Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 115

115 परमेश्वरा, आम्हाला कुठलाही सन्मान मिळायला नको.
    सन्मान तुझा आहे, तुझ्या प्रेमामुळे आणि
    आमच्या तुझ्यावर असलेल्या विश्वासामुळे सन्मान तुझा आहे.
आमचा देव कुठे आहे,
    याचा राष्ट्रांना का विचार पडावा?
देव स्वर्गात आहे
    आणि त्याला हवे ते तो करतो.
त्या देशांचे “देव” सोन्या चांदीचे नुसते पुतळे आहेत.
    कुणीतरी केलेले ते नुसते पुतळे आहेत.
त्या पुतळ्यांना तोंड आहे पण बोलता येत नाही.
    त्यांना डोळे आहेत पण बघता येत नाही.
त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही,
    त्यांना नाक आहे पण वास घेता येत नाही.
त्यांना हात आहेत पण हाताने स्पर्श करत नाही.
    त्यांना पाय आहेत पण चालता येत नाही
    आणि त्यांच्या घशातून कुठलाही आवाज येत नाही.
ज्या लोकांनी असे पुतळे केले आणि त्यावर जे विश्वास ठेवतात
    ते त्या पुतळ्यांसारखेच होतात.

इस्राएलच्या लोकांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा.
    परमेश्वरच त्यांची शक्ती आणि ढाल आहे.
10 अहरोनच्या कुटुंबा, परमेश्वरावर विश्वास ठेव.
    परमेश्वरच त्यांची शक्ती आणि ढाल आहे.
11 परमेश्वराच्या भक्तांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा.
    परमेश्वराच त्यांची शक्ती आणि ढाल आहे.

12 परमेश्वर आमची आठवण ठेवतो.
    परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देईल.
परमेश्वर इस्राएलला आशीर्वाद देईल.
    परमेश्वर अहरोनच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल.
13 परमेश्वर त्याच्या लहान आणि
    मोठ्या भक्तांना आशीर्वाद देईल.

14 परमेश्वर तुला आणि तुझ्या मुलांना अधिकाधिक आशीर्वाद देईल.
    अशी मी आशा करतो.
15 परमेश्वरानेच स्वर्ग व पृथ्वी निर्माण केली
    आणि परमेश्वर तुमचे स्वागत करतो.
16 स्वर्ग परमेश्वराचा आहे.
    पण त्यांने लोकांना पृथ्वी दिली.
17 मृत लोक परमेश्वराची स्तुती करीत नाहीत.
    जे लोक खाली थडग्यात आहेत ते परमेश्वराची स्तुती करीत नाहीत.
18 पण आता आम्ही परमेश्वराला धन्यवाद देतो
    आणि आम्ही त्याला सदैव धन्य मानू.

परमेश्वराची स्तुती करा.

यशया 8:1-15

अश्शूर लवकरच येईल

परमेश्वर मला म्हणाला, “एक मोठी गुंडाळी घे आणि टाकाने त्यावर पुढील शब्द लिही, ‘महेर-शालाल-हाश-बज.’ (याचा अर्थ: ‘लवकरच येथे लूटालूट व चोऱ्या होतील.’)”

साक्षीदार म्हणून विश्वास टाकता येईल अशा काही लोकांना मी गोळा केले. (ते होते उरिया हा याजक व यबरेख्याचा मुलगा जखऱ्या) त्यांच्या समोरच मी लिहिले. नंतर मी संदेष्ट्रीशी समागम केला. ती गर्भवती होऊन तिला पुत्र झाला. “परमेश्वराने मला त्याचे नाव “महेर-शालाल-हाश-बज” असे ठेवण्यास सांगितले. कारण तो मुलगा “आई-बाबा” असे बोलायला लागण्यापूर्वीच देव दमास्कसची व शोमरोनची सर्व धनसंपत्ती काढून अश्शूरच्या राजाला देईल.

