Revised Common Lectionary (Semicontinuous)
40 देव त्याच्या माणसांवर रागावला.
देवाला त्यांचा कंटाळा आला.
41 देवाने त्याच्या माणसांना इतर देशांना देऊन टाकले.
देवाने त्याच्या शत्रूंना त्यांच्यावर राज्य करु दिले.
42 देवाच्या माणसांच्या शत्रूंनी त्यांना आपल्या काबूत ठेवले
आणि त्यांचे आयुष्य कठीण केले.
43 देवाने त्याच्या माणसांना खूप वेळा वाचवले.
पण ते देवाविरुध्द गेले आणि त्यांना जे करायचे होते ते त्यांनी केले.
देवाच्या माणसांनी खूप वाईट गोष्टी केल्या.
44 पण जेव्हा जेव्हा देवाची माणसे संकटात होती
तेव्हा तेव्हा त्यांनी देवाला मदतीसाठी हाक मारली
आणि प्रत्येक वेळी देवाने त्यांची प्रार्थना ऐकली.
45 देवाने नेहमी आपल्या कराराची आठवण ठेवली
आणि आपल्या महान प्रेमाने त्यांचे सात्वन केले.
46 इतर देशांनी त्यांना कैदी बनवले
पण देवाने त्यांना त्याच्या माणसांशी दयाळू राहायला सांगितले.
47 परमेश्वरा, देवा आमचे रक्षण कर इतर देशातून
आम्हाला गोळाकर म्हणजे आम्ही तुझ्या पवित्र नावाचे आभार मानू
आणि तुझे गुणगान करु.
48 परमेश्वराला, इस्राएलाच्या देवाला धन्यवाद द्या.
देव नेहमी राहात आला आहे आणि तो सदैव राहाणार आहे.
आणि सगळे लोक म्हणाले, “आमेन!”
परमेश्वराची स्तुती करा.
परमेश्वर आणि मूर्ती
10 इस्राएलच्या वंशजांनो, परमेश्वर तुमच्याविषयी काय म्हणतो ते ऐका. 2 परमेश्वर असे म्हणतो,
“दुसऱ्या देशांतील लोकांचे अनुकरण करु नका.
आकाशात दिसणाऱ्या काही खास गोष्टींना घाबरु नका.
या आकाशातील गोष्टी बघून दुसरे देश घाबरतात.
परंतु तुम्ही अजिबात घाबरु नका.
3 त्या लोकांच्या चालीरीती अर्थशून्य आहेत.
त्यांच्या मूर्ती म्हणजे दुसरे काही नसून जंगलातील लाकडे आहेत
कामगार लाकूड पटाशीने छिनून त्या मूर्ती बनवितो.
4 ते लोक, त्या मूर्ती चांदीसोन्याने मढवून त्यांना सुंदर रुप देतात.
त्या खाली पडू नयेत म्हणून हातोड्याने
खिळे मारुन घट्ट बसवितात.
5 इतर देशांतील अशा मूर्ती काकडीच्या
मळ्यातील बुजगावण्यासारख्या आहेत.
त्या बोलू शकत नाहीत वा चालू शकत नाहीत.
लोकांनाच त्या वाहून न्याव्या लागतात.
तेव्हा त्यांना घाबरु नका.
त्या मूर्ती तुमचे वाईटही करु शकत नाहीत
व चांगलेही करु शकत नाहीत.”
6 परमेश्वर तुझ्यासारखा दुसरा कोणीही नाही.
तू महान आहेस.
तुझ्या नावातच मोठेपण व सामर्थ्य आहे.
7 परमेश्वर, प्रत्येक माणसाने तुझा आदर केला पाहिजे.
तू सर्व राष्ट्रांचा राजा आहेस.
म्हणूनच सर्वाना आदरणीय आहेस त्या राष्ट्रांमध्ये काही शहाणी माणसे जरुर आहेत
पण तुझ्या इतके सुज्ञ कोणीही नाही.
