Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी तंतुवाद्यावरचे दावीदाचे मास्कील
55 देवा, माझी प्रार्थना ऐक
कृपा करुन माझी दयेची प्रार्थना टाळू नकोस.
2 देवा, कृपा करुन माझे ऐक
आणि मला उत्तर दे मला माझ्या तक्रारी सांगू दे.
3 माझे शत्रू माझ्याविरुध्द वाईट बोलले,
तो दुष्ट माणूस माझ्यावर ओरडला.
माझे शत्रू रागात होते आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला.
त्यांनी माझ्यावर संकटाचा पाऊस पाडला.
4 माझे ह्रदय धडधडत आहे
मी खूप घाबरलो आहे.
5 मी भीतीने थरथर कापत आहे.
मी भयभीत झालो आहे.
6 मला कबूतरासारखे पंख असते तर किती बरे झाले असते.
मी उडून विश्रांतीसाठी एखादी जागा शोधली असती.
7 मी खूप दूर वाळवंटात गेलो असतो.
8 मी पळून जाईन, मी माझी सुटका करेन.
मी संकटांच्या वादळापासून दूर पळून जाईन.
9 प्रभु त्यांचा खोटेपणा बंद कर. [a]
या शहरात मला खूप हिंसा आणि भांडणे दिसत आहेत.
10 माझ्या भोवती संकटे आहेत.
दिवस रात्र आणि शहराच्या सर्व भागात संकटे आहेत
या शहरात महाभयंकर घटना घडत आहेत.
11 रस्त्यावर बरेच गुन्हे घडत आहेत.
लोक सर्वत्र खोटे बोलत आहेत आणि फसवणूक करत आहेत.
12 जर शत्रूंनीच माझा अपमान केला
तर मी तो सहन करु शकेन.
जर शत्रूंनीच माझ्यावर हल्ला केला
तर मी लपू शकेन.
13 परंतु मला संकटात टाकणारा तू आहेस माझा मित्र,
माझा साथी, माझा दोस्त.
14 आपण आपली गुपिंतं एकमेकांना सांगितली
आपण देवाच्या मंदिरात बरोबर प्रार्थना केली.
15 माझे शत्रू त्यांची वेळ यायच्या आधीच मरावेत अशी माझी इच्छा आहे,
जिवंतपणीच त्यांचे दफन व्हावे असे मला वाटते.
का? कारण ते त्यांच्या घरात भयंकर गोष्टी करण्याच्या योजना आखतात.
अलीफज ईयोबला उत्तर देतो
15 नंतर तेमानच्या अलीफजने ईयोबला उत्तर दिले:
2 “ईयोबा, जर तू खरोखरच शहाणा
असशील तर तू पोकळ शब्दांनी उत्तर देणार नाहीस.
शहाणा माणूस गरम हवेने इतका भरलेला नसतो.
3 विद्वान निरुपयोगी शब्दांनी
आणि निरर्थक बोलण्याने वाद घालत बसेल असे तुला वाटते का?
4 ईयोबा तुला जर तुझ्या मनाप्रमाणे वागू दिले तर कोणीही माणूस देवाला मान देणार नाही
आणि त्याची प्रार्थना करणार नाही.
5 तुझ्या बोलण्यावरुन तुझे पाप चांगले कळते.
ईयोबा तू हुशारीने बोलून तुझे पाप लपवायचा प्रयत्न करीत आहेस.
6 तू चुकत आहेस हे सिध्द करण्याची मला आवश्यकता वाटत नाही.
का? कारण तू तुझ्या तोंडाने जे बोलतोस ते तू चुकात असल्याचे सिध्द करतात.
तुझे स्वतःचेच ओठ तुझ्याविरुध्द बोलतात.
7 “ईयोबा, जन्माला येणारा तू पहिलाच माणूस आहेस असे तुला वाटते का?
टेकड्या निर्माण व्हायच्या आधीच तू जन्मलास का?
8 तू देवाच्या गुप्त मसलती ऐकल्यास का?
