Revised Common Lectionary (Semicontinuous)
इम्मानुएल-देव आमच्या बरोबर आहे
10 परमेश्वर आहाजशी बोलतच राहिला 11 परमेश्वर म्हणाला, “ह्या सर्व गोष्टी खऱ्या आहेत हे सिध्द् करण्यासाठी तू काही निशाणी मागून घे. तू तुला हवी असलेली निशाणी माग. ती निशाणी पाताळातून येवो अगर आकाशातून.”
12 पण आहाज म्हणाला, “पुरावा म्हणून मी कोठलीही निशाणी मागणार नाही. मी परमेश्वराची परीक्षा पाहणार नाही.”
13 तेव्हा यशया म्हणाला, “हे दाविदाच्या वंशजा, लक्षपूर्वक ऐक. तू लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहातोस. हे पुरेसे नाही म्हणून आता तू देवाच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहेस का? 14 तेव्हा देव माझा प्रभु तुला स्वतःहून चिन्ह देईल:
त्या कुमारिकेकडे पाहा [a] ती गर्भवती आहे.
ती मुलाला जन्म देईल.
ती त्याचे नाव इम्मानुएल ठेवील.
15 इम्मानुएल मध व लोणी खाईल.
अशा रीतीने जगत असतानाच ह्यातूनच तो चांगले करावे व वाईट सोडावे हे शिकेल.
16 पण तो चांगल्या वाईट गोष्टींतील फरक कळण्याइतका मोठा होण्याआधी एफ्राइम (इस्राएल)
व सिरीया हे वैराण बनलेले असतील.
तुला आता त्या दोन राजांची भीती वाटते.
प्रमुख गायकासाठी “भूकमळे” या चालीवर बसवलेले आसाफाचे स्तोत्र.
80 इस्राएलाच्या मेंढपाळा, माझे ऐक.
तू योसेफाच्या मेंढ्यांना (माणासांना) मार्ग दाखवतोस.
राजा म्हणून तू करुबांच्या आसनावर बसतोस.
आम्हाला तुला बघू दे.
2 इस्राएलाच्या मेंढपाळा, तुझे मोठेपण एफ्राइम आणि बन्यामीन व मनश्शे यांच्यासमोर दाखव.
ये आणि आम्हाला वाचव.
3 देवा, आमचा पुन्हा स्वीकार कर
आणि आम्हाला वाचव.
4 सर्वशक्तिमान परमेश्वर देवा, तू आमच्या प्रार्थना कधी ऐकशील?
आमच्यावर तू सदैव रागावलेलाच राहाणार आहेस का?
5 तू तुझ्या लोकांना अन्न म्हणून अश्रू दिलेस.
तेच त्यांचे प्यायचे पाणी होते.
6 तू आम्हाला आमच्या शेजाऱ्यांच्या भांडणाचे निमित्त केलेस.
आमचे शत्रू आम्हाला हसतात.
7 सर्वशक्तिमान देवा, पुन्हा आमचा स्वीकार कर.
आमचा स्वीकार कर आणि आम्हाला वाचव.
17 देवा, तुझ्या उजव्या बाजूला उभ्या असलेल्या तुझ्या मुलाला मदत कर.
तू वाढवलेल्या तुझ्या मुलाला मदत कर.
18 तो तुला सोडून परत जाणार नाही.
त्याला जगू दे आणि तो तुझ्या नावाचा धावा करेल.
19 सर्वशक्तिमान परमेश्वर देवा, आमच्याकडे परत ये.
आमचा स्वीकार कर. आम्हाला वाचव.
1 प्रेषित होण्यासाठी पाचारण केलेला; देवाची सुवार्ता सांगण्यासाठी वेगळा केलेला ख्रिस्त येशूचा सेवक पौल याजकडून. 2 देवाच्या संदेष्ट्यांच्या द्वारे पवित्र शास्त्रात पूर्वी सांगितलेली होती, 3-4 ती ही सुवार्ता देवाचा पुत्र प्रभु येशू ख्रिस्त जो देहाने एक मनुष्य म्हणून दाविदाच्या वंशात जन्माला आला याच्याविषयी आहे.पण पवित्रतेच्या आत्म्याच्याद्वारे तो मरणातून पुन्हा जिवंत झाला त्यामुळे त्याच्या सामर्थ्यासह “देवाचा पुत्र” असा गणला गेला.
5 त्या आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे आम्हांला कृपा आणि प्रेषित पद मिळाले आहे. अशासाठी की जे यहूदी नाहीत त्यांच्यामध्ये त्याच्या नावांकरिता विश्वासाच्या आज्ञापालनामुळे जो आज्ञाधारकपणा निर्माण होतो तो निर्माण करावा. 6 तुम्हीही त्या यहूदी नसलेल्यांमध्ये आणि देवाकडून येशू ख्रिस्ताचे अनुयायी होण्यासाठी बोलाविलेले आहात.
7 ज्या लोकांवर देवाने प्रेम केले आहे व त्याचे पवित्र जन होण्यासाठी बोलाविलेले असे जे लोक रोममध्ये आहेत त्या सर्वांना मी लिहित आहे.
आपला पिता व प्रभु येशू ख्रिस्त यांजकडून तुम्हांस कृपा व शांति असो.
येशू ख्रिस्ताचा जन्म(A)
18 येशू ख्रिस्ताच्या आईचे नाव मरीया होते आणि येशू ख्रिस्ताचा जन्म अशाप्रकारे झाला. मरीयेचे योसेफशी लग्न ठरले होते. परंतु त्या अगोदरच ती पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने गर्भवती आहे असे दिसून आले. 19 तिचा भावी पती योसेफ चांगला मनुष्य होता. तिची लोकांमध्ये बदनामी होऊ नये म्हणून त्याने गुपचूप तिला सूटपत्र देण्याचा विचार केला.
20 पण असे विचार त्याच्या मनात घोळत असतानाच देवाच्या दूताने स्वप्नात त्याला दर्शन दिले आणि सांगितले, “दाविदाच्या वंशातील योसेफा, [a] मरीयेशी लग्न करण्यास अनमान करू नकोस कारण तिला होणारे मूल पवित्र आत्म्यापासून [b] होणार आहे. 21 त्याचे नाव तू येशू [c] ठेव. कारण तो त्याच्या लोकांची पापापासून सुटका करील.”
22 हे सर्व यासाठी घडले की, प्रभुने संदेष्ट्यांच्या द्वारे जे सांगितले होते, त्याची पूर्तता व्हावी. 23 “कुमारी गर्भवती होईल, ती एका मुलाला जन्म देईल आणि ते त्याला ‘इम्मानुएल’ म्हणजे ‘आमच्याबरोबर देव आहे’ असे म्हणतील.”
24 जेव्हा योसेफ जागा झाला तेव्हा देवदूताने जशी त्याला आज्ञा केली होती तसेच त्याने केले, त्याने मरीयेशी लग्न केले. 25 पण तिने मुलाला जन्म देईपर्यंत त्याने तिला जाणले नाही. आणि योसेफाने त्याचे नाव येशू ठेवले.
2006 by World Bible Translation Center