Revised Common Lectionary (Semicontinuous)
कोरहाच्या मुलाचे स्तुतिगीत
87 देवाने आपले मंदिर यरुशलेमच्या पवित्र डोंगरावर बांधले.
2 परमेश्वराला सियोनचे द्वार इस्राएलमधल्या इतर ठिकाणापेक्षा अधिक आवडते.
3 हे देवाच्या नगरी लोक तुझ्याबद्दल आश्चर्यजनक गोष्टी सांगतात.
4 देव त्याच्या सर्व माणसांची यादी ठेवतो त्यापैकी काही मिसर आणि बाबेल मध्ये राहातात.
त्यापैकी काहींचा जन्म पलेशेथ, सोर आणि कूश येथे झाला.
5 सियोनात जन्मलेल्या प्रत्येकाला देव ओळखतो.
सर्वशक्तिमान देवाने ते नगर बांधले.
6 देव त्याच्या सर्व लोकांविषयीची यादी ठेवतो.
प्रत्येकाचा जन्म कुठे झाला ते त्याला माहीत आहे.
7 देवाचे लोक यरुशलेमला खास सण साजरा करण्यासाठी जातात.
ते खूप आनंदी आहेत.
ते गाणी गातात, नाच करतात.
ते म्हणतात, “सगळ्या चांगल्या गोष्टी यरुशलेम मधून येतात.”
17 “मगय तुम्हाला कळेल की मीच
तुमचा परमेश्वर देव आहे.
माझ्या पवित्र पर्वतावर म्हणजे
सियोनावर मी राहतो.
यरुशलेम पवित्र होईल.
त्या नगरीतून पुन्हा कधीही परके जाणार नाहीत.
नवजीवनाचे यहूदाला वचन
18 त्या दिवशी, पर्वत गोड
द्राक्षरसाने पाझरतील,
टेकड्यांवरून दूध वाहील,
आणि यहूदाच्या कोरड्या पडलेल्या नद्यांमधून पाणी वाहील,
परमेश्वराच्या मंदिरातून कारंजे उडतील
आणि शिट्टीमाच्या दरीला पाणी पुरवतील.
19 मिसर उजाड होईल.
अदोमाचे रान होईल.
का? कारण ते यहूद्यांशी क्रूरपणे वागले.
त्यांनी त्यांच्या देशातील
निष्पाप लोकांना मारले
20 परंतु, यहूदामध्ये नेहमीच
लोक राहतील.
ते यरुशलेममध्ये
पिढ्यान्पिढ्या वास करतील.
येशू दोन पुत्रांचा दाखला सांगतो
28 “याविषयी तुम्हांला काय वाटते ते मला सांगा. एका मनुष्याला दोन मुलगे होते. तो मनुष्य आपल्या पहिल्या मुलाकडे गेला आणि म्हणाला, ‘माझ्या मुला, आज तू माझ्या द्राक्षाच्या मळ्यात जा आणि काम कर.’
29 “मुलाने उत्तर दिले, ‘मी जाणार नाही.’ परंतु नंतर त्या मुलाने जायचे ठरविले व तो गेला.
30 “नंतर वडील आपल्या दुसऱ्या मुलाकडे गेले आणि म्हणाले, ‘माझ्या मुला, आज तू जाऊन माझ्या द्राक्षाच्या मळ्यात काम कर.’ त्या मुलाने उत्तर दिले, ‘होय बाबा, मी जातो.’ पण तो गेला नाही.
31 “त्या दोघांपैकी कोणत्या मुलाने वडीलांची आज्ञा पाळली?”
ते म्हणाले, “पहिल्या मुलाने.”
येशू त्यांना म्हणाला, “मी खरे सांगतो, जकातदार व वेश्या हे वाईट लोक आहेत असे तुम्हांला वाटते, पण ते तुमच्या अगोदर स्वर्गाच्या राज्यात जातील. 32 जीवनाचा खरा रस्ता कोणता हे तुम्हांला दाखवावे म्हणून योहान आला आणि तुम्ही योहानाला मानले नाही. जकातदार व वेश्या यांनी योहानावर विश्वास ठेवला हे तुम्ही पाहिले पण तरी देखील तुम्ही आपले मन बदलण्यास आणि योहानावर विश्वास ठेवण्यास तयार झाला नाही.
2006 by World Bible Translation Center