Readings for Lent and Easter
3 आम्ही ती गोष्ट ऐकली आणि आम्हाला ती चांगली माहीत आहे.
आमच्या वाडवडिलांनी आम्हाला ती गोष्ट सांगितली होती.
4 आणि आम्ही ती विसरणार नाही.
आमचे लोक शेवटच्या पिढीपर्यंत ती गोष्ट सांगत राहातील.
आम्ही परमेश्वराची स्तुती करु
आणि त्याने केलेल्या अद्भुत गोष्टीबद्दल सांगत राहू.
5 परमेश्वराने याकोबा बरोबर करार केला.
देवाने इस्राएलला कायदा दिला.
देवाने आमच्या पूर्वजांना आज्ञा दिल्या.
त्याने आमच्या पूर्वजांना त्यांच्या वंशजांना नियम शिकवायला सांगितला.
6 नवीन मुले जन्माला येतील, तीच पुढे मोठी होतील आणि ती त्यांच्या मुलांना गोष्टी सांगतील
या प्रमाणे लोकांना अगदी शेवटच्या पिढीपर्यंत नियम समजेल.
7 म्हणून ते सगळे लोक देवावर विश्वास ठेवतील.
देवाने जे केले ते ते विसरणार नाहीत.
ते अत्यंत सावधगिरीने त्याच्या आज्ञा पाळतील.
8 जर लोकांनी त्यांच्या देवाच्या आज्ञा त्यांच्या मुलांना शिकविल्या तर ती मुले त्यांच्या पूर्वजांसारखी होणार नाहीत.
त्यांचे पूर्वज देवाविरुध्द गेले.
त्यानी देवाच्या आज्ञा पाळायचे नाकारले.
ते लोक फार हट्टी होते ते देवाच्या आत्म्याशी प्रामाणिक नव्हते.
2006 by World Bible Translation Center