Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.
20 जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हा परमेश्वर तुमच्या हाकेला धावून
येवो याकोबाचा देव तुमच्या नावाला महत्व प्राप्त करुन देवो.
2 देव त्याच्या पवित्र स्थानातून तुम्हाला मदत पाठवो.
तो तुम्हाला सियोनातून साहाय्य करो.
3 तुम्ही देवाला जे जे होमबली अर्पण केले
त्याची त्याला आठवण राहो तुमचे सर्व त्याग तो स्वीकारो.
4 तुम्हाला जे काही हवे ते देव तुम्हाला देवो.
तुमच्या सगळ्या योजना तो प्रत्यक्षात आणो.
5 देव तुम्हाला मदत करेल तेव्हा आम्हाला आनंद होईल.
देवाच्या नावाचा जयजयकार करु या तुम्ही परमेश्वराला जे जे काही मागाल
ते सर्व तो तुम्हाला देवो अशी मी आशा करतो.
6 परमेश्वर त्याने निवडलेल्या राजाला मदत करतो हे आता मला कळले.
देव त्याच्या पवित्र स्वर्गात होता आणि त्याने स्वत:च निवडलेल्या राजाला उत्तर दिले.
देवाने आपल्या महान सामर्थ्याचा राजाला वाचवण्यासाठी उपयोग केला.
7 काही लोक त्यांच्या रथांवर भरंवसा ठेवतात आणि काही आपल्या सैन्यांवर विश्वास ठेवतात
परंतु आम्ही परमेश्वराच्या, आमच्या देवाच्या नावावर विश्वास ठेवतो आणि त्याच्या नावाचा धावा करतो.
8 त्या दुसऱ्या लोकांचा पराभव झाला.
ते युध्दात मारले गेले परंतु आपण जिंकलो आपण विजयी झालो.
9 परमेश्वराने त्या निवडलेल्या राजाला वाचवले.
देवाने निवडलेल्या राजाने मदतीसाठी हाक मारली आणि देवाने उत्तर दिले.
15 परमेश्वर म्हणतो,
“रामामधून आवाज ऐकू येईल.
तो भयंकर आकांत असेल खूप शोक असेल.
राहेल आपल्या मुलांसाठी रडेल
तिची मुले मेल्यामुळे ती कोणाकडूनही
सांत्वन करुन घेणार नाही.”
16 पण परमेश्वर म्हणतो, “रडू नकोस!
तुझे डोळे आसवांनी भरु नकोस
तुझ्या कामाबद्दल तुला बक्षीस मिळेल”
हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
“इस्राएलचे लोक त्यांच्या शत्रूंच्या देशातून परत येतील.
17 इस्राएल, तुला आशा आहे.”
हा परमेश्वराचा संदेश आहे.
“तुझी मुले त्यांच्या स्वतःच्या देशात परत येतील.
18 एफ्राईमला रडताना मी ऐकले आहे.
एफ्राईमला मी पुढील गोष्टी बोलताना ऐकले आहे.
‘परमेश्वर तू खरोखरच मला शिक्षा केलीस आणि मी धडा शिकलो.
मी बेबंद वासराप्रमाणे होतो.
कृपा करुन मला शिक्षा करण्याचे थांबव.
मी तुझ्याकडे परत येईन.
तू खरोखरच, परमेश्वर, माझा देव आहेस.
19 परमेश्वरा, मी तुझ्यापासून भटकले होते.
पण मी केलेली पापे मला कळली,
म्हणून मी माझे मन आणि जीवन बदलले.
मी तरुण असताना केलेल्या मूर्खपणाच्या गोष्टींची मला लाज वाटते.
त्यामुळे मला ओशाळे वाटते.’”
20 देव म्हणतो,
“एफ्राईम माझा लाडका मुलगा आहे,
हे तुम्हांला माहीतच आहे मी त्याच्यावर प्रेम करतो.
हो! मी नेहमीच एफ्राईमवर टीका केली.
पण तरीही मला त्याची आठवण येते.
तो मला अतिशय प्रिय आहे
आणि मी खरोखरच त्यांच्यावर दया करतो.”
हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
21 “इस्राएलच्या लोकानो, रस्त्यांवर खुणांचे फलक लावा.
घराकडे जाणाऱ्या वाटेवर खूण करा.
वाटेवर लक्ष ठेवा.
तुम्ही ज्या रस्त्यावरुन जात आहात.
त्याचे स्मरण ठेवा.
इस्राएल माझ्या पत्नी, घरी ये.
तुझ्या गावांना परत ये.
22 तू विश्वासघातकी मुलगी होतीस.
पण तू बदलशील.
तू घरी येण्याआधी किती वेळ वाट बघशील?
“परमेश्वराने अघटित निर्माण केले आहे.
स्त्रीला पुरुषाभोवती फिरु दिले.” [a]
येशू यरुशलेमासाठी रडतो
41 जेव्हा तो जवळ आला व त्याने शहर पाहिले, तेव्हा तो त्यासाठी रडला. आणि म्हणाला, 42 “जर आज कोणत्या गोष्टी तुला शांति देतील हे माहीत असते तर! परंतु आता ते तुझ्या नजरेपासून लपवून ठेवण्यात आले आहे. 43 तुझ्यावर असे दिवस येतील की, तुझे शत्रु तुझ्याभोवती कोट उभारतील. तुला वेढीतील, आणि सर्व बाजूंनी तुला कोंडीत पकडतील. 44 ते तुला, तुझ्या मुलांना तुझ्या भिंतीच्या आत धुळीस मिळवतील. व दगडावर दगड राहू देणार नाही. कारण देवाचा तुझ्याकडे येण्याचा समय तू ओळखला नाही.”
2006 by World Bible Translation Center