पुन्हा एकदा परमेश्वर माझ्याशी बोलला. माझा प्रभु, म्हणाला, “हे लोक संथ वाहणारे शिलोहाचे पाणी नाकारतात. ते रसीन व रमाल्याचा पुत्र (पेकह) यांच्या सहवासात आनंद मानतात.” पण मी, परमेश्वर, अश्शूरच्या राजाला त्याच्या सर्व शक्तीनीशी तुमच्यावर आक्रमण करण्यास भाग पाडीन. युफ्राटिस नदीच्या लोंढ्याप्रमाणे ते येतील. पुराचे पाणी चढत जाऊन नदीच्या किनाऱ्यावरून बाहेर ओसंडून वाहते तसेच ते येतील. नदीचा काठ ओलांडून बाहेर पसरलेल्या पाण्याप्रमाणे अश्शूरचे सैन्य सर्व यहुदाभर पसरेल. ते यहुदाच्या गळ्यापर्यंत चढेल व जवळजवळ यहुदाला बुडवून टाकील.

इम्मानुएल, हे पुराचे पाणी सर्व देशाला व्यापेपर्यंत पसरत राहील.

सर्व राष्ट्रांनो, युध्दा्ची तयारी करा,
    तुम्ही पराभूत व्हाल,
दुरवरच्या सर्व देशांनो, ऐका!
    लढाईची तयारी करा,
    तुमचा पराभव होईल.
10 लढण्याचे बेत करा,
    ते सिध्दी्स जाणार नाहीत.
तुम्ही तुमच्या सैन्याला हुकूम करा,
    पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही.
    का? कारण देव आमच्या पाठीशी आहे.

यशयाला इशारा

11 परमेश्वर माझ्याशी त्याच्या महान सामर्थ्यानिशी बोलला मी ह्या लोकांच्या मार्गाने जाऊ नये. असे परमेश्वराने मला बजावले. परमेश्वर म्हणाला, 12 “दुसरे त्यांच्याविरूध्द् कट करीत आहेत, असे ते म्हणत आहेत. तू त्या गोष्टींवर विश्वास ठेवू नकोस, ज्या गोष्टींना हे लोक घाबरतात, त्या गोष्टींना घाबरू नकोस. त्या गोष्टींची मुळीच भीती बाळगू नकोस.”

13 सर्वशक्तिमान परमेश्वर हाच असा आहे की त्याचे भय मानावे. त्याचाच फक्त आदर करावा. त्यालाच फक्त पवित्र मानावे. 14 तु जर परमेश्वराचा मान राखलास, तो पवित्र आहे असे मानलेस, तर तो तुला अभय देईल, पण जर तू त्याचा अनादर केलास, तर देव रस्त्यावरील दगडाप्रमाणे होईल आणि तुम्ही लोक त्यावर ठेचकाळून पडाल. इस्राएलच्या दोन घराण्यांना तो दगड अडखळवतो. यरूशलेमच्या सर्व लोकांचा परमेश्वरच सापळा आहे. 15 (पुष्कळ माणसे ह्याच अडथळ्याला अडखळून पडतील व त्यांची हाडे मोडतील. ते सापळ्यात अडकतील व पकडले जातील.)

लूक 5:27-32

लेवी येशूमागे जातो(A)

27 यानंतर येशू बाहेर गेला आणि त्याने लेवी नावाच्या जकातदाराला जकात नाक्यावर बसलेले पाहिले, येशू त्याला म्हणाला, “माइया मागे ये!” 28 लेवी सर्व काही तेथेच सोडून उठला आणि त्याच्या मागे गेला.

29 नंतर लेवीने त्याच्या घरी येशूसाठी मोठी मेजवानी दिली. जकातदारांचा आणि इतर लोकांचा मोठा जमाव त्याच्याबरोबर जेवत होता. 30 परुशी आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांनी त्याच्या शिष्यांकडे तक्रार केली, ते म्हणाले, “तुम्ही जकातदार आणि पापी लोकांबरोबर का जेवता?”

31 येशू त्यांना म्हणाला, “जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नाही, पण जे रोगी आहेत, त्यांना वैद्याची गरज आहे. 32 मी धार्मिकांस नाही तर पाप्यांस पश्चाताप करण्यासाठी बोलावण्यास आलो आहे.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center