8 दुसऱ्या देशातील लोक मतिमंद आणि मूर्ख आहेत.
दीड दमडीच्या लाकडाच्या मूर्ती त्यांना उपदेश करतात.
9 ते लोक तार्शिशहून आणलेल्या चांदीचा
आणि उफाजहून आणलेल्या सोन्याचा वापर करुन पुतळे बनवितात.
ह्या मूर्ती सुतार आणि सोनार घडवितात त्या मूर्तीवर ते निळ्या
आणि जांभळ्या रंगाचे कपडे चढवितात
“शहाणे लोक” असे “देव” तयार करतात.
10 पण परमेश्वरच फक्त खरा देव आहे.
खरा सजीव असा केवळ देवच आहें
शाश्वत शासन करणारा असा तो राजा आहें
त्याला राग आल्यास पृथ्वी कंप पावते.
त्याचा कोप देशांतील लोक सहन करु शकत नाहीत.
11 परमेश्वर म्हणतो, “त्या लोकांना पुढील संदेश द्या.
‘त्या खोट्या देवांनी पृथ्वीची आणि स्वर्गाची निर्मिती केली नाही.
ते स्वर्ग आणि पृथ्वीवरुन नाहीसे होतील.’”m
12 ज्याने आपल्या सामर्थ्याने पृथ्वी निर्माण केली असा एकमेव देवच आहे.
आपल्या ज्ञानाचा उपयोग करुन
त्याने जग निर्माण केलें आपल्या समंजसपणाच्या
आधारे पृथ्वीवर आकाश पांघरले.
13 ढगांचा गडगडाट आणि
आकाशातून पडणारा मुसळधार पाऊस ही देवाचीच करणी आहे.
पृथ्वीच्या प्रत्येक भागावरील आकाशात तो मेघ पाठवितो.
पावसाबरोबर वीज पाठवितो.
आपल्या भांडारातून वारा आणतो.
14 लोक अगदी मूर्ख आहेत.
आपण निर्माण केलेल्या मूर्तीमुळेच सोनार मूर्ख बनविले जातात.
त्या मूर्ती म्हणजे फक्त असत्य आहे.
ते फक्त थोतांडच [a] आहे
15 त्या मूर्ती शून्य किंमतीच्या आहेत.
त्या खोट्या आहेत, न्यायदानाच्या वेळी त्यांचा नाश होईल.
16 पण याकोबाचा देव त्या मूर्तीसारखा नाही.
त्याने सर्व गोष्टींची निर्मिती केली
आणि इस्राएलच्या वंशजांची, स्वतःचे खास लोक म्हणून निवड केली.
“सर्वशक्तिमान परमेश्वर” हेच देवाचे नाव.
19 कारण, जरी मी सर्व लोकांपासून मुक्त असलो तरी मी स्वतःला सर्व लोकांचा गुलाम करुन घेतले आहे. 20 यासाठी की, मी अधिक मिळवावे. यहूदी लोकांना जिंकण्यासाठी यहूदी लोकांसाठी मी यहूदी झालो. जे नियमशास्त्राधीन आहेत त्यांच्यासाठी 21 मी नियम शास्त्राधीन असणाऱ्या लोकांसारखा झालो. (जरी मी नियमशास्त्राधीन नाही तरी तसा झालो). यासाठी की जे नियमशास्त्रविरहीत आहेत त्यांना मी नियमशास्त्रविरहीत असा झालो. (जरी मी देवाच्या नियमशास्त्राशिवाय नाही) तरी मी ख्रिस्ताच्या नियमाधीन आहे. यासाठी की, जे नियमशास्त्रविरहीत आहेत त्यांना जिंकता यावे. 22-23 जे दुर्बल आहेत त्यांच्यासाठी मी दुर्बल झालो यासाठी की दुर्बलांना मला जिंकता यावे. मी सर्वांसाठी सर्व काही झालो आहे यासाठी की त्या आशीर्वादाचा वाटेकरी मला होता यावे.
2006 by World Bible Translation Center