Revised Common Lectionary (Semicontinuous)
कोरहाच्या मुलाचे स्तुतिगीत
87 देवाने आपले मंदिर यरुशलेमच्या पवित्र डोंगरावर बांधले.
2 परमेश्वराला सियोनचे द्वार इस्राएलमधल्या इतर ठिकाणापेक्षा अधिक आवडते.
3 हे देवाच्या नगरी लोक तुझ्याबद्दल आश्चर्यजनक गोष्टी सांगतात.
4 देव त्याच्या सर्व माणसांची यादी ठेवतो त्यापैकी काही मिसर आणि बाबेल मध्ये राहातात.
त्यापैकी काहींचा जन्म पलेशेथ, सोर आणि कूश येथे झाला.
5 सियोनात जन्मलेल्या प्रत्येकाला देव ओळखतो.
सर्वशक्तिमान देवाने ते नगर बांधले.
6 देव त्याच्या सर्व लोकांविषयीची यादी ठेवतो.
प्रत्येकाचा जन्म कुठे झाला ते त्याला माहीत आहे.
7 देवाचे लोक यरुशलेमला खास सण साजरा करण्यासाठी जातात.
ते खूप आनंदी आहेत.
ते गाणी गातात, नाच करतात.
ते म्हणतात, “सगळ्या चांगल्या गोष्टी यरुशलेम मधून येतात.”
यहूदाच्या शत्रूंना शिक्षा करण्याचे परमेश्वर वचन देतो
3 “त्या वेळी, यहूदा व यरुशलेम यांची कैदेतून सुटका करून, मी त्यांना परत आणीन. 2 मी, सर्व राष्ट्रांनासुध्दा गोळा करून, खाली यहोशाफाटाच्या दरीत [a] आणीन. तेथे मी त्यांचा न्यायनिवाडा करीन. त्या राष्ट्रांनी माझ्या माणसांना म्हणजेच इस्राएल लोकांना पांगविले. त्यानी त्याना बळजबरीने इतर राष्ट्रात राहण्यास भाग पाडले म्हणून त्या राष्ट्रांना मी शिक्षा करीन. त्या राष्ट्रांनी माझा देश वाटून घेतला. 3 त्यांनी माझ्या लोकांकरिता चिठ्या टाकल्या. वेश्या खरीदण्यासाठी त्यांनी मुलगा विकला आणि मद्य खरीदण्यासाठी मुलगी विकली.
4 “सारे, सीदोन व पेलेशेथच्या सर्व प्रांतानो, माझ्या दृष्टीने तुम्हाला अजिबात महत्व [b] नाही. माझ्या कृत्याबद्दल तुम्ही मला शिक्षा करीत आहत का? तुम्हाला कदाचित् तसे वाटत असेल. पण लवकरच मी तुम्हाला शिक्षा करीन. 5 तुम्ही माझे सोने-चांदी घेतली. तुम्ही माझा अमूल्य खजिना घेऊन आपल्या मंदिरात ठेवलात.
6 “तुम्ही यहूदाच्या व यरुशलेमच्या माणसांना यावनी लोकांना विकले. अशा रीतीने, तुम्ही त्यांना देशोधडीला लावू शकला. 7 तुम्ही त्या खूप दूर असलेल्या प्रदेशात माझ्या लोकांना पाठविले. पण मी त्यांना परत आणीन, आणि तुम्ही जे काही केले, त्याबद्दल तुम्हाला शिक्षा करीन. 8 तुमच्या मुला-मुलींना मी यहूद्यांना विकीन. मग ते त्या मुंला-मुलींना दूरच्या शबाच्या लोकांना विकतील.” परमेश्वरानेच हे सांगितले.
ख्रिस्ती म्हणून दु:ख सहन करणे
12 प्रिय मित्रांनो, तुमच्यावर मोठे संकट येऊन तुमची कसोटी होते तेव्हा नवल वाटून घेऊ नका. 13 त्याऐवजी, तुम्ही ख्रिस्ताच्या दु:खसहनाचे भागीदार झाल्याबद्दल आनंद करा. यासाठी की, जेव्हा त्याचे गौरव प्रकट होईल तेव्हा तुम्ही आनंदाने आरोळी मारावी. 14 जर तुम्ही ख्रिस्ताचे अनुयायी आहात म्हणून कोणी तुमचा अपमान केला तर तुम्ही धन्य आहात. कारण देवाचा गौरवी आत्मा तुमच्यावर विसावतो. 15 म्हणून, तुमच्यातील कोणास खुनी, चोर, भ्रष्टाचारी किंवा इतरांच्या खाजगी व्यवहारात लुडबूड करणारा म्हणून दु:ख सोसावे लागू नये. 16 पण जर तुम्ही ख्रिस्ती म्हणून दु:ख सहन केले तर तुम्हांला त्याबद्दल लाज वाटण्याचे मुळीच कारण नाही. तर तुम्हांला “ख्रिस्ती” हे नाव मिळाल्याने देवाला गौरव द्यावे. 17 कारण देवाच्या घराण्यापासून सुरुवात करुन न्यायनिवाडा व्हावा अशी वेळ आली आहे. आणि त्याचा आरंभ पहिल्यांदा आपल्यापासून होईल, तर देवाच्या सुवार्तेचा सन्मान करण्याचे जे नाकारतील त्या लोकांचा शेवट कसा होईल बरे?
18 आणि “जर चांगल्या माणसाचे तारण होणे अवघड आहे
तर मग जो अधार्मिक व पापी मनुष्य आहे त्याचे काय होईल?” (A)
19 तर मग ज्यांना देवाच्या इच्छेनुसार दु:ख सोसावे लागते, त्यांनी आपल्या निर्माणकर्त्या देवाच्या हाती आपले जीवन सोपवून द्यावे आणि त्यांनी चांगली कामे करीत राहावे.
2006 by World Bible Translation Center