग्य व न्याय्य गोष्टीच केल्या.
त्यांच्या ह्या कृत्यांमुळे त्यांच्याबाबतीत सर्व सुरळीत झाले.
16 योशीयाने गरीब व गरजू अशा लोकांना मदत केली.
त्यामुळे त्यांचे सर्व व्यवस्थित झाले.
यहोयाकीम, “देवाला ओळखणे ह्याचा अर्थ काय?”
ह्याचा अर्थ योग्य रीतीने जगणे व न्यायीपणाने वागणे.
मला ओळखणे ह्याचा अर्थ हाच होय.
हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
17 “यहोयाकीम, तुला फक्त तुझा फायदाच दिसतो.
तू तुझ्यासाठी जास्तीत जास्त मिळविण्याचाच फक्त विचार करतोस.
निरापराध्यांना ठार मारण्यात व
दुसऱ्याकडून वस्तू चोरण्यातच तुझे मन जडले असते.”
येशू परुश्यांवर टीका करतो(A)
37 जेव्हा येशूने आपले बोलणे संपविले तेव्हा एका परुश्याने त्याला आपलल्याबरोबर जेवायला बोलाविले. तो आत गेला आणि आपल्या जागी रेलून बसला. 38 परंतु त्याने जेवणापूर्वी हात धुतले नाहीत हे पाहून परुश्याला फार आश्चर्य वाटले. 39 तेव्हा प्रभु त्याला म्हणाला, “तुम्ही परुशी प्याला व ताट बाहेरुन स्वच्छ करता पण तुम्ही आतून अधाशीपणाने व फसवणुकीच्या दुष्टतेने भरले आहात. 40 तुम्ही मूर्ख लोक! ज्याने बाहेरील बाजू बनवली तो आतली बाजू बनवणार नाही का? 41 पण जे आतमध्ये आहे, ते गरीबांना द्या. आणि नंतर सर्व काही तुमच्यासाठी स्वच्छ होईल.
42 “परुश्यांनो तुम्हाला धिक्कार असो कारण तुम्ही पश्चात्ताप करता व पुदिन्याचा व प्रत्येक वनस्पतीचा दशांश देता. परंतु तुम्ही न्याय आणि देवाविषयीचे प्रेम याकडे दुर्लक्ष करता. तुम्ही या गोष्टी प्रथम काराव्यात व मुख्य गोष्टींकडे दुर्लक्ष करु नये.
43 “परुश्यांनो तुमचा धिक्कार असो, कारण तुम्हांला सभास्थानातील महत्त्वाच्या जागी बसणे आणि बाजारात नमस्कार घेणे आवडते. 44 तुमचा धिक्कार असो कारण तुम्ही खुणा न केलेल्या कबरांसारखे आहात, अशा कबरांवर लोक नकळत पाय देऊन चालतात.”
45 नियमशास्त्राचा एक शिक्षक येशूला म्हणाला, “गुरुजी, तुम्ही असे बोलता तेव्हा तुम्ही आमचासुद्धा अपमान करता.”
46 तेव्हा येशू म्हणाला, “नियमशास्त्राच्या शिक्षकांनो तुमचाही धिक्कार असो, कारण तुम्ही लोकांना वाहण्यास कठीण असे ओझे लादता व ते उचलण्यास तुमच्या एका बोटानेसुद्धा मदत करीत नाही. 47 तुमचा धिक्कार असो, कारण तुमच्या पूर्वजांनी ठार केलेल्या भविष्यवाद्यांसाठी तुम्ही कबरा बांधता. 48 अशा प्रकारे तुमच्या पूर्वजांनी केलेल्या कृत्यांचे समर्थन करता. 49 यामुळे देवाचे ज्ञानसुद्धा असे म्हणाले, ‘मी प्रेषित व संदेष्टे त्यांच्याकडे पाठवीन. त्यांपैकी काही जणांना ते ठार मारतील व काही जणांचा ते छळ करतील!’
50 “तेव्हा या पिढीस भविष्यवाद्यांचे जे रक्त जगाच्या प्रारंभापासून सांडले गेले त्याबद्दल दंड भरुन द्यावा लागेल. 51 म्हणजे हाबेलाच्या रक्तापासून ते जखऱ्या जो देवाचे मंदिर व वेदी यांच्यामध्ये मराला गेला. खरोखर मी तुम्हांस सांगतो या पिढिला ते भरुन द्यावे लागेल.
52 “नियमशास्त्राच्या शिक्षकांनो तुमचा धिक्कार असो. कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली काढून घेतली आहे. तुम्ही स्वतःही आत गेला नाहीत आणि जे आत जाण्याचा प्रयत्न करत होते, त्यांनाही जाऊ दिले नाही.”
2006 by World Bible Translation Center