Daily Reading for Personal Growth, 40 Days with God
2 जागे व्हा! जे उरलेले आहेत आणि मरणाच्या ह्यामार्गावर आहेत त्यांना मजबूत करा. कारण माझ्या देवाच्या दृष्टीने तुमची कृत्ये पूर्ण झाल्याचे मला आढळले नाही. 3 म्हणून लक्षात ठेवा, जे तुम्हाला प्राप्त झालेले आहे आणि जे तुम्ही ऐकले आहे त्याप्रमाणे वागा. आणि पश्चात्ताप करा. पण जर तुम्ही जागे होत नाही, तर मी एखाद्या चोरासारख येईन आणि तुम्हाला हे कळणार नाही की मी नेमक्या कोणत्या वेळेला तुमच्याकडे येईन.
4 “तरी तुमच्यात थोडे लोक आहेत जे सार्दीसमध्ये आहेत ज्यांनी स्वतःला स्वच्छ राखले आहे. ते लोक माझ्याबरोबर चालतील. ते पांढरी वस्त्रे घालतील कारण ते पात्र आहेत. 5 प्रत्येक व्यक्ति जी विजय मिळविते, ती त्यांच्यासारखी पांढरी वस्त्रे परिधान करील. मी त्या व्यक्तीचे नाव जीवनाच्या पुस्तकातून काढणार तर नाहीच पण माझ्या पित्यासमोर व त्याच्या देवदूतांसमोर त्याचे नाव स्वीकारीन,
2006 by World Bible Translation Center