Revised Common Lectionary (Semicontinuous)
वर मंदिरांत जाण्याच्या वेळेचे स्तोत्र.
121 मी वर डोंगरांकडे बघतो.
पण माझी मदत खरोखर कुठून येणार आहे?
2 माझी मदत परमेश्वराकडून,
स्वर्ग व पृथ्वी यांच्या निर्मात्याकडून येणार आहे.
3 देव तुला खाली पडू देणार नाही.
तुझा पाठीराखा झोपी जाणार नाही.
4 इस्राएलचा पाठीराखा झोपाळू होत नाही.
देव कधीही झोपत नाही.
5 परमेश्वर तुझा पाठीराखा आहे
तो त्याच्या महान शक्तीने तुझे रक्षण करतो.
6 दिवसा सूर्य तुला दु:ख पोहोचवणार नाही.
आणि रात्री चंद्र तुला इजा करणार नाही.
7 परमेश्वर तुझे प्रत्येक संकटापासून रक्षण करील.
परमेश्वर तुझ्या आत्म्याचे रक्षण करील.
8 परमेश्वरा तुला जाण्या-येण्यात मदत करील.
परमेश्वर तुला आता मदत करील आणि सदैव मदत करत राहील.
26 त्या वाडग्यावर काहीतरी होते. ते सिंहासनाप्रमाणे दिसत होते. ते इंद्रनीलाप्रमाणे गर्द निळे होते. त्यावर माणसाप्रमाणे दिसणारी आकृती बसलेली होती. 27 मी त्याचा कमरेवरचा भाग पाहिला. तो तप्त धातू प्रमाणे दिसत होता. त्याच्या भोवती आगीचा लोळ असल्याप्रमाणे दिसत होते. मी त्याच्या कमरेखालच्या भागाकडे पाहिले. तो आगीप्रमाणे दिसत होता. त्याच्या सभोवती प्रभा फाकली होती. 28 त्याच्या भोवती फाकलेले तेज इंद्रधनुष्याप्रमाणे होते. ते परमेश्वराच्या वैभवाच्या तेजाप्रमाणे दिसत होते. म्हणून मी ते पाहाताच जमिनीवर पालथे पडून, मस्तक टेकवून वंदन केले. त्या नंतर, माझ्याशी कोणीतरी बोलत असल्याचे मला ऐकू आले.
2 तो आवाज म्हणाला, “मानवपुत्रा उठ मी तुझ्याशी बोलणार आहे.”
राजा अग्रिप्पापुढे पौल
26 अग्रिप्पा पौलाला म्हणाला, “तुला तुझी बाजू मांडायला परवानगी आहे.” यावर पौलाने आपला हात उंच करुन आपल्या बचावाचे भाषण सुरु केले: 2 “अग्रिप्पा महाराज, मी स्वतःला धन्य समजतो कारण मला आपल्यासमोर माइयाविरुद्ध केलेल्या आरोपांचा बचाव करण्याची संधि आज मिळाली. 3 विशेषतः यहूदी चालीरीति आणि प्रश्न इत्यादी गोष्टींची आपणांला चांगल्या प्रकारे माहिती असल्याने तर हे जास्तच खरे म्हणावे लागेल. तेव्हा आपण माझे बोलणे धीराने ऐकून घ्यावे अशी मी विनंति करतो.
4 “मी माझे जीवन तरुणपणापासून माइया प्रांतात व यरुशलेमात कशा रीतिने जगत आलो हे सर्व यहूदी लोकांना चांगले माहीत आहे. 5 ते मला बऱ्याच काळापासून ओळखतात. आणि त्यांची इच्छा असेल तर मी एक परुशी म्हणजे आमच्या यहूदी धर्माच्या एका कट्टर गटाचा सभासद या नात्याने कसा जगत आलो याविषयी ते साक्ष देऊ शकतील. 6 आता मी आमच्या वाडवडिलांना देवाने जे वचन दिले होते, त्याच्या आशेकरिता माझा न्याय व्हावा याशाठी येथे उभा आहे. 7 आपल्या देवाची रात्रंदिवस कळकळीने उपासना करीत असताना हे जे वचन देवाने दिले ते पुरे होण्याची आशा आमच्या बाराही वंशाना वाटत आहे. या आशेमुळेच महाराज, यहूदी लोक माझ्यावर दोषारोप करीत आहेत. 8 देव मेलेल्यांना परत उठवितो, असे तुमच्यापैकी कित्येकांना विश्वास न ठेवण्यासारखे का वाटावे.
9 “नासरेथच्या येशूच्या नावाविरुद्ध जे जे काही करता येईल ते ते मी करावे असे मलादेखील वाटत होते. 10 आणि नेमके हेच मी यरुशलेम येथे केले. कारण मुख्य याजकांकडून मला तसा अधिकार मिळाला होता. म्हणून मी देवाच्या अनेक संतांना तुरुंगात टाकले, आणि हे जे संतगण जिवे मारले गेले, त्यांच्याविरुद्ध मी माझे मत नोंदविले. 11 अनेक सभास्थानात मी त्यांना शिक्षा केली. आणि देवाविरुद्ध जबरीने वाईट भाषण करायला लावण्याचा मी प्रयत्न केला, या लोकांवरील माझा राग इतक्या पराकोटीला गेला होता की, मी त्यांचा छळ करण्याकरिता इतर शहरांमध्ये देखील जात असे.
येशूचे दर्शन झाल्याचे पौल सांगतो
12 “एकदा दिमिष्क शहराला जाण्यासाठी मुख्य याजकांनी मला अधिकार व परवानगी दिली तेव्हा महाराज, 13 वाटेत भर दुपारच्या वेळी मी माइया व माझ्यासमवेत असणाऱ्यांच्या भोवती स्वर्गीय प्रकाश फाकलेला पाहिला. तो प्रकाश सूर्यापेक्षाही जास्त प्रखर होता. 14 आम्ही सर्व खाली जमिनीवर पडलो आणि हिब्रू भाषेत माइयाशी बोलताना एक वाणी मी ऐकली. ती वाणी म्हणाली, ‘शौला, शौला, माझा छळ तू का करतोस? अणुकुचीदार काठीवर लाथ मारणे तुला हानिकारक आहे,’
15 “आणि मी म्हणालो, ‘प्रभु, तू कोण आहेस?’
“प्रभूने उत्तर दिले, ‘मी येशू आहे, ज्याचा तू छळ करीत आहेस. 16 पण ऊठ आणि उभा राहा! या कारणांसाठी मी तुला दर्शन दिले आहे: तुला सेवक म्हणून नेमावे व जे काही तुला दाखविले व जे दाखवीन त्याचा साक्षीदार म्हणून तुला नेमावे. 17 मी तुझी यहूदी व यहूदीतर विदेशी यांच्यापासून सुटका करीन. आणि यहूदीतर विदेशी लोकांकडे पाठवीन. 18 यासाठी की, त्यांचे डोळे उघडावे व याविषयीचे सत्य काय आहे हे तू लोकांना दाखवून द्यावेस व त्यामुळे त्यांना त्यांच्या पापांची क्षमा मिळेल आणि माइयामध्ये विश्वासामुळे पवित्र झालेल्या लोकांमध्ये जागा मिळेल.’”
2006 by World Bible Translation Center