Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 65

प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.

65 सियोनातील देवा, मी तुझी स्तुती करतो.
    मी कबूल केल्याप्रमाणे तुला अर्पण करीत आहे.
तू केलेल्या गोष्टींबद्दल आम्ही लोकांना सांगतो.
    आणि तू आमची प्रार्थना ऐकतोस.
    तू तुझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाची प्रार्थना ऐकतोस.
जेव्हा आमची पापे आम्हांला खूप जड होतात
    तेव्हा तू माफ करतोस आणि त्यांची भरपाई करतोस.
देवा, तू तुझ्या लोकांची निवड केलीस.
    आम्ही तुझ्या मंदिरात येऊन तुझी प्रार्थना करावी यासाठी तू आमची निवड केलीस आणि आम्ही खूप आनंदी आहोत.
तुझ्या मंदिरातल्या आणि तुझ्या पवित्र राजवाड्यातल्या
    सगळ्या सुंदर विस्मयकारक गोष्टी आमच्या जवळ आहेत.
देवा, आम्हाला वाचव.
    चांगले लोक तुझी प्रार्थना करतात आणि तू त्यांच्या प्रार्थनेला उत्तर देतोस.
तू त्यांच्यासाठी आश्चर्यकारक गोष्टी करतोस.
    सर्व जगभरचे लोक तुझ्यावर विश्वास ठेवतात.
देवाने त्याच्या शक्तीने पर्वत निर्माण केले.
    आपण त्याची शक्ती आपल्या भोवती सर्वत्र पाहतो.
देवाने उन्मत्त झालेल्या खवळलेल्या समुद्राला शांत केले.
    देवाने पृथ्वीवर लोकांचे “महासागर” निर्माण केले.
सर्व जगातील लोक तू केलेल्या विस्मयजनक गोष्टींनी आश्चर्यचकित झाले आहेत.
    सूर्योदय आणि सुर्यास्त आम्हाला खूप आनंदी बनवतात.
तू जमिनीची काळजी घेतोस तू तिच्यावर सिंचन करतोस
    आणि तिला धान्य उगवायला सांगतोस.
देवा तू झरे पाण्याने भरतोस
    आणि पिकांना वाढू देतोस.
10 तू नांगरलेल्या जमिनीवर पाऊस पाडतोस.
    तू शेतजमीन पाण्याने भिजवतोस.
तू जमीन पावसाने भुसभुशीत करतोस.
    आणि तू त्यावर छोट्या रोपट्यांना उगवू देतोस.
11 तू नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या हंगामाने करतोस
    तू भरपूर पिकांनी गाड्या भरतोस.
12 वाळवंट आणि डोंगर गवताने भरले आहेत.
13 आणि कुरणे मेंढ्यांनी झाकली गेली आहेत.
    दऱ्या धान्यांनी भरल्या आहेत.
प्रत्येक जण आनंदाने गात आहे आणि ओरडत आहे.

योएल 2:1-11

परमेश्वराचा येणारा दिवस

सियोन वरुन रणशिंग फुंका!
    माझ्या पवित्र पर्वतावरून मोठ्याने इषारा द्या.
ह्या देशात राहणाऱ्या लोकांचा
    भीतीने थरकाप उडू द्या.
परमेश्वराचा खास दिवस येत आहे.
    परमेश्वराचा खास दिवस अगदी जवळ आला आहे.
तो काळोखा, विषण्ण दिवस असेल.
    तो अंधकारमय व ढगाळ दिवस असेल.
सूर्याेदयाच्या वेळी, तुम्हाला पर्वतावर सैन्य पसरलेले दिसेल.
    ते सैन्य प्रचंड न शक्तिशाली असेल.
यापूर्वाे कधी झाले नाही
    आणि यापुढे पुन्हा असे कधी होणार नाही.
धगधगती आग जसा नाश करते,
    तसा देशाचा नाश हे सैन्य करील.
त्यांच्यासमोरची भूमी
    एदेनच्या बागेसारखी असेल,
पण त्यांच्या मागे निर्जन वाळवंट असेल.
    त्यांच्या तावडीतून काहीही सुटणार नाही.
ते घोड्यांप्रमाणे दिसतात
    सैन्यातील घोड्याप्रमाणे ते धावतात.
त्यांचा आवाज ऐका.
तो आवाज, पर्वतावर चढणाऱ्या
    रथांच्या खडखडाटाप्रमाणे आहे.
फोलकटे जाळणाऱ्या आगीप्रमाणे
    तो आवाज आहे.
ते बलवान आहेत.
    ते युध्दासाठी सज्ज आहेत.
ह्या सैन्यापुढे लोक भीतीने थरथर कापतात
    आणि त्यांचे चेहेरे पांढरेफटक पडतात.

सैनिक जोरात पळतात.
    ते तटांवर चढतात.
प्रत्येक सैनिक सरळ पुढे कूच करतो.
    ते आपला मार्ग सोडीत नाहीत.
ते एकमेकांना रेटीत नाहीत.
    प्रत्येकजण आपल्या वाटेने जातो.
जरी एकावर वार होऊन तो पडला,
    तरी दुसरे कूच करीतच राहतात.
ते नगरीकडे धाव घेतात.
    ते त्वरेने तटावर चढतात.
ते घरात शिरतात.
    चोराप्रमाणे ते खिडक्यांतून शिरतात.
10 त्यांच्यापुढे धरणी व आकाश कापते,
    चंद्र-सूर्य काळे पडतात आणि तारे तळपत नाहीत.
11 परमेश्वर त्याच्या सैन्याला मोठ्याने हाक मारतो.
    त्याचा तळ फार मोठा आहे.
सैन्य त्याच्या आज्ञा पाळते.
    ते सैन्य खूप बलशाली आहे.
परमेश्वराचा खास दिवस हा विलक्षण आणि भयंकर आहे.
    तो कोण सहन करू शकेल?

2 तीमथ्थाला 3:10-15

शेवटच्या सूचना

10 तरीही तू माझी शिकवण, वागणूक, जीवनातील माझे ध्येय, माझा विश्वास, माझा धीर, माझी प्रीति, माझी सहनशीलता ही पाळली आहेस. 11 अंत्युखिया, इकुन्या, आणि लुस्त्र येथे ज्या गोष्टी माझ्या बाबतीत घडल्या, जो भयंकर छळ मीसोसला ते माझे दु:ख तुला माहीत आहे! परंतु प्रभूने या सर्व त्रासांपासून मला सोडविले. 12 खरे पाहता, जे जे ख्रिस्त येशूमध्ये शुद्ध जीवन जगू इच्छितात, त्या सर्वांचा छळ होईल. 13 पण दुष्ट लोक व भोंदू लोक इतरांना वरचेवर फसवीत राहतील आणि स्वतःही फसून अधिक वाईटाकडे जातील.

14 पण तुझ्या बाबतीत, ज्या गोष्टी तू शिकलास व ज्याविषयी तुझी खात्री झाली आहे त्या तू तशाच पुढे चालू ठेव. ती सत्ये ज्या कोणापासून तू शिकलास ते तुला ठाऊक आहे. तू त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतोस. 15 तुला माहीत आहे की, तू आपल्या अतिबाल्यावस्थेत असल्यापासूनच तुला पवित्र शास्त्र वचनांची माहिती आहे. त्यांच्या ठायी तुला शहाणे बनविण्याचे व तारणाकडे घेऊन जाण्याचे सामर्थ्य आहे. ते तुला तारणाकडे नेण्यासाठी लागणारे ज्ञान देण्यास समर्थ आहे.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center