केवळ तूच एक शहाणा माणूस आहेस असे तुला वाटते का?
9 ईयोब, तुझ्यापेक्षा आम्हाला जास्त माहिती आहे.
तुला न कळणाऱ्या गोष्टी आम्हाला समजतात.
10 केस पांढरे झालेले लोक आणि वृध्द आमच्याशी सहमत आहेत.
होय, तुझ्या वडिलांपेक्षा वृध्द असलेले लोक आमच्या बाजूला आहेत.
11 देव तुझे सांत्वन करतो
पण ते तुला पुरेसे वाटत नाही.
देवाचा निरोप आम्ही तुला अगदी हळुवारपणे दिला आहे.
12 ईयोबा, तू का समजून घेत नाहीस?
तू सत्य का पाहात नाहीस?
13 तू हे रागाचे शब्द उच्चारतोस
तेव्हा तू देवाच्या विरुध्द जातोस.
14 “मनुष्य कधीही निष्कलंक असू शकत नाही.
मनुष्यप्राणी देवापेक्षा अधिक बरोबर असू शकत नाही.
15 देव त्याच्या पवित्र दूतांवर विश्र्वास ठेवत नाही.
देवाशी तुलना करता स्वर्गसुध्दा निर्मळ नाही.
16 मनुष्यप्राणी सर्वांत वाईट आहे,
तो अशुध्द् आणि कुजलेला आहे.
तो वाईट गोष्टी पाण्यासारख्या पितो.
17 “ईयोबा, तू माझे ऐक मी तुला नीट सांगतो.
मला जे माहीत आहे ते मी तुला सांगतो.
18 विद्वानांनी ज्या गोष्टी मला सांगीतल्या,
त्या मी तुला सांगतो.
विद्वानांच्या पूर्वजांनी त्यांना या गोष्टी सांगीतल्या.
त्यांनी माझ्यापासून कुठलीही गुप्त गोष्ट लपवून ठेवली नाही.
19 ते त्यांच्या देशात एकटे राहात होते, तिथून दुसऱ्या देशांतील लोक जात नसत.
त्यामुळे इतरांनी कुणी त्यांना काही विचित्र कल्पना सांगितल्या नाहीत.
20 हे विद्वान लोक म्हणाले, दुष्ट माणूस जीवनभर यातना भोगतो.
क्रूर माणूस मरण येईपर्यंत भीतीने कापत असतो.
(क्रूर माणसाचे दिवस भरलेले असतात. तो त्या दिवसांत ही यातना भोगतो.)
21 त्याला प्रत्येक आवाजाची भीती वाटते.
जेव्हा आपण सुरक्षित आहोत असे त्याला वाटते तेव्हा त्याचा शत्रू त्याच्यावर हल्ला करतो.
22 दुष्ट माणूस निराश झालेला असतो.
व त्याला अंधारातून सुटका होण्याची आशा नसते.
त्याला मारण्यासाठी तलवार टपून बसलेली असते.
23 तो इकडे तिकडे भटकत राहातो परंतु त्याचे शरीर गिधाडांचे अन्न असते.
आपला मृत्यू अगदी जवळ आला आहे हे त्याला माहीत असते.
24 त्याला काळजी आणि यातना भयभीत करतात.
एखाद्या राजाप्रमाणे त्याला नष्ट करण्यासाठी त्या त्याच्यावर हल्ला करतात.
25 का? कारण दुष्ट मनुष्य देवाची आज्ञा मानायला तयार नसतो.
तो त्याच्या मुठी देवासमोर नाचवतो.
तो सर्वशक्तिमान देवाचा पराभव करायचा प्रयत्न करतो.
26 दुष्ट माणूस अतिशय हट्टी असतो.
तो जाड आणि मजबूत ढालीने देवावर हल्ला करतो.
27 माणूस श्रीमंत आणि धष्टपुष्ट असू शकतो.
28 पण त्याचे शहर धुळीला मिळेल.
त्याच्या घराचा नाश होईल.
त्याचे घर रिकामे होईल.
29 दुष्ट माणूस फार दिवस श्रीमंत राहू शकत नाही.
त्याची संपत्ती खूप दिवस टिकत नाही.
त्याची पिके जास्त वाढत नाहीत.
30 दुष्ट माणसाची काळोखापासून सुटका नसते.
तो त्या झाडासारखा असतो ज्याची पाने रोगामुळे मरतात
आणि वारा त्यांना दूर उडवून नेतो.
31 निरुपयोगी गोष्टींवर विश्वास ठेवून दुष्ट माणसाने स्वतःचीच फसवणूक करुन घेऊ नये, का?
कारण त्याला त्यातून काहीही मिळणार नाही.
32 आयुष्य संपायच्या आधीच दुष्ट माणूस म्हातारा आणि शुष्क झालेला असेल.
तो पुन्हा कधीही हिरव्या न होणाऱ्या फांदीसारखा असेल.
33 दुष्ट माणूस द्राक्ष न पिकता गळून गेलेल्या द्राक्षाच्या वेलीसारखा असेल.
तो फूल गळून गेलेल्या जैतून झाडाप्रमाणे असेल.
34 का? कारण ज्यांच्या जवळ देव नसतो त्यांच्याजवळ काहीही नसते.
जे लोक पैशावर प्रेम करतात त्यांची घरे आगीत भस्मसात होतात.
35 दुष्ट माणसे सतत दुष्टपणा करण्यासाठी आणि त्रास देण्यासाठी योजना आखत असतात.
ते लोकांना फसविण्यासाठी योजना तयार करतात.”
लैंगिक पापाविषयी येशूची शिकवण
27 “‘व्यभिचार करू नको’ [a] असे पूर्वी सांगितल्याचे तुम्ही ऐकले आहे, 28 परंतु मी तुम्हांस सांगतो की, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. 29 जर तुझा उजवा डोळा तुला पाप करायला प्रवृत्त करतो तर तो काढून टाक व फेकून दे. संपूर्ण शरीर नरकात जाण्यापेक्षा शरीराचा एखादा अवयव गमावलेला बरा. 30 जर तुझा उजवा हात तुला पापास प्रवृत्त करतो, तर तो तोडून फेकून दे, कारण संपूर्ण शरीर नरकात जाण्यापेक्षा शरीराचा एक अवयव गमावलेला बरा.
घटस्फोटाविषयी येशूची शिकवण(A)
31 “‘जर एखादा मनुष्य आपल्या पत्नीला घटस्फोट देतो तर त्याने तिला घटस्फोटाची लेखी सूचना द्यावी.’ [b] असे सांगितल्याचे तुम्ही जाणता. 32 पण मी तुम्हांला सांगतो की, जो कोणी आपल्या पत्नीला व्यभिचाराच्या कारणाशिवाय इतर कारणामुळे टाकून देतो, तो तिला व्यभिचार करण्यास प्रवृत्त करतो आणि जो कोणी अशा घटस्फोटीत स्त्रीशी विवाह करतो तो व्यभिचार करतो.
शपथ घेण्याविषयी येशूची शिकवन
33 “जेव्हा तू शपथ घेतोस तेव्हा ती तोडू नको. जी शपथ देवाला वाहिली आहे ती खरी कर, [c] असे सांगितल्याचे तुम्ही ऐकले आहे. 34 परंतु मी तुम्हाला सांगतो की, शपथ वाहूच नका, आकाशाची शपथ वाहू नका कारण ते देवाचे आसन आहे. 35 पृथ्वीचीही शपथ वाहू नका कारण ती त्याच्या पायाचे आसन आहे; आणि यरूशलेमाचीही शपथ वाहू नका, कारण त्या नगरीचा राजा देव आहे. 36 आपल्या मस्तकाचीही शपथ वाहू नका, कारण त्याचा एखादा केसही पांढरा किंवा काळा होणे तुमच्या हाती नाही.
2006 by World Bible Translation Center